Submitted by ऋन्मेऽऽष on 9 August, 2018 - 00:55
या विकेंडला शनिवारी रविवारी स्टे पिकनिकला जायचे आहे. पण दुर्दैवाने गटारी आहे. तरी पुन्हा आम्ही फॅमिली मेंबर एकत्र असण्याचा योग शक्य वाटत नसल्याने जायचेच आहे.
तर काही मुंबईनजीकच्या अश्या जागा सांगू शकाल जिथे गटारी टोळीचा उच्छाद नसेल.
मांसाहार करणारे चालतील, पिणारयांचा दँगा नकोय. राहायची सोय असलेले रिसॉर्ट, बीच रिसॉर्ट जिथे आतल्या आत मजा करता येईल. नाईलाज आहे म्हणून बोअर जागा नकोय तसेच महागडीही नकोय
एक सगुणाबाग कोणी सुचवले होते आज पण कॉल केला तर ते फुल्ल झालेय
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वापी/वलसाड मध्ये बघा रिसॉर्ट.
वापी/वलसाड मध्ये बघा रिसॉर्ट. तिथे दारूबंदी असल्याने गटारीचा प्रश्न नाही.
गटारी अमावस्या या नावाला
गटारी अमावस्या या नावाला साजेल असे ठिकाण कुठेही सापडेल.
11 तारखेच्या पार्टि साठी 9
11 तारखेच्या पार्टि साठी 9 तारखेला जाग आली असेल तर तुम्ही धन्य आहात.. ठिकाण सापडलंच तर आम्हालाही कळवा.
हिम्सकूल जे सहा सात फॅमिली
हिम्सकूल जे सहा सात फॅमिली मेंबर आहेत ज्यात पुरुष मी एकटाच त्यांची कालच सर्वांची उपस्थिती फायनल झाली. आधीही हि डेट डोक्यात होतीच पण नेमके याच आठवड्यात गटारी आहे हे चेक केले गेले नाही.
हिडन विलेज आटगाव
हिडन विलेज आटगाव
घरीच थांबा हो. गेला एखादा
घरीच थांबा हो. गेला एखादा विकांत वायाला तर जाउद्या. गटारीला स्थळेच काय रस्तेही फारसे सुरक्षित नसतात आजकाल. कोण कधी कसा कुठून अंगावर येईल हे सांगता येत नाही. गेल्या वर्षीचा स्वानुभव.
धागा आता नीट वाचला.
धागा आता नीट वाचला.
सगळीकडे फुल्लच असणार. भूताची पार्श्वभूमी असणारे एखादे हॉटेल मात्र हमखास मिळते. खंडाळ्यात आहे असे एक. म्हणजे मायबोलीवर एक धागाही काढता येईल (फोटो टाकावेत. त्यात लेखक आला तर वाचला असे समजू अथवा दुसरी दुनियासे आया है ये आर्टिकल असे म्हणू ).
https://www.youtube.com/watch?v=ZNefhkWo2FY
सस्मित, चेक करतो
सस्मित, चेक करतो
<<<<
गटारीला स्थळेच काय रस्तेही फारसे सुरक्षित नसतात आजकाल.
>>>
सार्वजनिक जागाही सेफ नसल्या तर सरकारची जबाबदारी काय?
बाकी ईतरवेळी गटारीला गेलो नसतोच. पण पुन्हा योग जमणे अवघड आहे.
आणि एक असेही वाटते की काही पिणारे गोंधळ घालणार म्हणून निर्व्यसनी लोकांनी आपल्या आनंदाला का मुकावे?
बदलापुरला पुर्वेला भोज
बदलापुरला पुर्वेला भोज रिसॉर्ट म्हणुन आहे कोकणी पध्दतीचं जेवण वेज्/नॉनवेज.. शिवाय राहुहि शकता.. हल्लीच आमच्याकडचे जावुन आलेत..
भावना, धन्यवाद चेक करतो हे
भावना, धन्यवाद चेक करतो हे देखील.
सध्या सोबत दोन तीन लहान मुले अॅड झाल्याने वॉटर रिसॉर्टवर विचार चालूय.
दोन तीन शॉर्टलिस्टेड मध्ये भिवंडीचे शांग्रिला रिसॉर्टवाले त्यांच्यातर्फे बूकिंगही कन्फर्म करताहेत. आम्हीच अजून कन्फर्म केले नाही. तिथला क्राऊड कसा आहे वगैरे विचारात आहोत. कोणाला काही आयडीया त्या रिसॉर्टबाबत?
शांग्रिला महागडे आहे.
शांग्रिला महागडे आहे.
भोज रिसॉर्टचा आमचा अनुभव फारच
भोज रिसॉर्टचा आमचा अनुभव फारच छान होता. वातावरण खुपच छान! मला खुप आवडले होते.
पालघरला विहंग विहार नावाचं
पालघरला विहंग विहार नावाचं रिसॉर्ट आहे. आम्हाला आवडलं . समुद्र जवळ असूनही शांत वातावरण, खाणं, राहणं वगैरे व्यवस्थित . त्यांची वेबसाईट पण आहे . तिथले फोटो पाहून ठरवता येईल
स्थळं सगळीच निर्गुण असतात.
स्थळं सगळीच निर्गुण असतात. सात्त्विक / राजस / तामस ह्या मानवी वृत्ती असतात. तुमची कुठल्या वर्गवारीत मोडते ते पाहा. स्थळाच्या त्याचेशी काहीएक संबंध नाही.
शाली, जाई, सस्मित, भावना,
शाली, जाई, सस्मित, भावना,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद
बिजी असल्याने या धाग्यावर / माबोवर फिरकता आले नाही.
पण आपली ठिकाणे वाचलेली, पण त्या आधी ईतरांनी ते शांग्रिला कन्फर्म केले असल्याने आपण सुचवलेली ठिकाणे नोट करून ठेवलीत. पुढच्यावेळी कामात येतील.
बाकी शांग्रिला छान वाटले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पाफा, मला फार महागडे वाटले नाही. म्हणजे लूट तर मुळीच नाही. जो दर्जा, फॅसिलिटी होती त्याला योग्य किंमत होती. आम्ही मुक्काम थोडा वाढवूनही घेतला. आणि एखाद्या दुसर्या ग्रूपसोबत पुन्हा तिथे जायलाही आवडेन
वर कोणी पालघरचे रिसॉर्ट सुचवलेले त्यावरून कॉलेजच्या खूप आठवणी जागा झाल्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
डिप्लोमाच्या ४ वर्षात आम्ही ७-८ वेळा पालघरच्या केळवा बीचला जाऊन आलोत. दर सेमीस्टर झाली की तो आमचा रिलॅक्स व्हायचा अड्डा. एक रात्र मुक्काम गप्पा गाणी आणि एक दिवस समुद्राच्या पाण्यात डुंबायचे. ईतर पिकनिकही झाल्यात. पण शेवटचा पेपर होताच पुढच्याच दिवशी पालघरसाठी निघायचे हे ठरलेलेच होते. त्यामुळे मूडही बेस्ट रिलॅक्स असायचा
स्थळं सगळीच निर्गुण असतात.
स्थळं सगळीच निर्गुण असतात. सात्त्विक / राजस / तामस ह्या मानवी वृत्ती असतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>
खरंय, पण प्रत्येक स्थळाचे एक कल्चर असते. काही ठिकाणी दारू पिऊन दंगा घालणार्यांना पोषक वातावरण असते त्यामुळे त्यांच्या कळ्या फुलतात ईतकेच.
असो, आम्हाला काही कुठेही जराही त्रास न होता आमची कौटुंबिक सहल निर्विघ्न पार पडली
बाकी शांग्रिला छान वाटले.
बाकी शांग्रिला छान वाटले.
पाफा, मला फार महागडे वाटले नाही. म्हणजे लूट तर मुळीच नाही. जो दर्जा, फॅसिलिटी होती त्याला योग्य किंमत होती. आम्ही मुक्काम थोडा वाढवूनही घेतला. आणि एखाद्या दुसर्या ग्रूपसोबत पुन्हा तिथे जायलाही आवडेन Happy
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 15 August, 2018 - 17:21
>>>
साधारणपणे सुट्टी एन्जॉय करताना काही गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो त्या हिशोबाने तुमची ववि छान झालेली दिसतेय. अभिनंदन.
धागा काही पेटला नाही. किमान
धागा काही पेटला नाही. किमान भूतबाधा या विषयावरून तरी पेटेल म्हणून लोणावळ्याच्या हॉटेलची लिंक सुद्धा दिली. धागालेखकाचे अन्यत्र असलेले प्रतिसाद पाहता त्याला मुंबईची चांगली माहिती आहे. त्यामुळे इथे विचारून तो आपला कार्यक्रम ठरवेल इतका भाबडा वाटत नाही. गटारी अमावस्या आणि सात्विक असं काँबिनेशन असल्याने पेटका धागा होण्याची शक्यता जास्त होती. तरीही भम्हटो झाला. एकंदरीतच लोकप्रियतेवरच प्रश्न उभे राहतेय. मोदी १९ ला पुन्हा निवडून येतात कि नाही याची शंका येऊ लागली आहे.
स्तुत्य धागा
स्तुत्य धागा
व्वा ! फारच इंटरेस्टिंग
व्वा ! फारच इंटरेस्टिंग शीर्षकाचे धागे वर येतायेत![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
अरे काय सुरु आहे? नवीन धागे
अरे काय सुरु आहे? नवीन धागे कमी पडले म्हणुन जुने धावुन-धावुन वर येऊन राहिले. माबो हायजॅक झाली की काय?
शांत माणूस काढत आहेत माझे
शांत माणूस काढत आहेत माझे धागे वर. ते माझे आय डी नाहीत. आज सांगून सांगून थकलोय हे लोकांना. त्यांनाही विनंती केलीय. आशा करतोय ते थांबले असतील आता![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
ते माझे आय डी नाहीत. आज
ते माझे आय डी नाहीत. आज सांगून सांगून थकलोय हे लोकांना.>> तुम्ही यावर स्वतंत्र धागा काढू शकता. तुमच्या म्हणण्याला व्यापक प्रसिध्दी मिळाली तर लोकांचेही शंकानिरसन होईल आणि तुमचाही त्रास वाचेल.