मायबोली गणेशोत्सव २०१८ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि पहिला विषय आहे - क्षितिज नवे - प्रेक्षणीय स्थळांची प्रकाशचित्रे.
आयुर्विन पूल, सांगली
आपल्यातल्या बर्याचजनांना वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्यायला आवडते. शहरं, देश बदलतील तस तश्या संस्कृती बदलतात. खाण्याचे पदार्थ, वेशभूषा, भाषा अश्या बऱ्याच वेगवेगळ्या संस्कृतीचं दर्शन होते. अश्याच तुम्ही पाहिलेल्या सुंदर प्रेक्षणीय स्थळाची प्रकाशचित्र सगळ्यांसाठीच उपलब्ध करुन देऊया.
मायबोली प्रशासन हे कायमच प्रताधिकार आणि त्याची अंमलबजावणी यांबाबत आग्रही राहिलं आहे. अनेक मायबोली किंवा मायबोलीबाह्य उपक्रम यांमध्ये वापरायला आपल्या सगळ्यांनाच प्रकाशचित्रं लागतात. यासाठी स्टॉक इमेजेस् अर्थात प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध करून देणारी संकेतस्थळं खूपच उपयोगाची ठरतात. मायबोलीवर अनेक उत्तमोत्तम प्रकाशचित्रं कायम प्रदर्शित होत असतात. आपण विषयावर आधारित झब्बू दरवर्षी ठेवतो, पण मग पुढे या चित्रांचं काय होतं?
आपण जशी इतरांनी उपलब्ध करून दिलेली चित्रं वापरतो, त्याच सागरात आपल्याला काही थेंब टाकता आले, काही खारीचा वाटा उचलता आला तर, असा विचार करून पहिला झब्बू हा देवाला, अर्थात आंतरजाल वापरणाऱ्या समुदायाला अर्पण करायचं आम्ही ठरवलं आहे.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
मी आता काही लिहीणारच नाहीए.
मी आता काही लिहीणारच नाहीए. काय फोटो आहेत एकेकाचे! निव्वळ अप्रतिम!
स्वातीताई, भारीच फोटो.
मनस्विता, संगम सुरेखच.
मेधा, दोन्ही फोटो छानच. पहिला ध्यान लावायला सुरेख जागा. आणि माचू पिचू तर स्वर्गच वाटतोय. मी नॅशनल जीओवर पाहिले होते. लकी आहात.
सशल, मस्त ढग आणि त्यांच्या सावल्या.
सगळे फोटो नावासह सेव्ह करण्यात आले आहेत.
One of the most photographed
One of the most photographed sites in the the Jasper National Park; Spirit Island in Maligne Lake.
समर मध्ये आणि नंतर पुढचा स्प्रिंग येईपर्यंत हा पेनिन्सुला असतो मग स्प्रिंग मध्ये परत आयलंड.
इंका साम्राज्याच्या सेक्रेड
इंका साम्राज्याच्या सेक्रेड व्हॅली मधून दिसणारी अॅण्डीज पर्वत राजी.
रथयात्रा एग्झिबिट - सिद्धगिरी
रथयात्रा एग्झिबिट - सिद्धगिरी संग्रहालय, कोल्हापूर
सुंदर फोटो! संगमाचा फोटो खासच
सुंदर फोटो! संगमाचा फोटो खासच!
मॉरो बे, कॅलिफोर्निया.
मॉरो बे, कॅलिफोर्निया.
Matterhorn (स्विस- झरमॅट)
Matterhorn (स्विस- झरमॅट)
सगळे झब्बू सुंदर
स्विस माथेरान भारी आहे
स्विस माथेरान भारी आहे
Grand Prismatic Spring
Grand Prismatic Spring (Yellowstone National Park, WY) दिसायला सुंदर दिसले तरी त्या वाफा, पाणी सगळे काही विषारी आहे.
सॅन फ्रान्सिस्को चा आयकॉनीक
सॅन फ्रान्सिस्को चा आयकॉनीक गोल्डन गेट ब्रिज
>>> स्विस माथेरान
>>> स्विस माथेरान
खरंच मस्त आहे!
यलोस्टोन भारी आहे! जायला हवं!
मॉनहीगन आयलंड, मेन.
मॉनहीगन आयलंड, मेन.
सगळेच फोटो भारी आहेत. किती
सगळेच फोटो भारी आहेत. किती किती म्हणून पाहावं ह्या जगात!
स्विस माथेरान >>> :)) थँक्यु
स्विस माथेरान >>> :)) थँक्यु
इया (Oia) (सँटोरिनी ग्रीस) - सुर्यास्त...
सुर्यास्त पहाण्यासाठी जगातली अजून एक सुंदर जागा
सर्व फोटो सुंदर !
सर्व फोटो सुंदर !
सगळेच फोटो मस्त!
सगळेच फोटो मस्त!
ब्लॅक फॉरेस्ट, ओबेरवूल्फाक,
ब्लॅक फॉरेस्ट, ओबरवूल्फाक, जर्मनी.
हे कुठलंही प्रेक्षणीय स्थळ
हे कुठलंही प्रेक्षणीय स्थळ नाही; केवळ फॉल मधल्या व्हेदर मुळे प्रेक्षणीय झालेलं घराजवळचं रोजचंच क्षितीज आहे.
जेथे खुळ्या ढगांनीं रंगीन साज ल्यावा..
ग्रँड प्रिझ्मॅटिक झब्बू
ग्रँड प्रिझ्मॅटिक झब्बू
यलो स्टोन
यलो स्टोन
परत तेच यलो स्टोन
परत तेच यलो स्टोन
WHOA!
WHOA!
हा वरचा फोटॉ फार भारी!!
हा वरचा फोटो फार भारी!! यलोस्टोन चे लँडस्केप पाहून खरंच दुसर्या ग्रहावर असल्यासारखे वाटते !
ग्लेशियर नॅशनल पार्क
ग्लेशियर नॅशनल पार्क
लेक मोरेन, बॅन्फ नॅशनल पार्क
लेक मोरेन, बॅन्फ नॅशनल पार्क
बॅन्फ आणि जॅस्पर नॅशनल पार्क्स मधल्या ग्लेशियल-फेड लेक्स मध्ये दिसणार्या निळ्या छटा केवळ अवर्णनीय होत्या.
काय सुंदर दिसतोय हा निळा रंग!
काय सुंदर दिसतोय हा निळा रंग!!
लेक मिशिगन
लेक मिशिगन
अरे तुम्ही सगळे फोटो कसे
अरे तुम्ही सगळे फोटो कसे टाकताय?
App मधून upload नंतरचा "send to text area" असा ऑप्शनच येत नाहीये!
Bow Lake (Banff National Park
Bow Lake (Banff National Park)
स्वरुप मी ब्राउजर मधून टाकते.
स्वरुप मी ब्राउजर मधून टाकते. अॅप वर अपलोड ऑपशन आहे पण अटॅच कसा करायचा समजलं नाही.
बोरीवली येथील पगोडा.
Pages