शतशब्द कथा आणि दिवाकरांच्या नाट्यछटा
शाळेत असताना दिवाकरांची " पंत गेले राव चढले " ही नाट्यछटा अभ्यासली . नाट्यछटेचा विषय एकाचे सुख दुसऱ्याचे दु:ख कसे होते हा आहे . तिचे गारुड आयुष्यभर कमी होणार नाही . असेच एक दिवस ती नाट्यछटा पुन्हा वाचावी असे मनात आले . मग गुगलले " पंत गेले राव चढले " . तेव्हा पुढील लिंक मिळाली . या लिंकवर नाट्यछ्टा म्हणजे काय , तिचा उगम , तिची वैशिष्ट्ये इत्यादी विषयी सविस्तर माहिती मिळाली . माझी आवडती नाट्यछटा आणि दिवाकरांन विषयी देखील जाणून घेतले . मा बो कर या लिंकवर क्लिक करून ती वाचू शकतात . ही लिंक जुनेजाणते मा . बो कर समीर गायकवाड यांच्या अवार्ड विनिंग ब्लॉगची आहे . खूप सुंदर लेख आहे . तर मग सज्ज व्हा वाचायला .
http://sameerbapu.blogspot.com/2016/04/blog-post_10.html?m=1
मंडळी तर आलात वाचून परत .
काही मंडळी म्हणू शकतात आम्हाला तर हे आधीच माहित होतं . मंडळी तसं असेल तर क्षमस्व कालापव्यय केला म्हणून .
अहो पण काही अनुभवी मंडळी प्रसन्नचित्त दिसतायेत पुन:प्रचिती साठी .
आणि नव शतशब्द कथालेखक विचार देखील करु लागलेत . शतशब्द कथा अशी लिहिली तर ?
अहो मध्यंतरी आपले मा बो कर स्नेही भास्कराचार्य कंटाळले शतशब्द फ्याडला .
त्यांनी एक विनोदी धागा काढला यावर तो ही शंभर शब्दांचा .
काय म्हणताय धागा माहित नाही . जरा वाचून या
https://www.maayboli.com/node/66455
प्रतिसाद वाचल्यावर कळले त्यांच्या सारखे अनेकांना वाटले .
अहो मला सुध्दा भरुन आले .
काय म्हणून विचरताय ?
मला कळेना खरच ताकापुरतं रामायण असू शकतं ?
शतशब्द कथांची शंभर शकले उडवली काही प्रतिसादांनी .
पण येथले चिवट शतशब्दकारही काही कमी पडले नाहीत .
त्यांचा दोर भारी पडला भास्कराचार्यांच्या दोराला. त्यांनी गडावर चढाई चालूच ठेवलीय .
दिवाकरांची नाट्यछटा वाचल्यावर मनात आले एकाच प्रसंगावर बेतलेली कथा नाट्यछटा झाली तर ?
तर शतशब्दकार मित्रांनो विचार करा .
आपल्यात सुप्तावस्थेत दिवाकर असू शकतात .
आणखी एक नवा गड सर करायला तयार असाल तर दारुगोळा पुढील लिंक वर
http://web.bookstruck.in/book/show/160
दत्तात्रय साळुंके
भारी आहे... लिंक्स बद्दल
भारी आहे... लिंक्स बद्दल धन्यवाद
आज लोकसत्तामध्ये पुढील बातमी
आज लोकसत्तामध्ये पुढील बातमी वाचली आणि दिवाकरांच्या नाट्यछटांचे संकलन करणारा माझा धागा आठवला. सुरवातीला बातमी....
दिवाकरांची ‘रिकामी काडेपेटी’ पोलिश रंगमंचावर! पोलंडमधील पोझनान शहरात दोन प्रयोग
बातमीचा दुवा
https://www.loksatta.com/pune/divakars-rikami-kadepeti-drama-on-polish-s...
ही नाट्यछटा जग कसं आहे ते सांगते
नाट्यछटेचा दुवा
https://web.bookstruck.in/book/chapter/9861