मराठी साहित्यातील वाड्ःमयचौर्य (plagiarism) ह्या समस्येवर आपण काही उपाय करू शकतो का? कोणते उपाय असावेत?

Submitted by किल्ली on 17 April, 2018 - 02:36

वाड्ःमयचौर्य हा हल्ली कळीचा मुद्दा झाला आहे.इंग्लिश भाषेत ही चोरी पकडण्यासाठी मुबलक साधने उपलब्ध आहेत. त्यांना plagiarism detection software असे म्हणतात. ही साधने संपूर्ण आंतरजालावरील माहिती बरॊबर तुमच्या लिखाणाची तुलना करून लिखाणामध्ये unique contents चं प्रमाण टक्केवारीमध्ये किती आहे ते सांगतात.अधिक माहितीसाठी ह्या संकेतस्थळाला भेट द्या:
http://www.plagiarism.org/article/what-is-plagiarism

अशी plagarism detection tools देवनागरीसाठी उपलब्ध आहेत का? कुणाला काही माहिती असेल तर सांगावे.
उपलब्ध नसतील तर आपण develop करू शकतो. programmer माबोकर कृपया ह्यावर मदत करा. अस्मादिक स्वतः NLP आणि machine learning जाणतात. त्यामुळे ह्या बाजुने प्रयत्न करता येईल.
admin तुम्हीही मार्गदर्शन करा.

ही साहित्यचोरी कशी पकडावी आणि त्यावर उपाय काय ह्यावर चर्चा करण्यासाठी आणि मत मांडण्यासाठी हा धागा काढत आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

असे कसे पब्लिक बिनधास्त कॉपी करतात.>>> मलाही हा प्रश्न पडला आहे. हल्ली अशी चोरीची खूप उदाहरणे समोर आली आहेत, दरवेळी असे करणाऱ्याला विचारावेसे वाटते की यातून नक्की काय साध्य होते??, नक्की कसला आंनद मिळतो?????

ही लेखक लोकं लिहिताना आपली नावं का लपवतात? टोपण नावं घेण्यामागची काय मानसिकता असते? टोपणनांवाने लिहिण्याचे काय फायदेतोटे असतात? Uhoh

तिथे मायबोलीवरची साडी ही कथाही चोरलेली आहे.

आता ते अतुल बावणे म्हणतील की सायली रहाटे सुद्धा मीच आहे .

प्रतिलिपीवरचा मजकूर कॉपी करता येत नाही असं दिसतंय.
काही मायबोलीकर प्रतिलिपीवरही आहेत, त्यांनी बावणेंचं वाङ्मयचौर्य तिथल्या प्रशासनाच्या लक्षात आणून द्यायला हवं.
हा प्रकार पाहून साहित्यचोरांचं सदस्यत्व रद्द केलंच पाहिजे आणि त्यांचं सर्वच्या सर्व लेखन अप्रकाशित केलं पाहिजे, भले त्यातलं काही त्यांचं स्वतःचं असेल, असं प्रकर्षाने वाटलं.

> हा प्रकार पाहून साहित्यचोरांचं सदस्यत्व रद्द केलंच पाहिजे आणि त्यांचं सर्वच्या सर्व लेखन अप्रकाशित केलं पाहिजे, भले त्यातलं काही त्यांचं स्वतःचं असेल, असं प्रकर्षाने वाटलं. > +१

Submitted by भरत. on 20 October, 2018 - 09:02>>
Pratilipi ला mail केला आहे काल..

हा प्रकार पाहून साहित्यचोरांचं सदस्यत्व रद्द केलंच पाहिजे आणि त्यांचं सर्वच्या सर्व लेखन अप्रकाशित केलं पाहिजे, भले त्यातलं काही त्यांचं स्वतःचं असेल, असं प्रकर्षाने वाटलं. >>> + १११११
पण मग हे ईकडे माबो ला सुद्धा लागु केले पाहिजे असे वाटते .
हा ईकडे ति व्यक्ती दुसरा आय डी घेवुन परत येण्याची शक्यता जास्त आहे, तरी काहीच कारवाई न करता सोडुन देणे म्हणजे ज्यांचे लिखाण चोरले होते त्यांच्यावर अन्याय असे वाटते.
अन आय डी ऊडविताना जर त्यांचे सगळे लेखन अप्रकाशित केले तर कदाचित ईतरांच्या मानसिक त्रासाची थोडीफार जाणिव देखिल होऊ शकते
अर्थात हेमावैम

साडीच्य धाग्यावर मी पण प्रतिक्रीया देवून आले >> यावर त्यांनी लिहीलेय की सायली त्यांच्या पत्नी आहेत
काय खरे काय खोटे माहीत नाही , पण हा जो कोणी अतुल बावणे आहे, खुप पोचलेला आहे हे नक्की.

हा प्रकार पाहून साहित्यचोरांचं सदस्यत्व रद्द केलंच पाहिजे आणि त्यांचं सर्वच्या सर्व लेखन अप्रकाशित केलं पाहिजे, भले त्यातलं काही त्यांचं स्वतःचं असेल, असं प्रकर्षाने वाटलं. >>> + १११११
पण तेव्हाच हेही वाटतं की असे निर्ढावलेले साहितयचोर पुन्हा नवीन id निशी येणार आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. Id उडवल्याने त्यांना काही दुःख वगैरे होईल असे वाटत नाही आणि स्वागताला लोकही तयार असतील Happy

नुकत्याच उघड झालेल्या काही घटनांवरून (वर दिलेली आणि मागे एकदा दुसरीकडे आलेली) हे लक्षात घेण्यासारखं आहे, की केवळ साहित्यचोरांवर कारवाई करणे पुरेसे नाही. पुढे निदान मायबोलीवरून चोरी होऊ नये म्हणून शक्य तेवढी खबरदारी घेणे आवश्यक आहे. सध्या इथले सर्व लिखाण सरळ कॉपी पेस्ट करण्याजोगे आहे. त्यास आळा घालून निदान मुख्य लेख तरी 'लेखन सिलेक्ट करता येणार नाही' असे करायला हवेत. (किंवा तशी सोय निवडण्याचा पर्याय लेखकांना हवा). अगदी करायचेच म्हटले तर एखाद्याला लेख पाहून स्वतः टाईप करता येईलच, पण निदान सहज कॉपी-पेस्ट करता येईल, अशी चौर्य-सुलभ सुविधा नको.

निव्वळ गैरसमज दूर करण्याच्याहेतुने मी हा प्रतिसाद देत आहे. यात कुणाचे नुकसान करण्याचा उद्देश नाही किंवा कोणत्याही बेकायदेशीर कृत्याचे समर्थन नाही. परंतु, हे असे माउस क्लिक डिसेबल असलेल्या वेब पेज वर लिहिलेले सोप्या पद्धतीने कॉपी करता येतं. ही माहिती आधीपासुनच ईंटरनेटर खुले आम पब्लिक डोमेन मधे उपलब्ध आहे.

अभि_नव, तुमचं बरोबर आहे. जितकी जास्त खबरदारी घेऊ तितक्यावरही तोडगा शोधणे चोरांना शक्य आहे. परंतु मामुली चोर तरी यातून वगळले जातील. म्हणजे कुलूप फोडून चोरी करणं किंवा काडीने कुलूप उघडता येणं शक्य आहे, म्हणून कुलूपच लावू नये असं नाही ना! ज्यांना ती कला अवगत नाही, किंवा जे तितके कष्टाळू चोर नाहीत, असे तरी घरात शिरणार नाहीत.

बाकी सारे गेले उडत, माझे प्रिय मित्र बेफिकीर गेले कित्येक महिने दिसले नाहीयेत माबो वर.

अक्षय दुधाळ देखील भरपूर चोऱ्या करून टिकून आहेत.

माबो ला क्लिका कमी पाडायल्यात का?

<<< प्रतिलिपीवरचा मजकूर कॉपी करता येत नाही असं दिसतंय. >>>
हा घ्या अख्खा मजकूर कॉपी करायला. कसा करायचा ते शिकायचे असेल आणि विचारलेत तर ते पण सांगतो. Wink

मक्याचे दाणे तव्यावर ठेवल्यावर जसे आनंदाने उड्या मारतात, तसंच गौरवचं मनही उड्या
मारत होतं, कारण आज त्याला बोनस मिळाला होता. गौरव आपल्या सायकलवर स्वार
होऊन वाऱ्याशी गप्पा मारत चालला होता. केक आपल्या तोंडाचा स्वाद वाढवतो आणि
त्यावर असलेली आयसिंग डोळ्यांचा स्वाद वाढवते, त्याचप्रमाणे आपला
महिन्याचा पगार आणि बोनस नेहमीच्या गरजांचा स्वाद वाढवतो. काही सण असेल तरच
आपल्याला बोनस मिळतो. पण यावेळी काही सण नसतानासुद्धा गौरवला बोनस मिळाला
होता. म्हणजे झाला ना बोनस वर बोनस, पिझ्झावर डबल सकूप फ्री! बोनस
मिळाल्यावर रमाला किती आनंद होईल याचा तो विचार करू लागला.दूध उखळवलं
तेव्हा माशी पडली नाही. दुधावर बराच वेळ झाकण नव्हतं तरीही पडली नाही. दूध
ग्लासात काढलं तेव्हा पण नाही पडली. पण, पिणाऱ्याच्या हातात देत असतानाच
माशी पडली. गौरव बोनसची खुषखबरी त्याची बायको रमाला देणारच होता, तितक्यात
माशी पडली. गौरवच्या घराच्या शेजारी एका लहान मुलाचा वाढदिवस सुरु होता. हे
बघताच गौरवाने सायकलला करकचून ब्रेक मारला आणि घरी न जाता बाजारात गेला.
सकाळी जेव्हा रमा नटून-थटून तयार झाल्यामुळे सुंदर दिसत होती तेव्हा लक्षात
आलं नाही; तिने नाश्त्याला खीर-पुरी बनवली तेव्हाही लक्षात आलं नाही; बोनस
मिळाला तेव्हाही लक्षात आलं नाही; आता सगळी दुकान बंद झाली तेव्हाच माशी
पडायला हवी होती! आत्ताच लक्षात यायला हवं होतं की आज लग्नाचा वाढदिवस आहे!कुकरमध्ये
भिजवलेले तांदूळ ठेवल्यावर; त्याचं झाकण बंद केल्यावर कुकरची शिटी
शोधण्यासाठी जी घाई असते तशीच घाई गौरवच्या चेहऱ्यावर होती. बाजारात फक्त
शोरूमच चालू होते. आता काय करायचं? श्रीमंत गृहिणी आपल्या पतीला खुश
करण्यासाठी संजीव कपूरची महागडी पुस्तक विकत घेतात आणि गरीब रमासारख्या
बायका कागद-पेन घेऊन त्यातल्या रेसिपी लिहून घेतात तसंच गौरव्ही त्याच्या
कुवतीप्रमाणे साडीचं दुकान शोधत होता. घरात साखर संपली तर आपण ना चहा पिऊ
शकत, ना दूध; स्वस्त दुकानं बंद झाल्यामुळे गौरव साडी न घेताही घरी जाऊ शकत
नव्हता आणि महागडी साडीही घेऊन जाऊ शकत नव्हता. जर गौरव गिफ्ट घेऊन गेला
नाही तर रमा नाराज होईल कारण सकाळपासून एखादा सण असल्यासारखी ती खुश होती.
तो पत्नीच्या कंजूस स्वभावाबद्दलही जाणून होता. जर त्याने महागडी साडी नेली
तर रमा गौरववर उकळत्या तेलासारखी खवळेल. पाहुणे आल्यावर जर आपल्याकडे दूथ
नसेल तर सरबतही बनवायला लागतं; लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा असेल तर
कधी-कधी महागातली साडीही खरेदी करायला लागू शकते याचा विचार करत गौरव
शोरूममध्ये गेला. असं जरुरी नाही की प्रत्येक शोरूममध्ये महागड्याच साड्या
असतील; कधी कधी एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्येसुद्धा कमी किमतीत चांगले
पदार्थ मिळतात.गरम गरम बटाटेवड्यांचा वास जसा एखाद्या खवय्याला आपोआप
तिकडे ओढून नेतो तसंच गौरवलाही शोरूममधला झगमगाट ओढून नेत होता. तिथे
एकापेक्षा एक साड्यांचे काउंटर होते. गौरव तिथल्या साड्या पडताळून पाहत
होता जसा एक लहान मुलगा खिशात दोनच रुपये असताना मिठाईचं दुकान पाहत असतो.
सिल्क, भरजरी, कॉटन, जॉर्जेट, शिफॉन, बांधणी, पैठणी अश्या बऱ्याच
प्रकारच्या साड्या होत्या. कोणाला डायबेटीस असेल तर तो चमचमीत पदार्थ खाऊ
शकत नाही, पण रेसिपी वाचायला काय हरकत आहे; गौरवाने विचार केला, कि जरी
आपली सिल्क साडी घेण्याची ऐपत नसली तरी साड्या बघायला काहीच हरकत नाही.बनारसी,
शालू, चंदेरी, टसर सिल्क, राजेशाही सिल्क, मुग्गा सिल्क, बालुचारी सिल्क,
मुर्शिदाबाद सिल्क, कंथा, संबळपुरी, सोनपुरी, ब्रम्हपुरी, मथा, पैठणी,
पटोला इकत, म्हैसूर सिल्क, कांचीपुरम, पोचमपल्ली, व्यंकटगिरी सिल्क…जसं काय
सेल्समन फाईव्ह स्टार हॉटेलचा मेनू वाचतोय आणि गौरवला भूकच लागली नाहीये.सेल्समनने
विचारलं,'कोणती साडी दाखवू?' एखाद्या आई परदेशातून येणाऱ्या तिच्या
मुलासाठी खूप सारे पदार्थ बनवून ठेवते. पण मुलगा आईला म्हणतो की मी फक्त
फळंच खातो. गौरवनेसुद्धा तसंच उत्तर दिलं,'कॉटन साडी'.'अहो भाऊ, हे सिल्कचं काउंटर आहे. कॉटन तुम्हाला तिकडे मिळेल' - सेल्समन.गौरवने कॉटन काउंटरकडे जात जाता मनात म्हटलं,'अरे, घरात चकली बनवण्याचा साचाच नसेल तर चकली कशाला बनवायला निघालास?'तिथल्या
सेल्समनने माझ्याकडे बघितलं आणि त्याच्या ढाब्यावरचं मेनूकार्ड वाचून
दाखवलं. कोटा, कलकत्ता कॉटन, खादी कॉटन, साउथ इंडियन कॉटन, संबळपुरी कॉटन,
कंथा कॉटन… सेल्समन पुढे काही बोलण्याआधी हा ऐकतोय कि नाही हे पाहण्यासाठी
त्याने एकदा गौरवकडे बघितलं; जसं भात चुलीवरून काढण्याआधी आपण तपासून बघतो
कि भात शिजला आहे की नाही. कांदा जेव्हा तेल सोडायला लागतो तेव्हा समजतं कि
तो व्यवस्थित भाजला गेला आहे. गौरवला भर ए.सीत घाम फुटला तेव्हा सेल्समनला
समजलं की हा गोंधळात पडला आहे. वाफ बाहेर आल्यावर जसं इडलीला पाणी सुटत
त्याप्रमाणे गौरवच्या अंगाला घाम आला होता. इडली शिजली आहे की नाही हे
बघण्यासाठी आपण इडलीमध्ये सूरी घुसवून पाहतो; सेल्समनने आपल्या प्रश्नांची
सूरी घुसवून गौरवची नजर वाचली.'तुम्हाला कोणत्या रेंजमध्ये दाखवू?'
एखादा नवीन शेजारी राहायला आला तर शेजारणी त्यांच्याकडन येत असलेल्या
स्वयंपाकाच्या वासानेच समजून जातात कि नवीन शेजारी शाहाकारी आहे की
मांसाहारी! सेल्समनसुद्धा हा प्रश्न विचारून ग्राहकाची कुवत समजून घेतात.गौरवकडे
तर बोनासचे दोन हजार रुपयेच होते. सगळा पगार तर कालच त्याने रमाच्या हातात
दिला होता. सगळ्या दह्याचं तर ताक बनवलं, आता दह्यातली कोशिंबीर कशी
करायची?'दोन हजार?' खिशातून दोन हजार काढून देण्याच्या अविर्भावात गौरवाने विचारले.सेल्समनने मनात विचार केला,'हा माणूस आपल्यासारखाच मध्यमवर्गीय दिसतोय. आपण त्याला मदत केली पाहिजे'.एकसारखी कापलेली भाजी पटकन शिजते आणि सारखीच परिस्थिती असलेली माणसे एकमेकांकडे लगेच आकर्षित होतात.त्याने विचारले,'कोणासाठी साडी खरेदी करायची आहे? कोणत्या प्रसंगसाठी हवी आहे?'एखादी
रेसिपी वाचूनसुद्धा जर ती करायला जमली नाही तर कोणत्यातरी जाणकार
माणसाकडून मदत घ्यावी. गौरवला साडी खरेदी करण्यास अडचण होत असल्याने त्याने
सरळ-सरळ सेल्समनची मदत घेतली.'काय सांगू यार! आत्ता सगळी साडीची
दुकानं बंद झाल्यावर लक्षात आलं की आज लग्नाचा वाढदिवस आहे. बायकोला साडी
घेतली पाहिजे. जर साडी घेऊन नाही गेलो तर ती दुःखी होईल. बाजारात फक्त
तुमचंच दुकान चालू होत म्हणून आलो इथे. आता मला समजत नाहीये कि कोणती साडी
घेऊ?'कधी कधी स्वतःच्या हाताने केलेल्या रेसिपेने पतीला खुश करू शकलो
नाही तर शेजारणीचीसुद्धा मदत घ्यावी लागते. त्याने सेल्समनकडून मदत
मागितली.'तुम्ही कशाला काळजी करता? दोन हजारात मस्त साडी दाखवतो. हि
बघा, एकदम लालेलाल डिझाइनर साडी आहे. वहिनी तर बघूनच खुश होतील. माझी
गॅरंटी आहे! खरंच! मार्केटमध्ये एकदम नवीन आहे. पण त्या काउंटरवर… हा तर
कॉटन काउंटर आहे.त्या सेल्समनने गौरवला दुसऱ्या काउंटरवर नेऊन एका
साडीचे पॅकेट खोललं. जसं लस्सीवाले लस्सी बनवताना ती हवेत उडवून एका
ग्लासातून दुसऱ्या ग्लासात ओततात तसंच सेल्समनने साडी हवेमध्ये उडवून
तिथल्या बिछान्यावर पसरवली. एखाद्या केकच्या दुकानातला बार्बीचा केक पाहून
लहान मुलांना जसा आनंद होतो, तसाच आनंद गौरवला तिथे पसरवलेली लाल रंगाची
डिझाइनर जॉर्जेट साडी पाहून झाला.खूप भूक लागली असेल आणि किचनमधून खूप
छान सुगंध येत असेल तर लगेच जेऊन घेतलं पाहिजे. गौरवनेसुद्धा लगेचच साडी
पॅक करून घेतली. दूध उकळून वर आल्यावर कोणी पटकन येऊन गॅस घालवला तर त्याचे
आभार मानले पाहिजेत. गौरवनेही त्या सेल्समनचे आभार मानले आणि दूध वाचलं
म्हणून निश्वास सोडला.तेलामध्ये तरंगत असलेल्या पुरीसारखा सायकलवरून
तरंगत गौरव घरी पोहोचला. ताटात गुलाबजाम वाढण्याआधी कडू कारलं वाढूया
म्हणजे गुलाबजाम वाढल्यावर मेहनतीची प्रशांसा होईल हा विचार करून गौरव
सायकलच्या कॅरियरवर साडी ठेऊन रिकाम्या हातीच घरी गेला. आंब्याला खूप
दिवसंपर्यंत पेंढयात ठेवल्यावर आपण ज्या आशेने पेंढयातुन आंबे बाहेर काढतो,
त्या आशेने रमाने गौरवाकडे पाहिले."खूप दिवसापासून साडी आणा असं
सांगूनसुद्धा आंबा पिकला नाही तर कुसून गेला आहे. गौरवचा हात रिकामाच आहे".
काजू कापताना हातांची जी अवस्था होते तशी अवस्था रमाच्या मनाची झाली होती.रमा
काहीही न बोलता किचनमधून जेवण घेऊन आली. नुकत्याच विझवलेल्या चुलीतून जसा
धूर निघतो तसाच धूर रमाच्या उदास चेहर्यावरून येत होता. हे पाहून गौरवला
हसू येत होतं. गौरवला जेवायला वाढून रमा स्वतः जेवायला बसली. बोलण्यासाठी
हीच योग्य वेळ आहे हे गौरवला समजलं."अग, हे काय? आज एकच पोळी?""होय, माणसाने कमीच खाल्लं पाहिजे. त्यामुळे आपलं शरीर लवचिक राहत.""माझं
ठीक आहे. पण तुला दिवसभर घरात काम करावं लागतं. काय माझा पगार तुला पुरत
नाही म्हणून तू असं पोटाला चिमटा काढून जगतेस? मी दुसरी नोकरी बघतो. तुझ्या
नशिबात जर दोन वेळचं पोटभर जेवण मिळत नसेल तर अशी नोकरी काय कामाची?""अहो! नाही नाही असं काहीही नाही. गेल्या महिन्याचा अर्ध्यापेक्षा जास्त पगार मी वाचवला आहे!रमा
जेवणाच्या ताटावरून उठली आणि किचनमध्ये जाऊन तांदळाच्या डब्यात लपवलेले
पैसे घेऊन गौरवला अशा गर्वाने दाखवलं जसं नवीन भाजीचा प्रकार केल्यावर
शेजारणीला टेस्ट करण्यासाठी दाखवला जातो."ही बघ गेल्या महिन्याची बचत!"मसाला
डोश्यावर सोडलेल्या तुपाची जशी चमक असते तशीच आत्मप्रशंसेची चमक रमाच्या
डोळ्यांमध्ये दिसत होती. रसगुल्ला बनवण्यासाठी गरम तेलात टाकलेल्या
मैद्याच्या गोळ्याप्रमाणे लाल होऊन गौरव ओरडला,"काय करशील? या पैशांची
भाकरी करून खाशील?'नंतर थोडं शांत होऊन, स्वतःच्या शब्दांना साखरेत
घोळवून गौरव म्हणाला,"रमू! या नोटा तुझ्या ताटातल्या भाकरीचं काम नाही करू
शकत! तुला दोन भाकऱ्या जास्त खाण्यासाठी हे पैसे खर्च करावे लागतील. तू
खाल्लेली भाकरी तुला जास्त कमााला येईल, हे डब्यात लपवलेले पैसे नाही!पाव-भाजीसाठी
बटाटा जसा कुस्करला जातो, तसंच गौरवच्या अशा बोलण्याने रमाची आत्मप्रशांसा
कुस्करून टाकली. त्यामुळे लाडूमध्ये लपलेल्या काजू-बदामाप्रमाणे रमाने
आपली पाठ किचनमध्ये लपवली.परिस्थिती बिघडत चाललेय हे गौरवच्या लक्षात
येताच गौरवने खारट भाजीवर लिंबू पिळण्याचा निर्णय घेतला आणि बाहेर जाऊन
साडी घेऊन आला. त्याने साडी उशीवर अशा प्रकारे सजवली, जसं कांदेपोह्यांवर
कोथिंबीर आणि खोबरं सजवतात.रमा किचनमधून हात पुसत-पुसत बाहेर आली. डायनिंग टेबलावर छप्पन्न भोग सजवल्याप्रमाणे ती त्या साडीकडे बघू लागली.रमाने चमकत्या डोळ्यांनी विचारलं,"किती रुपयाची आहे" करंजी खाताना वेलचीऐवजी काळीमिरीचा स्वाद आला आहे असं गौरवला वाटलं."तुला काय करायचंय. तू साडी बघ ना"."अहो! सांगा ना किती रुपयाची आहे"."जसं
टोमॅटो ऑमलेटमध्ये अंड नसूनसुद्धा त्याची चव छान लागते तसंच साडीची चुकीची
किंमत सांगून रमाच्या आनंदाची चव कशाला बिघडवायची" गौरव मनात म्हणाला."एक हजार""एक हजार? खरंच? हि तर खूपच सुंदर साडी आहे".गाजर
हलवा आवडणारा व्यक्ती थोड्याच वेळात हलव्यवर तुटून पडणार होता पण त्याच्या
लक्षात आलं की त्याला तर अपचन झालं आहे, त्यामुळे तो थांबतो.रमा पण
अचानक थांबली आणि म्हणाली,"एक हजाराच्या साडीची काय गरज आहे?
शे-दोनशेचीसुद्धा चालली असती. एवढा खर्च कशाला केलात? माझ्याकडे खूप साड्या
आहेत."काय? खूप साड्या आहेत तुझ्याकडे? तुझ्याकडे एकूण सहाच साड्या
आहेत हे मला माहित आहे. साडी बघून तुझा चेहरा जेव्हा चमकला तेव्हाच माझे एक
हजार रुपये वसूल झाले.इडली-सांबार करत असताना सांबारामध्ये सांबार
मसाला कशाला टाकायचा, खरतर रमाच्या कंजूस स्वभावानुसार गरम मसालादेखील
चालला असता. गौरव तर सांबार मसाल्याच्या बाजूने आपले पुरावे देऊन शांत
झाला. पण रमा कशी शांत होईल?""सहा साड्या काय कमी आहेत. अहो, माझ्या
आजी-पणजीने तर दोन साड्यांमध्ये संपूर्ण आयुष्य काढलं. एक अंगावर
घालण्यासाठी आणि दुसरी धुवून सुकवण्यासाठी. जर तुमचं एवढंच मन होत तर एखादी
स्वस्तातली साडी घेऊन यायची"."बर, बर. ती साडी उचल बिछान्यावरून. मला झोपायचं आहे".★★★★★रमाने सकाळी गौरवला चहा दिला आणि स्वतःही चहा प्यायला बसली. चहात साखर नव्हती. गौरव तोंड बिघडवत म्हणाला,"हे काय? यांच्यात साखरेऐवजी गुळ का टाकला आहेस?""गुळ शरीराला चांगला असतो. बर्याच दिवसापासून माझ्या मनात तुमची साखर सोडवण्याचा विचार सुरू होता. शेवटी आजपासून सुरुवात केली"."असं! मग उद्यापासून चहाच बनवू नको. तुझी चहापावडर आणि दूधही वाचेल!""अहो! तुम्हाला तर चहाची सवय आहे. जर तुम्ही चहा पिला नाहीत तर तुमचं डोकं दुखायला लागत"."उद्यापासून बाहेरच पित जाईन"."मग काय फायदा? उलट पैसे जास्त जातील"."तू काय सुधारणार नाहीस ना?"नेहमी
स्वादिष्ट पदार्थ खाणाऱ्या आजारी माणसाला जसं मुगाची खिचडी खायला दिली तर
तो ती खिचडी अर्धवटच खाऊन सोडून देतो तसंच गौरवसुद्धा अर्धवट चहा पिऊन
कामावर निघून गेला.रमा त्या लाल साडीत खूप सुंदर दिसेल. तिने
आत्तापर्यंत ती साडी दहावेळा नेसून पहिली असेल याचाच विचार गौरव दिवसभर करत
होता. जसं कोणितरी भारतामध्ये बसून अफगाणचा पुलाव स्वादिष्ट असेल की
भारताचा पुलाव स्वादिष्ट असेल याचा विचार करत बसतो. दिवस तर कसातरी संपला,
पण संध्याकाळी गौरव भूक लागल्यासारखा जेवणावर तुटून पडण्यासाठी लवकर घरी
निघाला. फोटो बघून एखादा पदार्थ ऑर्डर केल्यावर जसं तो पदार्थ स्वादिष्ट
असेल याची फक्त कल्पनाच केली जाऊ शकते, तसं गौरव रस्त्याने जात-जात फक्त
कल्पनाच करत होता की रमा त्या साडीमध्ये नटून-थटून दरवाजावर त्याची वाट
पाहत असेल.पण गौरव घरी पोहोचला तेव्हा ना दारावर कोणी उभं होतं, ना
रमाने ती साडी नेसली होती. गावजेवणासाठी जेवण तर तयार केलं आहे पण कोणाला
जेवणासाठी आमंत्रणच देता आलं नाही अशी गौरवची अवस्था झाली होती. जाऊदे,
तुपाऐवजी डालड्यानेच काम चालवून घेऊ."अरे व! आज तर तुम्ही लवकर आलात?""हं""चहा आणू?""आण"जसा एक खराब आचारी हॉटेलचा धंदा बिघडवू शकतो तसाच रमाच्या गुळाच्या चहाने गौरवच्या चहा पिण्याचा उत्साहच बिघडवला होता.चहाचे घोट घेता-घेता रमाने विचारलं,"काय झालं? तुमचा चेहरा का असा उतरलाय? ऑफिसमध्ये काही टेन्शन आहे का?""काही नाही""नक्कीच काहीतरी झालय"."ते…मी""हं ऐकतेय मी""मला ती कालची साडी नेसून दाखवशील का?"रमाच्या गालांवर लाजेने असा खड्डा पडला जसा मोदक बनवताना पिठामध्ये केला जातो."अहो, तुमच्या साडीने तर कमालच केली!""का? काय झालं? तू ती साडी नेसली होतीस का?""अहो नाही. ती साडी मी माझ्या मैत्रिणींना दाखवली"."मग, त्यात काय आश्चर्य?'"आश्चर्य हे कि त्या साडीमुळे मला दोनशे रुपयांचा फायदा झाला"."चहाचा कप संपवून गौरवने विचारलं,"ते कसं?""माझी मैत्रीण मानसीला ही साडी इतकी आवडली, इतकी आवडली कि तिने मला या साडीचे बाराशे रुपये दिले".घरी येता येता गौरवने जी स्वप्न पहिली होती ती एखाद्या भाजीसारखी करपली होती. गौरवने डोळे फाडून विचारले,"मग?""मग काय? दोनशे रुपयांचा फायदा मी कसा काय सोडेन? मी पटकन ती साडी मानसीला देऊन टाकली.सोनपापडी बनवताना बेसनपीठाची जी अवस्था होते तशीच अवस्था गौरवच्या मनाची झाली होती.

मला वाटते submitted by सोडून इतरांना राईट क्लिकचे अधिकार नसावेत . हे अधिकार मजकूर प्रकाशित करताना लेखकाला ठरविता यावेत . जर लेखक असे करायला विसरला तर आपोआप राईट क्लिक डिसेबल व्हावे.
कॉपी-पेस्टच्या प्रयासाचे Log लेखकाला दिसावेत.

अक्षय दुधाळ देखील भरपूर चोऱ्या करून टिकून आहेत.
>>> तो दत्तकपुत्र आहे इथला
मायबोली प्रशासनाने वरदान दिलेय त्याला

आता तर तिथले काई सदस्य ड्यु आयडीने लिहतात असे नुकतेच दिसले

IMG_20181022_092414.jpg

आता तिथे काही बोलून ही फायदा नाही..
Pratilipi ला सुद्धा आता हेच वाटलं असेल की हेच बेफिकीरजी आहेत आणि सायली यांच्या बायको..
म्हणून अजून ही काही action घेतली नाहीये..
ज्यांची कथा चोरली आहे त्यांना personally संपर्क करून सुद्धा त्यांचा काही Reply नाही..
त्यामुळे Pratilipi वर काही बोलून काहीच होणार नाही
Atleast तोपर्यंत तर नाहीच जोपर्यंत स्वतः या कथांचे खरे लेखक काही बोलत नाही.
__/\__

वा वा छान!
प्रतिलिपीचे कौतुक आहे Happy आणि कविता तुमचे ही Happy

वैशाली आणि भरतजी यांनी प्रकार निदर्शनास आणून दिला म्हणून तक्रार करता आली..
विनिता तुम्ही सुद्धा तिथे योग्य तो प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.

Submitted by अंकु on 22 October, 2018 - 12:30>>>
Happy

छान झालं.

तिथे रिपोर्ट करायची सोय आहे, ती वापरून आज मी इथल्या लेखनाची लिंक दिलेली.
पण कविता यांनी केलेल्या पाठपुराव्याने बहुधा आधीच काम झालं असावं.

विनिता व सर्व सहृदय मित्रांनो

खूप आभारी आहे हे निदर्शनास आणून दिल्याबद्दल

विपु वाचल्या, पायाला भिंगरी असल्यामुळे उत्तर इथेच देत आहे, कृपया राग नसावा

पण अश्या वेळो काया करायचे हे माहीत नाही

धन्यवाद बेफिकीरजी Happy

पण अश्या वेळो काया करायचे हे माहीत नाही >> केलेय हो आम्ही, आम्हांला लक्षात आले तसे! पण त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला ह्याचा आनंद आहे Happy

माबोवर निंबुडा ह्यानी लिहिल्या अनुवादित शेरलोक कथा प्रतिलिपीवर मला अनिल चव्हाण ह्या नावाने दिसल्य आहेत, २०१८ मध्ये पोस्ट झाल्या आहेत, माझ्याकडे त्याचा स्नॅपशॉट आहे

अनिल चव्हाण उर्फ आबा ह्यानावाचे कोणी माबोवर आहेत का? त्यान्चा आणि निंबुडा ह्या आयडीचा काही संबन्ध आहे आहे?

माझ्या मते निंबुडा ह्यान्चे लिखाण चोरीला गेले आहे.. मी त्याना विपु केली आहे, कुणी त्याना वैयक्तिकरित्या ओळखत असेल तर ही चोरी झाली आहे असे कळवा

एकंदर प्रतिलिपी वर चोरलेले लिखाण जास्त व ओरिजिनल कमी येत असेल तर साईट च्या प्रशासकाना धोरणे आणि डिस्क्लेमर कडक करायला हवेत.
व्हीसल ब्लॉअर ला त्याने योग्य पुरावे दाखवल्यास काहीतरी रिवार्ड देणे(म्हणजे त्याचे लिखाण अमुक दिवस वरच राहील इ.) आणि योग्य पुरावे दाखवून लोकांना व्हीसल ब्लोअर बनण्यास प्रोत्साहन देणे असं करता येईल.(अर्थात हे न करताही साईट सुरळीत चालू आहे त्यामुळे हे जास्तीचे उद्योग ते करतील असं वाटत नाही.)

पहिल्यांदा वा सुरुवाती सुरुवातीला वाईट वाटते लिखाण चोरीला गेल्याचे...
मग सवय होऊन जाते..
कालांतराने केलेल्या लिखाणात जीव अडकवून न ठेवता पुढे जायचे ही प्रगल्भता येते Happy

ग फेक आयडी बनवून मुद्द्यांम चोरलेले लिखाण टाकतील पकडून देऊन रेवार्ड मिळवण्यासाठी>>> खरय

अनिल चव्हाण ह्यान्चे प्रतिलिपी प्रोफाईल पाहिल्यावर शेर्लोक अनुवादित कथान्चा मोठा सन्ग्रह प्रतिलिपीवर दिसला आहे, पैकी २ कथा खुप आधी निम्बुडा ह्यानी माबोवर प्रकाशित केल्या होत्या
बाकीच्या कुठून आण्ल्या आहेत, की लिहिल्या आहेत त्यबद्दल आत माझ्या मनात शन्का उत्पन्न झाली आहे

पुन्हा एकदा विनन्ती करेन की, निम्बुडा ह्याना कुणी पर्सनल्ली ओळखत असेल तर त्याना ही माहिती द्यावी

शेरलॉक अनुवादित डाइंग डिटेक्टिव्ह आणि अजून एक मी बऱ्याच वर्षांपूर्वी लिहिल्या होत्या.(२००६-२००७ बहुतेक)
त्यातली एखादी आहे का?

Pages