Submitted by मोक्षू on 29 August, 2018 - 10:06
नवीन channel सोनी मराठी वर लागणारी मालिका... झी मराठी वरच्या फालतू मालिकांना कंटाळलेल्या सुज्ञ प्रेक्षकांनी काहीतरी चांगलं पहावं आणि त्यावर चर्चा करावी असं वाटतं म्हणून हा धागाप्रपंच... वेगळी कथा आणि उत्तम अभिनय...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
थोडी कथा आणि कलाकार माहिती
थोडी कथा आणि कलाकार माहिती असतील तर लिहा प्लिज. किती वाजता असते.
Sorry अंजु मला वेळ नाही माहित
Sorry अंजु मला वेळ नाही माहित.. मी सोनी च्या appvr पाहते... YouTube vr पण आहे सगळे episodes.. समीर धर्माधिकारी आहे लीड रोल मध्ये... बाकी अरुण नलावडे, जुयेरेगामधला सतीश वगैरे आहे... आणि कथा वाचण्यापेक्षा पहाण्यात जास्त मजा येईल..
Ok thank u.
Ok thank u.
भेटी लागी जीवा मालिका चांगली
भेटी लागी जीवा मालिका चांगली आहे.
अरुण नलावडे ब-याच दिवसांनी चांगल्या आणि वेगळ्या भूमिकेत दिसत आहेत.
सोने पे सुहागा म्हणजे त्यात समीर धर्माधिकारी पण आहे ना
रोज रात्री १०.३० वाजता असते ही मालिका अंजू मॅम!
Thanx, अंजू चालेल हो नुसतं
Thanx, अंजू चालेल हो नुसतं
मी नेटवर पहिले 2 भाग बघितले, फार इंटरेस्ट नाही वाटला. स ध कधी कधी काय बोलतो पटकन कळत नाही.
एखादा अरुण नलावडे असलेला भाग बघेन.
पहिले 2 5एपोसोड्स बोअर वाटले.
पहिले 2 एपोसोड्स बोअर वाटले... Pn आता चांगली वाटते आहे.. समीर पटवर्धन हा एक नामवंत वकील असतो. तो अनाथ असून अनाथाश्रमात वाढलेला असतो. खूप मेहनतीने त्याने नाव कमावलं म्हणून विशेष कौतुक असतं सगळ्यांना त्याच.... मोठा बिसनेस (law firm bahutek) का काय असतो त्याचा, पार्टनरशिप जुयेरेगा मधल्या सतीश सोबत असते. तो, त्याची बायको, एक मुलगा मुलगी (जे सतत उगाच भांडत असतात ) असं चौकोनी कुटुंब असते. पण त्याचा काही तरी पास्ट असतो जो tyane सगळ्यांपासून लपवून ठेवलाय. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याने केलेल्या समाजसेवेसाठी सन्मानित करण्यासाठी एक समारंभ योजला असतो एका संस्थेने. तिथे त्याला तात्या जंगम (अरुण nalawade) भेटतात आणी तो अस्वस्थ होतो... कारण त्यांना याच्या पस्तविषयी माहिती आहे.... आता पुढे कळेल नेमकं गुढ काय आहे.
त्या सतीशच्या बायकोच काम
त्या सतीशच्या बायकोच काम करणारी कलाकार कोण आहे ?
मी पण यु ट्यूब वर पाहिले पहिले दोन एपिसोड . चांगली वाटतेय . इंटरेस्टिंग . फॉलो करणार
सतिशची बायको आहे तिचं नाव
सतिशची बायको आहे तिचं नाव माहीती नाही. बघितलं आहे आधी पण कुठल्या सिरीयलमधे आठवत नाहीये.
याचं लेखन मानबा च्या आनंदने
याचं लेखन मानबा च्या आनंदने केलंय, किरण यज्ञोपवीत बरोबर.
तीन चार असे भाग बघितले. तिसरा बोअरचं वाटला. चौथा जरा बरा वाटला. अरुण नलावडे वडील असतात बहुतेक त्याचे, असं वाटतंय. स्लो वाटतेय जरा सिरीयल. काहीतरी सस्पेन्स आहे पण.
समीर मॉडेल म्हणून छान वाटतो
समीर मॉडेल म्हणून छान वाटतो पण अभिनय मात्र नाही आवडत त्याचा. बायको, मुलगा, मुलगी, मित्र यांनी चांगला केलाय अभिनय. मुग्धा रानडे छान करते काम, अगदी सहज पण मला समीरबरोबर मधुरा वेलणकर किंवा पूर्वा गोखलेला बघायला आवडलं असतं.
मी बघितलय या मालिकांमध्ये
मी बघितलय या मालिकांमध्ये हे जे कलाकार असतात तेच नंतर मालिकांचं लेखन करतात किव्वा जे आधी लेखन करतात ते नंतर काम करतात. मुग्धाने गोडबोले -रानडे आधी काम करत होती अगदी पहिल्या वाहिल्या गाजलेल्या आभाळमाया मालिकेपासून आणि अचानक तिला लेखन करणार का म्हणून विचारलं आणि ती मालिकांचं लेखन करायला लागली . तुझं माझं ब्रेक अप च पूर्ण लेखन मुग्धाच होत. आनंद आधी लेखन करत होता तर त्याला मानबा मध्ये काम मिळाल तेच रोहिणी निनावे मानबा मधली मावशी आणि केड्या बद्दल हि म्हणता येईल . तो छोट्या मुलांच्या सारेगामा मधून आलेला गायक रोहित राऊत आता एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे .
मुग्धा गोडबोलेची आई मंगला
मुग्धा गोडबोलेची आई मंगला गोडबोले लेखिका आहेना, त्यामुळे ते गुण तिच्यात असतील.
मिहीर राजदा गुजराथी थिएटरमधे फेमस आहे बहुतेक रायटर, डायरेक्टर, अभिनेता म्हणून .
पण तुझ्या बोलण्यात तथ्य आहे सुजा. शर्वरी पाटणकर पण गेली काही वर्ष लेखिका म्हणून दिसतेय. आधी बरेच वर्ष ती अभिनेत्री म्हणून माहीती होती.
कारण त्यांना याच्या पस्तविषयी
कारण त्यांना याच्या पस्तविषयी माहिती आहे.... आता पुढे कळेल नेमकं गुढ काय आहे. >>>> तो सस्पेन्स वेगळा दाखवला तर ठीकच आहे. नाहीतर समीर पटवर्धनला लग्नाआधीची/नन्तरची प्रेयसी/बायको/ अनौरस मुलगा/मुलगी असते अस काहीतरी दाखवायचे.
सतिशची बायको आहे तिचं नाव
सतिशची बायको आहे तिचं नाव माहीती नाही. बघितलं आहे आधी पण कुठल्या सिरीयलमधे आठवत नाहीये.>> ती झी वरच्या कन्यादान मालिकेत नायिकेची आई झालेली, शरद पोंक्षेची बायको. तसेच तिचा 'परतु' नावाचा सिनेमा पण आहे.
मला तो तात्यांचा मुलगा वाटतोय
मला तो तात्यांचा मुलगा वाटतोय.
एकतर पोस्टर मध्ये तो त्याचा मुलगा आणि अ न दाखवलेत. त्यात भेटतो, शेकहँड करतो, तो सीन बघून. तो पळून गेलाय की काय लहान असताना. त्याचा मुलगाही गातो, वाद्य वाजवतो, हा वारसा तिसऱ्या पिढीकडे आलाय असं वाटतंय किंवा अ ना च्या मुलीला वगैरे फसवून हा आता दुसरं आयुष्य जगतोय.
ती कौंसेलर दिसते छान पण अभिनय एकसुरी वाटतो, तेजस्वी पाटील नाव तिचं. मागे एक दोन सिरीयलमध्ये अभिनय नव्हता आवडला.
तो अरुण नलावडे यांचा मुलगा
तो अरुण नलावडे यांचा मुलगा असतो. काही तरी वाद होऊन घर सोडून आला असतो. कोणालाही हे माहीत नसते.
तो अरुण नलावडे यांचा मुलगा
.
हे दाखवलं का, मी पहिले चार
हे दाखवलं का, मी पहिले चार पाच भागच बघितलेत नेटवर.
इतके तर्क लावण्यापेक्षा sony
इतके तर्क लावण्यापेक्षा sony च्या app vr पूर्ण synopsis दिलाय... वाचून घ्या... मला serial आवडलीय त्यामुळे मी तर बघणार बाकी टायपायचा कंटाळा आलाय...
Back to back 10 episodes
Back to back 10 episodes बघितले, YouTube आहेत पूर्ण episodes. आवडली मालिका. Typical सासू-सून , विबासं पेक्षा काहीतरी वेगळं.
स.ध. चा अभिनय यतातथाच. मुग्धा मात्र छानच.तिची आई म्हणून भूमिका छान आहे. विहंगचा track चांगला आहे. Parallelly , त्या psychiatric चं counseling बरं घेतलयं. ती , श्वेता , व्रूंदा आवडल्या.
Exactly स्वस्ति नेहमीच्या
Exactly स्वस्ति नेहमीच्या मालिकांमधला तोचतोचपणा नाहिये म्हणूनच मला जास्त आवडतेय.... कालचा एपिसोड तर अप्रतिम होता... What an acting... मला समीर धर्माधिकारी ही आवडतोय... आणि मुग्धा पण..
मस्त चाललेय मालिका. आता
मस्त चाललेय मालिका. आता पर्यंत नऊ एपिसोड बघितले. ती सायकियाट्रीस आहे ती शशांक केतकर च्या बायकोसारखी दिसते प्रियांका ढवळे . खूप म्हणजे खूपच साम्य आहे . सगळ्यांची काम छान होताहेत . मस्त पकड घेतेय
रुद्रम नंतर हीच जरा सस्पेन्स
रुद्रम नंतर हीच जरा सस्पेन्स थ्रिलर वाटते आहे..... मला पण आवडते आहे... मस्त सुरु आहे..... कालचा एपिसोड मस्तच.... मुग्धा म्हणते" मला एक गोष्ट तुमच्यापासून थोडावेळ लपवताना गुदमरल्या सारखं झालं ani तुम्ही इतकी मोठी गोष्ट लपवून ठेवलीत. " हे खुप आवडलं... स्त्रिया ना काही लपवणं अज्जीबात जमत नाही.... खूप रेलेट झाली..... सायकियाट्रीस आहे ती शशांक केतकर च्या बायकोसारखी दिसते प्रियांका ढवळे .>>>>> अरे हो खरंच वाटते तशी.... तिला आधी कुठेतरी पाहिलंय असं पण वाटत... कोणत्या सिरीयल मधे होती का....
बऱ्याच होती. पहिली star
बऱ्याच होती. पहिली सिरीयल star pravah वर होती तेव्हा बघितलेली काही दिवस. तिचा हिरो( निखील पेठे नाव बहुतेक) त्यातला नंतर माधुरी मिडलक्लास मध्ये हिरो होता. गुंडा पुरुष देव मध्ये सेकंड हिरोईन होती. भगवान यांच्यावर मराठी चित्रपट होता त्यात मंगेश देसाई ची बायको होती. पिक्चर नव्हता बघितला पण सिरियल्स मी नवीन काही दिवस बघते. मला ती दिसायला आवडते पण तिचा अभिनय कुठल्याही रोलमध्ये सारखाचं वाटतो मला. फार नाही आवडत मला अभिनय तिचा. ती दिसल्यावर मी गृहीत धरलं की ती डायलॉग आता असे म्हणेल, काही मला वेगळं वाटलं नाही. सॉरी पण माझं हे पर्सनल मत.
अरेच्या खरच की, मी movie
अरेच्या खरच की, मी movie पहिला आहे तरी मला अज्जीबात आठवले नाही मग इथे वाचून परत ट्रेलर बघितला तर तीच आहे.... अंजु मला पण तिचा अभिनय एकसारखा वाटतो... मला नेहमी वाटते आता वेगळे expressions देईल, पण ती मात्र प्रामाणिक पणे एक सारखीच न्याय देते प्रत्येक डायलॉग la...
नवरा - बायको, बाप-मुलगा, बहिण
नवरा - बायको, बाप-मुलगा, बहिण - भाऊ, बाप-मुलगी सगळी नाती किती छान पद्धतीने मांडली जात आहेत... Once again awesome episode..
पण ती मात्र प्रामाणिक पणे एक
पण ती मात्र प्रामाणिक पणे एक सारखीच न्याय देते प्रत्येक डायलॉग la... >>> अगदी अगदी. फक्त दिसायला सुंदर आहे. ती दिसली की मला पाठ झालं आहे आता सर्व, ह्याच टोन मध्ये अशीच सेम टू सेम व्यक्त होणार.
मी अजून पुढे बघितलं नाहीये,
मी अजून पुढे बघितलं नाहीये, पाच भाग बघितले आहेत. एक सीन फक्त स ध ने चांगला केलाय इतक्या दिवसांत. संताप राग हतबलता असा होता. बाकी नाही आवडला अभिनय. कधी कधी काय बोलतो हे कळत नाही मला.
त्याची बायको, मुलं, मित्र बेस्ट अभिनयात अगदी सहज करतात. अरुण नलावडे तर आहेतचं.
चांगली आणि थोडी वेगळी मालिका.
चांगली आणि थोडी वेगळी मालिका.. नेहमीच्या ड्रामेबाजीपासून थोडी सुटका!
समीर धर्माधिकारी आणि मुग्धा गोडबोले दोघंही छान, अरुण नलावडे म्हणजे बोनस पाॅईंट... अजूनतरी बघणेबल मालिका !
मी मधले भाग नाही बघितले.
मी मधले भाग नाही बघितले. एकदम कालचा बघितला आत्ता.
मुग्धा काय सॉलिड काम करते मात्र. स ध जाम फिका पडतो तिच्यापुढे, त्याचे डोळे छान आहेत, personality छान आहे पण अभिनयाची बोंब.
ऑफिसमध्ये माजी पत्रकार आलेला त्याच्यासमोरही अभिनयात तो फिकाच पडला. स ध आणि तेजस्वी का तेजश्री पाटील सोडून छोटी भूमिका असलेला नवीन कलाकार पण उत्तम आणि अगदी सहज अभिनय करतोय, हे मलातरी प्रकर्षाने जाणवतं. माझं पर्सनल मत. ऑफिसमध्ये काम करणारे, घरातले नोकर, कॉलेजमधले मुलाचे मित्र सर्वांचा अभिनय अगदी सहज.
तो मुलगा काय करतो, कायम त्याला ८० हजार का हवे असतात, मधलं स्किप केलं म्हणून समजलं नाही. पण समहाऊ बरेच एपिसोडस बघण्याचा कंटाळा आला. आता कसं यापुढे एकेक नंतर नेटवर बघितला जाईल.
Pages