विचित्र नाव आणि नक्कीच नावा प्रमाणे काहीतरी वेगळं असणार हे जाणून घेण्यासाठी खूप दिवस उत्सुक होतो ,मग काय रविवारी पहाटे सवंगड्या सोबत स्वारी निघाली जाधववाडी(पुणे) वरून कामशेत-नाने फाटा- नाने-कांब्रे-जांभवली पर्यंत (60km )गावात मस्त पोहे हादडून गाडी कोंडेश्वर मंदिराजवळ लावून पायवाट धरून निघालो ढाक बहिरी च्या दर्शनाला ,आणि थोडे पुढे गेल्यावर समोरच एक अजस्त्र गड हाताची घडी घालून उभा राहिल्याचा भास होतो आणि कोणीतरी जोरात ओरडतो अरे तो बघ *ढाक बहिरी* आणि शेजारी *कळक राय चा सुळका*
मग काय, वर सकाळचे मस्त कोवळे ऊन आणि पायाखाली डोंगराची सुरेख मातीची पायवाट आमच्या भटक्यां साठी हि मेजवानीच ,
थोडे पुढे आल्यावर एक पठार पार करून जंगलात कधी पायवाट घुसली कळले नाही,उतार संपून खडी चढण चालू झ्हाली अतिशय दमछाक करणारी पण हवी हवीशी वाटणारी पायवाट चढून वर आलो आणि जे अनुभवलं ते अप्रतिम ,वर एक चिंचोळी खिंड वाट पाहत होती ,दोन्ही बाजूंना उंचच्या उंच कडे आणि त्यातून हि खिंड ,एका वेळेस फक्त एक-दोन जण जाऊ शकेल एवढी लहान ,पण त्यातून जो प्रचंड वाऱ्याच्या झोताचा वेग आम्हाला धड उभे पण राहू देत नव्हता, आणि त्या खिंडीतून भरपूर मधमाश्या बाहेर आल्यावर तर आमची तोंडं पाहण्यासारखी झ्हाली ,मनात शंका आली की आपल्याला आता इथूनच मागे फिरावे लागणार ,पण त्या खिंडीतून एक भटक्या वर आला आणि म्हणाला "त्या मध माश्यांना त्रास न देता खिंड पार करा काही करणार नाहीत तुम्हाला"
कसा तरी धीर करून एक- एक जण खिंड उतरू लागला ,वाटले किती तरी खिंडी पार पाडल्यात आपण हि काय किरकोळ ...,
पण कसले काय खिंड कमी आणि नाळ (डोंगरावरून जोरात पाणी खाली येण्याची वाट)जास्त होती ,माणसा पेक्षा मोठे मोठे दगड,त्याला हुक मध्ये साखळी अडकवलेल्या होत्या त्याच्या साहाय्याने हळू हळू खाली उतरायचे ,सॉलिड अनुभव होता कारण खाली 300 फूट खोल दरी आ वासून उभी होती, "पण... डर के आगे जित है"एक एक करत एकमेकांना संभाळत कसे तरी खाली उतरलो,
थोडे पुढे गेल्यावर 3 गुहा लागतात सहज मागे वळून पाहिलं तर त्या खिंडीच्या डाव्या बाजूला कळक रायाचा प्रचंड सुळका आम्हाला खुणावत होता "शाब्बास रे माज्या मर्दानों ,अजून थोडे धाडस दाखवा माझा भैरव प्रसन्न होईल...! "
पुढे जाऊन पाहतो तर मोठा च्या मोठा कडा अंगावर आल्यासारखा भासतो आणि तोच कडा सर करून वर जायचे असते ,पायऱ्या नावपूरत्या जेमतेम पाय मावेल अश्या खोबण्या फक्त आणि धरायला एक गज ,अश्या प्रकारे वर जाताना प्रत्येक पाऊल न पाऊल जपून ठेवावे लागतात, थोडे तरी निष्काळजी झ्हाली कि तुम्ही खाली न जाता थेट ढगात "सह्याद्रीत,चुकीला माफी नाही " पहिला पाडाव पार करून दुसरा पाडाव जराआडवा कातळ आहे ,आणि तिसरा टप्पा तर भयानक आहे इथे एका मजबूत झ्हाडाचे भरपूर फांद्या असलेले लाकूड लावलेले आहे त्यावर पाय ठेवत मनात देवाचे नामस्मरण करत दोरीच्या आधार घेत कसेतरी गुहे पर्यंत पोहचावे लागते ,हा सर्वोच्च आनंद चा क्षण असतो ,पाया पडून सहज आजूबाजूला पहिले तर गुहेतून राजमाचीचे आवळे-जावळे किल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन ऐटीत उभे होते, त्याच्या अलीकडे मांजरा प्रमाणे दिसणारा मांजरसुबा स्पष्ट दिसत होता ,बाकी सगळे जंगलाची हिरवळ मन शांत करते ,वर मंदिरा ला लागून तीन गुहा आहेत, त्यात जिवंत पाण्याचे झरे असलेली टाके आहेत,थोडावेळ थांबून मस्त पोटोबा केला ,प्रार्थना आणि घोषणा देऊन खाली उतरायला सुरुवात केली सोबत वाघाचे काळीज असलेला "विठ्ठल कडू" सर्वांना धीर देऊन खाली उतरण्यास मदत करत होता ,विठ्ठला प्रमाणे अडचणीत धावून येणार हा माझा अवलिया मित्र,
खाली उतरून खिंड चढून डाव्या बाजूने रस्ता शोधत ढाक च्या माथ्यावर पोहचलो ,श्यक्यतो कोणी वर जात नाही पण आम्हाला "खाज"भारी न ....!
वरून मस्त सगळा परिसर स्पष्ट दिसतो महाराजांनी याचा टेहळणी बुरुज म्हणून उपयोग करून घेतला होता ,
असा हा धाकात ठेवणारा *ढाक बहिरी* पाहून भरून पावलो मित्रांनो,,
या मोहिमे साठी तानाजी राजगुडे व मित्र परिवार यांचे विशेष सहकार्य लाभले ..
जय शिवराय....⛳
गणेश गोसावी
इंद्रधनु ट्रेर्कस
carsonrental
पुण्यावरून अंतर आणि मार्ग पण
जबरदस्त!
Nice.
Nice.
ढाकगडावर गेलात का बहिरीच्या
ढाकगडावर गेलात का बहिरीच्या गुहेत?
मस्त!
मस्त!
मस्तच
मस्तच
मस्त
मस्त