कुंकू टिकली आणि टॅटू - नवीन मालिका

Submitted by anamika_दे on 26 May, 2018 - 08:16

Koni baghtay Ka hi Malika? Bari challiye ajun tari

Group content visibility: 
Use group defaults

यात काम करणाऱ्या जिजीना श्रद्धांजली, फार वाईट झालं.>>>> ११११
विभा अन्न पाणी सोडून देते आणि विष्णुपंत घरीं येतात, तिथून पुढचा सांगा ना कोणीतरी brief मधे.

काय किळसवाणे प्रकार असतात एकेक. आधी ज्याला मुलासारखा वगैरे म्हणत होती ती बया नंतर त्याच्याच सोबत लग्न इ. इ. करुन मोकळी झाली. आधी बरी होती सिरियल नंतर बघवेना झाली.

शेवटचा एपिसोड बघितला, वुटवर. याआधी कोर्टात कामिनीला न्याय मिळतो तो एपिसोड बघितलेला.

काहीही होती, रमा राज एकत्र नाहीच आले. ती वहीनी आणि राज एकत्र. टी आर पी नसेल मिळाला, अशी स्टोरी केल्यावर कसा मिळणार.

राजेश देशपांडे यांनी एक पोस्ट लिहीलेली संपल्यावर त्यावर मी लिहीलेलं, रमा राज एकत्र यावेत असं वाटत असणार प्रेक्षकांना, तसं नाही केलं म्हणून टीआरपी कमी झाला असावा. तेव्हा रमाचं काम करणा-या अ‍ॅक्ट्रेसने मला थँक यु लिहीलं.

कुणाला मदत करायची म्हणून कोणी आपला नवरा देतं का. वहिनीला बाळ झालं का. तिची परिस्थिती वाईट होती पण नवरा देणं म्हणजे कैच्याकै.

मधे अनेक एपिसोडस बघितले नसल्याने काहीच माहीती नाही. पण शेवटी वहीनी परत प्रेग्नंट होती, तिचं आणि राजचं बाळ येणार. मुळात ती जोडी शोभत नव्हती, श्वेता पेंडसेसाठी कोणीतरी छान शोभणारा हवा होता आणायला. आदीश वैद्य लहान वाटतो तिच्यापुढे.

काहीतरी फालतू कथानक केल्यावर टीआरपी कसा वाढणार. मालिका गुंडाळावी लागली.

राज आणि रमा चं एकत्र शोभत होते
कामिनी ला डॉ ने सांगितलेलं ना कि abortion केल्या नंतर तिला परत बाळ नाही होऊ शकत. तेव्हा ती म्हणते की राज आहे मग मला अजून मूलं कशाला हवं.

राज आहे मग मला अजून मूलं कशाला हवं. >>> अरेरे असे डायलॉग्ज लिहून परत असं दाखवलं, मोठा जोक आहे Lol

त्यामुळेचं गुंडाळायला लागली असणार सिरीयल.

Pages