ब्लॅक मिरर

Submitted by कटप्पा on 8 August, 2018 - 11:55

नेटफ्लिक्स वर ब्लॅक मिरर नावाची सिरीज आहे. गूगल करा ती का भारी आहे या बद्धल.
मी मागच्या आठवड्यात सगळे पार्ट पाहिले ( प्रत्येक भाग वेगळी स्टोरी आहे)

कोणी आहेत का ब्लॅक मिरर फॅन्स. सॅन जुनीपरो स्टोरी मला जबरदस्त आवडली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Me Netflix var chya veb seeries cha chahata ahe pn black mirror vishhyi vachal navvhat baghto search Karun ata

जबरी आहेत सगळे भाग.

अजून कोणत्या serial आहेत अशा? म्हणजे प्रत्येक भाग वेगळी स्टोरी टाईप!!!

१९५९-१९६४ मधे एक टिवी सिरीज गाजली होती "ट्वायलाईट झोन". ही पण नेटफ्लिक्स वर आहे. कृष्ण धवल आहे पण मस्त आहे. आपल्याकडे नवल , हंस ही मासिके आहेत त्यातल्या काही जुन्या कथांवर सिरिज काढली तर कसे वाटेल तसे ट्वायलाईट झोन पाहतांना वाटते. तुम्हाला ही मासिके आवडत नसतील तर ट्वायलाईट झोन आवडणार नाही. यात फक्त सायन्स फिक्शन नाही तर मानवी मनाच्या, भावनांच्या वेगवेगळ्या पैलुंनाही स्पर्श केला आहे.
ब्लॅक मिरर म्हणजे सध्याच्या काळातली "ट्वायलाईट झोन" असे म्हणता येईल. मला ही पण आवडते. यात सगळ्या सायन्स फिक्शन आहेत . पण इतर सायन्स फिक्शन प्रमाणे खूप पुढच्या भविष्यात ( उदा.२-३ हजार वर्ष पुढे ) या घटना घडत नाही. पण सध्याच्या काळाच्या ५-१० वर्षातच घडणार्‍या (काहितर ६ महिने ते १ वर्षात घडणार्‍या) आहेत त्यामुळे त्या अगदी खर्‍या वाटू शकतात.

>अजून कोणत्या serial आहेत अशा? म्हणजे प्रत्येक भाग वेगळी स्टोरी टाईप!!!
हो खूप आहेत पण त्यासाठी वेगळा धागा काढून बोला. इथे नको. बर्‍याच serial मधे दुहेरी फॉर्मॅट असतो. प्रत्येक भागात वेगळी गोष्ट पण कुठेतरी सगळ्या भागांचे एक सूत्र पार्श्वभूमीवर चालू असते. उदा. Star Trek, White caller, Royal Pains, The Blacklist

काल पहिल्या सिझनचा पहिला भाग पाहिला जो ओके (सो-सो ओके) होता पण दुसरा महा बोअर झाला. त्यामुळे सिरीज बघणं थांबवलं.

My favorites -

The Entire History of You
White Bear
Nosedive
Men Against Fire
Hated in the Nation
USS Callister
Crocodile
Metalhead

You will never be the same after you watch Black Mirror.

Charlie Brooker (creator) च्या शब्दांत एका वाक्यात या शोबद्दल सांगायचं झालं तर “We replaced the supernatural with technology”. Enough said!

>>> We replaced the supernatural with technology”. Enough said!
Totally!! Happy

अजय, ट्वायलाइट झोनची मलाही आठवण झाली होती, पण ब्लॅक मिरर इज मच डीपर.
ट्वायलाइट अनेकदा इनएस्क्प्लिकेबल गोष्टी दाखवून थांबायची. ब्लॅक मिरर खरोखरच मानवी मनाचे अंधारे कोपरे दाखवते.
ती पाहताना आइनस्टाइन अ‍ॅटमबॉम्बबद्दल म्हणाला होता ते टेक्नॉलोजीच्या संदर्भात आठवत राहतं:
The release of atomic energy has not created a new problem, it has merely made more urgent the necessity of solving an existing one.

अर्रे विजिगिषु म्हणजे आमचे फेलो-ब्रेबॅ-फॅन ना? >>>>>> हो Happy Fellow Black Mirror fan! Black Mirror चाही तेव्हढाच फॅन झालो त्यामुळे लिहिणं क्रमप्राप्त होतं. Happy Binge watch नाही करता येत पण Black Mirror. एक एपिसोड झाला की तो खूप दिवस राहतो डोक्यात; रादर राहिला पाहिजे. Charlie Brooker is a genius.
तसे सगळेच एपिसोड्स मस्त आहेत पण The Entire History of You, Nosedive, Hated in the Nation आणि शेवटच्या season मधला Metalhead खोलवर गेले आहेत.

>>> Binge watch नाही करता येत पण Black Mirror. एक एपिसोड झाला की तो खूप दिवस राहतो डोक्यात
ट्रू दॅट!!

हो बॅन्डर्सस्न्याच बघितला, लय आवडला. एकदम वेगळीच कल्पना होती, ट्विस्ट पण भारी आहेत, पण नंतर किचकट होतं गेला.

मला असं वाटलं की

मला असं वाटलं की

पोलिस स्टेशनवरून थिओ त्याला घेऊन येत असताना नक्की काय झालं तुमच्या दोघांमधे विचारते तेव्हा तो तिला खरी सगळी गोष्ट सांगतो (हे काही दाखवलं नाहीये)
मग त्याच्या वाढदिव्साच्या दिवशी नवरा बायको दोघं एकमेकांना एका रात्रीची मुभा देतात.
तो गेम खेळायला ती परवानगी देते आणि तो तिला बाहेर डेट वर जाऊ देतो (ती रिंग काढून ठेवते त्या बॉक्समधे)