१ वाटी चणाडाळ,
१/४ वाटी दूध,
१/२ वाटी तूप(पावूण डाळरवा भाजायला, उरलेले गूळासाठी)
१/४ वाटी किसलेला गूळ्(मला कमी गोड लागते, तेव्हा तुम्ही ज्यास्त टाकू शकता),
केसर, वेलची,काजो,बेदाणे,
----------------------------------------------------------------
१) चणाडाळ मस्त मंदाग्नीवर भाजून झाली की रवाळ वाटून घ्यायची.
२) हा रवा मस्त्त तूपात परतून घ्यायचा, मग त्यात कडकडीत दूध घालायचे. हे केल्याने बेसन फुलते, जाळी पडते. तूपात डबडबलेले एका बाजूने चपटलेले लाडू न होता मस्त रवेदार बेसन लाडू(ते ही रवा न टाकता) होतात.
३)हाताने छान मळून घ्यायचे कोमट झाल्यावर. मळल्याने घशात बसत नाही.
४) आता दुसर्या टोपात किसलेला गूळ वितळवून घ्यायचा. किंचितसे तूप टाकून गूळ जसा वितळला की हे मिश्रण टाकून ढवळून गॅस बंद करून ठेवायचा.
५) मग रोजचेच वेलची वगैरे टाकून वळून घ्या. खमंग लागतात.
६) डायबीटीस लोकांसाठी स्प्लेडा नाहीतर आयडियल साखरेचे प्रमाणः
१/४ पेक्षा किंचित कमी स्प्लेन्डा मुसती मिक्स करून मळून लाडू बांधणे. तर आयडियल शुगर १/४ घेवून नुसती मिक्स करून लाडू बांधणे. माझ्या मते आयडीयल शुगर जरा स्पेल्न्डा पेक्षा बरी आहे(mark the words, बरी आहे म्हणून). खरे तर स्प्लेन्डा वर बरेच रिसर्च एवढे सपोर्ट करत नाही.
त्यापेक्षा स्टीवीया(natural plant sugar) चांगली आहे. पण स्टीविया एकदम घशात वेगळी टेस्ट सोडते. असो.
अ)ह्या लाडवाची खासियत हीच तर बेसन कच्चे रहात नाही व टाळूस चिकटले हा प्रॉबलेम नाही कारण डाळ सुद्धा आधी भाजलेली असते. ब) पाक करावा लागत नाही. क) टिकतात. तूप कायच्या काय ओतावे लागत नाही मग पातळ झाले लाडू आता काय करू अशी धावाधाव नाही.
तसेच रोज रोज काय ती साखर खायची. मला तसेही तूपटलेले, चपटलेले एका बाजूने ,घशात घास बसणारे लाडू कोणाचेच आवडत नाहीत व आवडायचे नाहीत बेसनाचे असतील तर. बेसन लाडू फक्त माझ्या आईच्याच हातचा खावा. आई वरील पद्ध्तीने करायची म्हणून मीही तसेच करते व करून पहा मस्त लाडू होतात. गूळाची चव छान लागते.
वरती लिहिले आहे तेच. वरील फोटो आताचा नाही. आधी लाडू केले तेव्हा काढला होता.
मस्तच दिसतायत गं लाडु. करुन
मस्तच दिसतायत गं लाडु. करुन बघाय्ला पाहिजेत
मनुस्वीनी, मिश्रण थंड
मनुस्वीनी, मिश्रण थंड झाल्यावरच वळायचे ना लाडु? गरम गुळाचा चटका बसतो फार.
बाकी लाडु एकदम छान, करुन बघीन.
करून पहा. आवडतील तुला. थॅंक्स
करून पहा. आवडतील तुला. थॅंक्स लाजो.
फिओना, मिश्रण कोमट झाल्यावर
फिओना, मिश्रण कोमट झाल्यावर वळ. हाताला जरासे तूप लाव. नाही बसणार चटका. वाटल्यास बहिणाबाईचे गाणे म्हण नी वळ लाडू.
एकदम, अरे संसार संसार स्टाइल
एकदम, अरे संसार संसार स्टाइल का?
फिओना, तुम्ही ना आजकालच्या
फिओना,
तुम्ही ना आजकालच्या मुली ना जरा म्हणून कष्ट व चटके नकोत. संसार संसार स्टाइलनेच कर ग नाहीतर कोणा खंद्या गड्यला बसव लाडू वळायला. ;). ह. घे.
आमच्या खंद्यागड्याला सांगायचं
आमच्या खंद्यागड्याला सांगायचं म्हणजे "झक मारली आणी तुला सांगितलं" असं होइल. लाडवांच्या ऐवजी भलताच पदार्थ तयार व्ह्यायचा. मीच वळुन बघीन, केले कि कळवते तुला कसे झालेत ते.
LOL फिओना. इकडून पण फक्त खाणं
LOL फिओना. इकडून पण फक्त खाणं होतं. ते लाडू काय पासून कोण समजावतेय. असो.
.
.
फिओना, कोमट झाल्यावरच वळ
फिओना, कोमट झाल्यावरच वळ लाडु. मी दोनदा केले होते ह्या पद्धतीने. मस्त होतात एकदम. मनु, कृती पुन्हा एकदा टाकल्याबद्दल धन्यवाद
मनू- झक्कास दिसतायेत तुझे
मनू- झक्कास दिसतायेत तुझे लाडू. तू, दिनेश आणि इतर सर्व सुगरण लोकांनी कॉम्प्लेक्स दिलाय.
तुझ्या सासुबाईंना सुद्धा तुझ्याएवढे पदार्थ येत नसणार गं.
धन्यवाद सर्वांना. ही सर्व
धन्यवाद सर्वांना.
ही सर्व माझ्या आईची देण आहे. she is a great cook.
मी पण यंदा असेच लाडु करणार !!
मी पण यंदा असेच लाडु करणार !! छान रेसीपी दिलीस मनु !
मी पण यंदा असेच लाडु करणार !!
मी पण यंदा असेच लाडु करणार !! छान रेसीपी दिलीस मनु !
मिक्सर मध्ये दळली जाईल का
मिक्सर मध्ये दळली जाईल का चणाडाळ?
सिंडी यावेळेस पुन्हा करणार असशील लाडु तर सांग हो, आम्ही येतोच लगेच.
तुझ्याकडे dry spice grinder
तुझ्याकडे dry spice grinder आहे का? असेल तर लो वर ठेव नी रवाळ वाट. नाहीतर मॅजिक बुलेट आहे का? त्याच्यात वाट. नाहीतर साधा ओस्ट्रीज आहे का त्याच्यात वाटली जाते पण थोडी थोडी घेवून वाटावे लागेल्.(कटकट आहे ते).
फिओना, तू हे लाडू केलेस तर मला पाठवून दे ह्यावेळेला मी नाही करत आहे.
मस्त.यावेळी दिवाळीला हेच
मस्त.यावेळी दिवाळीला हेच लाडु. मला हे बरेचसे शेंगुळ्याच्या लाडु सारखे लागत असावेत अस वाटतय. बरोबर का मनु?
माझ्याकडे प्रीतीचा इन्डियन
माझ्याकडे प्रीतीचा इन्डियन मिक्सर आहे. त्यात होइल असं वाटतय. मी मागे साबुदाणा बारीक केला होता त्यात. मस्त पीठ झालं होतं.
लाडु केले की टेस्टिंगसाठी तुझ्याकडेच पाठवते.
सीमा, शेंगूळा म्हणजे शेंगदाणा
सीमा,
शेंगूळा म्हणजे शेंगदाणा का?
फिओना, माझे लाडू अॅटलांटात गेलेत तसे. तेव्हा तिथून इथे यायला हरकत नसावी.
खाण्याची रिक्स घेणार असाल तर
खाण्याची रिक्स घेणार असाल तर पाठवायला पण काही हरकत नाही माझी.
तसा बरा करते मी स्वंयपाक!
साधे बेसन वापरुन केले हे लाडु
साधे बेसन वापरुन केले हे लाडु तर चालतील का ? प्रमाण किती घ्यावे लागेल ? डाळ भाजण्यापासून सगळे करायचा फार कंटाळा आलाय
आई वाटल्या डाळीचे लाडू करते.
आई वाटल्या डाळीचे लाडू करते. (चणा डाण भिजत घालून, वाटून ) त्याला बराच वेळ लागतो. त्यामानाने हे खुपच सोपे आहेत. उद्या करुन टाकेन !!!
सिन्ड्रेला, बाजारात बहुतेक लाडवासाठी खास रवाळ बेसन मिळायला हवे. ( भारतात मिळायचे )
सिंडे, देसि स्टोर ला चक्कर
सिंडे, देसि स्टोर ला चक्कर टाक आणि लड्डू बेसन आण.
मिनोती, दिनेश, देसी दुकानात
मिनोती, दिनेश, देसी दुकानात गेले तर डाळच आणेन
मुगडाळीचे आवडत असेल तर मग ते
मुगडाळीचे आवडत असेल तर मग ते वापरुन कर.
मी नेहमी चणाडाळ भाजूनच
मी नेहमी चणाडाळ भाजूनच नेहमीचे बेसन लाडू करते. हे गूळातले पण.
पण बाहेरचे देसी दुकानातले बेसन काही हरकत नसावी.
दिनेश, ते मुखविलास लाडू ना चणाडाळ भिजत घालून .. अरे बाप रे. किती वेळ लागतो व तूप पण भरपूर लागते. पण चव काय असते.. अहाहा... मस्तच! त्यात थोडा खवा टाकून काय लागतात हे भिजवलेल्या चणाडाळचे लाडू. वेळ असता तर केले असते. रोज रात्रीचे जागरण झेपणार नाही.
आताच लाडू बेसनाचे - रवाळ
आताच लाडू बेसनाचे - रवाळ बेसनाचे मायक्रोवेव्ह्मध्ये बेसनाचे लाडू केले. छानच झाले. पटकन, रंगाने चांगले, आणि जरा कमी तुपात. ह्यापुढे बेसनाचे लाडू मायक्रोवेव्हमध्येच करणार. उगाचच बेसन भाजून हात दुखवून घ्यायचे.
बजाजच्या फूड प्रोसेसर मध्ये
बजाजच्या फूड प्रोसेसर मध्ये डाळ वाटली जाते का?
अमि, मुंबईत आहेस ना? अगं हीरा
अमि, मुंबईत आहेस ना? अगं हीरा बेसन आण ना विकत..
आर्च, सेम पिंच.. तूप कमी लागतं मावेमध्ये. मीही मावेमध्ये बेसन भाजलं आणि रंग पालटण्यापुरतं परत गॅसवर.. 'तो' रंग आला नाही, तर लाडू कच्चा नसला, तरी कच्चा आहे असंच म्हणणार सगळे.. पण वेळ किती वाचला आणि कष्टही!
मनू, नक्की करून बघणार हे
मनू, नक्की करून बघणार हे लाडू.
बाकी ढीगभर पाकृ टाकल्यास पण मोहनथाळ ठार विसरून गेली आहेस ना?
Pages