मी तुला नक्कीच भेटेन.....
मी तुला नक्कीच भेटेन,
कुठे ? कशी? माहीत नाही!
कदाचित,
तुझ्या मानसीचे चित्र होऊन कॅनवासवर उतरेन.....
आणि कदाचित,
तुझ्या कॅनव्हासवरच्या चित्रातली
एक अमूर्त रेषा बनून तुला नजरेत साठवीत राहीन!
कदाचित,
सूर्याची तिरीप होऊन तुझ्या रंगात मिसळून जाईन,
नाहीतर रंगांच्या बाहुपाशात तुझ्या कॅनवासवर विसावेल...
काय सांगू, कुठे, कधी
पण तुला नक्कीच भेटेन...
नाहीतर,
अवखळ झरा होऊन तुझ्या अंगावर तुषार उडवीन,
आणि त्या तुषारानी तुझं सर्वांग भिजवून टाकीन,
एक गार शिरशिरी होऊन तुझ्या छातीला कवटाळीन..
मला बाकी काही माहीत नाही
पण एवढं कळतय की,
काळाने काहीही केलं तरी
या जन्मी तु माझ्यासमीपच असशील...
हे शरीर नष्ट झालं,
तर सगळंच नष्ट होतं ,
पण आठवणींचे कण विश्वात विरून जातात ...
मी ते कण गोळा करीन,
अन धाग्यात गुम्फीन......
ए, , मी तुला नक्की, नक्कीच भेटेन.....
अमृता प्रीतम...
मी साहित्यिक नाही, माझ्या
मी साहित्यिक नाही, माझ्या मर्यादा कृपया लक्शात घ्या. मुळात भाषान्तर आणि तेही कवितेचे ही अत्यन्त अवघड गोष्ट आहे . त्यात रसहानीचा सम्भव निश्चितच असतो. त्यातली उत्कटता हरपण्याचा धोका आणि शक्यता बर्याच्दा असते. मी केलेला उद्योग यांत्रिक आहे. कृपया भाषान्तराला आणि अक्षराला हसू नये ही विनन्ती....
व्वा वा त्वाडा जवाब नही !!!
व्वा वा त्वाडा जवाब नही !!! छान केलय भाषांतर.
भाषांतर मस्त जमलय पण अक्षर
भाषांतर मस्त जमलय पण अक्षर मात्र खूपच गिचमीड आलय
अप्रतिम... मस्तच भिणली आहे ही
अप्रतिम... मस्तच भिणली आहे ही कविता तुमच्यामध्ये... आता जरा तिच्याविषयीसुध्दा लिहून येऊ दे...
मला तर माझे कॉलेजचे ते प्रेमाचे (फुलपाखराच्या पंखासारखे हलके हलके, नाजूक नाजूक) दिवस आठवले...
रॉबिन्हूड भाषांतर सुरेखच
रॉबिन्हूड भाषांतर सुरेखच झालय. कवितेचा आशय फार छान उतरला आहे.
धन्यवाद, भाषांतर करून एक
धन्यवाद, भाषांतर करून एक सुंदर कविता सादर केल्याबद्दल. तुलिप ना अनुमोदन्=पुन्हा विषयी.
आवडलं भाषांतर.
आवडलं भाषांतर.
छान, मस्त जमलं.
छान, मस्त जमलं.
मस्त!
मस्त!
आताशी थोडे समजले असे
आताशी थोडे समजले असे वाटतेय.....!
हुडा मस्त जमलयं भाषांतर ,
हुडा मस्त जमलयं भाषांतर , त्यादिवशी थोडा थोडा कळांदी होती आज पुर्ण कळांदी .....
छान! यावरुन गुलजार यांची एक
छान!
यावरुन गुलजार यांची एक कविता आठवली...
-
मुझसे एक नज्म का वादा हैं मिलेगी मुझको
डूबती नब्जोंमें जब दर्द को नींद आने लगे
जर्द सा चेहरा लिये चांद जब उफक पर पहुंचे
दिन अभी पानी में हो और रात किनारे के करीब
ना अंधेरा ना उजाला हो ना रात ना दिन
मुझसे एक नज्म का वादा हैं मिलेगी मुझको
मला वाटते ही 'आनन्द' मध्ये
मला वाटते ही 'आनन्द' मध्ये होती का? त्यात नज्म च्या ऐवजी मुझसे एक कविताका वादा है असा बदल आहे....
होय. आनंद मधे नज्मच्या ऐवजी
होय. आनंद मधे नज्मच्या ऐवजी कविता शब्द वापरलाय.
मी ही कविता त्यांच्या "पुखराज" कि असंच काहीतरी नाव असलेल्या एका कविता संग्रहात वाचली होती.
मस्तच!
मस्तच!
छान!!!!!!
छान!!!!!!
हुड, मस्त जमल भाषांतर. लगे
हुड, मस्त जमल भाषांतर.
लगे रहो.
हूडकाका - जोर्दार भाषांतर
हूडकाका - जोर्दार भाषांतर !!
फक्त कण ऐवजी पुष्पे म्हटले तर चालेल?
मूळ कवितेत कण असाच शब्द आहे.
मूळ कवितेत कण असाच शब्द आहे. अर्थात ज्याला जसे गोड वाटेल तसा त्याने रसास्वाद घ्यावा हेही उत्तमच ना....!
वाह!!! छे या बाई पुन्हा वेड
वाह!!!
छे या बाई पुन्हा वेड लावणार असं दिसतंय. आरएच धन्यवाद अजून काही असतील पोस्ट करा प्लिज.
आता मला यांच पुस्तक कुठे-कसं मिळेल.