आज आत्ता तब्बल शंभर तास होत आलेत मला हे आव्हान स्विकारून.
गेल्या चार दिवसात व्हॉटसपबद्दलची वाटणारी ओढ टप्प्याटप्याने कमी होताना अनुभवली आहे.
१) नुकतेच व्हॉटसवपवर स्टेटस शेअर करायची सवय लागलेली. पहिल्या दिवशी सारखं डोक्यात तेच. अरे व्हॉटसप उडवले नसते तर हे शेअर करता आले असते, ते शेअर करता आले असते. दुसर्या दिवशी जाणवले की त्यात काय एवढे शेअर करण्यासारखे होते. क्षणिक भावना असते ती, दुसर्या दिवशी मलाच ओशाळून आले की आपण एवढी फालतू आणि छोटीशी गोष्ट मित्रांशी शेअर करता आली नाही म्हणून काल हळहळत होतो. आणि कसं असते, एकदा का आपले सो कॉलड स्वयंघोषित मनोरंजक अपडेटस शेअर करायची सवय लागली की जे शेअर करण्याजोगे आहे तेच मनोरंजक वाटू लागते.
२) मला ऑफिसच्या कामादरम्यान व्हॉटसप बघायचे व्यसन नाहीये. कारण माझ्या प्रायोरीटीज नेहमी क्लीअर असतात. माझा व्हॉटसपवर बागडायचा टाईम फिक्स आहे. सकाळी उठल्यावर ब्रश करताना पाच मिनिटे, चहा पिताना पाच मिनिटे, ट्रेनचा प्रवास दहा मिनिटे, ऑफिसमध्ये वॉशरूममध्ये असताना दहा मिनिटे, लंचटाईमला पाच मिनिटे, संध्याकाळचा ट्रेनचा प्रवास दहा मिनिटे, क्रिकेटची लाईव्ह मॅच बघताना रोमांचक क्षणी, आणि रात्री बिछान्यावर पडल्यावर उरलेसुरले. दिवसभरात तुटक तुटक व्हॉटसप बघणे होत असल्याने रात्री झोपायच्या आधी जेव्हा शेवटचे उघडतो तेव्हा बरेचदा बरेचसे मेसेज न वाचलेले असतात. मग ते वाचण्यात वा झरझर नजर फिरवून डिलीट करण्यात झोपायची वेळ आपसूक लांबली जाते. शेवटी हातातूत फोन बाजूला ठेवताना जाणवते, अरे यार काहीच विशेष निष्पण्ण झाले नाही. त्यापेक्षा अर्धा तास लवकर आणि जास्त झोपलो असतो. हे असे जवळपास रोजच होते.
३) ऑफिसच्या ग्रूपवर मी उगाचच भरती होतो. मला तिथे राहायची जराही ईच्छा नव्हती. पण नैतिकतेला अनुसरून राहणे भाग होते. आता व्हॉटसपच उडवल्यावर तिथे राहण्याचा संबंधच नाही. खूप रिलॅक्स वाटत आहे.
४) शाळा कॉलेजचे कधी पुन्हा संपर्कात येतील असे न वाटलेले मित्र या व्हॉटसपग्रूपच्या निमित्ताने जोडले गेले होते. त्यांचा संपर्क तुटणे हे चांगले की वाईट हे समजत नाहीये. सकारात्मक विचार करता कश्याला हवेत जुने मित्र रोजच्या रोज हाय हेल्लो करायला? उलट जुने मित्र नवीन चेहरे घेऊन आलेत असे वाटल्याने जुन्या आठवणी उगाचच तुरट झाल्यासारखे वाटत होते. शाळेतल्या मित्रांसोबत मोदी आणि राजकारण अश्या विषयांवर चर्चा करत वाद घालणे फार क्लेशकारक असते हे अनुभवत होतो. गेले चार दिवस या क्लेशापासून मुक्ती मिळाली आहे.
५) क्रिकेटचा ग्रूप मात्र फार मिस करत आहे. स्पेशली काही तासांतच भारत ईंग्लंड तिसरा कसोटी सामना सुरू होणार आहे आणि मी त्यावर तावातावाने कुठे चर्चा करणार नाहीये याची खंत वाटतेय. सध्याच्या घडीला हा एक फार मोठा तोटा दिसत आहे.
६) हाय हेल्लो गूडमॉर्निंगमध्ये जो आयुष्यातला वेस्ट ऑफ टाईम होत होता तो मात्र आता सरळसरळ वाचला आहे.
७) वाजपेयी गेले. त्यानंतर व्हॉट्सपवर उधाण आले असेल. या चार दिवसांत त्यापासून वाचलो.
८) गेले दोन दिवस ऑफिसमधील मित्र कुठल्यातरी वायरल विडिओबद्दल चवीचवीने चर्चा करत होते. मला त्यात सहभागी होता आले नाही. नंतर जाणवले की एखाद्या मित्राच्या मोबाईलवर तो विडिओ बघता आला असता. आता वाटतेय की नाही बघितला आणि नाही झालो त्या चर्चेत सहभागी तर आपले काही अडले नाही.
९) नॉनवेज ग्रूप्सवर उगाचच मन चाळवणारे खंडीभर पॉर्न विडिओज पडत राहायचे. त्या मोहमाया आणि सरतेशेवटी मिळणार्या क्लेषापासून लांब आहे.
एकूण जमा खर्चाचा विचार करता दूर राहण्याचे फायदे जास्त आणि तोटे कमी दिसत आहेत.
पण व्हॉट्सपचेही फायदे आहेत हे मात्र नक्की.
हजार तासांचे आव्हान पार पडेल की नाही कल्पना नाही, मात्र आता जेव्हा कधी व्हॉटसपवर परत जाईन, तेव्हा काही गोष्टी क्लीअर झाल्या असतील. व्हॉटसपचे नेमके फायदे काय आहेत हे समजले असेल. आणि गाळ बाजूला सारून फक्त त्या फायद्यांसाठीच व्हॉटसपचा वापर कसा मर्यादित करता येईल हे समजले असेल. अजून एक गोष्ट अंगी बाणवली जाईल ती म्हणजे रात्री झोपायच्या आधी अनरीड मेसेज क्लीअर केले नाहीत तर काही आभाळ कोसळत नाही हे समजल्याने त्या ठराविक वेळेला मी जो व्हॉटसपचा गुलाम व्हायचो ते आता आपल्याच आयुष्याचा राजा असल्यासारखे निवांत झोपलो असेन.
यापूर्वी झोपेची वेळ वगळता सलग चार तास व्हॉटसप न चेक करता राहिलो नसेल, पण या चार दिवसांत विचार पार पलटले. यापुढे बिनदिक्कत राहू शकेन.
तुम्हीही जमल्यास किमान शंभर तासांचे व्हॉटसप चॅलेंज घेऊन बघा. व्हॉटसपकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलायला चार दिवस पुरेसे आहेत.
व्हॉटसअॅप बंद केल्याने
व्हॉटसअॅप बंद केल्याने पिंपरीत गर्लफ्रेण्डसाठी लावले हजारो फ्लेक्स. लावणारा ऋन्मेष तर नाही ना ?
लोल. त्याच नाव आलंय की न्युज
लोल. त्याच नाव आलंय की न्युज मध्ये.
व्हॉटसअॅप शिवाय हजार तास.
व्हॉटसअॅप शिवाय हजार तास.
या उपक्रमामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. मंत्रीमंडळाची तातड्डीची बैठक सुरू झाली आहे. मुख्यमंत्री या प्रकरणी जातीने लक्ष घालत आहेत असे समजते. प्रधानमंत्री कार्यालयाकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आलेली आहे. पोलीस महासंचालकांनी या प्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला असून मनपाचे अधिकारी ठाणे व नवी मुंबई भागात फ्लेक्स लागणार नाहीत याची डोळ्यात तेल घालून दक्षता घेत आहेत.
राष्ट्रपतींनी या प्रकरणी चिंता व्यक्त केली असून आपातकालासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे जाहीर केले आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी या प्रकरणी ऋन्मेषच्या गर्लफ्रेंडला व्हॉट्सअॅपशिवाय हजार तास मोहीमेदरम्यान संपर्क करण्यासाठी आपण जातीने मदत करू असे आश्वासन दिलेले आहे. परंतु ट्रंप यांचा इतिहास पाहता आताच्या पत्नीने या आश्वासनाचा धसका घेतला आहे असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. सीआयए ऋन्मेषच्या गर्लफ्रेंडचा शोध घेत आहे.
जिओ कंपनीने ऋन्मेषसाठी वेगळे अॅप बनवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच त्याला जिओ गिगा फायबर चे कनेक्शन विनामूल्य देण्यात येणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी पत्रकार परीषदेत जाहीर केले आहे.
माझा सल्ला तू पण व्हॉट्सअप
माझा सल्ला तू पण व्हॉट्सअप किंवा कुठल्या मिडियापासून दीर्घकाळ दूर रहा यासाठी नसून जेव्हा केव्हा जितका काळ दूर राहायचे ठरवशील तेव्हा १००० तास असो, की १०० किंवा १००००, एका क्षणात कल्टी मारून मग त्याबद्दल विचार न करता हाती येईल त्या / हवे त्या कार्यात विलिन होण्या बद्दल आहे. नो रुखरुख, चुटपुट वगैरे..
रच्याकाने: काही कामानिमित्त व्हॉट्सअप वर येईन तेव्हा समूहात डोकावून जाईनच. त्या व्यतिरिक्त दीर्घकाळ कल्टी असणार आहे सध्यातरी. माबो वरून सुद्धा.
मानवमामा माझ्यामते व्हॉटसप
मानवमामा माझ्यामते व्हॉटसप ऊनईन्स्टोल करून त्यापासून दूर होण्यापेक्षा व्हॉटसपचा वापर मर्यादेमध्ये करणे याला जास्त संयम आणि धैर्याची गरज लागते.
मी सध्या जो मार्ग स्विकारला आहे तो सोपा आहे.
माझी खरी कसोटी तेव्हा लागणार जेव्हा मी या ब्रेकनंतर पुन्हा व्हॉटसप ईन्स्टॉल करणार..
क्रिकेटच्या आवडीने संयमावर
क्रिकेटच्या आवडीने संयमावर मात केली.
भारत ईंग्लंडमध्ये जिंकतेय आणि मी आमच्या क्रिकेटच्या व्हॉटसप ग्रूपवर चर्चेला नाही हे सहनशक्तीच्या पलीकडे होते.
व्हॉटसप ईनईन्स्टॉल करावेच लागले.
इथे आता लोकांची सहनशक्ती
इथे आता लोकांची सहनशक्ती वाढली आहे असे दिसते आहे.
३ दिवस कोणी इथे प्रतिसाद दिला नाहीये वरील प्रतीसादावर. माझाही संयम सुटला अन लिहिले एकदाचे वरील प्रतिसादावर.
हे म्हणजे मी रम न पिता शंभर
हे म्हणजे मी रम न पिता शंभर तास राहू शकतो म्हणताना एकीकडे व्हिस्की, बियर, व्होडका पिणे चालूच असे झालेय.
>>>>>>
हे उदाहरण १८० अंशात चुकलेले आहे.
कदाचित दारूबाबत रम व्हिस्की बीअर व्होडका सर्वांची चवढव साधारण एकसारखीच असेल, त्यामुळे एकदा तल्लफ लागली की पिणार्याला जे मिळेल ते चालत असेल. >>>>>
कंबख्त तूने तो पी ही नही है.
१८० अंश वळून जाग्यावर ये परत. मी दिलेलं उदाहरण अत्यंत समर्पक आहे हे तूच सिद्ध केलंयस.
Pages