अवकाशातून पृथ्वी निळ्याऐवजी शुभ्रधवल भासत होती.
आता जेरुसलेम शांत होतं. आफ्रिकासुध्दा. येमेन, अफगाणीस्तान, व्हेनेझुएला, इराक, सिरीया धुमसायचे बंद झाले होते. सौदीअरेबिया-इराण, अमेरिका-रशिया, म्यानमार-बांगलादेश, भारत-चीन-पाकिस्तान – सगळीकडे तलवारी म्यान झाल्या होत्या. इस्लामिक स्टेट, तालिबान, बोको हराम, हमास, हिझबुल्ला, जैश, मुस्लीम ब्रदरहूड अश्या अनेक अभद्र संघटनांचं नामोनिशाण उरलं नव्हतं. धर्म, जात, पोटजात, वंश, भाषा, वर्ण - कुठलेच भेद राहिले नव्हते. कुठे बॉम्बस्फोट नाहीत. ड्रोन्सचे हल्ले नाहीत. उध्वस्त शहरं, प्रेतांचे ढीग, तुटलेले हातपाय, रक्तपात, अनाथ मुलं, किंकाळ्या काही काही नाही.
देवाने डोळे उघडले. आणि ते पहाटे पडलेलं स्वप्न असूनही तो खिन्नतेने हसला. आता फक्त एव्हढंच त्याच्या हातात उरलं होतं.
------
डिस्क्लेमरः देव पुरुष आहे किंवा देव आहेच असं काहीही सुचवायचा हेतू नाहिये. एक कथा म्हणून वाचावी ही विनंती.
देवाचे स्वप्न खरे ठरावे...
देवाचे स्वप्न खरे ठरावे...
सगळे देवाच्या icchene च होते
सगळे देवाच्या icchene च होते ना.
Wah
Wah
छान...असे दिवस बघायला मिळावे
छान...असे दिवस बघायला मिळावे
काही अभद्र संघटनांची नावं
काही अभद्र संघटनांची नावं राहिलीत का?
मला वाटलं पृथ्वी निर्मनुष्य
मला वाटलं पृथ्वी निर्मनुष्य आणि उजाड झाली की काय!
वावे +१
वावे +१
पहिल्या वाक्याचा अर्थ काय?
पहिल्या वाक्याचा अर्थ काय?
< पहिल्या वाक्याचा अर्थ काय?
< पहिल्या वाक्याचा अर्थ काय? ->>
हिमयुग आले असणार
छान आहे अल्ला चं स्वप्न.
छान आहे अल्ला चं स्वप्न.
विठ्ठल, म्हंणूनच 'अश्या अनेक'
विठ्ठल, म्हंणूनच 'अश्या अनेक' हे शब्द टाकलेत. नाहीतर त्या नावांचेच १०० शब्द झाले असते. किंवा 'कथेतले जास्त शब्द ह्या नावांचेच आहेत' अशी कोणाचीतरी कुजकट कॉमेंट आली असती. तसंच फक्त मुस्लिम संघटनाच धार्मिक हिंसाचार करतात असंही सुचवायचं नव्हतं. पण जगात सध्या प्रामुख्याने त्याच दिसताहेत म्हणून ही नावं घेतली.
वावे, अॅमी तसं नाहिये....माणसं आहेत पण आता आपापसात भांडत नाहियेत. कथेचा असाही अर्थ निघेल हे माझ्या लक्षात आलं नव्हतं.
अदिति, शांतीचा रंग पांढरा ना म्हणून पृथ्वी धवल दिसतेय.
डिस्क्लेमर मध्ये 'एकच देव आहे, हिंदू धर्माप्रमाणे अनेक नाहीत असं सुचवायचा हेतू नाही' हेही वाक्य टाकावं का असा विचार केला होता. पण मूळ कथेच्या लांबीपेक्षा डिस्क्लेमरचीच लांबी जास्त होईल असं वाटल्याने टाकलं नाही. आशा होती की ह्यावर कोणी वाद उकरून काढणार नाही. पण आजकाल मायबोलीवर अशी आशा करण्यात काही अर्थ नाही हे आ.रा.रा. ह्यांच्या प्रतिसादावरून दिसतंय. प्रत्येक बाबतीत धर्म मध्ये आणलाच पाहिजे का? असले वाद घालायचे असले तर जिथे ह्यासाठी खास धागे काढलेत तिथे जाऊन घाला की. ज्यांना ह्यात रस नाही त्यांना का वात आणताय? देवाला खरंच असं स्वप्न पडलं तरी ते खरं होण्याची किती सुतराम शक्यता नाही हे ह्या प्रतिसादावरून कळतंय कारण दुसर्या धर्माबद्दल आकस बाळगणारे प्रत्येक धर्मात आहेत. देव झाला म्हणून काय झालं, तो तरी किती जणांना सद्बुध्दी देणार ना......
निखळ मनाने प्रतिसाद देणार्या सर्वांचे आभार!
देवाचे स्वप्न खरे ठरावे...
देवाचे स्वप्न खरे ठरावे...+१११
हो ना
मला वाटलं पृथ्वी निर्मनुष्य
मला वाटलं पृथ्वी निर्मनुष्य आणि उजाड झाली की काय!>>>मलाही असंच वाटलं होतं त्यात अजून हा प्रतिसाद...छान...असे दिवस बघायला मिळावे>>>
आता समजली शशक छान आहे
मला वाटलं पृथ्वी निर्मनुष्य
मला वाटलं पृथ्वी निर्मनुष्य आणि उजाड झाली की काय!>>> मलाही असंच वाटलं होतं.
पण शेवट वाचुन कळली. जमलीये.
मला वाटलं अणुयुद्धातून
मला वाटलं अणुयुद्धातून निर्माण झालेल्या पांढर्या ढगांनी पृथ्वी झाकोळून गेली म्हणून शुभ्रधवल.
कथा वाचून जगजित ची एक गझल
कथा वाचून जगजित ची एक गझल आठवली
एक ब्राह्मन ने कहा है के ये साल अच्छा है
दर्द की रात बहोत जल्द ढलेगी अब तो, आग चुल्हो में हर एक रोज जलेगी अब तो,
भूख के मारे कोई बच्चा नही रोयेगा, चैन की नींद हर एक शख्स यहा सोयेगा,
आंधी नफरत की चलेगी ना कही अब के बरस, प्यार की फसल उगायेगी जमी अब के बरस,
है यकीं अब ना कोई शोर शराबा होगा, जुर्म होगा ना कोई खून खराबा होगा...
ओस और धूप के सदमे ना सहेगा कोई, अब मेरे देस मे बेघर ना रहेगा कोई...
नये वादों का जो डाला है, वो जाल अच्छा है, रहनुमाओने कहां है के ये साल अच्छा है..
दिल के खुश रखने को गालिब ये खयाल अच्छा है! हेच खरं.
दिल के खुश रखने को गालिब ये
दिल के खुश रखने को गालिब ये खयाल अच्छा है! मस्त प्रतिक्रिया, मस्त कथेसाठी
आवडली कथा
आवडली कथा
कथा आवडली
कथा आवडली
छान आहे कथा.
छान आहे कथा.
तुमच्या सगळ्या शतशब्दकथा
तुमच्या सगळ्या शतशब्दकथा वाचल्या . छान लिहिता तुम्ही .