Submitted by मन्या२८०४ on 25 June, 2008 - 13:03
या मराठी वाक्याचा अर्थ सांगा:
येते हिमाद्रीकन्यापतीसुतललना यौवनामाजि जेंव्हा
रामस्त्रीनामकानात्यजुनउरत ते पिडीते होय तेंव्हा
हस्ती हस्तींद्रव्रुंदांतकमुखरिपूचे नामपुर्वार्ध नाही
यालागी भूसुतेशाअरीअनुजप्रिया स्वल्पही येत नाही
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यअ धेकना
यअ धेकना गप
मन्या, हे
मन्या,
हे बरोबर आहे का?
सर्व स्त्रियांनो ऐका एक विचित्र कहाणी
जी मी या माझ्या डोळ्यांनी पाहीली...
एक फुलांची सुंदर वाटीका दूरून दिसली सुंदर
त्याच्या बरोब्बर मध्ये एक वेल आणि त्यावर अतिशय सुंदर फूल
पण जसे फूल सुकले तसे काहीतरी अनपेक्षित घटिले
वेलीनेच जन्म दिलेले फूल वाळताच भक्षिले...
दक्शिना
दक्शिना भारिच.... इथे माझा फयुज उडाला......
चालुदे चालुदे..... कळले नाही तरी वाचायला मस्त वाटते.....
मी हि प्रयत्न करेन...... (जमेल का नाही माहीत नाही.....)
लय भारी आहे हा बी.बी.
लय भारी आहे हा बी.बी.
<
<
.
.
आमचं आपलं उलटं आस्तय. आधी
आमचं आपलं उलटं आस्तय. आधी बुडुख मंग शेंडा. >>>
रॉबीन ...
रॉबीन ...
रॉबिन
रॉबिन
.
.
.
.
robeenhood, क्या बात है.
robeenhood,
क्या बात है.
हे सर्व वाचायला एवढ कठिण आहे
हे सर्व वाचायला एवढ कठिण आहे यार... त्याचा अर्थ साग्णारे महाग्रेट!!! आपणा सर्वाना प्रणाम............
मायबोली म्हणजे खरच मजेदार
मायबोली म्हणजे खरच मजेदार जागा आहे.
हसत खेळत सगळ काही.
मस्तच आहे हि वेबसाईट
ऐके हो रमणी विचित्र करणी म्या
ऐके हो रमणी विचित्र करणी म्या देखिली लोचनी
वापी एक असे, मनोहर दिसे अत्यंत ते तुंबुनी
वेल मधे असे, एक फुल तया शोभिले
होता शुष्क विचित्र घडले, वेले फुला भक्षिले>>>>>>>>>
अर्थ: वापीला एक विचित्र घटना मी पाहीली, एका वेलीवर एक फूल होते, आम्ही काढायला गेलो तर त्या वेळी त्या वेलीनेच ते फूल चक्क खाल्ले कि..हो......:हाहा:
ऐके हो रमणी विचित्र करणी म्या
ऐके हो रमणी विचित्र करणी म्या देखिली लोचनी
वापी एक असे, मनोहर दिसे अत्यंत ते तुंबुनी
वेल मधे असे, एक फुल तया शोभिले
होता शुष्क विचित्र घडले, वेले फुला भक्षिले
रमणी मी एक विचित्र गोश्ट लोचट पणे पाहिली. (तुझ्या डोळ्यात)
पाणिदार डोळ्यात सुन्दर बुबुळ होते.
(Well) विहिरीमध्ये एक फुल तया शोभिले
होता शुष्क (Dry) झाल्यावर डोळ्यानी बुबुळ (फुल ) गिळले (दोळे बन्द झाले)
हा नविन होता. आधिचे सर्व मि माझ्या बाबान्च्या पुस्तकात वाचले होते.
फार पुर्वि मी एक श्लोक वाचला
फार पुर्वि मी एक श्लोक वाचला होता.
काहीतरी शब्दचुक असावी त्यामुळे अर्थ कळलाच नाही.
आता निट आठवत नाही.तो काहीसा असा.
.
कोणी एक वनी विचित्र पुतळा जेवावया बैसला
जेवन जेविता अती त्वरे पात्रेची तया भक्षिला
त्याची ती वनिता वनात फिरता सुर्यास प्रार्थी सदा
बोले विठ्ठल हा पदार्थ उमगा षन्मांसिचा वायदा.
.
. सांगेल कुणी?
वाह...सगळेच्या सगळे खुप
वाह...सगळेच्या सगळे खुप विचारवन्त आहेत...तुम्हा सर्वाना नमन असो....
आईशपथ........................
आईशपथ........................... !!
तुम्हाला अगदी साष्टांग नमस्कार....
अशक्य वेडे आहात तुम्ही सगळे.... मानलं तुम्हाला..... आयुष्यभर शोधत राहिलो असतो तरी हे अर्थ सापडले नसते...
गुरु लोकं आहात तुम्ही.... दंडवत !!
@ गंगाधर मुटे साहेबः कोणी एक
@ गंगाधर मुटे साहेबः
कोणी एक वनी विचित्र पुतळा जेवावया बैसला
जेवन जेविता अती त्वरे पात्रेची तया भक्षिला
त्याची ती वनिता वनात फिरता सुर्यास प्रार्थी सदा
बोले विठ्ठल हा पदार्थ उमगा षन्मांसिचा वायदा.
.
. सांगेल कुणी?
--- हे बहुधा भुंगा व कमळ यांचे रुपक आहे...... भुंगा कमळातील मध चाखायला बसला, पण सायंकाळ झाली व कमळाच्या पाकळ्या मिटल्या, भुंगा आतच अडकला.... मिसेस भुंगा मग सूर्याची प्रार्थना करु लागली की तू लवकर उगव म्हणजे माझा नवरा कमळातून बाहेर पडू शकेल.... चौथी ओळ बहुधा यमक जुळविणे वगैरेसाठी आहे. तिचा संदर्भ काही आठवत नाही!! [बाबा, काकांना विचारते....त्यांना नक्की आठवत असेल!]
अरे बापरे ... एवढा सोप्पा
अरे बापरे ... एवढा सोप्पा अर्थ होता याचा.
कळले की सोपे वाटते.. तेच कळण्यापुर्वी गुढ..!
अरुंधतीजी, तुम्ही मला लिंक द्यायला हवी होती. मी सहज येथे आलो नसतो तर हे मला कसे कळले असते बरे?
त्यामुळे तुम्ही जरी अर्थ सांगीतला आहे तरी मी तुम्हाला धन्यवाद म्हणणार नाही.
(No subject)
wow , अशक्य , मजा आली वाचायला
wow , अशक्य , मजा आली वाचायला ..अर्थ हो , तुम्हा सगळ्या हुशार वेड्यांना दंडवत
मन्या२८०४ : रावण = पदर??????
मन्या२८०४ : रावण = पदर?????? कसे बरं???
आणि शेवटच्या कोड्याचा अर्थही सांगा!
चौथी ओळ बहुधा यमक जुळविणे
चौथी ओळ बहुधा यमक जुळविणे वगैरेसाठी आहे. तिचा संदर्भ काही आठवत नाही!!
..
यात यमकासाठीच असे नाही. यमक तर आहेच. याचा रचयिता याचा तो 'तखल्लुस' आहे. हा विठ्ठल कोण?. या विठ्ठलाची अशी अनेक पद्यमय कोडी आहेत. त्याने याचे उत्तर देण्यासाठी सहा महिन्याचा वेळ दिला आहे. (षण्मासिचा वायदा). हे श्लोक पूर्वी जेवणाच्या पंगतीत अधून मधून करमणूक म्हणून म्हटले जात. तसेच पंगत श्लोक झाल्याशिवाय सुरू होत नसे.
विठ्ठल
विठ्ठल
हिमाद्रीकन्या = नदी, तिचा पती
हिमाद्रीकन्या = नदी, तिचा पती समुद्र, त्याचा सुत चंद्र त्याची ललना म्हणजे रात्र यौवनात येते म्हणजेच मध्यरात्र
रामस्त्री म्हणजे सीता, तिच्या नावातला काना काढला की उरत ते सीत म्हणजे थंडी,
हस्तींद्र = श्रेष्ठ असे हत्ती, म्हणजे हत्तींच्या कळपाचा नाश करणारा तो सिंह, त्याचे मुख असलेला नृसिंह आणि त्याचा रिपू हिरण्यकश्यपू, त्याच्या नावाचे पूर्वाध म्हणजे हिरण्य म्हणजे सोनं, तर सोनं म्हणजेच पैसे नाहीत, कशाला पैसे नाहीत तर हस्तींद्र घ्यायला म्हणजेच अंथरूण घ्यायला त्यामुळेच
भूसुता = सीता, तिचा ईश = राम, त्याचा अरी रावण, त्याचा अनुज कुंभकर्ण, त्याची प्रिया निद्रा थोडीही येत नाही.
थोडक्यातः
मध्यरात्री थंडी वाजते पण पांघरूण घ्यायला पैसे नसल्यामुळे झोप लागत नाही
मस्त, जबरी आहे हे.
मस्त, जबरी आहे हे.
Pages