अथ श्री आषाढ़ मासारम्भ ..
आषाढ़ महीना सुरु झाला की आपण आता पावसाळा खऱ्या अर्थाने लागला असं म्हणतो. वर्षातील सगळ्यात जास्त वाट बघितला गेलेला हा ऋतु. संपूर्ण निसर्गच जणू वर्षाऋतूच्या आगमनाची तयारी करत असतो, वरुणराजा येणार आणि सगळ्यांना तृप्त करणार या जाणिवेने पुलकित झालेला असतो. धरणी आपल्या कुशीतील अत्तराच्या कुप्या परत एकदा काठोकाठ भरून ठेवते. कोकिळ महाशय आपली उन्हाळी मैफिल आवरून चातकराजासाठी आसन मोकळे करून देतात. आमराया आपली उरलीसुरली फळे सोसाट्याच्या वाऱ्याला दान देऊन टाकतात. मयूर आपला पिसारा पुन्हा पुन्हा झंकारून पाहतो. तर मुंग्याची आपल्या अंड्यांना ऊन दाखवण्याची लगबग सुरु असते. मानवाच्या आनंदाला तर पारावर राहात नाही. आणि अशातच एक दिवस पश्चिम क्षितिजावर काळोख दाटून येतो. विजांचे भालदार- चोपदार वर्दी देतात आणि जणू ढोल ताशांच्या कडकडाटात, वाऱ्यावर स्वार होऊन तो येतो.. हो.. तोच तो.. मान्सून.
त्याच्या आगमनाने साऱ्या सृष्टीवर नवसंजीवनी पसरते. हिरवेगार गालिचे अंथरल्या जातात .
हा ऋतू नवनिर्मितीचा, ऋतू हिरवाईचा, ऋतू पाचूचा, ऋतू तृप्तीचा. आपण हा निर्मितीचा सोहळा दरवर्षी साजरा करतोच करतो. पिढ्यानुपिढ्या लेखकांनी, गायकांनी, कवींनी, चित्रकारांनी एकंदरीतच कलाकारांनी आपापल्या परीने पावसाला व्यक्त केलेच आहे. कधी आपल्या कुंचल्यातून तर कधी शब्दांमधून. एक राजस्थानी लोकगीत आहे. त्यात या 'पावस'काळाचं किती सुंदर वर्णन केला आहे बघा.
सुरंगी रुत आई म्हारे देस, भलेरी रुत आई म्हारे देस
मोटी-मोटी छांटयां ओसरयां ए बदली, तो छांट घड़े के मान, मेवा मिसरी
सुरंगी रुत आई म्हारे देस।
राजस्थान म्हणजे मरूभूमी. तिथल्या रहिवाश्यांसाठी तर पाऊस म्हणजे जणू अमृत वर्षा, प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद. ते म्हणतात..
"माझ्या देशात हा 'सुरंगी' ऋतु आला आहे. माझ्या देशात हा भला ऋतु आला आहे.
अरे ढगांनों तुमच्यातला एक एक थेंब आम्हाला घडाभर दिसतोय.
अरे बघा बघा, माझ्या देशात 'मेवा- मिसरी' (प्रमाणे प्रिय असा) हा 'सुरंगी' ऋतु आला आहे.
पाऊस प्रत्येकासाठी वेगवेगळा ठेवा घेऊन येतो. छोट्यांसाठी आता वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडण्याची मौज असते आणि भोलानाथाला "शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?“ असा निरागस प्रश्नपण विचारला जातो. तरुणाईला गडकिल्ले साद घालतात. शेतकरी नव्या आशेनी पेरणी सुरु करतो. "यंदा पीकपाणी भरपूर होऊ दे" असं साकडं वर्षाराणीकडे घातलं जातं. शहरी नोकरदाराला आपल्याला वेळेत ऑफिस गाठता येईल ना” ही काळजी सतावत असते. प्रेमिकांसाठी "सावन बरसें तरसें दिल" होऊन जातं. तर कोणाला आता धुतलेले कपडे कुठे वाळवू अशी चिंता भेडसावते. जितक्या वृत्ती तितक्याच प्रवृत्ती हेच खरे.
खरंतर आपल्याकडच्या शहरी भागात पाऊस म्हटला कि 'हाल-बेहाल'. गल्लीबोळात चिखल-राडा तर मुख्य रस्ते स्वतःच नाल्यांचे रूप घेतात. पण गुलजार साहेबांची नजर मात्र वेगळेच काही बघते. त्यांची लाडकी 'बारिश' येते तेव्हा काय होते...
बारिश आती है तो मेरे शहर को कुछ हो जाता है..
टिनकि छत, तर्पाल का छज्जा, पीपल, पत्ते, पर्नाला सब बजने लगते है।
तंग गली में जाते जाते,
मेरी साइकल का पहिया पानी की कुल्लियाँ करता है।
बारिशमे कुछ लम्बे हो जाते है कद भी लोगोंके
जितने ऊपर है, उतने ही पैरो के नीचे पानी में
ऊपरवाला तैरता है तो नीचेवाला डूब के चलता है.
खुश्क था तो रस्ते में टिक टिक छतरी टेंक के चलते थे
बारिशमें आकाश पे छतरी तक के टप टप चलते है..
सगळ्यां निसर्ग प्रेमींना नविन भागाच्या खुप खुप शुभेच्छा
वरील मनोगत निसर्गप्रेमी मनिम्याऊ (मृण्मयी) ने लिहिले आहे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२) https://www.maayboli.com/node/63032
जागू, सगळेच प्रचि झकास.
जागू, सगळेच प्रचि झकास.
साधना. मिरचीची झाडे मस्त तरारली.फुले येत आहेत. गळून पडताहेत.५-६ दिवस बाहेर होते.आता ब्रशिंग करायला हवं.
काही नवीन मेंबर्स
काही नवीन मेंबर्स
नाव माहिती नाही
१
२
३
>>>मी पहिलाय चोर Happy ..तो
>>>मी पहिलाय चोर Happy ..तो एक छोटा भुंगा किंवा भुंग्यासारखा कीडा आहे..
एकदम नजाकतीने पाने कातरतो आणि पानाचा तुकडा आपल्या पायात धरुन उडुन जातो...
खरतर त्याला तसं पानं कातरताना बघणं भारी वाटतं..>>>
स्मिता-श्रीपाद, नुक्ताच एका जुन्या दिवाळी अंकात यावरचा लेख वाचला. ही माशी पानं गोल, अर्धगोल कापून त्याचे छोटे द्रोण बनवते. त्यात अंडी घालते. पुन्हा कापलेल्या पानानेच त्याचे तोंड बंद करते. असे बरेच द्रोण एकात एक घालून उतरंड बनवते. गंमत म्हणजे सर्वात वरच्या द्रोणातल्या (म्हणजे सर्वात शेवटी अंडे घातलेल्या) अंड्यातून आधी अळी बहेर येते आणि मग एकेक करत खालच्या द्रोणातल्या अंड्यातून. त्या लेखात त्या माशीने मोठ्या तरवडाची पानं वापरली असं लिहिलं होतं.
नेटवर त्या द्रोणाच्या उतरंडीचे फोटोही आहेत.
मावळ
मावळ
स्मिता-श्रीपाद, नुक्ताच एका
स्मिता-श्रीपाद, नुक्ताच एका जुन्या दिवाळी अंकात यावरचा लेख वाचला. ही माशी पानं गोल, अर्धगोल कापून त्याचे छोटे द्रोण बनवते. त्यात अंडी घालते. पुन्हा कापलेल्या पानानेच त्याचे तोंड बंद करते. असे बरेच द्रोण एकात एक घालून उतरंड बनवते. गंमत म्हणजे सर्वात वरच्या द्रोणातल्या (म्हणजे सर्वात शेवटी अंडे घातलेल्या) अंड्यातून आधी अळी बहेर येते आणि मग एकेक करत खालच्या द्रोणातल्या अंड्यातून. त्या लेखात त्या माशीने मोठ्या तरवडाची पानं वापरली असं लिहिलं होतं.
नेटवर त्या द्रोणाच्या उतरंडीचे फोटोही आहेत. >> अरे वा मस्तच माहिती. मी पण शोधते आता नेटवर
@शाली : मस्त फोटो...
त्या फोटोतल्या निळा आकाशाला माझा झब्बु
राजाराम पुलावरुन काढलेला फोटो.
पावसाळ्यात उन्ह न मिळाल्याने
पावसाळ्यात उन्ह न मिळाल्याने माझ्या जास्वंदीवर पांढरे किडे आले होते खुप..बरेच काय काय घरघुती उपाय केले ( हळद- तिखटाचा स्प्रे वगैरे )
मग ती कमी झाली आणि परत उन्हे पडायला लागल्यावर पूर्ण गेली...
मग जास्वंदीला मस्त नवी पाने फुटली होती....२ कळ्या पण आल्या
पण....
गेल्या आठवड्यात पुण्यात परत पाउस न पावसाळी हवा सुरु झाली आणि परत जास्वंदीवर ती कीड आली आहे
ही पांढरी कीड दमट हवेमुळे न उन्ह न मिळाल्याने येते असा माझा समज बरोबर आहे का ?
की काही वेगळं कारण असतं
कायमची कीड घालवायला काही उपाय करता येइइल का ?
परत जास्वंदीवर ती कीड आली आहे
परत जास्वंदीवर ती कीड आली आहे>>>> हो माझ्याही जास्वंदीवर आली आहे.बेकिंग पावडर्चा स्प्रे मारला कमी झाली ,बाहेरगावी गेल्यावर पाहिले तर परत आली आहे.
तंबाखूच्या पाण्याचा फवारा
तंबाखूच्या पाण्याचा फवारा मारल्यास जास्वंदीवरील कीड मरते. मी एकदा हा यशस्वी प्रयोग करून पाहिला होता.
साबणाच्या फवार्यानेही मावा
साबणाच्या फवार्यानेही मावा जातो, मी ह्या वेळी प्रहार हे औषध मारले. ते रासायनिक नाही. मला बियाण्यांच्या दुकानात मिळाले.
सुप्रभात. मंडळी आता गारवा
सुप्रभात. मंडळी आता गारवा चालू झाला आहे. निसर्गातील घटकांसाठी पोषक मोसम. जमिनीवर आता दव पडायला सुरुवात होऊन सकाळी गवतावर पावले न्हाऊन निघतात. फुलपाखरे, पक्षी सकाळच्या थंड वातावरणात उन अंगावर घेत शांतचित्ताने बसलेले दिसतात. फुलांना तर एक नविनच तजेला दिसतो ह्या दिवसांत.
सोनटक्का
दुरंगी गुलाब
चिनी/छोटा गुलाब
आहाहा सर्वच.
आहाहा सर्वच.
नविन धागा मस्त धावतोय..
नविन धागा मस्त धावतोय.. मनोगत ही छानच ..सगळ्या गप्पा वाचुन काढल्या.. खुप छान वाटल. निरु, शाली , जागु एका पेक्षा एक फोटोज...
हे माझ्या कडे एका टब मधली कुमदिनी, ऑगस्ट पासुन एकुण १६ फुलं येऊन गेलीत..
कुंडीत पांढर्या कृ .कमळा ला
कुंडीत पांढर्या कृ .कमळा ला ५० एक फुलं येऊन गेलीत.. अजुन ही नविन कळ्या येत आहेत.. फळ मात्र एकच मिळाले..त्याचे सरबत अप्रतिम होते चवीला.. हा वेल दिनेश दा नी सुचवला होता आणि सरबताची पा. कृ पण त्यांनीच सांगीतली होती..:)
वा वा सायु, आहाहा.
वा वा सायु, आहाहा. पहील्यांदाच बघितलं ह्याचं फळ मी आणि सरबत छान आहे.
धन्स अन्जु ताई... सोनटक्का
धन्स अन्जु ताई... सोनटक्का फुलला का? माझ्याकडे नाही अजुन .. यंदा फुलतोय का नाही कोण जाणे..
सोनटक्का फुलला का? >>> नाहीये
सोनटक्का फुलला का? >>> नाहीये आता. आता फक्त लिली आणि तुळस, कोरफड आहे. पावटे वेल आला होता, शंभर शेंगा मिळाल्या. मेथी थोडी आलीय. इथे कुंड्या ग्रिलमधे एवढ्याच, बाकी खाली ठेवायला लागल्यात. त्यात विशेष काही नाही फुलझाडं.
अय्या ! कृष्णकमळाचं फळ मी
अय्या ! कृष्णकमळाचं फळ मी पहिल्यांदाच पाहतेय ! अक्खा फोटो पण टाक ना असेल तर !
सोनटक्का आणि दुरंगी गुलाब एकदम खासच !! मस्त
साधारण गणपती पासुन तोरडा
साधारण गणपती पासुन तोरडा अस्सा फुलतोय.. आता बार कमी होत चाललाय.. तरी रोजची १०,१२ फुल मिळतायत..
पावटे वेल आला होता, शंभर
पावटे वेल आला होता, शंभर शेंगा मिळाल्या. मेथी थोडी आलीय. ++ ग्रेट
कृष्णकमळाचं फळ मी पहिल्यांदाच पाहतेय ! अक्खा फोटो पण टाक ना असेल तर +++ हा घ्या..:)
वा वा सायु, मी जेलस. दृष्ट
वा वा सायु, मी जेलस. दृष्ट काढून टाक झाडांची . एन्जॉय.
जागू आज खूप वर्षांनी मायबोली
जागू आज खूप वर्षांनी मायबोली वर आलो तूझा धागा चालू आहे हे बघून आनंद झाला. साधना देखील आहे. पण जिल्ह्या दिसला नाही. बाकी शालीन आणि निरूपण चे फोटो पण छान आहेत. अभिनंदन.
मराठीतल्या चूका बद्दल क्षमस्व
मराठीतल्या चूका बद्दल क्षमस्व.
मला अगदी शालीन केलत आणि
मला अगदी शालीन केलत आणि निरुंदांचे एकदम निरुपण. समर्पक नावे आहेत ही. आवडली एकदम.
(No subject)
(No subject)
Lepidagathis bandraensis.
Lepidagathis bandraensis.
वरच्या चार फूला पैकी एकाचा close up.
हल्ली दर रविवारी येऊरला
हल्ली दर रविवारी येऊरला चालायला जातो...
तिथले हनुमान माकड...
@ Vijay pokal धन्यवाद _/\_
@ Vijay pokal धन्यवाद _/\_
पावटे वेल आला होता, शंभर
पावटे वेल आला होता, शंभर शेंगा मिळाल्या. मेथी थोडी आलीय. >>>>> किती मस्त.
कृष्णकमळाचं फळ मी पहिल्यांदाच पाहतेय !>>> मीही.सायु, धन्स ग.
वरचे सर्व फोटो मस्तच.
वरचे सर्व फोटो मस्तच.
हनुमान माकडाला वांदर म्हणतात का. गावी काळ्या तोंडाच्या माकडांना वांदर म्हणतात. खूप नुकसान करतात, माहेरी आमची कौलं पण नाचून फोडली, आता कोकणात माहेरी कौलांवर पत्रे टाकलेत, जे मला अजिबात आवडत नाही. कौलारू चिरेबंदी घर मस्त होतं.
मेथीने मान टाकली ,कारण कळत नाहीये. चांगली बोटभर झालेली. पुढच्या आठवड्यात जेवढी झालीय ती काढून आमटीत घालेन ठरवलेलं.
Pages