सध्या सोशलसाईटवर ट्रोलिंग नावाचा प्रकार फार बघायला मिळतो. बहुतांश लोकं एंजॉय करतात. पण मला हा भस्मासूर, एक किड वाटते. येत्या काळात काय ते स्पष्ट होईलच.
सध्या सोशलसाईटवरच्या चकरा कमी होऊनही व्हॉटसप फेसबूक कृपेने दोन प्रकार कानावर आलेत.
पहिला, वा पहिली - अनुष्का शर्मा.
विराट कोहलीची जोडीदार असायची तिला बरीच किंमत चुकवावी लागली आहे असे वाटते. आणि ती देखील उगाचच. त्यामुळे जातीवंत ट्रोलर्सची ती अशीही आवडीची टारगेट आहेच. सध्या तिच्या सुईधागा चित्रपटातील तिच्या रडक्या वा उदास चित्रांना घेऊन बरेच विनोद बनत आहेत. अश्या फोटोंना मेमेस की मीमस (स्पेलिंग - memes) असे काहीतरी म्हणतात. त्यातले काही आपल्याला खरोखर हसवतातही. पण दुर्दैवाने जेव्हा असे ट्रोलिंग विनोद एखाद्या महिलेवर बनायला सुरुवात होतात तेव्हा ते हळूहळू वल्गर होत जातात.
दुसरे आहेत दुर्दैवाने आपलेच सचिन पिळगावकर.
खरे तर यांच्याईतका चतुरस्त्र कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत अभावानेच. त्यांच्या अभिनय दिग्दर्शनाबद्दल तर बोलायलाच नको. पण या वयातही उत्साहाने नाचणे, नच बलियेसारखी स्पर्धा जिंकणे, नृत्यस्पर्धेचे जज बनताना नाचातील शास्त्रोक्त बारकावे टिपून सांगने, सारेच अफाट. पण ज्यांना खरेच आदराने महागुरू म्हटले गेले पाहिजे त्यांना चिडवल्यासारखे महागुरू म्हटले जाऊ लागले.
आता नुकतेच त्यांचे एक गाणे आले आहे.
Official : Amchi Mumbai -The Mumbai Anthem | Sachin Pilgaonkar |
https://www.youtube.com/watch?v=12x0hYBQElQ
प्रामाणिकपणे सांगायचे तर गाणे म्हणून मला ते नाही आवडले. अगदी आमच्या मुंबईचे गाणे असूनही नाही आवडले. पण यावरून ट्रोल करणे म्हणजे तुम्ही एखादे चुकीचे गाणे निवडून, वा फ्लॉप स्क्रिप्ट निवडून, वा बंडल पिक्चर करून फार मोठा गुन्हाच केला आहे अश्या पद्धतीने तुटून पडणे. हे सगळे कुठून येते? त्यातही जी व्यक्ती त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वी असेल, टॉपला असेल त्यांच्या चुकांनाच मोठ्या करून त्यांची टिंगल उडवण्यात लोकांना जास्त मजा येते. दुर्दैवाने हा एक हुमायुन नेचरचाच सडका भाग आहे. कमीअधिक प्रमाणात आपण कोणी याला अपवाद नाही आहोत. यात आपले काहीतरी आत सुखावते.
एखादी अनुष्का शर्मा आजच्या नटीतील विचारांनी बोल्ड अभिनेत्री असल्याने विराटच्या साथीने अश्या प्रकारांना इग्नोर करणे तिला जमतही असेल. पण आपल्या मराठमोळ्या सचिनना आणि त्यांच्या कुटुंबियांना नक्कीच हे सोपे जात नसेल.
आज तुम्ही म्हणाल पण नाही हो, मला ते सचिन वा ती अनुष्का मुळातच आवडत नाही. पण उद्या हा प्रकार ईतका बोकाळणार आहे की यातून कोणी सुटणार नाही.
त्यामुळे माझ्यापुरते तरी मी अश्या प्रकारांना लाईक शेअर एंटरटेन करणे बंद केले आहे. पूर्वी जे केले असेल त्याबद्दल सध्या वाईट वाटत आहे.
सचिनजी यांचे। ट्रोलिंग चुकीचे
सचिनजी यांचे। ट्रोलिंग चुकीचे होते. लोक इतके का डूख धरून आहेत काय माहिती.
Picturizatiom चीप होतं.
या लेखालाही ट्रोलिंग करू नये
मी नाही बाई त्यातली आणि ..... ................................. पठडीतला अजून एक लेख.
सचिन चं ट्रोलिंग मलाही नाही
सचिन चं ट्रोलिंग मलाही नाही आवडलं.व्हिडीओ/म्युझिक/चित्रीकरण सुमार आहे मान्य.पण ज्या काळात तो बनला त्या काळात तसेच म्युझिक व्हिडीओ बनत असतील.हाऊसफुल्ल वगैरे टाईप चे सिनेमे संपल्यावर पण अश्याच थीम ची गाणी शेवटी टायटल्स ना येतात.
सचिन ने काय असाईनमेंट करायला निवडावे हा त्याचा चॉईस आहे.आपल्याकडे न बघणे हा पर्याय असतो.किंवा फक्त त्या गाण्यावर टीका करणे हा चॉईस असतो.फेसबुकवर लोकांनी लिहिलेल्या अत्यंत वैयक्तिक बिलो द बेल्ट कमेंट पाहून बरं वाटलं नाही.(तिथे लिहायला घेतलं होतं पण फेसबुकवर अश्या विषयावर विरोधी सूर काढणे, तेही स्वतः ट्रोल व्हायची भीती असताना हा बराच शूर प्रकार आहे.सध्या नको होता.)
गाणं बघायचं डेरींग नाही केलं
गाणं बघायचं डेरींग नाही केलं पण खालच्या प्रतिक्रीया वाचल्या youtube वर, काही खरंच भन्नाट होत्या, सभ्य भाषेत होत्या हसू आलं. पण काही अतिशय खालच्या पातळीवर उतरलेल्या, असभ्य भाषेत होत्या त्या नाही आवडल्या, त्याला विरोध, त्या वाचवल्या पण गेल्या नाहीत. बाकी फेसबुक वर वाचायला गेले नाही.
पर्सनली मी कोणाचं trolling करत नाही. पण कधी कधी कीव येते सचिनची पर्सनली मला. गाण्याबद्दल विरोधी सूर बघून बघावसं वाटलं नाही मात्र.
मी तो महागुरू वाला डान्स
मी तो महागुरू वाला डान्स कार्यक्रम पहिला नाहीय, पण त्या कार्यक्रमानंतरच लोक चिडायला लागले सचिन वर हे कळतेय.
युट्यूबवरच्या प्रतिक्रिया
युट्यूबवरच्या प्रतिक्रिया नाही वाचल्या. पण मटा, लोकसत्ता अशा आघाडीच्या वृत्तपत्रांनी त्यातल्या काही प्रतिक्रियांची दखल घेतली आहे. फेसबुकवरचा एक जोक खूप आवडला.
मुंबईकर : तुम्ही पुणेकर म्हणजे ...
पुणेकर : हो झोपतो आम्ही एक ते चार, तुमच्यासारखे फालतू व्हिडीओ बनवण्यात वेळ घालवत नाही.
अजून एक होता
आता कळालं ना आम्ही पुणेकर पहिले कसे ते ? असे व्हिडीओ बनवाल तर शेवटून पहिले याल
एकाने आता मी केरळात शिफ्ट
एकाने आता मी केरळात शिफ्ट होतो लिहिलं.
पुणे की मुंबई वाद मिटला, पुणेच चांगलं असं कोणीतरी लिहिलं.
ह्या टाईप प्रतिक्रिया आवडल्या.
लोल.. म्हणजे मान्य केलं 1 ते
लोल.. म्हणजे मान्य केलं 1 ते 4 झोपा काढतात ते ☺️
मला सचिन तसा कधिच फारसा आवडला
मला सचिन तसा कधिच फारसा आवडला नाही. त्यांचा असा कोणता सोलो चित्रपट आहे जो गाजला? त्याचा नम्रपणा बेगडी वाटतो. तरुण दिसत रहाण्याचा हट्ट वेडेपणाचा वाटतो. पण या मानसाने लहानपणापासुन माझे मनोरंजन केलय. एकेकाळी त्याचे चित्रपट मी आवडीने पाहिलेत. ज्यांना त्याच्याविषयी काहीही माहित नाही त्यांनी ज्या असभ्य भाषेत कॉमेंटस् केल्या ते मात्र अजिबात नाही आवडलं. ज्या पध्दतीने ट्रोल केलं गेलं ते नाही पटले.
जाता जाता: उद्या मुंबईमधील ऑफीसांमध्ये नियम निघाला की 'दुपारी लंच टाईमनंतर तुम्हाला दोन तास झोपण्याची/विश्रांती घेण्याची परवानगी आहे' तर किती मुंबईकर या नियमाविरुध्द आवाज उठवतील?

त्यांचा असा कोणता सोलो
त्यांचा असा कोणता सोलो चित्रपट आहे जो गाजला? >>>>> गीत गाता चल.
आमच्या मटामधे श्रीपाद
आमच्या मटामधे श्रीपाद ब्रह्मेंचा लेख वाचनीय आहे.
यात माबो सेलेब्रिटी पण
यात माबो सेलेब्रिटी पण पकडायचे का?
:विचारात पडलेला बाहूला:
भारी होत्या प्रतिक्रिया
भारी होत्या प्रतिक्रिया
केरळात जातो,
टाईम टु लिव मुंबई
म्हणुन एलियन इथे येत नाहीत
सिने जगताला तांब्या पितळीचे दिवस
हा हा मजा आली जाम
किंवा फक्त त्या गाण्यावर टीका
किंवा फक्त त्या गाण्यावर टीका करणे हा चॉईस असतो
<<<
कर्रेक्ट! गाण्यावरच टिका अपेक्षित असते. पण ते तसे होत नाही म्हणून तर ही ट्रोलिंग झाली..
पण फेसबुकवर अश्या विषयावर विरोधी सूर काढणे, तेही स्वतः ट्रोल व्हायची भीती असताना हा बराच शूर प्रकार आहे.
<<<<<
एक्झॅक्टली! हाच यातला घातक भाग वाटतो. न पटलेल्यास विरोध केल्यास स्वत: ट्रोल व्हायची भिती.
एखाद्या राजकारण्यामागे त्याचे समर्थक वा भक्त असतात. कलाकारांबाबत मात्र लाखो कट्टर. चाहते सर्वांचेच नसतात .. सॉफ्ट टारगेट ठरतात
बाकी ट्रोल्स बघितले नाहियेत,
बाकी ट्रोल्स बघितले नाहियेत, पण वर दिलेला व्हिडीओ अगदीच बेकार आहे. जास्त वाईट वाटुन घेउ नका. ईतक वाईट अनुष्काला आणि सचिन ला ही नसेल वाटलं...
https://www.facebook.com
स्वभावच पडला असा.. मला तर खूप आवडलं महागुरूंचं
https://www.facebook.com/shahab.ahemad.3/videos/1892668320848590/
मलाही धक्काच बसला. खरं म्हणजे
मलाही धक्काच बसला. खरं म्हणजे इथे तो व्हिडीओ हेडर मधे टाकून महागुरूंच्या बदनामीसाठी आयतेच कोलीत द्दिलेय हाती. महागुरूंविषयी आदर, प्रेम असेल तर तो व्हिडीओ हेडरमधून उडवावा ही नम्र आणि कळकळीची विनंती.
महागुरूंची हिंदी मराठी सिनेमातली कारकीर्द अतिशय दीर्घ आहे. महानायक अमिताभ बच्चन हे देखील त्यांना ज्युनिअर आहेत. शोले च्या चित्रीकरणादरम्यान अमजद खान त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असे. त्यांच्या आत्मचरीत्रात आपल्याला अशा अनेक पडद्यामागील घटनांची ओळख होऊन आपण थक्क होऊन जातो. हरीभाई जरीवाला म्हणजे संजीवकुमार यांच्याशी सचिनजींचे मैत्रीचे नाते होते. सचिनजी त्यांना टिप्स देत. टीव्हीवर हा किस्सा ऐकताना अंगावर रोमांच उठले होते.
आपण मराठी रसिक कद्रू आहोत. आपल्या भाषेत एक महानायक आपली चित्रसेवा करतो आहे याची आपणास जाणीव नाही.
सगळीकडे वाचुन विडीओ पाहिला पण
सगळीकडे वाचुन विडीओ पाहिला पण कमेंट नव्ह्त्या त्याखाली. कुठे आहेत कमेंट?
विडीओ खरोखर बकवास आहे.
मुंबईचा लेले कोण हे मात्र
मुंबईचा लेले कोण हे मात्र नाही समजले.
कॉमेंट्स इथे आहेत.
कॉमेंट्स इथे आहेत.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2155050241419204&id=14278897...
यूट्यूबवरच्या कमेण्ट्सचे
यूट्यूबवरच्या कमेण्ट्सचे स्क्रीन शॉट्स काही महाभागांनी इथे टाकलेले आहेत. मला ऋन्मेषपेक्षाही वाईट वाटले, यातना झाल्या मनाला.
https://www.youtube.com/watch?v=FvXRDvkOuzc&feature=youtu.be
सचिन ने काय असाईनमेंट करायला
सचिन ने काय असाईनमेंट करायला निवडावे हा त्याचा चॉईस आहे.आपल्याकडे न बघणे हा पर्याय असतो.किंवा फक्त त्या गाण्यावर टीका करणे हा चॉईस असतो.फेसबुकवर लोकांनी लिहिलेल्या अत्यंत वैयक्तिक बिलो द बेल्ट कमेंट पाहून बरं वाटलं नाही.>>>>+ १००
महानायक अमिताभ बच्चन हे देखील
महानायक अमिताभ बच्चन हे देखील त्यांना ज्युनिअर आहेत. शोले च्या चित्रीकरणादरम्यान अमजद खान त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असे.
<<<
याबाबतही बरेच लोकांच्या पोटात खदखद आहे. आणि ते साहजिकच आहे. एखाद्या व्यक्तीला आपण ट्रोल करू लागतो वा ती आपली नावडती होते तेव्हा त्याच्याबद्दल कानावर आलेल्या महान गोष्टी आपल्या पचनी पडायला जड जातात हे हुमायून नेचर आहे.
शेवटच्या वाक्यात सचिनजींबद्दल वापरलेल्या महानायक शब्दाशी सहमत. आपल्यासाठी तेच अमिताभ आहेत. असायला हवे होते. तितकेच उत्तुंग व्यक्तीमत्व आहे.
याबाबतही बरेच लोकांच्या पोटात
याबाबतही बरेच लोकांच्या पोटात खदखद आहे. आणि ते साहजिकच आहे >> खदखद आहे हे वाचून मला धक्काच बसला. साहजिकच आहे असे कसे म्हहणवतेय? अशा प्रकारे समर्थन निषेधार्ह आहे. अत्यंत क्लेशदायक आहे. हे असे काही मायबोलीवर वाचण्यापेक्षा मेंबरशिप रद्द करण्यात यावी...
महाग्रू बरोबर तुमचे आवडते
महाग्रू बरोबर तुमचे आवडते गरिबांचे शाहरुख खान असणारे थालिपिठ्या लघुगुरुचे पण कान उपटलेत की लोकनी ऋण्म्याभाव ...
आयडी मरुन परत जिवन्त कसा काय झाला बुवा भभा ? पुनर्जन्मातदेखील ऋण्म्या तितकाच डाम्बरट अन चेंगट राहिलाय जणु
ट्रोलिन्ग व्हायचेच ..Its
ट्रोलिन्ग व्हायचेच ..Its part of social media in 21st century. तुमच्या कोव्ळ्या संवेदनशील बालमनावर विपरीत परिणाम होत असेल तर सोशल मीडिया पासून लाम्ब रहा म्हणावे
मायबोलीवर आपल्या सदस्य
मायबोलीवर आपल्या सदस्य माहीतीत आवडते कलाकार असा एक रकाना असतो.
जेव्हा मी माबोचे सदस्यत्व घेतले त्याच दिवशी मी त्यात माझ्या आवडीच्या तीन मराठी कलाकारांची नावे लिहीली. त्यातले एक नाव सचिनजींचे आहे.
तर आज त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे म्हणून ते अचानक माझे आवडते झाले नसून आधीपासूनच आवडीचे होते.
एण्ड येस आई क्नो ट्रोलिंग ईझ ध पार्ट ऑफ सोशल मिडीया.. बट ईट्स डर्टी पिक्चर सॉरी डर्टी पार्ट.. एण्ड ईट शूल्ड बी रीमूव्हड !
नाही नाही. माझे लाडके सचिनजी
नाही नाही. माझे लाडके सचिनजी यांनी दिलेले स्पष्टीकरण ज्याप्रमाणे काही लोकांना पटलेले नाही तद्वतच मलाही हे वरचे स्पष्टीकरण अजिबात पटलेले नाही. मला या लिखाणामागे उपहासाचा दर्प येऊ लागला आहे. माझ्या आवडत्या कलाकारावर थेट टीका न करता त्यांची बाजू घेतोय असे दाखवत त्यांचा नेमका तोच व्हिडीओ घेऊन धागा का काढावासा वाटला ? इतके आवडते कलाकार होते तर आजवर आलेल्या चित्रपटांबद्दल काहीच कसे लिखाण नाही केले ?
नुकताच रणांगण येऊन गेला, कट्यार येऊन गेला. कट्यार मधली भूमिका तर यादगार आहे. मग का बरे आपल्या आवडत्या कलाकारांच्या का गाजलेल्या कलाकृतीबद्दल दोन शब्द बोलावेसे वाटले नसावेत ?
(No subject)
घ्या, वर बघा. शोधलं की मिळेल.
घ्या, वर बघा. शोधलं की मिळेल.
आणि काही विषय निघाल्याशिवाय उठसूठ मला ते आवडतात याचा जप करत बसू का?
आणि माझी मायबोलीवर दिलेली माहीती चेक केलीत का? तिथे सदस्यत्व घेतल्यापासून त्यांचे नाव आहे आवडत्या कलाकारांमध्ये.
कट्यार आणि रणांगण मी पाहिले नाहीत तर त्यावर लिहू कसा? तरी कट्यारचा रसप यांचा धागा असल्यास शोधून या. तिथे सचिनजींच्या कौतुकात काहीतरी लिहिले असेलच
Pages