Submitted by संयोजक on 13 September, 2018 - 00:44
मजेशीर कोट्या चॅलेंज
एखाद्या सिनेमातला, नाटकातला संवाद असो किंवा कथा कादंबरी मधलं एखादं वाक्य आपण सतत कोट्या करण्यासाठी वापरतो. थोडक्यात काय तर आपलं आयुष्य हे कोट्यांनी व्यापलेलं आहे. पावला पावला ला आपण दाखले देण्यासाठी एखादी कोटी वापरतोच. बऱ्याचदा आपण उत्साहात केलेल्या ह्या कोट्या मजेदार असतात. कधी कधी कोटी कोटी प्रयत्न करूनही कोटी साधत नाही, तर कधी कधी सहज बोलताना तोंडातून उच्चकोटीची कोटी बाहेर पडते. अश्याच मजेदार, विनोदी, मार्मिक कोट्या करणाऱ्यांसाठी हा चॅलेंज खेळ आहे.
नियम
१) संयोजक एक शब्द देतील.
२) त्या शब्दावरून फालतू कोटी करायची आहे.
३) जो सगळ्यांत आधी कोटी लिहील तो पुढचा क्लू देणार.
उदा. माउस
माउस माऊ स घाबरतो
पहिला शब्द - रेडिओ
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
शब द संध्याकाळ - नवीन मराठी
शब द संध्याकाळ - नवीन मराठी चित्रपटाचे नाव व टॅगलाइन
मी दोन उत्तरं बरोबर लिहीली.
मी दोन उत्तरं बरोबर लिहीली. पण शब्द दिला नव्हता. म्हणून आत्ता देतो.
१. गजगामिनी
२. षण्मुखानंद
शब्दाने शब्दाला शब्दात पकडत
शब्दाने शब्दाला शब्दात पकडत हरवल... हरलेल्या शब्दाने शब्दाला बक्षीस द्यायचा शब्द दिला....
जमलय की नाही माहित नाही..पहिल्यांदाच ट्राय केल..

कोटी करणे कला आहेच, शिवाय
कोटी करणे कला आहेच, शिवाय शब्दांचे दोन अर्थ माहीत असण्यासाठी भाषेवर हुकूमत देखील असावी लागते. सुरूवातीलाच ही शंका आलेली होती. इथे खूप कमी वेळा एक शब्द द्व्ययर्थी वापरात आलेला दिसला आहे. माझा पहिलाच प्रतिसाद कदाचित खटकला असेल. पण खेळासाठी कोटी ही कल्पना योग्य नाही असे त्या वेळी वाटले होते.
शब्द, कापड अशा शब्दातून काय कोट्या करणार ? पुलंची वीटेची कोटी आठवते.
कोटीवरून एक किस्सा ..
कोटीला इंग्रजीत पन म्हणतात. एका इंग्रजीच्या प्राध्यापकाला सातत्याने पन करायची आवड होती. त्याचे हे पन (कोटी) चे वेड एव्हढे वाढले होते की मित्र हैराण झाले होते. एक दिवस मित्रांनी ठरवलं की प्राध्यापकाची खोड जिरवायची. एकदा पार्टीमधे प्राध्यापक महोदय बाथरूमला गेले. ही संधी हेरून मित्रांनी दरवाजाला बाहेरून कडी घातली.
प्राध्यापक महोदयांनी थोड्या वेळाने दरवाजा वाजवायला सुरूवात केली. पण कुणीच उघडायला तयार नाही. त्यांनी मित्रांना हाका मारल्या. मित्रांनी बाहेरून सांगितले की "आत्ताच्या आत्ता इथे पन करून दाखव, तरच आम्ही दरवाजा उघडू. नाहीतर आयुष्यात पुन्हा कधीही पन करणार नाहीस हे वचन दे "
प्राध्यापक महोदयांनी हे ऐकले. काही सेकंद शांततेत गेले आणि आतून आवाज आला
" ओ(ह) पन "
मित्रांना दरवाजा उघडायला लागला हे ओघाने आलंच.
गजगामिनी -
गजगामिनी -
"तोड तुझ्या प्राणपणाने जपलेल्या पणाचे गज, गा मिनी, गा, गजगामिनी रागात गा! " न्याहाळताना कसरती करणारा गज, गामिनी आजी मौनव्रत धरलेल्या मिनीला सर्कशीत वदल्या.
(कसंय?
)
शब्दाने शब्द वाढत जाऊन
शब्दाने शब्द वाढत जाऊन शब्दकोडं तयार झालं.
तो ऐरावत गज, ती रूपगर्विता
तो ऐरावत गज, ती रूपगर्विता गजगामिनी.....
षण्मुखानंद च्या प्रयोगाला थिएटर मात्र रिकामं ....
क्षणमुखानंद म्हणजे काय?
क्षणमुखानंद म्हणजे काय?
मेरीच यांच्याशी सहमत. आपण
मेरीच यांच्याशी सहमत. आपण कोट्या करण्याऐवजी शब्दांचा खेळ जास्त करत आहोत. अर्थात तो थांबऊ नकाच. मजा येतेय वाचायला. आणि हा विरंगूळा आहे. चालू द्या. पण चांगल्या दर्जाची कोटी करायचा प्रयत्न नक्की करा असे मला वाटते.
‘मेरीच सुनो’ असं मेरीच यांचे म्हणने नाही पण प्रयत्न करायला काय हरकत आहे?
द्वादशांगुला... भारी होता
द्वादशांगुला... भारी होता प्रयत्न. वाटले नव्हते !
आजचा शब्द घ्या: कान
आजचा शब्द घ्या: कान
शब्दाचा अर्थ जरी नाही बदलला तरी या शब्दामुळे वाक्याचा अर्थ नक्की बदलेल.
माझ्याकडून सारखे सारखे कपाचे कान तुटल्याने आईने माझे चांगलेच कान उपटले, तेंव्हापासुन चहाच्या नावाने मी कान पकडले.
जुई, कोटी करता करता तू तर
जुई, कोटी करता करता तू तर कविता केलीस चक्क.
आभा, कविता छान आहे.
आभा, कविता छान आहे.
माझ्याकडून सारखे सारखे कपाचे
माझ्याकडून सारखे सारखे कपाचे कान तुटल्याने आईने माझे चांगलेच कान उपटले, तेंव्हापासुन चहाच्या नावाने मी कान पकडले. आईच्या जागी मी असते तर एक कानाखाली देऊन कान पकडून उठा बश्या काढायला सांगितल्या असत्या..
मंजुताई
मंजुताई
ह्या धाग्यावर कान देवून
ह्या धाग्यावर कान देवून ऐकताऐकता छान करमणूक झाली
लग्न झाल्यावर काण्यांकडल्या
लग्न झाल्यावर काण्यांकडल्या माझ्या सासरच्या समस्त अगदी कानाकोपर्यातल्या काना स्त्रिया नाकाकानात दागिने लेवून मढलेल्या पाहून मी देखिल लगोलग जाऊन कांदेबटाटे घ्यावेत तसे कानपूरहून भरपूर कानातले घेतले. हाकानाका. पण शेवटी खबर कानोकानी झालीच.
माझे नाव ऐकून भल्या भल्यांचे
माझे नाव ऐकून भल्या भल्यांचे कान चिमटीत जातात आणि तुम्ही कानाखाली द्यायच्या गोष्टी करता? आता हे कुणाच्या तरी कानावर घातले पाहीजे.
कानाची वैशिष्ट्ये विचारल्यावर
कानाची वैशिष्ट्ये विचारल्यावर मी म्हणालो "कानाला काना दिल्यास कानाचा काना होतो" तेव्हा काहींनी कानात बोटे घातली, काही म्हणाले "कान विटले", गुरुजींनी कान धरून उभे केले.
कानातल्याचा खडा पडल्यापासून
कानातल्याचा खडा पडल्यापासून मी कानाला खडा लावला आणि कानातली वापरायचं बंद केलं.
द्वादशांगुला... भारी होता
द्वादशांगुला... भारी होता प्रयत्न. वाटले नव्हते ! >> धन्स!
जुई, कोटी करता करता तू तर कविता केलीस चक्क. Happy>> हो काय!
माझ्या लक्षातही आलं नव्हतं, तुम्ही सांगितलंत तेव्हा कळलं! गामिनी आजींच्या पुढ्यात हत्ती आणण्याच्या नादात झालं असावं! 
कान-
या कानाचे त्या कानाला ऐकू न देण्याची दक्षता बाळगूनही भिंतीला असलेल्या कानाने काना देण्याच्या शुल्लक कारणावरुन कोणी कोणाच्या कानाखाली पेटवली, हे शेवटी चोखपणे कानावर घातलेच सगळ्यांच्या; पण आम्हाला काय, आम्ही कानात बोळे घालून कानवले खाऊ!
छान द्वादशांगुला.
छान द्वादशांगुला.
या कानाचे त्या कानाला कळु न द्यावे असे म्हणतात, ऐकू ऐवजी कळु हवे असे मला वाटते.
कान इकडे असूनही का न कळले
कान इकडे असूनही का न कळले त्याला?
का नात त्याची ओरडेल म्हणून कानात बोळा घातला?
असे काही प्रकरण आहे का हे? का नाही? कानात सांगता का नाही?
एकाने दुसर्याच्या कानात
एकाने दुसर्याच्या कानात दुयर्याने तिसर्याच्या कानात सांगायच्या ह्या कानगोष्टीच्या खेळात कानामागून तिखट झालेली असूनसुध्दा खेळ का न रंगला बुवा ...
कान कसे असावेत? एक तर
कान कसे असावेत? एक तर कानवल्यासारखे. नाहीतर गणपतीबाप्पा सारखे....
छान द्वादशांगुला. Happy> धन्स
छान द्वादशांगुला. Happy> धन्स मानवकाका!
कृष्णाजी मस्त जमलंय!
प्रकरण
प्रकरण
आज शाळेत कुठले बरे प्रकरण शिकवत आहेत?
त्या ह्यान्च्या प्रकरणामुळे शाळेला हे प्रकरण झेलावे लागत आहे
मंजूताई, परीतै धान जमलंय.
मंजूताई, परीतै छान जमलंय.
कृष्णा छान, असेच नसले तरीही
कृष्णा छान, असेच नसले तरीही असेही प्रकरण नक्कीच आहे हे. कसले प्रकरण कळले की भलतेच प्रकरण होणार नाही.
मानव, हो ना प्रकरण मग शेकत पण
मानव, हो ना प्रकरण मग शेकत पण नाही!
Pages