पूर्वी बायका नवयाचं नाव घेत नसत, तेव्हा लग्नसमारंभात नवीन लग्न झालेल्या मुलींना उखाणे घ्यायला सांगायचे,त्या निमित्ताने त्यांना नवयाच नाव घ्यायला मिळायच. परंतु आज ही लग्नात, मंगळागौरीला हे उखाणे घेतले जातात. एक गमंत म्हणून ह्या सगळयाकडे पहायचं असत. मग काही वयस्कर बायका हे उखाणे या मुलींना सांगतात व त्या ते घेतात. मी काही नवीन उखाणे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, नवीन पीढीतल्या मुली असे उखाणे घेतील.
कम्प्युटरमध्ये घातली नवीन डिस्क
------शी लग्न करण्यान मी घेतली आहे मोठी रिस्क
फेसबुकवर फ्रेण्ड्स केले शंभर
-------च नाव घेते मी आहे त्यांची लव्हर
फेसबुक, मोबाईल शिवाय चैन मला पडेना,
-------च नाव घेते झोप मला येईना.
लग्नाच्या आहेरात आई वडिलांनी
दिला मला black berry चा मोबाईल
-----च नाव घेते आता फेसबुकवर update करीन माझा प्रोफाईल.
तुम्हाला देखील काही सुचत असतील तर जरुर लिहा.
असाच एक ऐकलेला. इतिहासाच्या
असाच एक ऐकलेला.
इतिहासाच्या पुस्तकाला भुगोलाचे कव्हर-
आणि ****रावांच नाव घेते ****रावांची लव्हर.
नाव घ्या नाव घ्या, नाव काय
नाव घ्या नाव घ्या, नाव काय घ्यायचं
नाव आहे *****, पण अहोचं म्हणायचं
घर दोघांचं असतं, दोघांनी सावरायच
मी पसरवायच आणि ****नी आवरायचं
नताशा दोन्ही उखाणे आवडले.
नताशा दोन्ही उखाणे आवडले.
सुंदर सुंदर हरीण त्याचे
सुंदर सुंदर हरीण त्याचे फेन्गाडे फेन्गाडे पाय
----- अजून घरी आला नाही पिऊन पडला काय...
एका हातात पर्स दुसर्या हातात
एका हातात पर्स दुसर्या हातात रुमाल
.....माझे हक्काचे हमाल
घरोघरी मातीच्या चुली त्या
घरोघरी मातीच्या चुली

त्या चुलीवर भाजला पापड
... रावांपेक्षा बरं दिसतं
लाल तोंड्या माकड
दादाने माझ्या लग्नात घर
दादाने माझ्या लग्नात घर भरणीच्या वेळी घेतलेला अस्स्ल सातारी उखाणा
"सातारा जिल्ह्यात पाटण तालुका, पाटण तालुक्यात किल्लेमोरगिरी माझं गाव
अन आरशात बघुन कुंकु लिहीती दर्शना तिचं नाव"
व्हॉट्स अप फॉरवर्ड कडु
व्हॉट्स अप फॉरवर्ड
कडु कारलं, तुपात घोळलं , विश्वासरावांना चारल
GROUP ADMIN च नाव घेते ,कटाप्पाने बाहुबलीला का मारल ?
(No subject)
माझ्या नणंदेच्या
माझ्या नणंदेच्या डोहाळजेवणाच्या वेळी मी घेतलेला उखाणा :
demonetization special
नणंदेच्या डोहाळजेवणात आनंदाला नाही तोटा
कारण -- नी आजच बदलून आणल्यात ५०० आणि हजाराच्या नोटा
IT वाल्या मित्रांसमोर हा घेतला होता :
beautiful are the roses, sweet is the fruit
in --'s life OS I have become root
भुसावळ ची केळी, नागपुर ची
भुसावळ ची केळी, नागपुर ची सन्त्री
--- माझी ग्रुह मंत्री !
कडु कारलं, तुपात घोळलं ,
कडु कारलं, तुपात घोळलं , विश्वासरावांना चारल
GROUP ADMIN च नाव घेते ,कटाप्पाने बाहुबलीला का मारल ?
>> नक्की कोण आहे नवरा.
Pages