नवरात्र : आदिशक्तीचा जागर
माळ पाचवी
शारदीय नवरात्रात आदिशक्तीची आराधना करणे व तिला आपली सुखदु:खे सांगणे व मन रिते करणे ह्यासारखे दुसरे समाधान नसते.
आजच्या दिवसाची माळ ही आपल्या लाडक्या बहिणीसाठी आहे. बहीण लहान असो वा मोठी असो त्याने नात्यात काहीच फरक पडत नाही. आपली सुखदु:खे कायमच सांगायला एक हक्काचे माणूस असते. लहानपणापासूनची कितीतरी गुपिते ह्या नात्यात दडलेली असतात. वयानुसार त्या त्या वयात येणारे अनुभव, संकटे ह्या साठीचा हक्काचा आधार व योग्य मार्गदर्शन मिळेल याची कायमची खात्री असते.
आजच्या केशरी रंगासारखेच बहिणीच्या नात्याने आपल्या व्यक्तिमत्वात देखील एक आत्मविश्वास असल्यासारखे वाटते. या आधारावर आपण आयुष्यात कित्येक स्तरांवर योग्य दिशेने वाटचाल करू शकतो.
“जन्माच्या मारूनी गाठी
मी झोळी धरली हाती
घरदार सोडूनी आले
मिळवाया चिन्मय शांती”
दुर्गेशी आपले नाते असेच युगायुगांचे आहे, जणू न सुटणार्यार गाठीच आहे. या आदिशक्तीच्या छायेत कायमच आपल्याला एक चिन्मय शांति मिळत असते.
छान विचार आहेत तुमचे.
छान विचार आहेत तुमचे.