
ज्वारीचं पीठ - ३ वाट्या
बेसन /चणाडाळीचं पीठ - १ वाटी
लाल तिखट/ बारीक चिरलेली हिरवी मिरची - चवीनुसार
मीठ - चवीनुसार
जिरे - चिमूटभर
ओवा - चिमूटभर
तीळ - चिमूटभर
हळद - चिमूटभर
धणेपूड - थोडीशी
कोथिंबीर - बारीक चिरून
कांदे बारीक चिरून - २
आवडत असतील तर टोमॅटो - १ बारीक चिरून
तेल
"भूक लागलीये,खमंग काहीतरी खायची इच्छा होतेय. पोटभरीचं चटकन होईल असं काय करावं बरं ?"
"थालीपीठ कर."
"भाजणी नाहीये पण "
"बिग डील. मी सांगते तसं कर ."
"सांग मग"
"ही घे कृती:"
१.. एका परातीत किंवा टोपात वरील सर्व साहित्य एकत्र करावे (तेल सोडून)
२. पाणी टाकून पीठ मळून घ्यावे
३. साधारण थालीपीठाला भिवतो तसे छान मऊ थापले जाईल असे मळावे
गोळा झाल्यांनतर तेलाचा हात लावून परत एकदा मळावे
४. नॉन स्टिक पसरत भांड्यात कडेने सर्व बाजुंनी थोडेसे तेल सोडावे.
गोलाकार थालीपिठे थापून घ्यावीत.
बरेच जण प्लास्टिक कागदावर थापून मग तव्यावर/ पसरत भांड्यात शेकतात/भाजतात
मी डायरेक्ट तव्यावरच थापले.
थापताना ज्वारीची पीठ हाताला चिकटते, म्हणून हाताला तेल लावून घ्यावे
५. थापून झाल्यानंतर त्याला ४-५ छिद्रे पडून त्यात थोडेसे तेल सोडावे
(तेलामुळे चव चांगली येते, कमी तेल टाकले तरी चालू शकते )
६. दोन्ही भिजुनी खरपूस ,खमंग आणि थोडेसे लाल होईपर्यंत भाजून घ्यावे
कडक झाल्यानंतर खायला आणखी मजा येते
७. भाजल्यानंतर ताटात काढून ताज्या दह्याबरोबर खावे
फोटोग्राफ्सः
थालीपीठ भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून थोडा वेळ झाकून तसेच राहू द्यावे. मस्त कडक होतात
वाह मी पण असं बनवते पण त्याला
वाह मी पण असं बनवते पण त्याला हे नाव आहे हे पहिल्यांदा कळलं....
मस्त ...आजच करिन ...मी
मस्त ...आजच करिन ...मी साताऱ्याची आमच्या इथे याला धपाटेही म्हणतात ......
ऑल टाइम फेवरेट.. मस्त दिसतंय.
ऑल टाइम फेवरेट.. मस्त दिसतंय. उद्याचा मुहुर्त नक्की.
भारी लागेल.
भारी लागेल.
मस्तच आणि मस्टच (करायला)
मस्तच आणि मस्टच (करायला)
भारी दिसतंय... आमच्याकडे
भारी दिसतंय...
आमच्याकडे धपाटे म्हटलं की आधी हुरड्याचं पीठ मग इतर पीठांची एन्ट्री कधी हुरड्याचं पीठ नसेल तरी चालतं. पण आम्ही कांदा नाही घालत लसूण असतो ठेचून आणि हिरवी मिरची तीही ठेचलेलीच. तोंपासु...
मस्तच.
मस्तच.
खाल्लं आहे हे आधी. मराठवाडी
खाल्लं आहे हे आधी. मराठवाडी आहे हे माहिती नव्हतं. पुन्हा करायला हवं. छान आहे फोटो.
मस्त आहे थालीपीठ व फोटो.
मस्त आहे थालीपीठ व फोटो.
मी आधी प्लॅस्टिकवर थापून करायचे. एकदा कोकण सरसमध्ये एक बाई ओल्या फडक्यावर थालीपीठ ठेऊन तो फडका तव्यावर, फडक्याची बाजू वर येईल असा टाकून मग हलकेच सोडवून घेताना बघितले. फडके नीट ओले करून घेतले की हवे तितके जाड/पातळ थालीपीठ आरामात थापून भाजता येते.
किल्ले दंगा फोटोज.
किल्ले दंगा फोटोज.
थालिपीठ जीव की प्राण, माझी ताई सुरेख करते. आणि मी पण थेट तव्यावर थापते.
अलिकडे खूप दिवसात नाही केलं.
अहाहा! मस्स्त ! फोटो तोंपासू
अहाहा! मस्स्त ! फोटो तोंपासू !

भारतातून येताना ज्वारीचं पीठ आणलेलं असतं तेव्हा केलंच जातं १-२ दा .. भारी लागतं !
नंतर मग पीठ पण संपलं थालीपिठ पण संपलं हाती राहिला तवा असं होतं
मग काय येऊन जाऊन भाजणीचं नैतर साबुदाण्याचं
सुरेख...! हा प्रकार घरी
सुरेख...! हा प्रकार घरी नेहेमी होतो. तर्हेतर्हेची पीठं, पालेभाज्या, कांदा, टॉमेटो असलं काय काय घालून करतो. यात आदल्यादिवशीचे उरलेले प्रकारही सुरेख चव जमवतात...
सरळ तव्यावरच लावायचे. पहीलं लावतांना तर तवा गारच असतो, पुढल्यावेळी लावतांना तव्यावर जरासं पाणी शिंपडायचं आणि मग पाण्याचा हात घेत घेत थालीपीठ पातळ पसरवता येतं... प्लॅस्टीक, कापड वगिरे मला उगा कुटाणा वाटतो (अर्थात मलाच ब्रका)
मी तव्यावर लावायचा प्रयत्न
मी तव्यावर लावायचा प्रयत्न केला. हात भाजेल या भीतीने पसरता येईना.
सरळ तव्यावरच लावायचे. पहीलं
सरळ तव्यावरच लावायचे. पहीलं लावतांना तर तवा गारच असतो, पुढल्यावेळी लावतांना तव्यावर जरासं पाणी शिंपडायचं>> yes आणि एकावेळी २ २ तवे असतात चालू
खाणारी तोंडं बरीच असतील तर तसे फार्फार सोप्पे जाते
सरळ तव्यावरच लावायचे. पहीलं
सरळ तव्यावरच लावायचे. पहीलं लावतांना तर तवा गारच असतो, पुढल्यावेळी लावतांना तव्यावर जरासं पाणी शिंपडायचं आणि मग पाण्याचा हात घेत घेत थालीपीठ पातळ पसरवता येतं... प्लॅस्टीक, कापड वगिरे मला उगा कुटाणा वाटतो >>>
मलाही तसंच आवडतं. पटपट थालिपीठं लावून होतात सरळ तव्यावर असली की.
सगळ्यांचे आभार
सगळ्यांचे आभार


पाकृ टाकताना जरा धाकधूक होती.. आत हुरूप वाढला आहे ..
टाकत जाईन बिनधास्त इथून पुढे
सुरेख...! हा प्रकार घरी नेहेमी होतो. तर्हेतर्हेची पीठं, पालेभाज्या, कांदा, टॉमेटो असलं काय काय घालून करतो. यात आदल्यादिवशीचे उरलेले प्रकारही सुरेख चव जमवतात... +१११
आई करते अस.... भारी होतात
एकावेळी २ २ तवे असतात चालू>>हो अग्दी अगदी
छान रेसिपी आणि फोटो.
छान रेसिपी आणि फोटो.
>> मलाही तसंच आवडतं. पटपट थालिपीठं लावून होतात सरळ तव्यावर असली की.
मी कायम प्लास्टिक वर (झिपलॉक बॅग) थापते. गरम तव्यावर व्यवस्थीत थापता येणार नाहीत असं वाटतं. प्लास्टीक वर थापून तव्यावर घातली तरी पटापटा होतात
मी एक तवा आणि एक कढई घेते,
मी एक तवा आणि एक कढई घेते, डायरेक्ट लावते त्यावर. एक उतरलं की एक ठेवते.
इ ना चॉलबे अन्जू... दोन्ही
इ ना चॉलबे अन्जू... दोन्ही तवे गॅसवर एकापाठोपाठ. पहिल्या गार तव्यावर एक थालीपीठ थापून लावायचं आणि तो गॅसवर चढवला की लगेच दुसर्यावरही थालीपीठ लावून तो ही गॅसवर... आता पहिल्या थालीपीठाची उलटण्याची वेळ. ते झालं की दुसर्याची ही तीच वेळ... तोवर पहिलं पानात वाढायला तयार... अॅन्ड सो ऑन...
योकु तीन तवे का नाही?
योकु तीन तवे का नाही?
घरात नसतेत...
घरात नसतेत...
माझ्या स्टाइलचे कमी तेलाचे
माझ्या स्टाइलचे कमी तेलाचे दिसते आहे.
गरम तव्यावर्/भांड्यात व्यवस्थीत थापता येतं. हाताला तेलाऐवजी गार पाणी लावावे. पट्पट हात उचलला की छान जमते.
ज्वारी पिठ नसतच पण घरात
ज्वारी पिठ नसतच पण घरात असलेल्या सगळ्या पिठांचे साधारण असेच बनवते. फोटो मस्त...
मी तव्यावर लावायचा प्रयत्न
मी तव्यावर लावायचा प्रयत्न केला. हात भाजेल या भीतीने पसरता येईना.>>>>> मी तो प्रयत्नही केला नाही.कारण तव्याची,गॅसची आच लागते.प्लॅस्टिक उत्तम.नुसती कांदावाली आवडत नाहीत.त्यात काहीतरी भाज्या घालून आवडतात.त्यामुळे मऊपणा येतो.मात्र तांदळाच्या पिठात कांदा,ओली मिरची कोथंबीर असली की एकदम झकास लागते.त्यातही उकडीचे पीठ राहिले असेल तर अजूनही मस्त लागतात.
इ ना चॉलबे अन्जू >>>
इ ना चॉलबे अन्जू >>>
दोन्ही तवे गॅसवर एकापाठोपाठ.
दोन्ही तवे गॅसवर एकापाठोपाठ. पहिल्या गार तव्यावर एक थालीपीठ थापून लावायचं आणि तो गॅसवर चढवला की लगेच दुसर्यावरही थालीपीठ लावून तो ही गॅसवर... आता पहिल्या थालीपीठाची उलटण्याची वेळ. ते झालं की दुसर्याची ही तीच वेळ... तोवर पहिलं पानात वाढायला तयार... अॅन्ड सो ऑन...+११११११११११११११११११११
आमच्याकडे मी गरम गरम आधी
आमच्याकडे मी गरम गरम आधी नवऱ्याला करून वाढते थालीपीठ वगैरे असेल तर, मग निवांत मी खाते. त्यामुळे चालते एकानंतर एक
लॉल!
लॉल!
चांगली आयडिया अन्जू.
चांगली आयडिया अन्जू. सुरवातीचे एक दोन तसेही नीट जमत नाहीत ना.
नाही हो, उलट तीच जास्त चांगली
जास्त कोणी पाहुणे, नातेवाईक असतील तर थालीपीठ न करता भाजणीचे वडे करते, ते सोपं पडतं.
Pages