Submitted by सत्यजित... on 29 July, 2016 - 16:55
असे वाटताहे तुला पाहिल्यावर...
फुला वाटते जे,कुणा वाहिल्यावर!
कशी सांग भेटू नव्याने तुला मी...
उरी डाग गहिरा,जुना राहिल्यावर!
नको चिंब भिजण्या सरी पावसाच्या...
नदी जाहले मी धुके वाहिल्यावर!
तुझा पावसाळा फिरंगी मिठींचा...
बरसतो खरे,पण..मला दाहिल्यावर!
किती जीवना हे..सुगंधी उसासे!
नवा श्वास घेते,जुना साहिल्यावर!
—सत्यजित
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा !!! सुरंगी शब्दांचा
वा !!! सुरंगी शब्दांचा पावसाळा...
'अजी रुठकर अब कहाँँ जाइयेगा
'अजी रुठकर अब कहाँँ जाइयेगा 'या गाण्याच्या चालीत गुणगूणता येतेय .
खूप खूप धन्यवाद माणिकजी!
खूप खूप धन्यवाद माणिकजी! चालीबद्दल विशेष!
मी,ऐ फुलोंकी रानी' या चालीवर
मी,ऐ फुलोंकी रानी' या चालीवर म्हणून पाहिली!
असे वाटताहे तुला पाहिल्यावर..
असे वाटताहे तुला पाहिल्यावर...
फुला वाटते जे,कुणा वाहिल्यावर!
जबरदस्त कल्पना
सुन्दर आहे
सुन्दर आहे
सुरेख गझल. आवडली.
सुरेख गझल. आवडली.
असेच वाटते तुला पाहिल्यावर...
असेच वाटते तुला पाहिल्यावर... मस्तच. आवडली..