नजरबाज(भाग२)

Submitted by Abhishek Sawant on 22 August, 2018 - 06:37

नजरबाज(भाग २)
त्याने खानाच्या सैन्याची इतंभूत माहिती राजांना कळवली, त्यानुसार महाराजांनी आपली पुढची चाल ठरवली. गडावर परतल्यानंतर महाराजांची कौतुकाची थाप त्याच्या पाठीवर पडली आणि त्याला वाटले आपल्या जीवनाचे सार्थक झाले. ती थाप अजूनही त्याच्या लक्षात होती.....
।।क्रमश।।
महादेव या मोहिमेचं महत्व जाणून होता, एकतर आजवरचा हा सगळ्यात धाडशी प्रयत्न होता आणि यामध्ये स्वतः शिवाजी महाराज सामील होणार होते. मुघलांच्या इलाख्यात इतक्या आतमध्ये घुसून लूट करून परत सुखरूप स्वराज्यात यायचं म्हणजे फार जिकिरीचं काम होतं. जसे शिवाजी महाराजांनी शत्रूच्या राज्यात नजरबाज पेरून ठेवले होते तसेच शत्रूचे नजरबाज आपल्या राज्यात असणारच याला काही दुमत न्हवत. या मोहिमेची माहिती बाहेर पडली तर शिवाजी महाराज आणि पर्यायाने महाराष्ट्रावर अनिष्ट ओढवून घेतल्यासारखं होईल. स्वतः महाराज आणि त्यांचे नजरबाज आणि मावळे यांनी कामालिची गोपनीयता बाळगलेली होती. एवढी कि जिजाऊंना सुद्धा महाराज मोहिमेवर निघे पर्यंत सांगण्यात आलेलं न्हवतं.
महादेव गडावर गेला त्याचे साथी आणि महाराज यांनी सदरेवर मोहिमेबद्दल माहिती सांगितली. मग त्यांची विचार चक्र चालू झाली. मोहिमेचा मार्ग काय असेल, त्या मार्गाच्या आजूबाजूचा परिसर त्याची भौगोलिक परिस्थिती तेथील हवामान तेथील राजनैतिक परिस्थिती आणि धोके याचा बराच वेळ विचार आणि चर्चा करून एक मार्ग निवडण्यात आला. हल्ला इतका जलद आणि चपळ झाला पाहिजे होता की कुणालाही कळायच्या आत लूट करून सैन्य सुरक्षित बाहेर पडले पाहिजे.
"सुरत" सुरत म्हणजे मोघलांच्या अफाट संपत्ती चे प्रतीक, त्या काळात सागरी व्यापार फोफावला होता, त्यामुळे सुरत या परदेशी व्यापाऱयांचे केंद्र बनले होते. सुरतेची कर फक्त रूपानेच लाखो रुपयांची कमाई होत असे. आजवर कोणी सुरतेला हात घालण्याचा प्रयत्न केलेला न्हवता तसा विचारही कोणाच्या मनाला शिवला नसेल. सुरत लुटून आपल्या राज्याची आजवर मुघल सैन्याने केलेल्या नुकसानाची भरपाई करण्याचा महाराजांचा बेत होता .
आज पासून चार पाच महिने आपले शेकडो नजरबाज सुरत पर्यन्त पेरलेले असतील. सुरतेच्या चारी बाजूला मोघली साम्राज्य होते म्हणून तिला कोणतीही तटबंदी न्हवती.आधी महाराजांनी सगळी कडे चुकीच्या खोट्या बातम्या पसरवल्या कि महाराज गोव्यावर स्वारी करणार आहेत आणि मुघलांच्या मदतीला महाराज स्वतः जाणार आहेत वैगेरे वैगेरे.
इकडे महादेव शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन निघाला आज पासून बरोबर चार महिन्यानंतर सुरतेच्या लुटीची मोहीम आखण्यात आली. गडावरून खाली आल्यानंतर महादेवाने आपल्या साथीदारांना त्यांच्या ठरलेल्या जागा सांगितल्या. त्र्यंबकेश्वर हुन जव्हार मार्गे मोहीम ठरलेली होती. कुणी व्यापारी कुणी बैरागी कुणी काही बनून आपल्या जागेवर स्थावर झाले. मिळेल तशी माहिती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवली जायची.
सगळ्यांची व्यवस्था लावून महादेव ४० नजरबाजांसमवेत सुरते मध्ये आला. तापी नदीच्या किनार्यावर सुरतेचा किल्ला वसलेला होता आणि त्याच्या दक्षिणेला सुरत अगदी माळावर वसलेली होती. अनेक इंग्रज तुर्क तालिबानी व्यापारी आपला माल घेऊन सुरतेला येत असत कारण सुरत शहराला समुद्र किनारा पण लाभलेला होता.
महादेव मोमीन झाला होता, त्याने सुरत मध्ये प्रवेश केला तसे ते सर्व पांगले. फाटलेली कपडे डोक्यावर टोपी हनुवटीवर वाढलेली अर्धी पिकलेली दाढी आणि बारीक शरीर. तो आता पोटापाण्यासाठी आपला मुलुख सोडून सुरतेला आलेला मुसलमान होता. जकातनाक्यासमोर ऊभा राहून मिळेल ते काम करत तो सुरत मध्ये दिवस काढत होता. दिवसभर काम करायचे मिळालेला मोबदला घ्यायचा आणि कुणा व्यापाऱ्याच्या घराची राखनदारी करत रात्र काढायची असा त्याचा दिनक्रम चालू होता. दोन सदरे एक गटूळे आणि एक फाटकी वाकळ अशी त्याची संपत्ती होती. तो दिवसातून पाच वेळा न चुकता नमाज पढायचा. असाच त्याचा दिनक्रम चालू असताना एक दिवस त्याची जकातखान्यावरच्या पाहरेकऱ्याशी ओळख झाली. त्याच्या कडून त्याला सुरतेची पर्यायाने किल्लेदाराची गाफील असण्याची माहिती कळाली.
दिवसेंदिवस सुरत आणि मार्ग याबद्दल खडा आणि खडा माहिती राजांना कळत होती. महादेवनं सुरतेच्या पाहाऱ्याची पाहणी केली आणि महाराजांना संदेश पाठवला. शहराच्या वेशी वर कोणतीच तटबंदी नाहीये हे लक्षात आल्यापासून महादेवाने किल्यावर लक्ष केंद्रित केले. किल्ला कितीवेळ लढवला जाऊ शकतो, किल्यावरून प्रतिकार झाला तर त्याचा सैन्याला किती अपाय होईल हे सुद्धा जाणून घेणे गरजेचे होते.
अखेर तो दिवस जवळ आला होता महादेव जकातखान्यासमोर तोंड पाडून ऊभा होता तसं त्याला पाहारेकाऱ्याने हटकले
क्यो मोमीन क्या हुआ??
तसा मोमीन पाहारेकऱ्याचं तोंड बघत म्हणाला आज गलबत नही आया कुछ काम हि नही मिल रहा है. कब जहाज आयेगे??
तसा पहारेदार संशयाने त्याला म्हणाला क्यो? तुम्हे जाण के क्या करना है??
तसा मोमीन सावरला कुछ नही हुजूर हमारा तो पेट उसिसे भरता है इस्सीलीये..
इकडे एक बबलू नावाचा कारागीर वखारीबाहेर इंग्रज साहेबाच्या घोड्याला नाल मारून देत होता. बबलू पाच महिन्यापूर्वी कामाच्या शोधात सुरतेत आला होता. साहेबांनी त्याच्या कामावर खुश होऊन वखारीबाहेर त्याला एक छापरी बांधू दिली. नाल मारून घेता घेता त्याने बबलूला विचारले इथे एक भिकारी असायचा तो कुठे गेला तसा बबलू म्हणाला
दिला हाकलून त्याला गरीब म्हणून जागा दिली तर माझी नाल चोरायला लागला.
गेल्या तीन चार महिन्यात तो भिकारी शहराला परिचित झाला होता वाखारीबाहेर बसलेला असायचा त्याचे ते घाण मळकट कपडे घालून भीक मागत बसलेला असे. तोच भिकारी म्हणजे राजांचा नजरबाज राजे १५ कोसांच्या अंतरावर असताना जाऊन मिळाला.
शेवटची नाल मारून झाल्यावर बबलून मान वर केली मोतद्दार पैसे न देताच निघून गेला. तसा बबलू खाली मान घालून विचार करू लागला जरा थांब माझा राजा येतोय सगळंच वसूल करून घ्यायला.
अंगावर पडलेल्या सावलीने त्याला भान आले त्याने पाहिले तर रामशरण थकल्या चेहऱ्याने उभा होता. त्याने विचारले तर रामशरण म्हणाला की तेल्याघरची चाकरी करून जीव वैतागलाय. बैलांना गोल घाणा फिरवून मला चक्कर येईल आता. राम शरण वखारीत एक चक्कर मारून निघून गेला. नजरबाज मावळ्यांनी सुरतेची माहिती पूर्ण पणे राजांना पुरवली. आणि ते एक एक करून सुरत मधून गायब होऊ लागले. कारण लुटलेली संपत्ती बैलांवर लादून ज्या मार्गाने स्वराज्यात आणणार होते त्यामार्गावर पण लक्ष ठेवायला पाहिजे होत नाहीतर असे होता कामा नये कि ती संपत्ती दुसरे कुणीतरी लुटलं.
दुपारी सुरतेच्या शांत रस्त्यावर घोड्यांच्या टापांचा आवाज घुमला दोन पाहारेदार शिवाजी महाराजांची बातमी घेऊन आले.
किल्लेदार इनायतखान गोड साखरझोपेत होता त्याला उठवण्यात आले, झोपमोड झाल्याने त्रस्त झालेला इनायतखान त्यांच्यावर डाफरला "क्या हुआ??"
"हुजूर शिवाजी आया है"
तशी त्याची झोप उडाली,त्याचे डोळे विस्फारले गेले त्याने विचारलं "क्या बक रहे हो?? कहा है शिवाजी?"
"देवणे मे रुका है भारी फौज के साथ"
इनायतखानाला काही कळेनासे झाले, शिवाजी महाराज मुघलांच्या राज्यात इतके आत घुसतील असे त्याला वाटत न्हवते. तो त्यांच्यावर ओरडू लागला
"तुमने खुद देखा है??"
तसे पहारेकरी सांगते झाले देवणे मध्ये दंगल उठलीये ती ऐकूनच आम्ही इथे आलो.
तेव्हढ्यात खानाचा किल्यावर पहारा देणारा म्हणाला शिवाजी किसी मुघल सरदार को मदद करणे निकले है ऐसी खबर मिली है. तसा इनायतखान शांत झाला पण तो इसम ज्याने हि खबर आणली होती त्याने ती राजाच्या नजरबाजाकडून ऐकली होती. इंग्रज आणि दुसरे व्यापारी शिवाजी महाराजांच्या बातमीने घाबरले.त्यांनी सुरत सोडून जहाजावर माल लादायचा निर्णय घेतला पण इनायतखानाने त्यांना परवानगी दिली नाही. आणि अश्या तर्हेने सुरत शेवट पर्यंत गाफील राहिली.
तर शिवाजी महाराजांसाठी महाराष्ट्र निर्माण करणे किती अवघड होते हे यातून दिसत. आपण आता महाराजांचा टॅटू काढून गळ्यात हातात शिवाजी महाराजांचं लॉकेट घालून शिवभक्त असल्याची ग्वाही देतो पण खरे शिवभक्त तर त्यांचे मावळे होते नाहीतर कोण कुणासाठी चार पाच खऱ्या खुऱ्या भिकाऱ्याचं आयुष्य जगेल.
।।समाप्त।।

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खुप छान..
अशा कथा विस्तारित स्वरूपात अजुन येउ द्या Happy

श्रीमानयोगी (रणजित देसाई) ह्या कादंबरीत खूप विस्तृत स्वरूपात सुरते ची लूट या घटनेच वर्णन केलेलं आहे

@shirin... Itihaas swatha cha kadhi lihitat ky... Mi mazya likhana sathi history change karu ka????? Ani shrimaan yogi pahila nit vacha...