२१ व्या वाढदिवसाला मायबोलीकरांची जगाला भेट : maayboli.cc
आज इंग्रजी तारखेनुसार मायबोलीला २१ वर्षे पुर्ण झाली. गेल्या २१ वर्षात आपण अनेक उपक्रम केले. पण एका वेगळ्या उपक्रमाबद्दल आपण गेल्या गणेशोत्सवात एक कल्पना मांडली होती.
मायबोली प्रशासन हे कायमच प्रताधिकार आणि त्याची अंमलबजावणी यांबाबत आग्रही राहिलं आहे. अनेक मायबोली किंवा मायबोलीबाह्य उपक्रम यांमध्ये वापरायला आपल्या सगळ्यांनाच प्रकाशचित्रं लागतात. यासाठी स्टॉक इमेजेस् अर्थात प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध करून देणारी संकेतस्थळं खूपच उपयोगाची ठरतात. मायबोलीवर अनेक उत्तमोत्तम प्रकाशचित्रं कायम प्रदर्शित होत असतात. आपण विषयावर आधारित झब्बू दरवर्षी ठेवतो, पण मग पुढे या चित्रांचं काय होतं?
आपण जशी इतरांनी उपलब्ध करून दिलेली चित्रं वापरतो, त्याच सागरात आपल्याला काही थेंब टाकता आले, काही खारीचा वाटा उचलता आला तर, असा विचार करून पहिला झब्बू हा देवाला, अर्थात आंतरजाल वापरणाऱ्या समुदायाला अर्पण करायचं आम्ही ठरवलं आहे.
या उपक्रमाला गेल्या वर्षी भरपूर प्रतिसाद मिळाला. त्याचंच मूर्त स्वरूप म्हणजे मायबोली क्रियेटीव्ह कॉमन्स http://www.maayboli.cc ही साईट आजपासून सुरु होते आहे.
मायबोली.सीसी या साईटवरची सगळी प्रकाशचित्रे प्रताधिकारमुक्त आहेत. अनेक मायबोलीकर छायाचित्रकारांच्या देणगीमुळेच हा प्रकल्प उभा राहिला आहे. त्या त्या फोटोखाली तो देण्यार्याचे नाव आणि प्रोफाईलची लिंक दिली आहे. ही प्रकाशचित्रे प्रताधिकारमुक्त आहे आणि कुणाचीही परवानगी न देता विनामूल्य ही प्रकाशचित्रे वापरता येतील अशी स्प्ष्ट सूचना प्रत्येक पानावर खाली आहे. कायदेशीर दृष्ट्या हि सगळी cc-0 (creative commons 0 ) या परवान्याशी संलग्न आहेत.
या प्रकल्पाचे काम अजून संपले नाही. तुम्ही दोन प्रकारे मदत करू शकता.
१) तुमच्या माहितीत काही व्यावसायिक मराठी प्रकाशचित्रकार असतील तर त्यांना त्यांचे एक तरी प्रकाशचित्र प्रताधिकारमुक्त करून या प्रकल्पासाठी देणगी द्यायला सांगा. त्यांचे नाव देणगीदार म्हणून प्रकाशचित्राखाली नक्कीच असेल. मराठी आणि भारतीय संस्कृतीशी निगडीत आणखी प्रकाशचित्रे हवी आहेत. प्रकाशचित्रांबरोबर रेखाचित्रेही (illustrations, cliparts) चालतील.
२)गेल्या वर्षीची अनेक आणि या वर्षी आलेली प्रकाशचित्रे तिथे जोडायची आहेत. आपल्याला या साठी अजून काही स्वयंसेवक हवे आहेत. हे काम घरबसल्या, ऑनलाईन , जितका शक्य असेल तितका वेळ देऊन करता येण्यासारखे आहे. तुम्हाला ही मदत करणे शक्य असेल तर कृपया या पानावर खाली प्रतिसादात लिहा. पण हे मोबाईलवर करण्यासारखे नाही. लॅपटॉप किंवा डेस्कटॉप लागेल.
मायबोलीच्या २१ व्या वाढदिवसाच्या या आनंदाच्या दिवशी, मायबोलीकरांकडून सगळ्या जगाला आपण ही भेट अर्पण करतो आहोत.
अभिनंदन मायबोली!!!!
अभिनंदन मायबोली!!!!
मी माबोवर जे काही फोटो डकवले आहेत ते सर्व प्रताधिकार मुक्त आहेत असे जाहीर करतो. व्यक्तिगत फोटो सोडून अन्य कुठलेही फोटो मायबोली ला वापरण्याचे अधिकार देत आहे.
मायबोलीने इतक्या वर्षात जे भरभरून दिले त्याची किंचित परतफेड.>>>>>+१०००, आशु, अगदी मनातलं बोलला.
माझ्या फोटोवर वॉटरमार्क्स आहेत. वेमा, जे जे फोटोज पाहिजेत ते सांगा, वॉटरमार्क काढुन फोटो पाठवतो.
छान . मदत करायला आवडेल.
छान . मदत करायला आवडेल. मायबोलीवर आत्तापर्यंट टाकलेले फोटो सॉर्ट करून ते कॉपीराईट फ्री म्हणुन ईथे ठेवायचे असच ना ?
अभिनंदन !
अभिनंदन !
अभिनंदन आणी शुभेच्छा .
अभिनंदन आणि शुभेच्छा .
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
क्रियेटीव्ह कॉमन्स वेबसाईटवर सर्च सुविधा देता येईल का ? अर्थातच त्यासाठी फोटोंना मेटाडेटा द्यावा लागेल.
ते लगेच शक्य नसेल तर तो पर्यंत फोटो रँडमली दाखवता येतील, जेणेकरून जास्तित जास्त फोटो लोकांच्या नजरेस पडतील.
मस्त! अभिनंदन!!
मस्त! अभिनंदन!!
मायबोलीवर आत्तापर्यंत कधीही न टाकलेले फोटोज जर या साइटवरती टाकायचे असतील तर काय करायचे? अशी काही सोय आहे का?
पराग मेटाडेटा ची आयडियाही
पराग मेटाडेटा ची आयडियाही चांगली आहे. टॅग्ज देउन सर्चेबल करता येइल. हे टॅग देण्याचे काम ही करता येइल आपल्याला.
अर्रे वाह!
अर्रे वाह!
अभिनंदन आणि शुभेच्छा!!
मस्तच! काही कॅटेगरीज करता
मस्तच! काही कॅटेगरीज करता येतील का? http://www.maayboli.cc वर एखादा ठराविक फोटो शोधायचा कसा?
इतर ठिकाणी शोध घेतला तर तसा
इतर ठिकाणी शोध घेतला तर तसा काही फोटो इथे आहे हे त्यांना दिसले पाहिजे.
माबोला वाढदिवसाच्या खूप खूप
माबोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
(No subject)
त्या साईटवर अपलोड चे बटण सापडले नाही.
पहिला फोटो बनशंकरी देवळाचा रथ, दुसर बदामि गुहेतील एक शिल्प.
अरे वा !! शुभेच्छा !!!
अरे वा !! शुभेच्छा !!!
अभिनंदन मायबोली टीम..एक
अभिनंदन मायबोली टीम..एक चांगला उपक्रम आहे .
मी यात निश्चितच सहभाग नोंदवेन.
मी काढलेला एक फोटो पाहून मस्त
मी काढलेला एक फोटो पाहून मस्त वाटलं खूपच सुखद धक्का
अजून बरेच फोटो आहेत. कसे द्यायचे सांगा
मला काम करायला आवडेल.
अगोदर rmd ने विचारलेलेच
अगोदर rmd ने विचारलेलेच पुन्हा.
हे दुसरीकडे लिहिले-
Srd
19 September, 2017 - 06:28
नवीन मायबोली इमिजिज साइटवर थेट अपलोड करण्याचे अजून सुरू व्हायचे आहे का?
तोपर्यंत कुठे फोटो अपलोड करायचे?
फेसबुकवर अगोदरच लोड केलेल्या फोटोंची लिंक्स दिली अपलोड करता येईल का?
मला वाटतय की कुठले फोटो इथे
मला वाटतय की कुठले फोटो इथे समाविष्ट करायचे हे स्वयंसेवक ठरवणार असतील . आपल्याला ह्या साईट वर फोटो डायरेक्ट अपलोड नाही करता येणार .
मनीमोहोर, बहुतेक या साइटवर
मनीमोहोर, बहुतेक या साइटवर काम चालू असेल. मी अगोदर विकिकॅामन्स या अशा साइटकडे लक्ष वेधले याचे मुख्य कारण फोटोचे टॅग्ज इंग्रजित दिले तर सर्चमध्ये लगेच सापडतात पण मराठी देवनागरी दिले तर जरा कठिणच आहे. मी दोन फोटो इथे दिलेत ते कुठल्या मायबोलीच्या लिखाणात नसल्यामुळे.
हल्लीच्या स्मार्टफोनमधला फोटो विकिवर दिला तर त्यातला exif data आपोआपच तिथे जातो.
मला वाटतं मायबोलीने अपेक्षित फोटो विषयही द्यावेत.
छान उपक्रम, अभिनंदन आणि
छान उपक्रम, अभिनंदन आणि शुभेच्छा
काम करण्यासाठी वाट पहातेय.
काम करण्यासाठी वाट पहातेय. परत दिवाळी आली की बिझी होऊ.
लवकर सांगावे.
छान उपक्रम ! साईट ओपन केली
छान उपक्रम ! साईट ओपन केली माझेच २ फोटो दिसलेत !
बाकी फोटो कुठे दिसतील??
मुक्तेश्वर, अजून काम सुरु आहे
मुक्तेश्वर, अजून काम सुरु आहे. पूर्ण झाले की वेमा जाहीर करतीलच
मुक्तेश्वर, अजून काम सुरु आहे
मुक्तेश्वर, अजून काम सुरु आहे. पूर्ण झाले की वेमा जाहीर करतीलच >> धन्यवाद !
खूप छान
खूप छान
धन्यवाद आणि आभार्स मायबोली टीम
पुवाशु
अभिनंदन
अभिनंदन
वीकेंडला मी एक ते दोन तास #२
वीकेंडला मी एक ते दोन तास #२ साठी मदत करू शकतो EST
काही दिवसांनी मायबोलीला बावीस
काही दिवसांनी मायबोलीला बावीस वर्षे पूर्ण होतील
Pages