बेसनाचे गूळातले लाडू

Submitted by मनःस्विनी on 12 October, 2009 - 21:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१ वाटी चणाडाळ,
१/४ वाटी दूध,
१/२ वाटी तूप(पावूण डाळरवा भाजायला, उरलेले गूळासाठी)
१/४ वाटी किसलेला गूळ्(मला कमी गोड लागते, तेव्हा तुम्ही ज्यास्त टाकू शकता),
केसर, वेलची,काजो,बेदाणे,

क्रमवार पाककृती: 

besanladu_1.jpg
----------------------------------------------------------------
१) चणाडाळ मस्त मंदाग्नीवर भाजून झाली की रवाळ वाटून घ्यायची.
२) हा रवा मस्त्त तूपात परतून घ्यायचा, मग त्यात कडकडीत दूध घालायचे. हे केल्याने बेसन फुलते, जाळी पडते. तूपात डबडबलेले एका बाजूने चपटलेले लाडू न होता मस्त रवेदार बेसन लाडू(ते ही रवा न टाकता) होतात.
Happy
३)हाताने छान मळून घ्यायचे कोमट झाल्यावर. मळल्याने घशात बसत नाही. Happy
४) आता दुसर्‍या टोपात किसलेला गूळ वितळवून घ्यायचा. किंचितसे तूप टाकून गूळ जसा वितळला की हे मिश्रण टाकून ढवळून गॅस बंद करून ठेवायचा.
५) मग रोजचेच वेलची वगैरे टाकून वळून घ्या. खमंग लागतात.
६) डायबीटीस लोकांसाठी स्प्लेडा नाहीतर आयडियल साखरेचे प्रमाणः
१/४ पेक्षा किंचित कमी स्प्लेन्डा मुसती मिक्स करून मळून लाडू बांधणे. तर आयडियल शुगर १/४ घेवून नुसती मिक्स करून लाडू बांधणे. माझ्या मते आयडीयल शुगर जरा स्पेल्न्डा पेक्षा बरी आहे(mark the words, बरी आहे म्हणून). खरे तर स्प्लेन्डा वर बरेच रिसर्च एवढे सपोर्ट करत नाही.
त्यापेक्षा स्टीवीया(natural plant sugar) चांगली आहे. पण स्टीविया एकदम घशात वेगळी टेस्ट सोडते. असो.

अ)ह्या लाडवाची खासियत हीच तर बेसन कच्चे रहात नाही व टाळूस चिकटले हा प्रॉबलेम नाही कारण डाळ सुद्धा आधी भाजलेली असते. ब) पाक करावा लागत नाही. क) टिकतात. तूप कायच्या काय ओतावे लागत नाही मग पातळ झाले लाडू आता काय करू अशी धावाधाव नाही.
तसेच रोज रोज काय ती साखर खायची. मला तसेही तूपटलेले, चपटलेले एका बाजूने ,घशात घास बसणारे लाडू कोणाचेच आवडत नाहीत व आवडायचे नाहीत बेसनाचे असतील तर. बेसन लाडू फक्त माझ्या आईच्याच हातचा खावा. आई वरील पद्ध्तीने करायची म्हणून मीही तसेच करते व करून पहा मस्त लाडू होतात. गूळाची चव छान लागते.

वाढणी/प्रमाण: 
१ वाटीत १० लाडू वरील आकाराचे.(डाळ वाटून रवा फुलतो तो).
अधिक टिपा: 

वरती लिहिले आहे तेच. वरील फोटो आताचा नाही. आधी लाडू केले तेव्हा काढला होता.

माहितीचा स्रोत: 
आई साखर घालून करायची बरीच वर्षे पुर्वी. मग ब्रॉउन साखर घालून करायला लागली. मी गूळ घातला एवढेच.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधारण अशाच पद्धतीने उडदाचे लाडू करतात असे मैत्रिणीकडून ऐकले होते. मला खूप दिवसांपासून करुन बघायचे होते ते आज केले. तिची कृती मला नक्की माहिती नाही म्हणून मी सेम ह्याच कृतीने केले. मस्त झालेत. गूळ थोडा जास्त झाला म्हणून वाटीभर मखाणे भाजून घातले.

आज पुन्हा केले हे लाडू. मस्तच होतात. यंदा जरा धीर आल्याने तीन मोठ्या वाट्या भरुन लाडू बेसन घेतले. पुन्हा एकदा धन्यवाद रेसिपीसाठी Happy

मनु तुझ्या रेसिपिने केलेले हे लाडु. मस्त झालेत. लेकाने आवडीने खाल्ले Happy
एक विचारायचंय... साखर घालुन करायचे असतील तर पाक करावा लागेल का?

आज हे लाडु करुन पाहिले. गुळ थोडा जास्त झाला होता बहुतेक...मग त्यात दाण्याचा कुट घातला..अफलातुन चव आली होती..सर्वाना फार आवड्ले...धन्यवाद!! Happy Happy

Pages