आज गप्पा चालल्या होत्या, आयुष्यातला सर्वोत्तम निर्णय कोणता होता( best decision in your life).
माझे मन भूतकाळात गेले - इंजिनिरिंग 2010 मध्ये पास झाल्यानंतर मला एका मोठ्या आयटी कंपनीत जॉब लागला होता. बंगलोर ला पोस्टिंग, 25 हजार पगार - माझ्यासारख्या गावाकडे 10वी पर्यंत शिक्षण झालेल्या मध्यम वर्गीय मुलासाठी स्वप्न सत्यात उतरल्या सारखे होते.
2011 पर्यंत स्वप्नांना तडा गेला असे वाटू लागले, काम ते नव्हते जे मला अपेक्षित होते. गाणी ऐकत दिवस दिवस कोडींग वगैरे माझ्या अपेक्षा होत्या पण मी इथे एक्सेल शिटा भरत होतो.डेटा मॅपिंग करत होतो.
कॅन्टीन मध्ये जायचो लोक म्हणायचे, लकी आहेस हा प्रोजेक्ट मिळाला, या प्रोजेक्ट मधून 2 वर्षात onsite मिळते म्हणजे मिळतेच.
काही मित्र आधीच मास्टर्स करायला तिथे गेले होते, फोटो टाकत होते, पार्ट टाईम जॉब करून पैसे कमवत होते. अमेरिकेत जायला मिळेल, डॉलर्स मिळतील आणि मी अशा प्रोजेक्ट मध्ये होतो.
2011 च्या ऑक्टोबर मध्ये मॅनेजर म्हणाला पुढच्या वर्षी साठी तुझा व्हिसा प्रोसेस आपण सुरू करणार आहोत.
आणि दोन आठवड्यात मी पेपर टाकले ( राजीनामा दिला).
का?? कारण US ला जायचे म्हणजे हे काम बंगलोर मध्ये 1 ते 2 वर्षे करा आणि नंतर onsite जाऊन पुढची 2 ते 4 वर्षे हेच काम. म्हणजे 6 वर्षे मी फक्त एक्सेल मध्ये, आणि मग अडकून रहा आणि असे रोल करत रहा.
तर मी onsite नको म्हणालो, US ला नको म्हणालो आणि मी एक स्टार्ट अप जॉईन केली. जिथे मला रोज नवीन चॅलेंजिंग काम होते,इंटरेस्टिंग होते आणि मला आवडणारे होते.
तर अशा प्रकारे मी 1 लाख + एम्प्लॉयी वाली कंपनी सोडून टोटल 15 जण असणाऱ्या स्टार्ट अप ला आलो. 30% पगार कट घेतला( कमी पगारावर आलो). सगळे म्हणाले मी चुकीचा निर्णय घेतला आहे. पण तोच निर्णय मला 2016 मध्ये अमेरिकेत घेऊन गेला आणि ते देखील मला आवडणाऱ्या कामात , जवळजवळ तिप्पट पगार जो मला जुन्या onsite position मध्ये ऑफर झाला होता आणि अशा कंपनीत जिथे माझा resume जुन्या स्किल्स वर कधीच सिलेक्ट नसता झाला.
आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय - पैशाच्या मागे न धावता, आवडत्या क्षेत्रात जाणे.
तुमच्या आयुष्यातील( करियर, लाईफ कशातीलही) सर्वोत्तम निर्णय कोणता होता???
सर्वांच्या कथा इन्स्पायरिंग
सर्वांच्या कथा इन्स्पायरिंग आहेत.
जेम्स वांड on 19 July, 2018 -
जेम्स वांड on 19 July, 2018 -
इंजिनियरिंगला ऍडमिशन न घेण्याचा निर्णय माझा आयुष्यातला सगळ्यात मोठा अन सर्वोत्तम निर्णय होता!>>===+++११११
नवीन Submitted by दक्षिणा on
नवीन Submitted by दक्षिणा on 19 July, 2018 - 17:58
डबा बाटली अभिनंदन. तुमची कथा स्फुर्तीदायक आहे.
तुमचे दुकान अजून भरभरून चालू दे. Happy>>>>> +११११
वरील इंजिनियरिंग शिक्षण न
वरील इंजिनियरिंग शिक्षण न घेण्याच्या सर्वोत्तम निर्णयाला जोड म्हणून मी माझ्या आवडत्या विषयांचे शिक्षण घेण्याचाही निर्णय घेतला, मुख्यधारेतील विद्यापीठातून त्या विषयात एम.फील घेतलं, तूर्तास मुक्त विद्यापीठातून ३ विषयांत एम.ए. पूर्ण केलं आहे चवथ्या विषयात पुढील वर्षी स्नातकोत्तर पदवी मिळेल. मातृभाषा मराठी, हिंदी आणि इंग्रजी सोडून इतर भाषा शिकायचं आता मनाने घेतलं आहे, जमेल तसे बंगाली, तामिळ अन पंजाबी शिकायचा मानस आहे. रोज रात्री झोपताना अतिशय शांतचित्ताने झोपतो, नोकरीला चिडचिड होत नाही, खूप आवडते जे काम करतोय. मला वाटतं हा 'स्वानंद' एक परिमाण असावं, आपला निर्णय बरोबर अन सर्वोत्तम होता की नाही ते तपासायला.
अर्थात, नावडते फिल्ड घेऊन त्यात इंटरेस्ट विकसित करून, त्यात आनंदाने वावरणाऱ्या लोकांसाठीही आमच्या मनात परम आदर आहे _/\_
डबा बाटली तुमचे खुप खुप
डबा बाटली तुमचे खुप खुप अभिनंदन. . तुमचे दुकान धो धो चालु द्या !!!
मी आज पासुन १३ वर्षांपुर्वी मॅक्स म्युलर भवन, पुणे येथुन जर्मन ची सगळ्यात वरची लेव्हल पुर्ण केली, त्या नंतर एका छोट्या ट्रान्स्लेशन ब्युरो मधे जॉब केला तेव्हा माझ्या तिथल्या बॉस ने सांगितले होते की काही झालं तरी "कोअर ट्रान्स्लेशन" सोडु नकोस. व्हॉईस प्रोसेसींग व तत्सम कामांमध्ये लगेच भरपुर पैसे मिळतील पण फक्त बोली भाषा सुधारेल... मी त्या वेळी सरांचा तो सल्ला मानला आणि "कोअर ट्रान्स्लेशन" करत राहिलो..आता मला लक्षात येतयं की तो माझा सर्वोत्तम निर्णय होता
मी आज पासुन १३ वर्षांपुर्वी
मी आज पासुन १३ वर्षांपुर्वी मॅक्स म्युलर भवन, पुणे येथुन जर्मन ची सगळ्यात वरची लेव्हल पुर्ण केली >+११ _/\_
माझ्या साठी सर्वात योग्य
माझ्या साठी सर्वोत्तम निर्णय म्हणजे लग्नाचा जोडीदार निवडण्याचा.. I रिअली feel blessed ..
माझ्या साठी सर्वोत्तम निर्णय
माझ्या साठी सर्वोत्तम निर्णय म्हणजे लग्नाचा जोडीदार निवडण्याचा-> +१ माझाही सर्वोत्तम निर्णय
माझ्या साठी सर्वोत्तम निर्णय
माझ्या साठी सर्वोत्तम निर्णय म्हणजे लग्नाचा जोडीदार निवडण्याचा-> +१११११
माझाही
दक्षिणा, किल्ली, रश्मी,
दक्षिणा, किल्ली, रश्मी, प्रसन्न हरणखेडकर आपले मनःपूर्वक आभार.
माझ्या साठी सर्वोत्तम निर्णय म्हणजे लग्नाचा जोडीदार निवडण्याचा-> सहमत आहे.
माझा सर्वोत्तम निर्णय होता तो
माझा सर्वोत्तम निर्णय होता तो म्हणजे मी मैत्रीण.कॉम चालू केली हा. टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने मला रोजच्या दिवसाला नवनवीन शिकायला मिळते. पर्सनल फ्रंटवर भरपूर मैत्रिणी मिळाल्या; ओळखी झाल्या. क्लिशे वाक्य असले तरी खरे आहे की माझं आयुष्यच बदलून गेले. चांगल्या अर्थाने.
बस्के आय अॅम सो शुअर. आणि
बस्के आय अॅम सो शुअर. आणि मैत्रिण चे काम तु खूप छान पाहतेस.
पसारा छान वाढवला आहेस.
खुप कौतुक वाटतं मला तुझं
अवांतर.
अवांतर.
ही मैत्रीण.कॉम फक्त बायकांसाठीची वेगळी संयुक्ता आहे का?
मेन बोर्डावर थ्रेड्स दिसताहेत, https://www.maitrin.com/node/2334 या धाग्यावर ८४ प्रतिसादही दिसताहेत, पण वाचायला गेलो तर काहीच नाही असे का?
आ. रा. रा., हो काही लेख
आ. रा. रा., हो काही लेख सार्वजनिक असतात मात्र बाकीचे सर्व लेखन स्री सदस्यांसाठी मर्यादित आहे.
बस्के, खरच मैत्रीण सुरू करणे हा एक उत्तम निर्णय आणि अंमलबजावणी देखिल उत्तम निभावता आहात सर्वजणी
आ.रा.रा, मैत्रीण.कॉम ही केवळ
आ.रा.रा, मैत्रीण.कॉम ही केवळ स्त्रियांसाठी असलेली ऑनलाईन कम्युनिटी आहे. काही लेख / विभाग सार्वजनिक वाचनासाठी खुले आहेत मात्र प्रतिसाद रजिस्टर्ड सदस्यांनाच लिहीता/ वाचता येतील अशी सिस्टीम आहे.
हे इथे कदाचित अवांतर होत आहे. पुढे हवंतर विचारपुशीत बोलू.
बस्के - खूप छान !
बस्के - खूप छान !
माझा लग्नाचा निर्णय हा
माझा लग्नाचा निर्णय हा सर्वोत्तम नाही म्हणता येणार. पण मनासारखे झाले याचे समाधान आहे. नाहीतर आयुष्यभर रूखरूख लागली असती. त्याचा किस्सा नंतर कधी तरी. इथे नको.
टाका ना डबा जी. कटप्पा माईंड
टाका ना डबा जी. कटप्पा माईंड नाही करणार.
माईण्ड नाही करणार पण तलवार...
माईण्ड नाही करणार पण तलवार...
किर्णू,
किर्णू,
नक्की कसलं दुकान टाकलंय आता?
BSK, विपु केली आहे
BSK, विपु केली आहे
मायबोली आणि मैत्रिण ह्या
मायबोली आणि मैत्रिण ह्या एकमेकांच्या holding-subsidiary websites आहेत का?
26 जुलैच्या भयंकर पावसात
26 जुलैच्या भयंकर पावसात प्रवास थांबून मागे फिरण्याचा. स्टेशनपर्यत पोचते तोच रौद्र रूपाचा पाऊस सुरू झालेला .
सिक्सथ सेन्स नावाच्या प्रकाराच्या अनुभव त्या दिवशी घेतला . तशीच रेमटून पुढे गेले असते तर अडकून पडले असते .>> जाई तुमचा प्रतिसाद वाचून आठवणी जाग्या झाल्या.
मी पण तेव्हा मुंबईमध्ये नवीन होतो. Struggler असल्याने interview chi तयारी करणे आणि interviews देण्यापलीकडे काही काम नव्हते. असाच त्या दुपारी interview la जाण्याची तयारी करत होतो. तसा नेहेमीच पाऊस असतो पण त्या दिवशीच्या पावसाची बातच काही और होती. एक interview आयुष्यातली पहिली नोकरी मिळवून देऊ शकत होता आणि स्वप्न सत्यात उतरू शकत होता. निर्णय घेणं अवघड होत. पण तुम्ही म्हणालात तसं, ससिक्स्थ सेन्स कामी आला आणि घरीच राहिलो.
रात्री भावाचा शेजाऱ्यांच्या फोन वर निरोप आला तो ऑफीस मधे अडकून पडलाय. त्याने बजावलं की मी घरी येईपर्यंत कुठेही जाऊ नकोस. त्याची आणि माझी भेट चार दिवसा नंतर झाली. त्या वेळेला मोबाइल फोन नसल्याने आणि चार दिवस वीज नसल्याने एफएम रेडिओ हाच सहारा होता. त्या वेळेला त्या २० रुपयाच्या रेडिओ चा खूप आधार वाटला
पोस्ट रिटायरमेंट्,मला कंपनीने
पोस्ट रिटायरमेंट्,मला कंपनीने एक्स्टेन्स्शन देवून ३ वर्षे रिटेनरशिप देण्याचा निर्णय मी डावलला आणि तो सर्वोत्तम ठरला. ३ किवाडे उघडली. प्रोफेसर म्हणून टीचिंग्,अनुवादक्,कन्सल्टन्सी... वेळ माझ्या नियंत्रणात, कॉलेज फक्त ७ महिने असते... त्या मुळे जगभर भटकंती, वाचन वगैरे परस्यु करू शकलो, आता अनुवादावर भर .... रोज वाढत जाते काम अन कॉलेज पण प्लस आता सेमिनार् ला बोलायला बोलावतात.... वय ६७ .... पण आता तब्येत ठणठणीत.... मीरिटेनर् शिप घेतली असती तर एव्हाना ... त्या संधी गेल्या अस्ता... आर्थिक स्थैर्य उत्तम मिळाले
मी डॉक्टर आहे. पण दुकान चालत
मी डॉक्टर आहे. पण दुकान चालत नसल्याने मायबोलीवर आलो तो माझा सर्वोत्तम निर्णय होता. इथल्या हिंदुत्ववाद्यांना फोडून काढण्यासाठी मी इब्लीसावतार घेतला आणि मग माझ्या संतप्त शब्दांनी त्यांना फोडून काढले. एकदा त्यांनी मला डेक्कन जिमखान्याला बोलावले होते. पण मी पण वस्ताद. गेलोच नाही. नाहीतर त्या दिवशी माझा गेम झाला असता.
मी इथे माझे खरे नाव अद्याप कुणालाही कळू दिलेले नाही. हा एक माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता.
तसेच मी माझे गाव, माझा चेहरा हे सुद्धा कुणाला कळू दिलेले नाही.
पण मी वृद्ध असल्याचे हिंदुत्ववाद्यांनी शोधून काढलेच.
मंदार जोशी आणि प्रसाद गोडबोले यांनी मला खूप त्रास दिला. आजही नवीन आयडी आला की माझ्या छातीत धस्स होतं. मग मी उसनं अवसान आणून त्यांच्यावर हल्ला करतो.
ज्यांचे आयडी उडायचे त्यांची मी टिंगल करायचो. पण मी शोषित वर्गाचा असल्याने मला खास आरक्षण होतं.
पण एक दिवस काय झालं कळालं नाही. माझा आयडी गेला.
मी खूप रडलो भेकलो. पाया पडलो. पण काही उपयोग झाला नाही.
मग मी ठेवणीतला दुसरा आयडी काढला. त्याने हल्ले चढवले. पण तो ही गेला.
मग मी तिसरा आयडी घेतला. आता माझीही टिंगल होऊ लागली. पण माझी सवय काही जाईना.
मी हल्ले केले. करतच राहीलो.
माझा हा ही आयडी गेला.
आरारा असं म्हणता म्हणता हाच आयडी माझ्या नशिबात आला.
आता मी आरारा म्हणून टिकून आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होय.
मायबोली आणि मैत्रिण ह्या
मायबोली आणि मैत्रिण ह्या एकमेकांच्या holding-subsidiary websites आहेत का?>>>
नाही. असे का वाटले असेल तुम्हाला?
एनीवे, अजुन प्रश्न असतील तर कृपया इथे न लिहिता विचारपुस/संपर्कात लिहा.
Facebook account delete करणे.
Facebook account delete करणे, बरेच वॉट्स अप ग्रूप delete केले. खूप मनशांती मिळाली..
किर्नुस्झोम्बले. अवांतरमाफीस
वाचले असेल... आता ड्ल्ट्मरतो.अवांतरमाफीस
डॉक्टर , आय होप तुम्ही वरच्या
डॉक्टर , आय होप तुम्ही वरच्या पोस्टीला रिप्लाय करणार नाही.
चांगला चाललेला धागा उगाच भकटवण्याच्या या वृत्तीचा निषेध!!!
अॅड्मिन, प्लिज लक्ष द्या
समज आली म्हणा किंवा वयात येउन
समज आली म्हणा किंवा वयात येउन जबाबदारीची जाणिव झाल्यानंतर , अनेक निर्णय घेत घेत जीवन प्रवास सुरु आहे, अशा वेळी सर्वात चांगला निर्णय कोणता हे सांगणे कठीण आहे. ढोबळमानाने ज्या निर्णयामुळे माझा फायदा झाला तो उत्तम निर्णय आणि ज्यामुळे नुकसान होऊन्,मनःस्ताप झाला, तो वाईट निर्णय म्हणावा.
Pages