पैसा आला धावुण.......!
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
8
आज रात्रो ठिक साडे बारा वाजता भारतीय लोकशाहीचे एक भयनाट्य सुरु होईल. प्रचंड प्रमाणात पैसा, दारु अन ई.ई. चा पुर येउन त्यात लोकशाहीचे प्रेत वाहुन जाईल.
तर तम्माम नागरिकांनो, आज आत्ता ताबडतोब, दोन मिनिटे शांत बसुन, आपण आपल्या लोकशाहीला आदरांजली वाहु!
अन उद्या सकाळी तिची अंत्ययात्रा काढायला सकाळी ७ वाजता पुन्हा हजर राहु!
वेळ- सकाळी ७ ते संध्याकाळी ५.
ठिकाण- गावची पडकी शाळा.
साहित्य- निळे रंगीत पाणी.
कृती- कळ दाबणे.
प्रकार:
शेअर करा
भारतीय लोकशाही अमर रहे!
तुझ्या उमेदवाराच्या अपयशाचे
तुझ्या उमेदवाराच्या अपयशाचे समर्थन आताच सुरु केले आहे काय?
चंपक आम्ही आशेवर जगतोय .
चंपक आम्ही आशेवर जगतोय . येवढ्या लवकर तिरडीवर नका ठेऊ लोकशाही ला .
चम्प्या , तू निवडलेल्या
चम्प्या , तू निवडलेल्या उमेदवाराचा पक्षच असा आहे की त्याला हे असलं अॅन्टीसिपेटरी विव्हळायची सवय आहे..... त्यामुळे तो गुण तुलाही लागलेला दिसतोय.
आज दुपारी मिळालेल्या बातमीत तुझ्या उमेदवाराची स्थिती बरीच सुधारले असून तो आता निवडून येऊ शकतो या लीगमध्ये आला आहे.... (आता मात्र लोकशाही एकदम परिपक्व वाटत असेल तुला. ढोंगी कुठला...! :))
अॅन्टीसिपेटरी विव्हळायची >>>
अॅन्टीसिपेटरी विव्हळायची >>> मराठी प्रतिशब्द काय>
दुपारपर्यंत सगळे ठिक च असते, गोंधळ रातीलाच होतो! १००० च्या रेट ची बातमी होती मग आरडु नको त काय करु!
यंदा इअक्डुन पण बर्यापैकी तयारी आहे,,,,, सो , नो - विव्हळणे!!!
श्री....... उम्मीद पे दुनिया काय्म है! जै हिंद!
अॅन्टीसिपेटरी =
अॅन्टीसिपेटरी = घटनापूर्व
विव्हळण्याला 'इवळणे' हा अत्यन्त अर्थवाही शब्द आहे माझ्या गावाकडे आणि तुझ्याही..
आता तुला इवळण्याचे पार्श्वसंगीतही मनातल्या मनात ऐकू येईल बघ...

१००० ची पुंगी सोडुन दिली अन
१००० ची पुंगी सोडुन दिली अन प्रत्यक्षात २०० अन ३०० ने वाटप केले गेले.. हा अन्याय हे
किमान ५०० तरी?.... दिवाळी हाय का नाह्य?
आमचे १०० बरे मग!
किमान लोकांना खोटी स्वप्नं दाखवुन भ्रमनिरास तरी केला नाही!
... १००० चे पुंगी आम्ही च वाजवली होती.... मधल्यांनी ७००-८०० खाल्ले असं बेमालुम पसरवलं! जै हो!
भेटु २२ ला......!
गाठ पडली ठका ठका असाच मामला
गाठ पडली ठका ठका असाच मामला आहे तुमचा चम्पटराव