पाकातले चिरोटे
१ कप रवा
खायचा रंग,मी पिवळा आणि गुलाबी वापरला आहे
१ टेस्पून तेल मोहनासाठ
चिमुटभर मीठ
४ टेस्पून वितळलेले तूप,
३ टेस्पून कॉर्न फ्लोअर
पाक:
१ कप साखर,१/२ कप पाणी, गोळीबंद पाक करावा
रव्यामध्ये १ टेस्पून कडकडीत गरम तेल घालावे. चिमूटभर मीठ घालावे. अंदाज घेउन पाणी घालावे आणि थोडा घट्ट असा गोळा भिजवावा. २ तास ओल्या कपड्याने झाकून ठेवावे.
२तासांनी भिजवलेल्या गोळ्याचे ३ सारखे भाग करावे. एक गोळ्यात गुलाबी आणि एक गोळ्यात पिवळा रंग घालून नीट मळून घ्या. एक गोळा कोणताही रंग न घालता तसाच ठेवा.प्रत्येक गोळ्याची एकदम पातळ पोळी लाटावी. पोळीतून खालचा पोळपाट दिसला पाहिजे इतपत पातळ लाटावी.
३ टेस्पून तूप वितळवून त्यात ३ टीस्पून कॉर्न फ्लोअर घालून पातळसर पेस्ट बनवा.१ लाटलेली पोळी घेऊन त्यावर बनवलेली पेस्ट पसरावी. त्यावर दुसरी लाटलेली पोळी बरोबर पहिल्या पोळीवर येईल अशी ठेऊन या पोळीवर पेस्ट लावावी. वर तिसरी पोळी ठेवून उरलेली पेस्ट लावावी.
एका बाजूने गुंडाळी करत मध्यभागी आनून घट्ट रोल बनवावा. अशाच उरलेल्या तीन पोळ्या बनवून रोल बनवा.साखर आणि पाणी एकत्र करून गोळीबंद पाक करावा. रोलचे १/२ इंचाचे तुकडे करावे. एक तुकडा घेउन लेयर असलेली बाजू वर अशाप्रकारे ठेवून हाताने दाब देउन चपटे करावे. लाटणे फिरवून छोटीशीच पुरी/चिरोटे बनवा. तयार चिरोटे तेलात मंद आचेवर बदामी रंगावर तळून घ्या. चिरोटा कोमट झाल्यावर साधारण गरम असलेल्या पाकात घाला. मिनिटभर ठेवून बाहेर काढा. आणि उभा करून ठेवा.
फोटो टाकाल का. तोंपासु
फोटो टाकाल का.
तोंपासु
(No subject)
छान पुडं सुटली आहेत. उत्तम
छान पुडं सुटली आहेत. उत्तम जमली आहे.
मस्तच दिसतायत.
मस्तच दिसतायत.
धन्यवाद पाथफाईंडर
धन्यवाद पाथफाईंडर , मानिमोहोर:)
वॉव !! काय सुंदर दिसताहेत!!
वॉव !! काय सुंदर दिसताहेत!!
मस्तच!
मस्तच!
कसले भारी दिसताहेत चिरोटे.
कसले भारी दिसताहेत चिरोटे. तोंपासु एकदम.
चिरोटे एकदम सहीच दिसताहेत ...
चिरोटे एकदम सहीच दिसताहेत ... मस्तच !
वॉव!
वॉव!
सुरेख!
सुरेख!
खुपच सुन्दर .....
खुपच सुन्दर .....
मी मैदा आणि रवा वापरुन करत असते चिरोटे.....
आता फ़क्त असे रव्याचे करुन बघेन ,फोटो बघून तोपासु...
अतिशय सुंदर !!! बघूनच खावेसे
अतिशय सुंदर !!! बघूनच खावेसे वाटत आहेत
वाह! अगदी तोंपासू..
वाह! अगदी तोंपासू..
एकदम कातिल दिसताहेत चिरोटे.
एकदम कातिल दिसताहेत चिरोटे. पटकन उचलून खावासा वाटतोय. सुरेख जमलेत.
भारी !
भारी !
फोटो कसला चुम्मा आलाय.. गुलाब
फोटो कसला चुम्मा आलाय.. गुलाब दिसताय मला सारे.. मोडावेसे वाटेना..
काय सुरेख दिसत आहेत चिरोटे!
काय सुरेख दिसत आहेत चिरोटे! वॉव! पर्फेक्ट!