चीनला जाण्यासाठी काय तयारी करावी?

Submitted by चैत्रगंधा on 1 August, 2018 - 01:08

घरातली व्यक्ती (ज्ये.ना.) १ आठवड्यासाठी चीनला जाणार आहे. शाकाहारी असल्याने आणि ब्रेड/ बेकरी पदार्थांची अ‍ॅलर्जी असलयाने खाण्याचे प्रॉल्बेम आहेत. इथले चीनचे धागे वाचून बिजींगमधल्या २/३ हॉटेल्सची नावे लिहून घेतली आहेत.
बरोबर डाळ /तांदूळ, रेडिमेड उपमा देणार आहे. अजून काय चालेल? नेटवर कस्टम नियम वाचून कळाले नाही. डाळिंब, कच्ची पपई अशी फळे, सुकामेवा देता येईल का? रव्याचे लाडू, सातूचे पीठ, साजूक तूप चालते का? तिथे काही नाही मिळाले तर सातूचे पीठ दुधात कालवून/ तूप मेतकूट भात असे खाता येईल. बरोबर छोटा इलेक्ट्रीक कुकर देणार आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फळे चालणार नाहीत, पण डाळिंब किंवा पपई, केळी, कलिंगड, सफरचंद, इ. फळे बीजिंगमध्ये स्थानिक दुकानांत सहज मिळतात. सुका मेवा चालायला हवा. तूप चालणार नाही. (पण जर कस्टमने थांबवले नाही, तर निघून जाईल एखाद वेळेस.) पीठं चालतील. मी जाताना मेथीच्या दशम्या, लसणाची चटणी, गूळपोळी असे बरोबर घेऊन गेलो होतो. २-३ दिवस त्या पुरल्या. झालंच तर स्नॅक्स म्हणून गुजराती खाकरा, बाकरवडी वगैरे कोरडे पदार्थ होते. त्या सगळ्याला कोणीही अडवलं नाही.

मी स्वतःही शाकाहारी आहे. Happy मला आजवर कसलाच त्रास झालेला नाही. ब्रेड-बेकरी अ‍ॅलर्जी असली तरी अगदी चिनी रेस्टॉरंट्समध्येही व्यवस्थित शाकाहारी खायला मिळेल. फक्त ते त्यांना नीट सांगता आले पाहिजे. ह्यासाठी दोन वाक्ये -

'वो ज स्सु' - मी शाकाहारी आहे. 'सु' हा शब्द महत्त्वाचा. 'सु' २-३ वेळा म्हटल्यानंतर त्यांना कळतेच कळते आणि मेन्युमधले शाकाहारी पदार्थ ते तुम्हाला दाखवायला लागतात. सहसा वांगं, टोफू, ग्रीन बीन्स ह्यांच्या डिशेस असतात. त्या 'बाई मीफान' म्हणजे पांढर्‍या भाताबरोबर खाल्ल्यास काहीही त्रास नाही.

'वो बु जीरियो' - 'मी मांस खात नाही'. वरचे न कळल्यास हेही म्हणू शकतो, पण मला तरी ती वेळ आत्तापर्यंत कधीच आली नाही.

बीजिंगमधली शुद्ध शाकाहारी व व्हेगन रेस्टॉरंट्सची यादी -

https://www.happycow.net/asia/china/beijing/

ह्याचबरोबर बीजिंगमध्ये 'गँजेस' नावाचे उत्तम भारतीय रेस्टॉरंट ३-४ ठिकाणी आहे. ह्याचबरोबर ताज लँड्स एंड, तंदूर ही रेस्टॉरंट्स आहेत.

हवामान कसे असते.. ऑगस्ट मध्ये उकाडा असतो का? नेटवर hot and rainy दिसत आहे. लोकरीचे कपडे नाही घेतले तर चालेल ना? एखादा स्वेटर /शाल देईन एसीचा त्रास वाटला तर बरोबर असावा म्हणून.

मुंबईतली मेमधली उष्णता + जूनमधला पाऊस हे असेल. लोकरीची काहीच गरज नाही. पाऊस नसताना तर भारतासारखंच गरम होतं. एसीसाठी देऊ शकता.

एक लघुच शंका....
गूगल ट्रान्स लेटर वापरून 'त्यांच्याशी ' संवाद साधता येईल ना?

चीन मध्ये शांघाय/बीजिंग सारख्या मोठ्या शहरात अजिबात प्रॉब्लेम होणार नाही.फळं, भाज्या, पाव, राईस हे तर सगळीकडे मिळते.काही न मिळाल्यास पिझ्झा हट/डोमिनोज /पापा जॉन्स मध्ये मार्गारिता खाता येतो.