कुंकू टिकली आणि टॅटू - नवीन मालिका

Submitted by anamika_दे on 26 May, 2018 - 08:16

Koni baghtay Ka hi Malika? Bari challiye ajun tari

Group content visibility: 
Use group defaults

भयानक सिरेल आहे...किती ती उद्दाम नायिका......
तिचा नवरा अतीच मुळू मुळू आणि ती वहिनी सारखी फिदी फिदी - फिदी फिदी......
इतका काय लहान दीराचा पुळका....
आणी ही तर बेफाटच आहे...एकदम सांगून टाकलं ..खोटंच .....की मी प्रेग्नंट आहे...तीही लग्नाच्या आधी पासून...तेही घरात दोन बाहेरची माणसं, सासरे व सासू बसले असताना............. हे चांगलं, बोल्ड लक्षण मानून तिला कुणी वाखाणत असेल....तर मग.. ठीकच आहे!

कुणी बघतंय का आता..?
अगम्य प्रकार सुरु आहेत. राज व कामिनी यांना घराबाहेरच्या खोलीत कोंडून ठेवलंय, रमा वा ट्टेल त्याच्यावर वाट्टेल ते आरोप करत्येय, अचाट लॉजीक, अतर्क्य प्रसंग....

कामीनी ला दिवस गेलेत , ते मूल केदार च नाही याची सर्वाना खात्री आहे (का ते माहिती नाही) . तिला सगळे जाब विचारत ,आरोप करत असतात तेव्हा राज ते मूल आपलं आहे , असं सांगतो. बहुतेक म्हणून त्यांना बाहेर काढले. आता रमा राज च्या प्रेमात पडल्या ची कबुली देते. तूनळी वर 5-5 मि. भाग बघून एवढेच कळले

केदार च नाही याची सर्वाना खात्री आहे (का ते माहिती नाही)>>> केदार आणि कामिनी मूल होण्यासाठी ट्रीटमेंट घेतायत.डॉक्टर त्यांची फॅमिली फ्रेंड आहे.
असं एक एपिसोड पहिला परवा त्यात दिसलं

केदार च नाहिये ते मुल अस doctor सांगते विभा ला call करुन. doctor आणि विभा friends आहेत.
जेव्हा राज ते मुल त्याच आहे अस सांगतो तेव्हा विभा आधी केदार आणि कामिनी मग राज आणि कामिनी ला अनुक्रमे एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघायला सांगते. त्यावरून निष्कर्ष काढते कि राज कामिनी ला वाचवायला खोटे बोलला कारण दोघांच्या डोळ्यात माया ममता आणि आइ मुलाचे प्रेम दिसले. या उलट कामिनी केदार एकमेकांना बघत असताना केदार नजर लपवत होता.
आणि कामिनी काहीही बोलत नाहीये उलट केदार ला बोलते तुम्ही का नाही बोललात. केदार अजूनही काहीही बोलत नाहीये. कामिनी ला दोष देतोय. परंतू अस दाखवत आहेत कि केदार ला माहिती आहे सगळा.
रमा ला राज कामिनी वर विश्वास आहे, म्हणुन ती त्या दोघांना घरातून हाकलून द्यायला विरोध करते. त्यांना घरात राहूनच शिक्षा द्या सांगते.
So आता त्या दोघांना अडगळीच्या कि अंधाऱ्या खोलीत बंद केले आहे. आजच्या भागात कामिनी फास लाऊन घेते पन वाचते. आणि आजी त्यांना पुन्हा एकमेकांच्या मिठीत बघते, मग आजी रमा ला जी सुभद्रा काकुना न जुमानता राज कामिनी ला खायला घेउन आलेली असते,नको देउ म्हनते.
तिकडे रमा च्या वडिलांची angioplasty झाली पन तो काही त्याचा हेकेखोरपणा सोडत नाही. आपल्या थोरल्या जावाई ला
तसेच बोलतोय जरी मरणाच्या दारातून आला तरी.
ही झाली आजवर ची कथा.
परंतू काही गोष्टींचा उलघदा होत नाहीये.
१ काका म्हण्जे सुभद्रा चा पती कामिनी ची बाजू घेतो
२ कामिनी खरा सांगत नाहीये, आपल्या दिराला वाचवण्यासाठी तरी खरे बोलाव नाहीतर इतर वेळी भारी पूलका येतो दिराचा.
माझ्या नवऱ्याची बायको पेक्षा हे कथानक बरे चालले होते म्हणून बघत होते परंतू आता इथेही कथानक पुढे जात नाहीये.

आपल्या दिराला वाचवण्यासाठी तरी खरे बोलाव नाहीतर इतर वेळी भारी पूलका येतो दिराचा.
>>> दिरानेच कांड केलंय ना. पुढं कळणार आहे ते मूल दिराचेच आहे ते. टॅटू ला अजून खरं माहीत नाहीय.

अरे आज थोडेसे दिसले काही सीन्स घरी टीव्ही वर, ती कामिनी(?) मस्त। मान टाकून न तडफडता लटकत होती फाशीला, तरी जिवंत Uhoh

असे कुठे होते का, काहीही

दिरानेच कांड केलंय ना. पुढं कळणार आहे ते मूल दिराचेच आहे ते. टॅटू ला अजून खरं माहीत नाहीय.
>>> नाहीये तस, त्यांचे घराणे संस्कारी आहे

मस्त। मान टाकून न तडफडता लटकत होती फाशीला, तरी जिवंत
>>> कारण तीला प्रेक्षकांना लटकावून टाकायचे होते/आहे

मला आवडतीये सद्ध्या सिरिअल.. चांगली चालू आहे.. सासू खरोखरीच प्रगत विचारांची दाखवली आहे.. आणि सद्ध्याच्या परिस्थितीला हात घातलाय...

सासू खरोखरीच प्रगत विचारांची दाखवली आहे. >>>> क्काय? अनामिका, नक्की हिच सिरियल पाहता ना तुम्ही? जी सासू घरात नवीन आलेल्या सुनेला वटसावित्रीचे, मासिक पाळीत सोवळे पाळण्याचे म्हत्त्व पटवून देत होती, ती सासू प्रगत विचारांची? Uhoh

कामिनी चा , केदार च्या उद्योगपती मीत्राने फायदा घेतला. केदारची या सगळ्याला नाईलाजास्तव संमती होती.
सगळं घडून गेल्या वर त्या ने सारवासारव केली.
मग कामिनी गरोदर राहिली तेव्हा तिच्या वरच चिखलफेक केली. तिला घराबाहेर काढ म्हणून आईच्या मागे लागला.
कामिनीला उलट धमकावलं.
जेव्हा कामिनीने सासू ला खरं काय ते सांगितले तेव्हा विभाने पत्रकार परिषद घेऊन हे प्रकरण सगळ्यासमोर आणलं. कामिनीच्या मागे खंबीरपणे उभी राहिली आणि घरच्यांंचा रोष पत्करुन केदार आणि त्याच्या मित्राविरूद्ध police complaint केली.

क्काय? अनामिका, नक्की हिच सिरियल पाहता ना तुम्ही? जी सासू घरात नवीन आलेल्या सुनेला वटसावित्रीचे, मासिक पाळीत सोवळे पाळण्याचे म्हत्त्व पटवून देत होती, ती सासू प्रगत विचारांची? Uhoh >>> विभा कामिनीच्या पाठी उभी राहिलीये खंबीरपणे.. कोणती सासू उभी राहील अशी त्यातही मुलगा involved असताना.. ७ च्या आत घरात वाला rule ही बंद केलाय आता.. मला वाटत कुलकर्ण्यांच्या घरातadjust व्हायला तिने हे सगळे केल असेल.. now she is returning to her own being..

काहीतरी वेगळे असणार विभाच्या मनात. इथे वाचलं म्हणून शेवटचे काही एपिसोडस बघितले. ती पर्सखाली काय लपवून दाखवते केदारला, वाटी असते काहीतरी. मग लगेच पत्रकार परिषद. आता मेन पुरावा locket गायब असं कालच्या एपी मध्ये समजलं त्यामुळे काल जी शंका, रमा च्या आईने बोलून दाखवली ती खरी वाटते. हे नाटक करून कामिनीकडचा पुरावा गायब केला बहुतेक विभाने. हे सर्व नाटक असणार.

कामिनी चा , केदार च्या उद्योगपती मीत्राने फायदा घेतला. >>> पण कामिनी त्यावेळी गप्प कशी काय राहिली? तिने त्यावेळीच त्याला विरोध करायला हवा होता.

कामिनिकडे ठोस पुरावा होता काहीतरी लॉकेट, ते विभाला कळले असावं आणि कामिनी तो पोलिसात देईल ही भीती असावी म्हणून हे सर्व नाटक करून मेन पुरावा गायब केलाय. मी फक्त चार एपिसोडस इथे वाचून बघितले पण कालच्या एपिसोडनंतर मला हा विभाचा डाव वाटतोय.

त्यामुळे पुढे नाही बघणार.

हो का, अरे वा. मग बघेन नंतर voot वर एपिसोड. मला वाटलं की नाही मिळणार लॉकेट.

पण त्यात नक्की तेच आहे ना की बदललं आहे काही मिन्स फेरफार.

ती पर्सखाली काय लपवून दाखवते केदारला, वाटी असते काहीतरी. मग लगेच पत्रकार परिषद.>>>>> ती गंधाची वाटी असते. विभा सगळ्यांंना टिळा लावते घरातून निघताना. केदार ला लावायची ईच्छा नसते म्हणून नीघून जाते.

ओहह thank u स्वस्ति, मला कळलंच नाही. जर खरंच विभाचा हेतू चांगला असेल आणि ती खरंच कामिनीच्या बाजूने असेल असं सिद्ध झालं तर सिरीयल खूप positive संदेश देतेय.

सुरुवातीचा शॉट बघितला. चांगला होता कोर्टसीन. सासू खरंच सुनेच्या बाजूने होती. मुलाला शिक्षा झाली. बाकी पुढे बोअर व्हायला लागलं. शेजारी बायका काही बाही उगाच टोमणे मारतात आणि त्या काकू कामिनीला बाहेर काढायला निघतात वगैरे मग बंद केलं voot. कामिनी गोड आहे पण, मला आवडते श्वेता पेंडसे, मध्ये व्हिलन होती एका सिरीयलमध्ये तेव्हाही काम चांगलं केलं आणि आताही छान करते. सारिकाने पण काम छान केलंय पण मेन नायक नायिका बोअर आहेत.

ती गंधाची वाटी असते. विभा सगळ्यांंना टिळा लावते घरातून निघताना. केदार ला लावायची ईच्छा नसते म्हणून नीघून जाते. >>>> हे योग्य केल विभाने. उगाच गुरुमातेसारख (मानबा) टिळा लाव रे , टिळा लाव रे बाळा म्हणत त्याच्या पाठीमागे वाटी धरत गेली नाही ते.

मालिकेने दीड वर्शांची उडी घेतली आहे .
> रमा कुठेतरी बाहेरच्या देशात बास्केट्बॉलच्या मॅचेस खेळते आहे .
>रेवती आणि प्रसादला आता एक छोटा मुलगा आहे.
>गौरी च्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि तिला दिसू लागलं आहे .
>सातच्या आत घरात चा नियम आता रद्द करण्यात आला आहे.
>खानावळीचं रूपांतर एका छोट्याश्या रेस्टॉरंट मध्ये केलं आहे आणि त्याचा व्याप आता कामिनी सांभाळते.
>राज चे बाबा अजूनही थोडे घुश्श्यातच आहेत , ते आता लोकाना आयुर्वेदिक उपचार देतात. परंपरा बंद झालं वाटतं , नक्की कळलं नाही .
>रमाच्या आई-बाबांची दिलजमाई झाली.
>सुभद्रा काकू सुधारली.
आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे कामिनी आणि राजचं लग्न झालं .
कामिनीचं आताचं रूपडं फार सुन्दर आहे Happy

आता बहुतेक केदार परत येईल .

Pages