बाळंतपणासाठी पगारी रजेबद्दल चर्चा

Submitted by भरत. on 9 August, 2018 - 01:30

अ‍ॅडमिन्/वेबमास्तर, खरं तर मला हा धागा चालू घडामोडी या ग्रुपात उघडायचा आहे. पण त्या ग्रुपमध्ये लेखनाचा धागा उघडायची सोय दिसली नाही, म्हणून ललितलेखनात लिहितोय.
current affairs.png

सार्वजनिक ठिकाणी स्तनपानाबद्दलच्या धाग्यावरची चर्चा पुढे बाळंतपणासाठी पगारी रजेकडे वळली.
तिथले मुद्दे नेटकेपणाने मांडून नव्याने चर्चा करण्यासाठी हा धागा.

त्या धाग्यावरचे या विषयासंबंधीचे प्रतिसाद ,मुद्द्यांनुसार सुसंबद्ध रीतीने आणि जिथे मला आणखी लिहावंसं वाटेल, तिथे माझं मत, अशी मांडणी करायचा प्रयत्न आहे. आलेल्या आक्षेपांंना उत्तरही देईन.
हे लिहिताना सगळा त्या चर्चेचा मला पटेल्/रुचेल असा गोषवारा आहे, असा आक्षेप येण्याची शक्यता आहे. पण तसा हेतू आणि प्रयत्न नाही

***************************************************************
मुद्दा १ : बाळंतपणासाठी भरपगारी रजा असावी का?
सई केसकर - . मूल झाल्यावर काम करायचे की नाही करायचे यावर काम करणाऱ्या आणि न करणाऱ्या महिलांची आपापसात जुंपणे. किंवा एका ग्रुप मधील काहींनी दुसऱ्यांना जज करणे.

अ‍ॅमी - याच्याशी पूर्ण असहमत. भरपगारी बाळांतपणाची 6 महिने रजा घेऊन नंतर राजीनामा टाकणाऱ्या बायका 'केवळ वैयक्तिक' निर्णय घेत नसून त्या सगळ्याच बायकांना, त्यांना नोकरिवर घेणाऱ्या/ठेवणारयाना आणि एकदरच समाजाला/त्याच्या स्त्रियांबद्दलच्या दृष्टिकोनाला affect करतायत.

आणि स्त्रियांनी एक्मेकांसोबत भगिनीभावच बाळगला पाहिजे असे काही compulsion आहे का? भांडुदेत कि छान कचाकचा Lol

सई केसकर - टर्निटी लिव्ह एलिजिबिलिटी ही लिव्ह घेण्याच्या आधी केलेल्या कामावर आधारित असते हे एक कटू सत्य आहे.
आपण कुणालाच आपल्यासाठी काम करायचे कंपल्शन करू शकत नाही.

बाकी भांडायचेच असेल तर बायकांनी एक होऊन पुरुषांशी का भांडू नये?

अ‍ॅमी - सई, अनु आणि राजसी, आपापल्या मोलकरणीना भरपगारी बाळंतपणाची रजा वगैरे वगैरे देतात वाटतं.

> बाकी भांडायचेच असेल तर बायकांनी एक होऊन पुरुषांशी का भांडू नये? > मला माफ करा मी तुमच्या गटात येऊ इच्छित नाही _/\_
भारतासारख्या देशात जिथे मुलं जन्माला घालू नका म्हणून सांगावे लागते तिथे ३ महिने काय आठवडयाचीदेखील भरपगारी रजा देऊ नये असे माझे मत आहे.

===
> प्रेग्नन्सी लिव्ह नंतर रुजू झाल्यावर ठराविक काळ आम्ही नोकरी सोडणार नाही असा क्लोज घालून हवी तितकी प्रेग्नन्सी लिव्ह घेता आली पाहिजे,
( ३ महिने लिव्ह घेतलीत तर काही bond पीरीअड नाही, ६ महिने घेतलीत तर लिव्ह नंतर कमीतकमी ४ महिने काम करावे लागेल, वर्षभर घेतलीत तर ८ महिने लागेल etc _) असे काही तरी >
हे ठीक आहे. बिनपगारी रजा असेल तर ती कितीही घेऊ द्यायला हरकत नाही.

mi_anu : एमी,
आमच्या मावशी अलरेडी 45 वर्षाच्या असलयाने असा सिनारीओ आला नाहीये.सध्या वर्षाला 24 पेड हॉलिडे, दिवाळीला पगाराला पगार बोनस, वर्षातून 2 वेळा गावी जायला पेड 5 दिवस सुट्टी इतकं देतो.
मूळ मुद्दा हा की बाळंतपण, त्या साठीची सुट्टी ही लक्झरी मानली जाऊ नये.
6 महिने पेड वाला मुद्दा आता आलाय.काही महिन्यांपूर्वी. त्यापूर्वी 3 महिने पेड, त्यांनंतर लिव्ह बॅलन्स उरला असेल तो आणि त्यांनंतर अनपेड असं सर्व कंपन्या मध्ये होतं.

राजसी - ऍमी, बिनतोड मुद्दा केला की पर्सनल व्हायचं का! बाकी माझा तरी अजून प्रेग्नेंट मोलकरणीशी संबंध आलेला नाही. एक मोलकरीण दिवस गेल्यावर गावी निघून गेली, विचारलं असतं तर दिली पण असती. एकीला मुलीच्या लग्नासाठी(मागितली तितकी) पंधरा-वीस दिवसांची भरपगारी रजा दिली होती , दोन-तीन वर्षे होती. तोंड उघडून मागितले की सगळं मिळत!

अजून तरी कोणी कोणाला भारतात मुलं जन्माला घालू नका सांगितले नाहीये!

अमितव - Amy, तुमची मते भयानक आणि टोकाची आहेत. जराही सहमत नाही.
पुढारलेल्या देशात (अमेरिकेचा अपवाद) स्त्री आणि पुरुष दोघांना पेरेंटल लिव्ह असते. कॅनडात तेव्हा जो पगार मिळतो तो इआय ( एम्प्लॉयमेंट इन्शुरन्स) मधून मिळतो. तुम्ही काम करत असताना प्रत्येकाच्या पगारातून इ आय कापला जातो, आणि तुमची नोकरी गेली, आजारपण आलं, प्रेग्नंट झालात इ.इ. तर एका वर्षांपर्यंत ( प्रेग्नन्सीला हल्ली 2 केलंय मला वाटतं) तुम्हाला पगाराचा काही भाग इआय (पर्यायानं सरकार) देतं.
नंतर कामावर घ्यायचं बंधन असतं. व्यक्तीला काम सोडण्याचा हक्क असतो. इ आय ही एक उत्तम सोशल सिक्युरिटी आहे.

अ‍ॅमी - अमितव,
• तुम्ही ज्या पुढारलेल्या देशांबद्दल बोलताय तिथे जन्मदर किती आहे?
• इआय सरकार देतंय कि खाजगी कम्पन्या?
• तो सर्व नागरीकांना मिळतोय कि उच्च मध्यम वर्गातल्या पांढरपेशा नोकरदारांनाच मिळतोय?

अमितव - सर्व इ आय भरणाऱ्या व्यक्तीना मिळतो. सुखवस्तू बाई घरी बसली आणि नवरा काम करत असला तर नवऱ्याला मिळते. इंडिपेंडन्ट कॉन्ट्रॅक्टर असाल आणि खुशीने इ आय भरत असाल तरी मिळतो.
प्रत्येक प्रश्न सामाजिक उतरंडीतून बघण्याचे सोडा. (अ‍ॅमी - हे ठीक आहे. तिथे व्यक्ती निवड करतेय आपण एखाद्या 'सरकारी' स्कीमचा भाग बनायचे कि नाही. हे भारतातल्या Epf सारखे वाटते आहे. भारतातील भरपगारी maternity leave म्हणजे 'खाजगी कम्पनीच्या जीवावर सरकार उदार' प्रकार आहे.)

अमितव : तुम्ही जन्मदर वाढलाय म्हणून गर्भारपण कमी करायला रजा पगार काही नको म्हणत होता. मग ते फक्त पांढरपेशा लोकांना मिळतं तर मोलकरणीना का नाही वर आलात आता सरकारी धोरणामुळे सगळा भार खाजगी आस्थापनावर येतो म्हणून कितीपण रजा घ्या पण पगार नको पण नंतर नोकरी देण्याचं बंधन ठेवा असं म्हणताय.

अ‍ॅमी - अमितव,
परत एकदा मागे जाऊन प्रतिसाद वाचून बघा.

> सई, अनु आणि राजसी, आपापल्या मोलकरणीना भरपगारी बाळंतपणाची रजा वगैरे वगैरे देतात वाटतं. > आपल्या एम्पलोयरकडून भ.बा.र. मिळावी म्हणणारे स्वतः एम्पलोयर झाल्यावर काय करतात विचारले आहे.
===
> भारतासारख्या देशात जिथे मुलं जन्माला घालू नका म्हणून सांगावे लागते तिथे ३ महिने काय आठवडयाचीदेखील भरपगारी रजा देऊ नये असे माझे मत आहे. >
याचा अर्थ "भारतातल्या लोकाना मूल जन्माला घाला म्हणून सांगावे लागत नाही घालू नका म्हणून सांगावे लागते. ती मुलं जन्माला घालतच राहणार आहेत. त्यामुळे जोपर्यंत जन्मदर २- होत नाही तोपर्यंत मुलं जन्माला घालणे हा काही सरकारी, सामाजिक, खाजगी कम्पनी मालकांचा प्रश्न होउ शकत नाही. यापैकी कोणीही मातेला पैसे द्यायची गरज नाही." असा होतो.

अमितव : म्हणूनच विचारतोय की जन्मदर 2 होत नाही तोपर्यंत वरील सर्वांनी इन्शुरन्स ही देऊ नये. सरकारी मोफत उपचार करणारी इस्पितळे बंद करून टाकावी. पुरेसे गरीब लोक मेले आणि इफेकटिव्ह जन्मदर 2 वर आला की वाचवा कोणाला वाचवायचं ते. तोपर्यंत पैसे असतील तर जा डॉ कडे नाहीतर मरा. हे वाचायला कसं वाटतंय ??

अ‍ॅमी - व्यक्ती स्वतः प्रिमियम भरून विमा घेते ना? खाजगी कंपनीने भ.बा.र. का द्यावी सांगू शकाल का?
आणि सरकारने हि सक्ती केल्याने कम्पनी स्त्रियांना नोकरीवरच घेत नाही याची सामाजिक किंमत किती आहे?

त्याऐवजी सरकाराने इआयसारखी योजना आणावी किंवा 'सर्व' स्त्रियांना २च मुलांसाठी एक ठराविक रक्कम द्यावी. त्यासाठी करदात्यांना वेगळा सेस लावावा अशा मागण्या का होत नाहीत?

अमितव - हे नियम सरकारी आस्थापनानाही लागू असतील सो फक्त खाजगी कंपनी हे पहिलं चुकीचं आहे. [अ‍ॅमी - सरकारने द्यावं त्याच्या नोकरांना काय द्यायचं ते. खाजगी कम्पनीला का सक्ती करतायत?आणि त्यामुळे होणाऱ्या ऋण परिणामांच काय? ]
दुसरं म्हणजे तुम्ही जितका इआय भरता तितकाच इआय तुमच्या कंपनीला भरणे ही बंधनकारक असते. [अ‍ॅमी - Epf सारखेच आहे हे. कम्पनी इआय भरत असेल तर तो तुमच्या Ctc त हिशेबात धरलेला असणार.][(mandard : Insurance is not a part of CTC, at least in the company's I worked in India.]
शेवटचं : कोणी आणि कशा स्किम मधून हा खर्च उचलावा हा माझा मुद्दा नाहीये. [अ‍ॅमी - माझा हाच मुद्दा आहे]
ती सामाजिक सुरक्षा देणारी सेवा असावी. हे तुम्हाला मान्य असेल तर कोणी आणि कशी स्किम चालवावी यावर कॉम्प्रोमाईज होउ शकते. [सरकारी && 'सर्व'समावेशक असेल तरच मान्य आहे]

अ‍ॅमी - तुम्ही जो अर्थ काढला आहे तो चुकीचा आहे. मी वरती लिहिले आहे .
<भारतासारख्या देशात जिथे मुलं जन्माला घालू नका म्हणून सांगावे लागते तिथे ३ महिने काय आठवडयाचीदेखील भरपगारी रजा देऊ नये असे माझे मत आहे. >
याचा अर्थ "भारतातल्या लोकाना मूल जन्माला घाला म्हणून सांगावे लागत नाही घालू नका म्हणून सांगावे लागते. ती मुलं जन्माला घालतच राहणार आहेत. त्यामुळे जोपर्यंत जन्मदर २- होत नाही तोपर्यंत मुलं जन्माला घालणे हा काही सरकारी, सामाजिक, खाजगी कम्पनी मालकांचा प्रश्न होउ शकत नाही. यापैकी कोणीही मातेला पैसे द्यायची गरज नाही." असा होतो.

नानबा - अ‍ॅमी च्या पोस्ट्स काहीही वाटल्या.
चाईल्डबर्थ हा माझा ह क्क आहे. एज्युकेशन हा जसा आज सगळ्यान्चा हक्क समजला जातो, त्याचा भार कसा सगळ्या समाजावर पडतो, त्यापे क्षाही बेसिक गोष्ट आहे ही.
तुमची आई काम करायची का माहित नाही, पण करत असेल तर तेव्हाच रजाच न देण्याचा उपाय केला असता तर तुम्ही आज इथे असला असतात का? (वाईट अर्थाने लिहित नाहीये, उदाहरण समजावे म्हणून लि हिती ये) समाजात ५०% अ सलेल्या वर्क्फोर्स कर्ता असे धो रण!

राजसी -मोलकरणीला ML दिली असती लिहिलंय ते वाचलं नाहीत का तुम्ही? का तुम्ही देत नाही / द्यायची नाही म्हणून इतरांचं पण तसंच असेल असं गृहीत धरलं आहे. Organised sector एम्प्लॉयमेंट मध्ये कोणत्याही रजेच्या फायद्यांना eligible होण्यासाठी probation पूर्ण करावा लागतो. मोलकरीण एवढी टिकली तर आपोआपच सगळं manage होतं!
बाकी, तुमचं म्हणणं अस दिसतंय की बायका भरपगारी ML घेतात त्यामुळे कंपनीचे आर्थिक नुकसान होते त्यामुळे त्यांना भरपगारी रजा देऊ नये. इतकीच जर मुलं जन्माला घालायची बाईला हौस असेल तर Unpaid Leave घ्या आणि मुलं जन्माला घाला. मुळात बायकांना हे सगळ्या गोष्टी मिळवायला किती संघर्ष करावा लागलाय हे तुम्ही सोयीस्कर रित्या विसरताय. बायकांना बालंतपणाच्या सुट्ट्या द्यायच्या नसतील तर कोणालाच कसलीच सुट्टी देऊ नका. अवघड आहे परत स्वातंत्र्यपूर्व काळाकडे सामाजिक वाटचाल! काही माझ्या समजण्यात चूक झाली असेल तर नक्की सांगा.
बेसिकली, some women can have it all हे बऱ्याच जणांना खुपयंत का? सगळ्याच बायकांना have it all मिळावं अशी इच्छा असेल तर त्यात काही गैर नाही . त्याची सुरूवात घरापासून व्हायला हवी. वडील, भाऊ, नवरा ह्या मंडळींना आधी बदलावं लागेल!

भरत - कल्याणकारी राज्य आणि नोकरी देणारी कंपनी एकच का?

सशल - नोकरी देणारी कंपनी कल्याणकारी राज्यात आहे की कुठे? भारत कल्याणकारी नाही का? शिकून सवरून भारताच्या जीडीपी ला हातभार लावणार्‍या महिलांनां (मुलं काय गम्मत म्हणून एकटी बाई जन्माला घालत नाही) मुलं जन्माला घालण्याचा अधिकार बजावण्यासाठी नोकरीवर पाणी सोडण्याची गरज भासावी का कारण भारतात लोकसंख्या फार जास्त आहे? मुलं जन्माला घालणं ही चैन आहे का? तुम्हाला उद्या सर्दी ताप खोकला झाला तर तुम्ही बिनपगारी रजा घेता का?

अवरली वेजेस आणि सॅलरीड एम्प्लॉयमेन्ट ह्यातला फरक काय आहे? एम्प्लॉयर ला सॅलरीड एम्प्लॉइज् ठेवण्याची गरज का भासावी? तासाच्या हिशोबावर काम करून त्याची मोलमजूरी देणं बेस्ट

===
अ‍ॅमी - सिम्बानी " प्रेग्नन्सी लिव्ह नंतर रुजू झाल्यावर ठराविक काळ आम्ही नोकरी सोडणार नाही असा क्लोज घालून हवी तितकी प्रेग्नन्सी लिव्ह घेता आली पाहिजे," असे सुचवले आहे त्यावर मी "हे ठीक आहे. बिनपगारी रजा असेल तर ती कितीही घेऊ द्यायला हरकत नाही." म्हणले आहे.
-

मानव पृथ्वीकर - (लोक)आपापल्या मोलकरणीना भरपगारी बाळंतपणाची रजा वगैरे वगैरे देतात वाटतं.

झालेले विषयांतर लक्षात घेता हा ही योग्य व महत्वाचा मुद्दा आहे.

राजसी - बरं! बायकांची ML इतकी इतरांना खुपत असेल आणि कंपनीला आतबट्ट्याचा व्यवहार वाटत असेल म्हणून ML वर गदा आली तर career women इतर पर्याय धुंडाळतीलच जस की surrogate, adoption पण त्या option ला पण कुठलीतरी बाईच लागेल अजून प्रयोगशाळेत नऊ महिने ठेऊन घरी बाळ आणायची technology आलेली नाही.
Adoption /Surrogacy दोन्ही केसेसमध्ये नवमातांना ML मिळालेली पाहिलेली आहे. Adoption Govt तर्फे केलं तर surrogacy पेक्षा खूपच स्वस्त पडत. Surrogate Mother च्या ML च काय झालं किंवा ज्या बाईचं मूल दत्तक गेलं तिच्या ML च काय ते मला कळायला मार्ग नव्हता. कोणत्याही केसमध्ये स्वतः मूल जन्माला घालणे स्वस्त आहे.

मैत्रेयी - बाया प्रेग्नन्ट झाल्यावर मॅटर्निटी लीव्ह नाकारून मुले जन्माला घालण्यास डिस्करेज करणे हे फार लांबचा घास वाटतोय. त्यापेक्षा सर्व पुरुषांची सक्तीने नसबंदी करणे जास्त प्रोअ‍ॅक्टिव्ह होईल का? [अ‍ॅमी - वाह वाह मैत्रेयी. फारच स्पॉट ऑन!! सध्या फक्त maternity leave मिळणाऱ्या बायकाच मुलं जन्माला घालतायत आणि ती बंद झाली कि तो स्त्री नसबंदीचा प्रोग्रामच ठरणार आहे. त्यापेक्षा सर्व पुरुषांची सक्तीने नसबंदी करणे जास्त प्रोअॅक्टिव्ह होईल. बरोबर आहे. सुचलंच नाही मला.]

सशल - म्हणजे जी १०-१५% जनता ऑर्गनाइज्ड वर्क फोर्स मध्ये आहे त्यांनां मुलं जन्माला घालण्यापासून परावृत्त करावं आणि बाकीची मेजॉरिटी जनता (अनऑर्गनाइज्ड् लेबर) ह्यांनीं मात्र हवी तितकी मुलं जन्माला घालावी म्हणजे भारतातला पॉप्युलेशन एक्स्प्लोजन चा प्रॉब्लेम सुटेल असं म्हणता का तुम्ही? [अ‍ॅमी - Maternity leave मिळतेय म्हणून १०-१५% organised work force मधल्या बायका (त्या किती % आहेत एकूण लोकसंख्येच्या?) मुलं जन्माला घालतायत असं म्हणता का तुम्ही?]

सशल - तेच तर मी म्हणते. की ह्या बायकांनां मॅटर्निटी लीव्ह नाकारून भारतातल्या पॉप्युलेशन ला आळा घालण्याचा प्रस्ताव आहे ना तुमचा? त्याबद्दल उत्सुकता आहे.
बाकी मग ह्या बायकांनीं किती मुलं जन्माला घालावीत, प्रत्येक बाळंतपणात किती मॅटर्निटी लीव्ह घ्यावी, ती भर पगारी असावी की कशी आणि सगळ्यात मुख्य मुद्दा म्हणजे त्यांनीं आणि उरलेल्या सर्व आयांनीं आपापल्या बाळांनां दुध कसं आणि कुठे पाजावं त्याबद्दल नंतर बोलू; एकदा पॉप्युलेशन प्रश्न निकालात काढला की चर्चा करायला मुद्दे हवेतच ना!

अमितव : (बाळंतपणाची रजा) गरजेची नाही असं म्हटलं म्हणून तर इतका पोस्ट प्रपंच.
भारताचा जन्मदर बघता पेन्शन बंद करावे, रुग्णालयांनी 50 55 च्या वरच्या व्यक्तीना काहीही सेवा देऊ नये. त्यांनी फक्त मरावे. हे कसं वाटतंय?

स्वाती_आंबोळे - बरोबर, आणि चाळिशीच्या वरची व्यक्ती काम करताना दिसली तर तिलाही मारावं. इतकं तरुण रक्त शिकून वर्कफोर्समध्ये दरसाल दाखल होत असताना करायची काय जुनी खोडं?!

अ‍ॅमी - हे ठीक आहे. बिनपगारी रजा असेल तर ती कितीही घेऊ द्यायला हरकत नाही. >
असे लिहिलेले असतानादेखील " भारताचा जन्मदर बघता पेन्शन बंद करावे, रुग्णालयांनी 50 55 च्या वरच्या व्यक्तीना काहीही सेवा देऊ नये. त्यांनी फक्त मरावे. हे कसं वाटतंय?", " बरोबर, आणि चाळिशीच्या वरची व्यक्ती काम करताना दिसली तर तिलाही मारावं. इतकं तरुण रक्त शिकून वर्कफोर्समध्ये दरसाल दाखल होत असताना करायची काय जुनी खोडं?!" असल्या कमेंट येण्यामागे काय कारण असेल बरे??

फारेण्ड -मला तर माझ्या लहानपणीपासून आम्ही कोणत्याही मोलकरणीचा कसल्याही खाड्या बद्दल किंवा रजे बद्दल पगार काटल्याचे आठवत नाही, तसेच कोणत्याही मोलकरणीला आपणहून कधी काढल्याचे आठवत नाही - बहुतांश इतर कामांमुळे किंवा ठिकाण बदलल्याने सोडून जातात. या कामांना लोक मिळण्याचा प्रॉब्लेम मोठा असल्याने सध्या कोणीही ही लक्झरी अ‍ॅफोर्ड करू शकत असेल असे वाटत नाही Happy

च्या - किमान ६ महिन्याची मॅटर्निटी लिव्ह कंपल्सरी असावी पण ती भरपगारी असावी कि नाही हे ठरवण्याचा अधिकार कंपनीला असावेत किंवा बालसंगोपन हे LTD (long term disability) सारख्या सदरात आणून कंपन्यांना महिना ठराविक पगार देण्यास भाग पाडता येईल.

स्वाती_आंबोळे - >>> तुमच्या सर्व्हिस पिरियडमध्ये अमुक इतकी पगारी रजा मिळेल. ती कशी वापरायची याचा निर्णय तुमचा,

भरत, हे 'फॅमिली लीव्ह' अशा सदरात म्हणत असाल, तर एकवेळ मान्य. म्हणजे मग त्यात कोणत्याही कारणाने शारीरिक आणि/अथवा मानसिकदृष्ट्या आजारी वा परावलंबी असलेल्या/झालेल्या व्यक्तींसाठी किंवा तिची काळजी वाहणार्‍यांसाठी ठराविक मुदतीची भरपगारी रजा. ('एकवेळ' म्हटलं कारण मग एकदा मॅटर्निटी लीव्ह घेतलेल्या स्त्रीवर कोणाची काळजी घ्यायची वेळ आली तर तेव्हा तिने काय करायचं?)

पण मौजमजा करण्यासाठी घेण्यात येणारी 'व्हेकेशन' आणि ही रजा यात तुलना होऊ शकत नाही.

मॅटर्निटी हा चॉइस असला तरीही त्याचे शारीरिक / मानसिक परिणाम असतात, रिकव्हरी ही प्रोसेस असते - यात दुमत असेल असं वाटलं नव्हतं. असो.

भारतात लोकसंख्या जास्त आहे म्हणून बायकांना पीनलाइज करा, त्यांना रिकव्हरीला वेळ देऊ नका हे काय लॉजिक?

च्रप्स - काही प्रतिसाद बायकांचे खरच आहेत का प्रश्न पडतोय. रिकव्हरी काय आहे, डिलिव्हरी मधले त्रास, सी सेक्शन वाल्यांचे वेगळे त्रास, नॉर्मल पण जास्त टियर वाल्यांचे वेगळे त्रास, 3rd डिग्री, 4th डिग्री , incontinance प्रॉब्लेम्स... हे किमान बायकांना माहीत असायला हवे.
9 महिने शरीरातील बदल, झीज भरून काढायला 3 मंथ असायलाच हवेत.
आणि मोस्ट important हा वेळ newborn शी bonding साठी पण महत्वाचा आहे

अमितव - मी पाहिलेल्या देशांत बाळंतपण, दीर्घ आजार, अपघात, काम गेल्याने (राजिखुषीने सोडल्याने नाही) नविन काम मिळेपर्यंतचा काळ हे सगळं एकाच तागडीत तोलुन त्यावर सुट्टी आणि पगाराचा काही भाग (१००% अजिबात नाही, अप टू ५०-५५% ) मिळतो. पण तुम्ही कामावर आहात हे धरलं जातं आणि दीर्घ सेवेमुळे जे लाभ मिळतात की वेतनवाढ इ. त्याला तुम्ही पात्र असता.
व्हेकेशन डेज मध्ये बाळंतपण उरका हे मला क्रुर वाटलं.
च्रप्स +१ हे त्रास स्पेल आउट करुनही हे त्रास निम्नस्तरालाही होतात हे उत्तर अड्ड्यावर मला मिळालं. असो.

मैत्रेयी - इथे लोकसंख्या नियंत्रणाचा उपाय म्हणुन मॅटर्निटी लीव्ह बंद करणे हा मुद्दा चर्चेला घेतला गेला. नंतर त्यातला फोलपणा दाखवून दिल्यानंतर लोकसंख्या नियंत्रण बाजूला पडले आणि कंपन्यांच्या आर्थिक हिताचा प्रश्न आला. आता काय तर इतरांना मिळणारी मॅटर्निटी लीव ज्यांना बाय चॉइस मुले नकोयत त्यांना न मिळण्यामुळे त्यांच्यावर होणारा अन्याय पुढे आला! नक्की प्रॉब्लेम काय आहे? यालाच कोल्ड लॉजिक म्हणतात का?

m_Anu - खरं सांगायचं तर माझे डोळे इथल्या चर्चा वाचून बरेच उघडले.
चित्र बदललं आहे वगैरे असं काहीतरी वाटत होतं ते भास दूर झाले.Anu -

अमितव - आता निम्नवर्गाला मिळत नाही, पगारी लोकांच्या घरी काम करणार्‍या स्त्रीयांना मिळत नाही असा मुद्दा झालाय. त्यांना मिळत नाही, तर त्यांना मिळायला काय करता येईल ही चर्चा व्हायला हवी का ज्यांना मिळत्येय ती कशी चुकीची आहे/ गरजेची नाही ही?

मानव पृथ्वीकर -हा मुद्दा योग्यच आहे. अर्थात त्यांना कशी मिळेल यावर चर्चा व्हायला हवी.

फारेंड - टोटली Happy हे सगळे प्रॉब्लेम्स म्हणजे विशिष्ठ वर्गाचे चोचले असून त्यात काही दम नाही, हे लॉजिक लावायचे असेल तर दुष्काळग्रस्त विस्थापित लोक, वीटभट्टी ते वीटभट्टी कुटुंब फिरवत संसार हाकणार्‍या बायका यांच्यापुढे शहरातील मोलकरणीही सुखवस्तू वाटतील. आदिवासी वगैरेंना तर नोकर्‍याच नसतात, मग कसली मॅटर्निटी लीव्ह - तेथून सुरूवात करावी काय?-

स्वाती२ - मॅटर्निटी लिव किंवा पॅरेंटल लिव जी आहे तीच्या कडे बघताना पुढील पिढीत केलेली गुंतवणूक म्हणून बघावे. यातुन अनेक गोष्टी खरे तर साध्य होतात. जन्म देणार्‍या स्त्रीचे शारीरीक आणि मानसिक आरोग्य, अर्भकाचे आरोग्य आणि निकोप वाढ ज्यात सुरवातेचे काही महिने हे खूप महत्वाचे असतात, मुल दत्तक घेतले असेल तर अजून वेगळे प्रश्न ही उद्भवू शकतात. त्याशिवाय मूल आणि पालक यामधील संबंध दृढ होणे, वाढत्या जबाबदारीतून येणारा ताणतणाव कमी होणे याचा दीर्घकालीन परीणाम बघता सशक्त समाज म्हणून हिताचेच आहे. अपत्य जन्मानंतर योग्य आधार खरे तर सर्वच थरातील पालकांना मिळायला हवा. तसा मिळत नाही ही खेदाची गोष्ट.

*********************************************************************************************************************
मुद्दा २ - महिला बाळंतपणावर गेल्यावर बाळंतपणानंतर कामावर रुजू झाल्यावर ऑफिसला आणि त्या महिलांना सामोरे येणारे प्रश्न

mi_anu : मला मान्य आहे, ६ महिने भर पगारी रजा घेऊन मग रिझाईन करण्याचा बायकांना मॉरल हक्क नाही.
पण बाई प्रेग आहे हे कळल्याक्षणी ती ३-४ महिने व्यवस्थित असली तरी तिच्याबद्दल चे सर्व महत्वाचे करीयर डीसीजन लांबणीवर टाकणे/दुसर्‍याला देणे, इन्क्रीमेंट प्रो रेटा देणे(हे इन्क्रीमेंट तिने प्रेग नसताना १०-११ तास बसून केलेल्या मागच्या वर्षीच्या कामाबद्दल असणार असतं.), अगदी व्यवस्थित प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन नसलेल्या स्त्री ला पण मॅ लीव्ह वर जायला आठवा चालू झाल्यापासून दबाव आणणे,लीव्ह वरुन परत आल्यावर इतर १०० लोकांनी नाकरलेली टिम आणि वर्क प्रोफाईल देणे, ऑनसाईट ला तिने हो सांगितले असले, घरचा सपोर्ट असला तरी परस्पर वर 'ती नाही येणार म्हणाली, जमणार नाही' सांगणे या गेमा कंपन्या टाकतच नाहीत असं नाही. (काही सन्माननीय अपवाद असतील.)

आमच्या स्त्री मैत्रिणी म्हणतात की बायकांना मुलं जन्माला घालावी लागतात,त्यासाठी आपल्याला त्यांना वेळेची/वफ्रॉहो ची सूट द्यावी लागते ही या लोकांना बायकांवर आपण करत असलेली मोठी मेहरबानी वाटते.

सई केसकर - नुसती प्रेग्नन्ट नाही. जर "प्रेग्नन्ट होणार" अशी शंका असली तरी. काही फर्टिलिटी ट्रीटमेंट घेणाऱ्या बायकांच्या अशा कथा ऐकल्या आहेत. एक तर मूल होईल की नाही याची खात्री नाही आणि मूल होईल म्हणून ऑफिसमधून चांगल्या संधी हातातून निसटाना पाहायच्या.
बिगर पिक्चर बघता बायकांना बेनिफिट ऑफ डाउट देण्याकडे माझा कल आहे. कारण आधी हायरिंगच कमी असतं. त्यात ही सगळी स्थित्यंतरे (आणि त्यांच्यावर असलेला कल्चरल दबाव) पाहता ज्यांना ६ महिन्यांची रजा घेऊन पुन्हा छान सुरुवात करायची आहे अशा स्त्रियांसाठी काही रिझाईन करणाऱ्या असल्या तरी अस व्हर्सस देम अशी स्त्रियांमध्येच फूट पडू नये.

सिम्बा - प्रेग्नन्सी लिव्ह नंतर रुजू झाल्यावर ठराविक काळ आम्ही नोकरी सोडणार नाही असा क्लोज घालून हवी तितकी प्रेग्नन्सी लिव्ह घेता आली पाहिजे,
( ३ महिने लिव्ह घेतलीत तर काही bond पीरीअड नाही, ६ महिने घेतलीत तर लिव्ह नंतर कमीतकमी ४ महिने काम करावे लागेल, वर्षभर घेतलीत तर ८ महिने लागेल etc _) असे काही तरी

mi_anu : हो असे बरे वाटते.
एच आर आणि बाई या दोघांनी एकमेकांचा अंदाज घेत गेमा टाकत बसण्यापेक्षा क्लियर अ‍ॅग्रीमेंट बरे.

राजसी - Maternity leave ला काहीही clause असू नये. सहा महिने maternity leave मग साठलेली PL, मग without pay leave असं सगळं करुन स्त्रीने राजीनामा दिला तरी. ह्या काळात स्त्री प्रचंड मानसिक, शारीरिक आणि सामाजिक स्थित्यंतरातून जात असते. जितकी मदत मिळेल तेवढी असू दे. जी स्त्री rejoin करते तिला anyway मोठा ब्रेक झाल्यामुळे करियर बॅकलॉग आलेला असतोच. जी सोडून जाते तिला निदान पूर्ण काळावधी मिळते नक्की तिला काय हवंय आणि करायचंय ते ठरवण्याचा.

सिम्बा - राजसी तुमचे म्हणणे एका अर्थी बरोबर आहे,
पण उलटे बघा,
long ब्रेक नंतर परत येणाऱ्या स्त्री ला जॉब वर ठेऊन घेऊ असा एक अश्युअर्न्स मिळतोय.

तुम्ही एखाद्या कम्पनीच्या मालक, किंवा प्रोजेक्ट सांभाळनार्या manager आहात अशी कल्पना करून पहा.
तुमच्या टीम मेम्बर च्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक स्थित्यंतराबरोबर तुमचे किती देणेघेणे असेल?
आणि त्या टीम मेम्बर च्या आयुष्यात अशी उलथापालथ घडली आहे म्हणून क्लायंट ने तुमचा सब standard परफोर्मंनस का कबूल करावा?

जी काही पोलिसी असेल ती स्त्रियांना योग्य तितके झुकते माप देऊन कंपनी ला तोटा होणार नाही अशी असावी.

mi_anu : सब स्टॅंडर्ड?
मला वाटते अगदी नवी टेक्नॉलॉजी रात्री जास्त वेळ थांबून रॅम्प अप करायचे असे काम दिले नाही, आधी करत होती तेच काम दिले तर परफॉर्मन्स सब स्टॅंडर्ड असायचे काही कारण नसावे.तसा असला तर तो लिव्ह आधी पण असेल.
'कमी टाईम कमिटमेंट' हा एक फरकाचा मुद्दा सोडल्यास मूल होण्याआधीचा आणि नंतर चा परफॉर्मन्स यात फरक पडतो असे वाटत नाही.
कमी टाईम कमिटमेंट ला पॅकेज मध्ये काही कमी करून चालवायला हरकत नसावी(आमच्या इथे एकीला हाफ पे आणि 6 तास वर्किंग विथ लंच असे दिले होते)

राजसी - एखादया बुव्याला काही अनपेक्षित तब्बेतीच्या कारणांमुळे वर्ष-सहा महिने रजेवर जावे लागले तर लगेच त्याला काढून टाकायच्या गप्पा करतात का? सगळ्याच बायका बाळंत होतात म्हणून काही महत्त्वाचं नाही असं का! आणि आधी खर्ची घातलेल्या वर्षांवरच ML मिळते.
बाकी, अनुला अनुमोदन.

च्रप्स : बाळंत बाईला कुठल्या देशात कामावरून काढतात? सगळीकडे law आहेत त्यांना प्रोटेकट करायला.

राजसी : वरचं discussion वाचा..

mi_anu - एम्प्लॉयर ची मजबुरी पटते.टीम मधल्या बायका लिव्ह वर जाणार असणे, त्या साठी रिप्लेसमेंट बघणे हे करावे लागते.यात काही वेळा कंपनी चा फायदा पण असतो.रिसोर्स रोटेशन आपोआप होते.
परत एकदा, बाळंत होण्याचा निर्णय, त्यानंतर घरी राहणे ही लक्झरी नसून समाजातल्या बऱ्याच जणांची गरज आहे.(पुरुषांना पण प्रत्यक्ष बाळंत झाले नाही तरी ऑफस्प्रिंग हवं असतं असं मानून.)

भरत : ह्युमन रिसोर्सेसची गरज ठरवताना स्त्रिया बाळंतपणाची रजा घेणार, हे लक्षात घ्यायला हवं. घेतलं जात असावं ना?

फारेण्ड : पण सिरीयसली, हे सहा महिन्यांच्या पगारी रजेचे धोरण सार्वत्रिक असेल, तर यात कोणाचेही वैयक्तिक नुकसान नाही.
- काम करणार्‍या स्त्रीला सहा महिन्यांची पूर्ण पगारी रजा, आणि नंतर नोकरीत परत
- नवीन कामाकरता लायक असलेल्या स्त्रीला फक्त ती प्रेग्नंट आहे म्हणून नोकरी नाकारणे बेकायदा
- आणि सर्व ठिकाणी, अगदी मोलकरणींकरताही, ते एन्फोर्स करण्याची सिस्टीम

हे जरा युटोपियन वाटले, तरी पूर्ण १००% एन्फोर्स झाले तर यात कोणाचेही वैयक्तिक नुकसान नाही. याचे फायनॅन्शियल बर्डन सर्वत्र सारखेच वाटले जाणार आहे. इतरत्र वापरला जाणारा पैसा प्रेग्नंट स्त्रियांच्या पगाराकरता वापरला जाइल.

एक उदाहरण म्हणजे अमेरिकेत अनेक खाजगी कंपन्यांत पहिले दोन नियम राबवले जातात. जेथे ते सक्तीचे आहेत त्या कंपन्यांना स्वतःला व त्यांच्या कॉम्पिटीटर्सना सुद्धा ते लागू होतात. त्यामुळे competitive disadvantage हा जो मुख्य खाजगी कंपन्यांना धोका असतो तो पूर्ण निघून जातो यातून.

उपाशी बोका - असहमत. पण धाग्याचा विषय हा नाही, त्यामुळे तुमचे चालू द्या.

अ‍ॅमी - सार्वत्रिक नाहीय ते धोरण. आणि त्याचा काय परिणाम होतोय याची लिंक वर सिम्बानी दिली आहे. हि अजूनेक

मुद्दा३ : कामाच्या ठिकाणी रजा आणि समानता

भरत - मला अ‍ॅमी यांचे मुद्दे (आता) पटले.
राजसी यांच्या पोस्टचा उत्तरार्ध पकडून आपण कुटुंबव्यवस्था, समाज बदलू शकत नाही, म्हणू कायद्याने, नोकरीच्या नियमांत स्त्रियांना सवलत दिली आहे असा अर्थ निघतो.

सारख्या कामासाठी सारखे हक्क आणि लाभ या तत्त्वांत मॅटर्निटी बेनेफिट्स बसत नाहीत. अ‍ॅमी यांनीच अन्यत्र लिहिलेल्या ज्या मुद्द्यामुळे मला त्यांचं म्हणणं पटलं तो हा मुद्दा :
मॅटर्निटी बेनेफिट्सचा लाभ पुरुष (आता पॅटर्निटी बेनेफिट्स येताहेत, दत्तक, सरोगसीसाठी बेनेफिट्स मिळतील हे आणखी पुढचं) आणि ज्यांना मूल नको आहे, असे स्त्रीपुरुष घेऊ शकत नाहीत. आत त्यांचा निर्णय जगावेगळा म्हणून त्यांना या सोयींचा लाभ घेता येऊ नये हा अन्याय नाही का? की त्याबद्दल त्यांना काही इन्सेंटिव्ह मिळावा? नो क्लेम पिरियडसाठी इन्शुरन्सवाले बोनस देतात- त्याप्रमाणे.

या सगळ्यासाठी स्त्रियांना झगडावं लागलंय हे मान्य करून आपण समानतेच्या पातळीवर ही तात्त्विक चर्चा करतोय हे लक्षात ठेवूया.

राजसी - बाळंतपणाची रजा हा benefit नाही आवश्यकता आहे. ज्यांना लाभ वाटतो त्यांनी खरंच डोळे उघडून बघण्याची गरज आहे. It is not a vacation, full time job where one doesn't have to atleast worry about how to feed herself and the baby.
बाकी जगावेगळा निर्णय घेणाऱ्यांना लाभ मिळत नाही म्हणणे म्हणजे विम्याचे पैसे वसूल व्हावेत म्हणून आजारपण/ अपघात अश्या अपेक्षा करण्यासारखे आहे.

वावे - राजसी +१
बाळंतपणाची रजा ही आवश्यकताच आहे, ' फायदा' नाही.

भरत - मी आधीच स्पष्ट केलंय की बाळंतपणाच्या (भरप्गारी) रजेसाठी झालेल्या झगड्याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि हे तात्त्विक पातळीवर आहे.

वेगळ्या शब्दांत लिहून पाहतो.
"बाकी जगावेगळा निर्णय घेणाऱ्यांना लाभ मिळत नाही म्हणणे म्हणजे विम्याचे पैसे वसूल व्हावेत म्हणून आजारपण/ अपघात अश्या अपेक्षा करण्यासारखे आहे."
इथे भेदभाव होतो, असं वाटत नाही का?

mi_anu - हा मुद्दा मॅ लिव्ह ६ महिने झाली तेव्हा बर्‍याच चर्चात आला होता.फक्त मॅटर्निटी बेनिफिट स्त्रियांना दिले तर मूल न होण्याचा निर्णय घेतलेले कर्मचारी, बॅचलर्स यांना ते अन फेअर वाटते.
माणूस चोरीछुपे दुसरीकडे जॉइन होणार नाही, आपल्याच कंपनीसाठी काही हायर शिक्षण करेल आणी नंतर आपल्या कंपनीत वापरेल ही काळजी घेऊन कोणालाही ६ मंथ पेड सबाटिकल द्यायला हरकत नाही. (आणि गंभीर आजारांबाबत ६ मंथ पेड सीक लिव्ह.)

भरत - समान कामासाठी समान लाभ यात पेड मॅटर्निटी लीव्ह बसत नाही. तुम्हाला तुमच्या सर्व्हिस पिरियडमध्ये अमुक इतकी पगारी रजा मिळेल. ती कशी वापरायची याचा निर्णय तुमचा, असं म्हटलं तर हा प्रश्न येणार नाही. [सशल - ह्यात कुठल्याही प्रकारची सामाजिक बांधीलकी नाही!
रोबॉट्स ठेवावेत त्यापेक्षा!! हाडामासाची माणसं तरी कशाला?] [राजसी - अमुक इतकी पगारी रजा मिळेल. ती कशी वापरायची याचा निर्णय तुमचा ---- युरोप-अमेरिका टूरला पगारी रजा घेऊन जाणे / घरांत सहा महिने लोळत पडून पुस्तके वाचणे आणि Maternity leave ह्यात फरक आहे.] [फारेण्ड - यात बाळंतपणाची रजा इतर रजांसारखी employer discretion वर असू नये. वेगळ्या कॅटेगरीत असावी. ]
लक्षात घ्या. मॅटर्निटी लीव्ह किंवा पेड मॅटर्निटी लीव्ह देऊच नका असं मी (अजूनपर्यंत) म्हटलेलं नाही.

याची दुसरी बाजू - एम्प्लॉयरकडून दिला जाणारा आरोग्य विमा हा अनेक ठिकाणी फक्त (लग्नाचा) जोडीदार आणि मुलांसाठी असतो. अन्य नातेवाईक (अनेक ठिकाणी डिपेंडंट आईवडील, भावंडे, थोडक्यात ज्यांची जबाबदारी आहे, अशी नातेवाईक असलेली किंवा नसलेली व्यक्ती यांचा समावेश असतोच असं नाही.

दोन्ही पालकांसाठी सारखीच पॅरंटल लीव्ह हे फक्त ऐकलं आहे. प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. त्यामुळे त्याबद्दल बोलता येत नाही.

अमितव - आमच्या इथे दोन्ही पालकांना मिळून 52 आठवडे सुट्टी मिळते. तुम्ही हवी तशी घ्या.
उत्पन्नमिळकत कर वजावटी आणि एकूणच स्ट्रक्चर जोडीदार ( लग्न गरजेचं नाही, कॉमन लॉ पार्टनर चालेल) आणि त्यातही मुलं असतील तर फेवरेबल असतात. मुलांचे खर्च वजावटीत जातात. कॅनडात तर युनिव्हर्सल चाईल्ड केअर बेंनिफिट मिळतो. सर्व पालकांना एक (करपात्र)रक्कम दर महिना मिळते. मुलं नसतील तर नाही मिळत. जी एस टी परत मिळण्याचं स्ट्रक्चर परत कुटुंबाच्या आकारावर अवलंबून असत. हे जन्मदर वाढावा मुलं जन्माला घालावी म्हणून काही प्रमाणात आहे हे मान्यच पण हे आर्ग्युमेंट साठी टोकाचं डिस्क्रिमीनेशन आहे.
दत्तक मूल घेतलं तरीही 52 आठवडे बॉंडिंगला सुट्टी मिळते.

यावा कॅनडा आपलाच आसा.

अमितव - अहो मग दीर्घ किंवा लघु अकस्मित आजारपणासाठीचे बेनिफिट ही समान काम मध्ये बसणार नाहीत.
प्रत्यक्ष कर भरला नाही/ कमी भरला तरी सरकारने काळं गोरं करायला हवं. कर भरला नाही... राज्य परिवहन बस मध्ये जागा मिळणार नाही. पार्क मध्ये घसरगुंडी वर चढा पण घसरायचं नाही.

सशल - >> यावा कॅनडा आपलाच आसा. Happy
आता अ‍ॅमी (आणि त्यांचं लॉजिक पटलेले भरत) म्हणतील , "खरंच, ज्या ज्या भारतीय वर्कींग महिलांनां पेड मॅटर्निटी लीव्ह हवी आहे त्यांनीं कॅनडात जाऊन मुलं जन्माला घालावीत; भारतात फार गर्दी आहे! एकतर मुलं जन्माला घालता येतील किंवा नोकरी करून पगार मिळवता येईल. दोन्ही जमायचं नाही , कारण पुरूषांनां मुलं जन्माला घालता येत नसल्यामुळे हा समसमान न्याय नाही ".

फारेण्ड - इन प्रिन्सिपल बरोबर आहे. पण एकूणच धोरणे कौटुंबिक गरजांच्या बाजूने झुकलेली असणे हे मला पटते आणि त्या दृष्टीने ही असमानता योग्य आहे. अ‍ॅफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन, डायव्हर्सिटी हायरिंग मधेही अशी असमानता असते, आणि ती ही योग्य आहे.
<<<<आजारपण, अपघात कोणाला हवा असत नाही, ठरवून घेता येत नाही. तेव्हा ते यात घुसवू नका. >>> हे मान्य आहे. पण cold corporate culture च्या दृष्टीने जर पाहिले तर कर्मचार्‍याचे आजारपण ही कंपनीची जबाबदारी नाही. त्याबद्दल जेव्हा कन्सेशन दिले जाते तेव्हा 'समान' तत्त्वाला तेथेही अपवाद होतो. रजा कर्मचार्‍याच्या चॉईस ने आलेल्या गोष्टीमुळे आहे की नाही हा फॅक्टर कॉर्पोरेट लॉजिक ने नगण्य आहे.
वरती कामाच्या ठिकाणी झालेले अपघात किंवा कामाच्या स्वरूपातून आलेले आजारपण धरलेले नाही.

mi_anu कामवाल्या बायांना पेड लिव्ह देण्याबद्दलः
बाया दिवसाला १ घर सरासरी ४५ मिनीट काम करतात. अशी ४ ते ५ कामं त्यांच्याकडे असतात. सर्वांनी ठरवल्यास एखाद्या बाईला ६ महिने पगारी लिव्ह सर्वांनी मिळून द्यायला काहीच हरकत नाही. कल्पना चांगली आहे. माझ्याकडे दिवसाची फक्त ४५ मिनीट कमिट करणार्‍या बाईला ६ महिने भरपगारी रजा एकटीने देणं मला परवडणार नाही. पण ती माझ्याकडे दिवसाचे ६ तास/जास्त वेळ काम करत्/मुले सांभाळत असेल तर ही अशी लिव्ह आणि लागेल तो हेल्थ सपोर्ट/बिनव्याजी कर्ज देणं हे माझं कर्तव्य आहे.

**********************************************
मुद्दा ४ : बाळंतपणाची रजा भरपगारीच का असावी -
(खरं तर हे मुद्दा क्र, १ मध्येच बसू शकतं. पण कॉपीपेस्ट करताना मला वेगळा मुद्दा वाटला, म्हणून इथे खाली घेतलाय)
mi_ anu : मॅ लिव्ह ला दिले गेलेले पेड बेनिफिट ही महिला वर्गाला दिलेली सवलत नसून त्यात भूतकाळातील बरेच वाईट अनुभव, अगतिकता, बायकांनी मूल जन्माला घालून पैशाची गरज वाढणे (सिंगल मदर,काही आकस्मिक अपघातामुळे विधवा होणे, घराचे हफ्ते वगैरे विचार करता) याचा इतिहास आहे. (पूर्वीच्या काळी मुलांना अफू घालून घरी ठेवून दिवसभर कामावर जाणार्‍या बायकांच्या काही कथा ऐकल्या असतील.)
समाजावर परीणाम, गुन्हे वाढणे, मुलं कुपोषित्/गतीमंद निपजणे, मुलांचे शोषण असे बरेच प्रत्यक्ष न दिसणारे साईड इफेक्ट ३ किंवा ६ महिने पेड मॅ लिव्ह न देण्यात आहेत. पूर्वीच्या काळी सरकारी ऑफिसेस मध्ये पण शेवटची कळ येईपर्यंत (बाळ झाल्यवर ३ महिने पूर्ण मिळावे आणि पैशाचे कमी नुकसान व्हावे म्हणून )काम करणार्‍या बायांच्या कथा ऐकल्या आहेत.

पैश्याचं सोंग आणता येत नाही.काही घटकांनी मुलं न जन्माला घालायचा निर्णय घेतला म्हणून सर्वांना घेता येत नाही. नवा जीव समाजात आणायला, वाढवायला पैसे लागतात. वेळ लागतो.आपण ज्या कंपनीला उमेदीची ५-१० वर्षं, रोजचे ९-१० तास किंवा जास्त कमिटमेंट देतो तिच्याकडून या मोठ्या घटनेत आधाराची जराही अपेक्षा करु नये?
[भरत : यासाठी मोबदला मिळतो ना? की आवडीचं काम आहे म्हणून करतो आपण ते?
[ mi-anu - मोबदला मिळतो. नो डाऊट.पण कंपन्यांचे निर्णय, अक्वीझिशन्स, बदललेल्या स्ट्रॅटेजी या आपल्या जीवनाची दिशा हळूहळू नकळत बदलत असतात.ही दिशा भविष्यासाठी चांगली असते किंवा नसते.जरी हा सुप्रिम त्याग वगैरे नसला तरी एखादी कंपनी एका विशीष्ठ स्टेज ला जाण्यात मनापासून काम करणार्‍या प्रत्येक कर्मचार्‍याचा बीट असतो.
मोबदला आणि श्रम हे प्रपोर्शन मध्ये नसू शकतात. (कोणत्यातरी लांबच्या गावातून १.५ लाख वर्षाला पॅकेज वर पुण्यात्/मुंबईत कॉट बेसिस वर राहणारे फ्रेशर्स्/पगार ओके मिळूनही कामाच्या ठिकाणाजवळ महाग रेंट्/लांब स्वस्त रेंट ने राहील्यास बस रुट वर नसणे/एकंदर खिश्यातले गणित नफ्याकडे जावे म्हणून कराव्या लागलेल्या तडजोडी/आयटीतले महाग पार्टी कल्चर्/त्यातून जास्त पंगे न घेता वेगळे राहणे/स्वस्त मजा मॅनेज करणे). कधीकधी आयुष्यातले अनेक तास, नोकरीसाठी केलेल्या तडजोडी, भलता रोल अंगावर पडून वेगळी कामे करावी लागणे याच्या मानाने नोकरीने आपल्याला जास्त दिलेले नाहीये असा फील येतो}]

mi_ anu- मे बी इथे मुद्दे मांडणार्‍यांसमोर चुकीची वागणारी उदाहरणे असतील. पण मॅ लिव्ह घेऊन आपले आवडीचे काम मिस होते म्हणून शक्य तितक्यालवकर जॉइन करुन, अनेक ठिकाणचे बॉल एका वेळी जगल करुन ऑफिस च्या कामावर इम्पॅक्ट होऊ न देणार्‍या कमिटेड वर्क ओरिएंटेड बायका आपण पाहिल्या नाहीत का?

बाय द वे, स्वतःचे रास्त तळमळीचे लॉजिकल मुद्दे पर्सनल वर न येता, अती अग्रीसिव्ह न होता मांडले तर त्याचा इम्पॅक्ट जास्त होतो असा अनुभव आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डेलिया, अर्धवट वाचल्याने तुम्हाला जे प्रश्न पडले आहेत त्यांची उत्तरे तिथेच आजूबाजूला आहे. अधले मधले गाळून निष्कर्ष काढण्याच्या या पद्धतीला मी वैतागलो आहे. तिसऱ्या वेळी पुन्हा एकदा.... शक्य नाही ते.

वरचे काही प्रतिसाद नजरेखालून घातल्यावर "आपापल्या मोलकरणींना भरपगारी मॅटर्निटी लीव्ह देता का?" हे विचारण्यामागचा एम्प्लॉयरसाठी यात नक्की काय आहे, हे समजून घ्या हे सांगण्याचा अ‍ॅमींचा उद्देश सफल झाला असं वाटतं.

मी आधीच्या प्रतिसादांत लिहिलेल्या (ट्रान्सफर, रिस्की मानली गेलेली कामे याबद्दलच्या) अनुभवांतून ऑफिसांत स्त्रियांना मिळणार्‍या वागणुकीत पॅट्रोनायझिंगची सावली आहे, तीच बाळंतपणाच्या बाबत अधिक गडद होते असं वाटतं.
शिवाय आपण जेंडरला धरून त्या त्या व्यक्तीचं वागणं कसं असायला हवं याचे ठोकताळे बांधलेले असतात, हेही जाणवलं.

त्यामुळे एम्प्लॉयर्स किंवा कलीग्ज, सीनियर्सनी एम्प्लॉयी, सहकर्मचार्‍याबद्दल कामाच्या संदर्भात् किंवा कामाप्रती त्याच्या कमिटमेंटच्या बद्दल आडाखे बांधताना जेंडर स्टिरियोटाइपच्या बाहेर पडून व्यक्ती व्यक्ती बद्दल विचार करायची गरज आहे, हे जाणवलं.

मुलं जन्माला न घालणारे = लोक जगावेगळा निर्णय घेणार अशी एक टिप्पण्णी चर्चेच्या ओघात आलीय.
तसंच या चर्चेवरून मातृत्व, बाळंतपण आणि बाळंतपणाची रजा हे सेक्रेड काऊ असं समजण्याकडे माझा प्रवास चालला आहे.
मला वाटतं या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या पर्सनल चॉइस आहेत. मॅटर्निटी लीव्ह अ‍ॅव्हेल करणार्‍या स्त्रीला कोणत्याही निगेटिव्ह गोष्टी फेस करायला लागू नयेत, तितकंच
लग्न न करणार्‍या किंवा एकटं राहणार्‍यांना ,मूल नको असलेल्यांना, स्वतः मुल जन्माला घालण्याऐवजी ते दत्तक किंवा सरोगसीने मिळवणार्‍यांना, कामाचं/करियरचं महत्त्व अधिक वाटल्याने एक चॉइस म्हणून बाळंतपणानंतर बाळाची काळजी घेण्यासाठी स्वतःला योग्य वाटेल अशी व्यवस्था करून लवकर कामावर परतणार्‍या स्त्रियांनाही समजून घेण्याची गरज आहे.
या सगळ्यासाठी जगावेगळे हा शब्द वापरला गेला, म्हणून सांगतोय की अशा व्यक्तींचं प्रमाण वाढत चाललंय. आणि वाढत जाणार आहे.
आर्थिक प्रगतीसोबत फर्टिलिटीचं प्रमाण घटतं आहे. मुलं नसलेल्या व्यक्तींचं प्रमाण वाढतं आहे. प्रगत देशांत जन्मदरांचं प्रमाण इतकं घटलं आहे, की तिथे लोकसंख्या कमी होऊ घातली आहे. जे देशांच्या पातळीवर होतंय, तेच का समाजातल्या वेगवेगळ्या आर्थिक पातळीवरच्या लोकांतही होतंय.
मूल परवडत नाही म्हणून , करियरमध्ये सेटबॅक नको म्हणून किंवा यातलं नुसतंच मूल नकोच आहे किंवा मूल व्हायचं राहून गेलंय असं जगण्याचा निर्णय घेणारे लोक आहेत. आणि त्यांच्या चॉइसला नावं ठेवली जाऊ नयेत.
याचा विपर्यास करून मुलं नसणारे लोक आहेत म्हणजे बाळंतपणाची रजा हे चोचले, नसते लाड असा अर्थ काढला जाणार नाही, अशी आशा आहे.
बाळंतपणात आणि त्यानंतर शक्य त्या सर्व प्रकारचा सपोर्ट मिळायला हवाच. पण त्यातल्या कॉम्प्लेक्सिटीज लक्षात याव्यात. त्या फक्त एकाच बाजूने नाहीत, हे समजावे.

सई, पीनी, स्वाती१(- युरोप-अमेरिका टूरला पगारी रजा घेऊन जाणे / घरांत सहा महिने लोळत पडून पुस्तके वाचणे आणि Maternity leave ह्यात फरक आहे., हेच तुम्ही जरा वेगळ्या शब्दांत सांगितलंय, ते आवडलं) आणि स्वाती२ यांनी लिहिलेल्या पोस्टच्या विरोधात माझा स्टँड जातोय असं वाटत असलं तरी त्यांतल्या अनेक गोष्टींशी मी सहमत आहे.

<<<निम्न स्तरातल्या महिलांना यातले लाभ मिळत नाहीत आणि शारीरिक मानसिक त्रास मुकाट सहन करावे लागतात, म्हणजे हे सगळे उच्चवर्गीय महिलांचे चोचले आहेत असं त्या मुद्दाचं झालेलं इंटरप्रिटेशन अत्यंत दुर्दैवी आहे. >>> भरत - ते तुमच्या कोणत्याही पोस्टच्या संदर्भात नाही.>>

फारेण्ड, ते माझ्या कोणत्याही पोस्टच्या संदर्भात नसलं तरी मला दुर्दैवी वाटू नये किंवा मी तसं म्हणू नये, असं आहे का?

हा एक लेख वाचनात आला.

हा लेख बर्‍यापैकी जेंडर न्युट्रल आहे. प्रत्यक्षात तसं आहे का? सध्याचे वास्तव्यस्थान लक्षात न घेताही भारतीयांबाबत तसं कितपत आहे? यातच अनेक प्रश्नांची उत्तरं आहेत, असं वाटतं.

मॅटर्निटी लीव्ह LTA सारखा आहे. जर तुम्हाला त्याचा फायदा हवा असेल, तर मूल जन्माला घालावं लागेल. पर्यटन करावं लागेल हे तोंडावर फेकल्यासारखं असलेलं उत्तर खरं तर मला आवडलंय. पण मॅटर्निटी लीव्हची तुलना LTA शी केलेली अनेकांना आवडणार नाही.

त्यावर त्या लेखातलं एक वाक्य :
Parenthood is a choice to be made and i think sometimes we forget that.

बाळंतपणाची भरपगारी रजा हा एक ट्रिगर होता आणि त्यावरून डोक्यात आलेले अनेक विचार मांडले गेलेत. सगळेच त्या मूळ मुद्द्याला धरून असतीलच असं नाही.

पण मॅटर्निटी लीव्हची तुलना LTA शी केलेली अनेकांना आवडणार नाही. >>> अशक्य आहे. पुन्हा मागे जाऊन पुन्हा पहिल्यापासून सुरूवात करावी लागेल. पुन्हा कुणीतरी... छे छे नकोच ते.
चालू द्या मंडळी

मी इथल्या सगळ्या (फॉर आणि अगेनस्ट, सरकास्टिक पर्सनल ऍटॅक न करता मांडलेल्या मुद्द्यांशी) सहमत आहे.
फक्त माझ्या घरी 1 तास (बाय चॉईस, त्यांना फुल टाईम काम मिळू शकते.ऑफर्स आहेत) आणि इतर 5 घरी 1 तास काम करणाऱ्या बाईंना मी 1 तासाची सबब न सांगता 7 तास बसवून ठेवून 8 तासाचा पगार द्यावा वगैरे आर्ग्युमेंट सोडून.

फक्त माझ्या घरी 1 तास (बाय चॉईस, त्यांना फुल टाईम काम मिळू शकते.ऑफर्स आहेत) आणि इतर 5 घरी 1 तास काम करणाऱ्या बाईंना मी 1 तासाची सबब न सांगता 7 तास बसवून ठेवून 8 तासाचा पगार द्यावा वगैरे आर्ग्युमेंट सोडून >>> असे ऑर्ग्युमेण्ट कुणी केले आहे ते कॉपी पेस्ट करून सांगाल का ? किमान ते कशाच्या संदर्भात आले आहे याबद्दलच्या एखाद दोन ओळी.

सार्वजनिक ठिकाणी स्तनपान धाग्यातून जसा मॅटर्निटीचा धागा आला तसा या धाग्यातून घरगुती मदतनीसांवर होणारे अन्याय असा धागा निघू पाहतोय.
मी तो काढणार होते पण कुठल्या सदराखाली ते समजेना.

कुठल्या सदराखाली काढू >>>> कोतबो

तुला असे वाटतंय का या फोरम मध्ये घरगुती कामगारांवर अन्याय होतो (आणि तो होण्यात आपला हात असतो) हे कोणी मान्य करेल??
प्रत्येक जण आपल्याकडच्या आईडिअल एम्प्लॉयमेंट कंडिशन बद्दल सांगेल

Organised / Unorganised sector employment मध्ये फरक तर असणारच ना! चांगली नोकरी म्हणजे काय असतं नक्की? ह्या सगळ्या गोष्टी एकत्र मिळाल्या झाली चांगली नोकरी Happy

तुला असे वाटतंय का या फोरम मध्ये घरगुती कामगारांवर अन्याय होतो (आणि तो होण्यात आपला हात असतो) हे कोणी मान्य करेल??>> Organised sector मध्ये contract वर घेतलेल्या लोकांना हे फायदे मिळत नाहीत. घरगुती कामगार ही त्याच category मध्ये मोडतात. बांधिलकी कमी. पण पगारी कर्मचार्यांबद्दल असे असत नाही.

>>तुला असे वाटतंय का या फोरम मध्ये घरगुती कामगारांवर अन्याय होतो (आणि तो होण्यात आपला हात असतो) हे कोणी मान्य करेल??>> मी मागच्या पानावर कुठेतरी लिहिलं आहे अगदी स्पष्ट. दिवसातून एक तास केर लादी करायला येणार्‍या बाईला भरपगारी मॅटर्निटी लिव्ह द्यायची गरज मला अजिबात वाटत नाही आणि मी भारतात असते तर दिली नसती. पण अशीच कुणी हेल्पर माझ्याकडे ८ तास येऊन घर सांभाळणं, मग त्यात पडेल ते काम, स्वैपाक वगैरे आला- करत असेल तर नक्कीच द्यायला हवी असं वाटतं. ज्यांनी कोणी हा मुद्दा चर्चेला काढला असावा त्यांना दुसर्‍या कॅटेगरीतली मदतच अपेक्षित असावी बहुतेक.

सर्वप्रथम माफी मागून विचारतो की अशी रजा देण्याचा कायदाच व्हावा अशी काही मागणी आहे का?
की नुसतीच मते मांडणे चालू आहे.
कायदा करून काही होत नाही.
पण निरनिराळी मते मांडल्यामुळे कुठल्याहि प्रश्नाचा सर्वांगीण विचार करण्यास मदत होते. म्हणून मतस्वातंत्र्य.

घरगुती मदतनीसांसंबंधीच्या चर्चेसाठी धागा काढला आहे.
https://www.maayboli.com/node/67125
त्यासंबंधीची चर्चा तिथे करता येईल.
इथे आलेले मुद्दे तिथे हलवून हवे असतील, तर ते करायला एकदोन दिवस लागतील.

दुपारी पोस्ट लिहिलेली तेव्हा ती माझ्याकडून शेवटची होती. (नवा काही मुद्दा आला नाही, तर)
यासंबंधीची एक बातमी त्यानंतर वाचनात आली म्हणून -
इंडियन एक्सप्रेसमधून
New Zealand’s Prime Minister Jacinda Ardern returned on Monday to Parliament to run her first Cabinet meeting, six weeks after giving birth to her daughter.
...Ardern was accompanied by her partner Clarke Gayford
.....Gayford is caring for Neve full time and travelling with Ardern, who is breastfeeding.

द गार्डियन मधून
New mothers in New Zealand are eligible for 22 weeks’ paid maternity leave, to be increased to 26 by 2020, but Ardern chose to take just six weeks in a move that divided opinion.
The plan is that Neve will mainly be looked after by Gayford, but in these early weeks and months will be with Ardern as much as possible.
There’s every chance if I was in a different set of circumstances I would have done that transition [back to work] differently or had a bit more time. But I have the privilege of doing this job and I have to say the privilege of being a mother too. So I am making the combination I have work for us.”
हे दोन्ही मुद्दे माझ्या प्रतिसादांत आले होते, म्हणून या बातम्यांतला तो भाग इथे डकवावासा वाटला.

मला या धाग्यामुळे समजले की बाळंतपणाच्या भरपगारी रजेचे पैसे कंपनीच्या मालकाच्या खिशातून जातात.
मी आजवर असे समजत होतो की सरकारी अनुदान वगैरे असते. किंवा निम्मे निम्मे.
असो,. पोस्ट नंतर फुरसतीने सावकाश वाचतो. अजून ज्ञानात भर पडेन Happy

अमेरिकेत मेडीकल कारणामुळे ( बाळंतपणासह इतर वैयक्तिक किन्वा फॅमिली च्या ) जास्त मुदतीच्या रजा घेतली असता, पगार हा इन्शुरन्स कम्पनीकडून मिळतो. त्याला FMLA म्हणतात. एम्प्लोयर ला तो खर्च पुर्णपणे उचलावा लागत नाही. प्रत्येक कंपनीत इन्शुरन्स टर्म्स वेगवेगळ्या असू शकतात. पगार कधी पुर्ण कधी अर्धा मिळतो. इन्शुरन्स हप्त्यांचा खर्च कम्पनी , एम्प्लॉयी असा दोघांना ( प्रेत्येक कम्पनी पॉलीसी प्रमाणे वेगवेगळे ) उचलावा लागतो.
मलातरी इन्शुरन्स कम्पनीचा हा पर्याय विचार करता योग्य वाटतो. कारण फक्त एम्प्लॉयी चा विचार करून चालणार नाही. बाळंतपणाच्या रजेचा पगार देताना एम्प्लॉयरचे देखिल फार नुकसान होता कामा नये, नाहीतर कोणीही एम्प्लॉयर अशा बायकांना नोकरी देताना हात आखडता घेणारच. शिवाय यामधे इतरही काही दिर्घ मुदतीचा आजार एम्प्लॉयी किन्वा घरातील इतर कोणास झाल्यास पगारी दिर्घ मुदतीची रजा मिळू शकते. यातही अशी रजा वर्शातून एकदाच घेता येते असेही काही क्लॉज आहेत.

बाळंतपणाची भरपगारी रजा ही फक्त आणि फक्त पर्मनंट एम्प्लॉयी लाच मिळू शकते. कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर काम करणार्‍यांना अशा रजा अलाऊड नसतात व त्यांना कधीही अशी दीर्घ मुदतीची भरपगारी रजा कुठेही ( कोण्त्याही कम्पनीत ) मिळू शकत नाही. मोलकरणींचा विषय वर आलेला आहे म्हणुन त्याचा विचार करता , बहुतेक मोलकरणी या 'पर्मनंट एम्प्लॉयी ' नसून टेम्पररी वर्करच असतात. क्वचित काही घरात वर्षानुवर्ष काम करणार्‍या मोलकरणी असतात. अशा जवळ जवळ घरच्या झालेल्या मोलकरणींना मालक लोक बर्‍याच सवलती स्वतःहुन देतात , पण अर्थात हे ज्याचे त्याच्यावर अवलंबून.
मोलकरणी किन्वा तत्सम कामगार वर्गासाठी अशी इन्शुरन्स ची सेवा सरकारर, एम्प्लॉयर, आणि स्वतः हे कामगार यांच्या समन्वयाने निर्माण केली गेली पाहिजे.

वर्षानुवर्षे एकच काम असेल तर अशा कामासाठी कॉण्ट्रॅक्ट करता येत नाही भारतात तरी. मोदींनी कायदे बदललेत असं ऐकून आहे. कल्पना नाही. मागच्या धाग्यावर सविस्तर दिलेले आहे.

>>अमेरिकेत मेडीकल कारणामुळे ( बाळंतपणासह इतर वैयक्तिक किन्वा फॅमिली च्या ) जास्त मुदतीच्या रजा घेतली असता, पगार हा इन्शुरन्स कम्पनीकडून मिळतो. त्याला FMLA म्हणतात.>>
नाही . अमेरीकेत FMLA कायद्यानुसार १२ आठवड्यांची अनपेड रजा मिळते बाळाची काळजी घेण्यासाठी. ही फेडरल लॉ अंतर्गत. वेगवेगळ्या स्टेटचे स्वतःचे कायदे आहेत त्या नुसार रजेचा काळ अजून वाढू शकतो. काही राज्यात रजेच्या काळात पगाराचा काही भाग मिळतो. हे सगळे कायद्यानुसार जे क्वॉलिफाय होतात त्यांना. बाकी रजेच्या काळात पगार देणे, न देणे हे एम्प्लॉयरनुसार बदलते.
बरेचजण सीक लीव आणि इतर सुट्ट्यांचे ठिगळ लावतात.,जिचा पगार मिळतो. ही रजाही तशी मोजकीच असते . त्यातही निगोशिएट करावे लागते. कंपन्यांच्या स्वतःच्या बाळंतपणाच्या रजेच्या पॉलिसीज असतात पण त्या कंपनीनुसार आणि तुम्ही काय कॅटेगरीत त्यावर. कंपनीतर्फे ग्रुप इंशुरन्स- शॉर्ट टर्म डिसॅबिलिटी असल्यास त्यातून पगाराच्या(५०%-१००%) पैसे मिळतात. एकंदरीत अमेरीकेत बाळंतपणाची रजा हा आजही सामान्यांसाठी लढाईचाच मुद्दा आहे.

OECD Study in 42 countries

180119085547-chart-maternity-leave-oecd-new-780x439[1].jpg

डागदर अड्डावाला, हा ग्राफ कुठून घेतला आहे?
हंगेरीमध्ये ३ वर्षाची रजा मिळते - ती आई किंवा वडील किंवा दोघेही विभागून घेउ शकतात.
पगार कमी कमी होत जातो - सुरुवातील पूर्ण आणि मग शेवटी अगदी कमी असे होते. वरच्या ग्राफमध्ये बहुतेक पगारी रजा किती मिळते ते दिवस दाखवले असावेत.
सगळ्यात बायका ३ वर्षे रजा घेत नाहीत. बहुतेकदा २ वर्षानंतर पुढले बाळंतपण करतात म्हणजे सलग ४ वर्षे (कधी तिसरेही आणि मग ६ Happy )व्रजा मिळते. ज्या पोझिशनवर रजा घेतली तीच किंवा तिला समांतर पोझिशन परत आल्यावर द्यावी लागते.

या शिवाय मुले बरोबर असतील बर्‍याच ठिकाणी सवलत मिलते. उदा. रेल्वे/बसच्या भाड्यात पूर्ण कुटुंबाला अर्धा दरात प्रवास करता येतो जर बरोबर मूल असेल तर.

Pages