हाफु - जपानी कथा.

Submitted by इंग्रजी माध्यमच... on 22 October, 2018 - 05:23

रियो शाळेतून येउन वडलांसोबत सोफावर बसला. त्याचा दुःखी चेहरा पाहुण त्याचे वडिल रोहितने त्याची विचारपूस केली. रियो रागामध्ये जपानी भाषेमधे म्हणू लागला “मी बेसबॉल चांगल्या पैकी खेळून दाखवलं. तरीही मला कॅपटनने टीमधे घेतलं नाही. पुन्हा तसच झालं”. त्याच्या त्याचं जपान टीममधे खेळण्याचा स्वप्न धोक्यात दिसत होतं. रोहित सुद्धा त्या भाषेत म्हणाला “मी भेटायला येतो तुझ्या शिक्षकांशी” . “तुम्ही नका येऊ. मी अाईला घेऊन जातो. तुम्हाला पाहून वर्गातले मुले अजूनच मला चिडवतील”. रोहित शांत झाला. तो सुद्धा थोडा दुःखावला. रोहितने जपानमधे त्याच्या अॉहिसमधल्या जपानी मुलगी सकूरा सोबत लग्नं केलं होतं. रोहितचा वंशज रंग काला असल्यामुळे रियो सकूराच्या पोटी सावला जन्माला अाला होता. जपानमधे ९९% माणसं जपानी अाहेत. तिथली बहुतेक माणसं जातीयवादी असल्या मुले तिथं मिश्रित जातीच्या मुलांना त्रास सहन करावा लागतो. तिथं अश्या मुलांना हाफू म्हणतात. हाफू म्हणजे अर्धा. अर्धा जपानी. तेव्हा नर्सला सुद्धा रियोकडे जाण्यास विचित्र वाटायचं. अाता शाळेत रियो जिथं बसतो, तिथली अाजू- बाजूंची मुळं थोडं लांब होतात. रियोला घराबाहेरील मैदानात खेळायला कोणीच घेत नाही. तो एकटा पडला अाहे. तो लहाणपणापासून खिडकीकडून मुलांना खेळतांना पाहतो. ३ वर्षाचा असताना रियो एका मुलाचा हात पकडून “माझ्या सोबत खेळ ना” म्हणून रडलेला. सकूराने ते पाहून त्याला कडकडीत मिठी मारली. तो अाईच्या मिठीत मनमोकळेपणाने रडू लागला. अाता त्याला अश्या वातावरणांत राहण्याची सवय झाले. शाळेतले शिक्षक चांगले असल्यामुळे तो शाळेत मुलांना अावडत नसतानाही रियो खेळतो. रियो त्यांच्यापासून वेगळा अाहे, असं त्याला वाटतं. कधी कधी त्याला स्वताचा चेहरा अारस्यात पाहून विचित्र वाटतं. अारस्यात पाहून रडतो. त्याला जगासमोर अभिमानानं सांगायचं अाहे की “मी जपानी अाहे”. त्यासाठी त्याला जपान बेसबॉल टीममधे निवडून यायचं अाहे. “मी जेव्हा अंतरराष्‍ट्रीय मॅचमध्ये होमरन शॉट मारेन, तेव्हा पुर्ण स्टेडिमधे जपानी लोकांचा अानंदाचा जल्लोश असेल. मी धावेल. जपानी झेंडा उंचावला असेल. तेव्हा ते मला त्यांचाच वंशज म्हणून स्विकारतील”. रोहित त्याचं पुर्ण समर्थन करतो. त्याची खेळी कशी सुधारता येइल हे तो बघतो. रियो सामांन्य माणुस अाहे, असं त्याला वाटून देण्यासाठी रोहित फॅमिली सोबत काही वर्ष जपान सोडून अमेरिकेत राहू असा विचार सकूराची मांडतो. तिथं तो बेसबॉल ही चांगल्यापैकी शिकेल अाणि तो प्रोफॅशनल खेळाडू झाल्यावर येऊया परत जपान टीममधे सिलेकशनसाठी. अमेरिकेत नोकरीची सोय झाली अाणि विजा अालं की निघून जाऊ.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर... सकारात्मक विचार करायला शिकवणारी कथा.
भाषांतरही खूप सुंदर केले आहे.
मला काही भयाण वगैरे आजिबात वाटलं नाही... तुमची मराठी गोष्टीतून व्यक्त होण्याची कळकळ पोचतेय.
लिहित रहा.
रियोचं पुढे काय झालं हे सांगणारा पुढचा भाग येऊ द्यात.