Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मेघाने आता कुणालाही कसलीही
मेघाने आता कुणालाही कसलीही explanations न देता आणि कुणाकडूनही कसलीही अपेक्षा न ठेवता आपला आपला गेम खेळावा!
उरलेल्या लोकांच्यात फूट पडायची वाट बघावी कारण आत्ता घरातले कुणीही तिचे काहीही ऐकुन घेण्याच्या मनस्थितीत नाहीये.... थोडे टोन डाउन करावे आणि योग्य वेळी आपले पत्ते खेळावेत!>> मला वाटत सगळे सिझन कोळून प्यायलेल्या मेघाला वाटत असेल कि कुथेतरी मांजरेकर तिला सपोर्ट करतील वा त्या अवस्थेतून बाहेर येण्याकरता हात देतील पण इकडे उलटी गंगाच वाहतेय असं दिसतय त्यामुळे ती हरुन नको जायला म्हणजे मिळवल..
पुजो म्हणे बॅकबिचिंग करत नाही? कम्माले.. आणि मेघा हि सतत कुचाळक्या करते लोकांच्या तर मग आस्ताद काय करतो?
अशक्य चुगलखोर प्राणी आहे तो.. त्याची सुरुवात कशी झाली आणि आता तो कसा वागतोय बापरे.. त्याच्यामानाने रेशम कित्येक पटिने परवडली..
मेघाला हे सगळे बोलत आहेत, पण
मेघाला हे सगळे बोलत आहेत, पण त्याच्यापेक्षाही भयंकर आहेत आस्ताद, पुष्कर, रेशम आणि सई इन दॅट ऑर्डर. मेघा कितीही अनफेअर असली तरी तिच्या एकटीवर या तिघा-तिघांनी चालून जाणं मुळीच अॅक्सेप्टेबल नाही. मेघाबद्दल वाईट वाटतं मला. हे स्टेज्ड असो वा खरं, माणसांनी भरलेल्या घरात आपल्याशी कोणीही बोलत नाही, किंवा जेव्हा बोलतात तेव्हा वाईटच बोलतात हे सहन करणं कमालीचं अवघड आहे.
कालच एका वर्तमानपत्रात वाचलं- 'वस्त्रहरण' या मच्छिन्द्र कांबळींच्या नाटकाचं पुनरुज्जीवन होतंय. त्यात नंंकि आणि रेशमला रोल द्यायचा विचार चालू आहे. म्हणून नंकिचं एलिमिनेशन केलं का? आणि ते खरं असेल तर रेशमही बाहेर पडणार का? नंकि खरं तर मस्त खेळतो. तो एलिमिनेट नको व्हायला हवा होता या स्टेजला. पुष्कर किंवा आस्ताद पैकी एक बाहेर पडला असता, तर बरं झालं असतं. घरातलं वातावरण खूपच गढूळलंय. शेवटचे पंधरा दिवस राहिलेत. जरा सुसह्य वागायला हवेत सगळेच.
https://go.voot.com
https://go.voot.com/bLtwGxNgmOK
बघा पुन्हा एकदा पुम्बा
पूनम आ पु नव्हते नॉमीनेट.
पूनम आ पु नव्हते नॉमीनेट. सईला online सर्वात कमी मतं होती, पण voot वर असतील किंवा कमी असतील तरी तिला ठेवायचं असेल तर ठेवणार.
पुंबा खरंच छा गयी स्मिता . फायनली एक वाक्य तरी बोलले कौतुकाचे म मां तिच्यासाठी.
आता स पु आ नक्की तिला नॉमीनेट करणार.
पूल वॉलीबॉलमधून कप्तान
पूल वॉलीबॉलमधून कप्तान निवडायचा होता तर मग सासु सुन टास्क आनी उमेदवार निवाडा यात का दिवस फुकट घालवले ?? मंंद बिग बॉस... बिचरया स्मिता साठी वाईट वाटतय she was deserving .कोणाला पटला नसेल निर्णय पण बिग बॉस च्या नियमा पुढे काय बोलणार!!!
यावेळी स्मिता खरंच कॅप्टन
यावेळी स्मिता खरंच कॅप्टन व्हायला हवी होती. स्वतःच्या मूडनुसार जर बिबाॅ निर्णय बदलणार असतील तर टास्क हवेतच कशाला? बसा लोळत सगळ्यांनी. जे बिबाॅचे फेवरेट असतील ते बनतील कॅप्टन. होतील सेफ. जिंकतील पण. बाकी सगळे बसतील फॅनभरोसे. अजिबात भांडण नको की काही नको.
मेघाने सांगितलेले पुजोला
मेघाने सांगितलेले पुजोला सांगताना काल सै ने टेबल चा -captain room केली(ऐकू येत नाही वाटतं हिला)मग काय लंडनवाले अजुन भडकले.मेघाने टास्कनंतर त्याला ठीक वाटतंय का विचारले तरी...आणि 'आयला' ही शिवी नाही तो उभयान्वयी अवयव आहे.[संदर्भ- असला नवरा नकों गं बाई..राजा गोसावी.]
काय फाल्तु आणि बायस्ड
काय फाल्तु आणि बायस्ड वीकेन्डचा डाव !
इतके दिवस नाटक करत होते म.मा अस्तादला रागवायचे कि तू बिग बॉस सारखा वागतोस, आज स्वतः म.मा अस्तादवर होस्टींग सोपवून गप्प होत होते , पुष्कर सुध्दा हवा तेंव्हा कंट्रोल घेत होता, मेघाने मात्रं गप्प बसायचं !
दूधाच्या अॅलर्जीने मेघाने क्विट करायला हवे होते हे बोलले ते ठिकच होते , पण अख्खा एपिसोड मेघा बॅशिंग, पुष्कर अचानक बॅकबिचिंग करत नाही असा साक्षात्कार झाला ममांना, मागच्या महिन्यात हेच ममा पुष्किला मेघाबद्दल मागे बोलत होता म्हणून रागवले होते
आणि बॅकबिचिंग करायचं नाही हे प्रिन्सिपल कधीपासून सुरु झालं म्हणे बिग बॉसमधे ? ते बन्द म्हणजे शो चा आत्माच हरवेल
म.मा ना माहित नाहीका बिग बॉस त्यावरच चाल्लय , स्वतः बिग बॉस वुट अॅप वर अनसीन अनदेखा गॉसिप्सच दाखवते कायम.
डे १ पासून सगळेच बोलतात मागे , कोणीच गॉसिप नाही केले तर कन्टेन्ट काय शो ला
शर्मिष्ठालाही पेटवत होते मेघाविरुध्द, त्यात अस्ताद आधी पुढे.
सगळ्यात व्हिलन सई दिसत आहे, जिथे तिथे चुगल्या आणि मेघाविरुध्द भांडणं पेटवतेय, ही बदललेली सई कशी खूsssप आवडतेय रे.आ. ला
आज कॅप्टनशिपचा त्याग आयडीआ सुध्दा आस्तादने मेघाकडून चोरली, तेंव्हा डिसिव्ह मुद्दा मस्तं मांडला मेघाने .
तिचाही तोच विचार असणार कि नाहीतरी तिला मेजॉरीटी नाही मिळणार त्यापेक्षा त्याग करून गुडबुकमधे जा , जे तिनी आज अस्तादने काय विचार केला असणार सांगताना दाखवलं .
उद्याच्या ट्रेलरमधेही अस्तादकाकु बडबड करतायेत, भरीस भर यांचे मेड अप फोन कॉल, पत्रं वगैरे दिसतय !
सुरवातीला मेघाने रागात जी बडबड केली रेशम अस्ताद बद्दल ती टेक्निकली चूक असली तरी बाकी एकदम बँग ऑन होती and 'Pushkar should have denied captionship if he was so upset', was so correct !
ट्वीटरवर वाचवत नाहीत इतकी आणि
ट्वीटरवर वाचवत नाहीत इतकी आणि या भाषेत मापे काढलीत ना आस्ताद आणि मांजरेकरांची पब्लीकने!
आपण सगळेच फार फार सौम्य आणि सभ्य भाषा वापरतो इथे असे वाटायला लागलेय (आणि तेच बरोबर आहे!)
मांजरेकरांनी काल मेघाच्या चुका बऱ्याच वेळ उगाळल्या तरी तिच्यावर उखडलेले वाटले नाहीत ते.... जे चूक आहे ते सांगितले आणि जिथे शक्य होते तिथे अगदी व्यवस्थित कौतुकसुद्धा केले..... आणि टोन सुद्धा "अस नसत ना ग मेघा!" वगैरे समजावणीचाच वाटला निदान मलातरी!
पण त्याचवेळी त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी (आणि त्याही सोयिस्करपणे आस्ताद रेशम वगैरेंबद्दल) निसटून जातात हेही खरे!
कदाचित त्यानाही जाणीव असेलच की जितके मेघाला कॉर्नर करु तितका बाहेर मेघाला सपोर्ट आणि बाकीच्यांबद्दल रोष वाढतच जाणार आहे!
>>आणि बॅकबिचिंग करायचं नाही
>>आणि बॅकबिचिंग करायचं नाही हे प्रिन्सिपल कधीपासून सुरु झालं म्हणे बिग बॉसमधे ?
मला वाटतय की त्यांचा बॅकबिचिंग ला विरोध नाहिये.... त्यांचे फक्त एव्हढेच म्हणणे वाटले की जे बोलायचेय ते टास्कबद्दल बोला, शो मधले आणि शो पुरते बोला.... पर्सनल उणीदुणी काढू नका!
Checkout Aastad gossips about
Checkout Aastad gossips about Megha! on Voot https://go.voot.com/bLtwGxNgmO
मी फक्त या लिंक मधल्या लिंक वरून बोलतोय..आता ३ वेळा परत बघितला video टोटल अस्ताद 2 वेळा अन रे 1 वेळा पुष्पकच म्हणालेत..लीप sync पण तसाच आहे..त्यामुळे कोण खोट बोलतेय ते कळतंय..
कोणीतरी वर म्हंटलं आहे की अस्ताद ची PR ने मॅनेज केला असेल..म्हणजे अस्ताद ची PR voot वरचे विडिओ change करू शकतात..what nonsence.. पण मेघाचा PR एक पोस्ट करून बदनामी करू शकतो..अन असा कोण सोमि वर verify करत काय येत ते..
कोणीतरी सोमि च्या लिंक टाकेल का इथे..म्हणजे महा ची लोकसंख्या अन सोमि वर किती कंमेंट येतात ते लिंक करता येईल..
बिबॉ चा FB पेज वर फक्त १०k likes आहेत..अन काल च्या ep वर 1.1k कंमेन्ट.. त्यातल्या कितीतरी रिपीट आहेत..म्हणजे या 1.1k म्हणजे सगळ्या महा मत समजायचं का??
Twitter चा पण same situation आहे..rather even worst..
बाकी लगे रहो..सोमि चा बागलबुवा..
शुक्रवारच्या एपीमध्येच आस्ताद
शुक्रवारच्या एपीमध्येच आस्ताद ब्लू फिल्म बोलला आहे, तुम्ही सगळे कोणत्या लिंकबद्दल बोलताय ते माहित नाही. कालचा एपि बघितला नाही पण मेघा परत परत सई आणि पुष्करशी का बोलायला जाते, स्वाभिमान नाही का तिला आणि असल्या विश्वासघातकी लोकांना कसली स्पष्टीकरणं द्यायची, बोर होतं तेच तेच ऐकायला.
नविन धागा काढा आता..
नविन धागा काढा आता..
आता पाहिला कालचा एपी, मेघा
आता पाहिला कालचा एपी, मेघा खरेच महानीच अन हलकट बाई आहे. हो मी न्यूट्रेलि बघते, कुणीही फेव्हरेट नाहीये, आता दरवेळी हिच्या इतके वाईट कोणी वागत नाही तर काय करणार ना,
हिच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कोणालाही बोलताना बघितले नाही, खासकरून रेशम बद्दल. मला अजूनतरी रेशमने इतके वैयक्तिक कोणाबद्दल बोललेले दिसले नाही, शी, किती घाण विचार अन भाषा आहे हिची
ह्या विकेंडला सलमान हवा होता, मस्त घेतली असती हिची, सलमान नेहमी ज्याला कॉर्नर केलेय त्याला चिअर अप करतो पण कुणी वाईट वागले तर त्यालाही सोडत नाही. हीला काही लोक शिल्पा शिंदे सोबत कम्पेर करतायेत, पण शिल्पा अशी बिलकुल नव्हती, अगदी हिना अन विकास बद्दल पण तिने इतकी नीच भाषा वापरली नव्हती
बाकीचे काही खूप चांगले वागताहेत असे नाही पण हिच्यापेक्ष्या लाख बरे
सध्या फक्त अन फक्त स्मिताच बरी वाटतेय, खूप छान आहे ती, काल दिसत पण खूप भारी होती.
बाकी ममा ह्या वेळी थोडे बरे वाटले, त्या मेघाला किती पामपेर करतात ते, सारखे काय बाळा बाळा. बिचाऱ्या स्मिताला कसे बोलतात. हिच्या समोर त्यांचे पण मांजर झाले असे वाटले
एका वाक्यात, मेघा कशीही असली.
एका वाक्यात, मेघा कशीही असली...कितीही भांडली तरी आपल्यांशी/ घरातल्या लोकांशी भांडते अस वाटतं. आणि आ रे , असे भांडतात जसे रस्त्यावरच्या/ परक्या माणसांशी भांडताहेत.
स्मिताचा केप्टन व्हायचा चान्स पुन्हा एकदा गेला.सईला विकेंडला सर्वात कमी मते असणार आणि ती राहावी या हेतूने बिबॉने व्हॉलीबॉल चा गेम केला! आता केप्टन झाल्याने पुढचा आठवडा ती सेफ झाली.
हिम्मत असेल तर बिबॉ ने आज अस्ताद पुष्कीच्या बादलीत मगाने पाणी भरल्याची व्हिडीओ क्लिप दाखवावी... मारे फेअर खेळलोय म्हणतो ना!
अस्तादने काल शरा अन मेघामध्ये ही फूट पाडण्याचा प्रयत्न केला.. पण सगळ्यांसमोर पचका झाला.
सईला विकेंडला सर्वात कमी मते
सईला विकेंडला सर्वात कमी मते असणार आणि ती राहावी या हेतूने बिबॉने व्हॉलीबॉल चा गेम केला!>>>> exactly.
तिचा संबंधच नव्हता ना. स्मिता आणि चौगुले जर टास्क खेळणार होते आणि बाकी उरलेले समर्थन करणार होते तर सई कॅप्टन होणं आऊट ऑफ द बुक नाही का?? आता स्मिताला पुन्हा चान्स मिळणार नाही. In fact या वेळेस चौगुले पण कॅप्टन होऊ शकला असता. हे आ स पु रे ला अनफेअर नाही वाटत का? दोन्ही लोक त्यांच्याच गृपचे होते. आणि आता सई जी एकेकाळी 'दुष्मन टीम' ची होती, कॅप्टन झालीये. आस्तादचा चेहरा पाहण्यासारखा होता पण. रे चा पण.
स्मिता आणि चौगुले जर टास्क
स्मिता आणि चौगुले जर टास्क खेळणार होते आणि बाकी उरलेले समर्थन करणार होते >> हे असं नव्हतं. व्हॉलिबॉल च्य टास्क च्या इन्स्ट्रक्शन्स ऐकल्या का? त्यात स्पष्ट सांगितले होते की ४ टीम्स असतील. त्या एकमेकाविरुद्ध खेळतील.
बाकी आता गेले काही दिवस मेघाचे वागणे अजिबात पटले नाहीये. आस्ताद ला सपोर्ट करण्यावरून अन आता दूध पिण्यावरून तिने ज्या कोलांट्या उड्या मारल्या अन कांगावा केला ते हास्यास्पद वाटले. दलबदलू, बॅकस्टॅबर इ. विशेषणं पुष्कर सई ला पण लागू होतात. शिवाय त्यांचे ते सारखे आपण किती ग्रेट आपण किती किती क्लोज फ्रेन्ड्स ना हे लाडे लाडे बोलणे डोक्यात जाते. आस्ताद डोक्यातच जातोच. शरा ला काही स्वतंत्र पर्सनॅलिटी नाही, रेशम सध्या सुसह्य असली तरी तिचे आधीचे बिहेवियर आणि एकूण मेन्टॅलिटी कुठे जात नाही. स्मिता चांगली वागत असली तरी डंब आहेच. अभी किस्को सपोर्ट करनेका असे झाले आहे! जे होईल ते तटस्थपणे पहावे झाले.
Ohh
Ohh
दूधाच्या अॅलर्जीने मेघाने
दूधाच्या अॅलर्जीने मेघाने क्विट करायला हवे होते हे बोलले ते ठिकच होते , पण अख्खा एपिसोड मेघा बॅशिंग, पुष्कर अचानक बॅकबिचिंग करत नाही असा साक्षात्कार झाला ममांना ++++१११११ ती २५-३० वेळा उलटया झाल्या वगैरे खोट बोलली त्यावरुनही ममा बोलले ते पटल. पण अख्खा
एपिसोड तिलाच बोलत होते. थोडेच दिवस उरले आहेत आणि हिने स्वतःच्या इमेजचा पचका केला खोटे बोलून. बट आय होप कि तिच जिन्कावी.
मेघाने पुष्कर, रेशमबद्दल पर्सनल बोलायला नको होत.
सईला कुणी captain केल? एवढ काय मोठ कर्तुत्व केल तिने सासु-सून टास्कमध्ये? स्मिता किव्वा किशोर व्ह्यायला हवे होते captain.
वरती दिलेली लिन्क वुट वर दिसत नाहिये. जर आस्ताद पुष्पक बोलला असेल तर तो शब्द म्यूट का केला? तो व्हिडीओ का काढला?
आस्ताद म्हणतो मी कधीच अपशब्द वापरत नाही. मग त्यादिवशीच्या भान्डणात मेघाला उद्देशून 'च्या आयला' सारखे शब्द बोलला ते काय होत?
हिम्मत असेल तर बिबॉ ने आज अस्ताद पुष्कीच्या बादलीत मगाने पाणी भरल्याची व्हिडीओ क्लिप दाखवावी... मारे फेअर खेळलोय म्हणतो ना! >>> अगदी अगदी. उलट ममा ने पुष्कीची स्तुतीच केली त्या टास्कबद्दल.
व्हॉलीबॉलचा गेम अक्षरशः पळवला
व्हॉलीबॉलचा गेम अक्षरशः पळवला आहे. नंतर लगेच सईला पटापट सर्वांची मते??? काहीतरी अंतर्गत सेटिंग झालंय! अगदी मेघानेही पाहिल्यासाग फटक्यात मत दिलं!
सईला इम्युनिटी देण्यासाठी असावं हे सगळं.
सईला मत देणे मेघानेच सुरु
सईला मत देणे मेघानेच सुरु केले. शर्मिष्ठाने लगेच री ओढली. गेल्या आठवड्यात सई ऐवजी आस्तद ला सपोर्ट केले,हा सगळा राडा इन्डायरेक्टली ओढवला आणि आता सईशी इतके वाजले तरी आता तिलाच सपोर्ट केले सगळेच अनाकलनीय आहे. गंमत म्हणजे पहिल्या दोन - तीन मतांच्या नंतर सगळ्यांनीच सई सई करायला सुरुवात केली! रेशम आणि आस्ताद (!) दोघांनी स्वतःची मते सईला दिली ?? कशी काय ? बाकीचे तिलाच देतायत तर आप्ले मत वाया का घालवा(!) असा स्मितासारखा विचार असेल तर मतदान या प्रकाराला काही अर्थच राहत नाही
म्हणजे जर मेघा आणि शरा ने सुरुवातीलाच आस्ताद ला सपोर्ट केले असते तर सगळ्यांनीच आस्ताद ला सपोर्ट केला असता का मग
माझा बॅकलाॅग राहीलाय बराच.
माझा बॅकलाॅग राहीलाय बराच. पण खरंच आता कंटाळा आला. आणि जर फेअर प्ले नसेल तर बिबाॅ is backstabbing us all.
आता ते कोण आनंद चव्हाण आहेत त्यांना पब्लिसिटी मिळतेय असं जरीही वाटत असेल आणि त्यामुळे ते खुशीत असतील तर त्याचं कारण एकच की पब्लिक पहिल्यापासून बघत आहे म्हणून इतकं यश मिळालंय. पण जर असा बोअरींग, स्टेज्ड, मॅनेज्ड गोष्टी घडत राहिल्या तर सिझन 2 कोण बघणार?
मग मराठी बिबाॅ one season wonder बनून राहील.
फेअर कोणीही खेळत नाहीये. तशी
फेअर कोणीही खेळत नाहीये. तशी अपेक्षा हाच भाबडेपणा ठरावा. आणि खोटारडेपणा, बिचिंग , गॉसिप्स सगळेच करत आहेत करा आता कोणाला सपोर्ट करता ते असं म्हणत शँपेन उडवत असतील चव्हाण आणि ममां.
मेघाने कालच्या आस्ताद
मेघाने कालच्या आस्ताद सोबतच्या ugly fight मुळे सईला मत दिले असेल. आता गुडबुक्स वगैरे प्रकार उपयोगाचे नाहीयेत. पण आस्ताद टीमने त्याला मत दिले असते तरी पुन्हा 4-4 मतंच झाली असती.
पहिलाच सिझन असल्यामुळे कदाचित कानात वारं शिरल्यासारखं झालं असेल सगळ्यांनाच. घरातील सदस्य आणि शो मेकर्सना पण. हिंदीचे पण सुरूवातीचे सिझन्स नाही का censored असायचे. रात्री 11 नंतर दाखवले जायचे.
>>बाकी लगे रहो..सोमि चा
>>बाकी लगे रहो..सोमि चा बागलबुवा..<<
१. सोशल मिडिया हे (विशेषतः यु ट्युब) बर्याच जणांचं उपजीविकेचं साधन झालेलं आहे. सनसनाटी बातमी, विडियो क्रिएट करुन टार्गेट ऑडियंसला गंडवुन फुटट्रॅफिक वाढलं कि नंबर ऑफ हिट्स्च्या प्रमाणात त्यांची कमाई होते. याकरता हे युट्युबर्स कुठल्याहि थराला जाऊ शकतात, आणि गंडणारे गंडतात...
२. मेघाची दुसरी (इविल) बाजु तिच्या समंजस समर्थकांना दिसुन येत आहे हि चांगली गोष्ट आहे. तरिहि तीच जिंकावी हा त्यांचा दावा हे न उलगडणारं कोडं आहे...
३. माझ्यामते आस्तादने स्वतःचं मत सईला देउन मेघाच्या फुग्याला टाचणी लावली. आस्तादच्या वेळेप्रमाणेच सर्वप्रथम आपलं मत देउन तिचा डॅमेज कंट्रोल करण्याचा विचार होता, परंतु इतरांची मतं तिच्या अपेक्षेबाहेर स्विंग झाल्याने तिचा पोपट झाला. ती खदखद/जळजळ नंतर तिच्या स्वगतातुन बाहेर पडली. "ये पब्लिक है, ये सब जानती है..." हे सकाळचं गाणं अगदि समर्पक...
सोशल मिडीआचा बागुलबुवा वगैरे
सोशल मिडीआचा बागुलबुवा वगैरे म्हणणाऱ्यांनी आपण पण त्याच सोशल मिडीआचा भाग आहे हे विसरु नये!
इथला जनाधार पण सॅंपल म्हणून बघायला हरकत नाही.... बाकी यूट्यूब, फेसबुक, ट्वीटर इतकी टोकाची भुमिका आपण घेत नाही आणि तुलनेने पातळी सोडून लिहित नाही इतकाच काय तो फरक!
बाकी कुणी कुणाला सपोर्ट करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक चॉइस असूदे ना!
कुणाला आस्ताद, रेशम आवडतात तर कुणाला मेघा.... स्मिताचेही बरेच चाहते वाढलेत सध्या!
आणि या सपोर्टमध्ये सुद्धा " बाकीच्यांपेक्षा तुलनेने बरा/बरी डिझर्विंग" वगैरे असाही एक विचारप्रवाह असू शकतो ना!
सपोर्ट करतोय त्याच्या सगळ्याच गोष्टी पटतायतच किंवा पटल्याच पाहिजेत असे नाही ना!
सईला कॅप्टनशीपचा जॅकपॉट लागला
सईला कॅप्टनशीपचा जॅकपॉट लागला... आता बघाल तर सई मेघा जे बोलेल ते तिकडे जाऊन सांगते म्हणून आ रे ला ति सुधारली असे वाटतं..
शुक्रवारच्या भांडणात मेघा आणि बाकिचे पु, आ स ने अपशब्द वापरले..पण ममाने फक्त मेघाची वाजवली..सई म्स्त आग लावायची काम करत आहे... मेघापण आता बावचाळी आहे..पहिल्यासारखी खंबीर वाटत नाही पण आता तिच्याबाजूने कोणीच नाही आणि सगळे फासे उलट्याबाजूने पड्त आहे आणि म्हणून ती आता बॅकस्टेफ घेत आहे असं वाटतं...
सगळे चुका करत आहे पण ती एकटी आहे म्हणून सगळे तिलाच टार्गेट करत आहे आणि ती त्यात ट्र्प होत चालली आहे...याघडीला स्मिता आणि रेशमला विनर व्हायचा चान्स आहे, असे वाटतं..
सईला मत देणे मेघानेच सुरु
सईला मत देणे मेघानेच सुरु केले. शर्मिष्ठाने लगेच री ओढली. गेल्या आठवड्यात सई ऐवजी आस्तद ला सपोर्ट केले,हा सगळा राडा इन्डायरेक्टली ओढवला आणि आता सईशी इतके वाजले तरी आता तिलाच सपोर्ट केले सगळेच अनाकलनीय आहे. >>> अनाकलनीय काही नाही वाटलं मला यात. तिने स्वतःच क्लियर केलंय की आस्ताद ला मत देतांना ती इमोशनल झाली होती. एकवेळ असं धरून चालूया, की यात तिचे calculations होते की स्वतःची कॅप्टनशीप पणाला लावून समोरच्याही ग्रुपच्या गूडबुकात जाण्यासाठी तिने हे केले, तरीही स्वतःच्या ग्रुपचा अतिप्रचंड प्रमाणात तिने रोष ओढवून घेतला, जो तिच्यासाठी अतिशयच अनपेक्षित होता. ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी तिने आस्तादला सपोर्ट करायच्या कार्यात सै ला मदत करून पू च्या कॅप्टनशीपसाठी हातभार लावला, जेणेकरून तो जिंकेल आणि सैपु पुन्हा तिला मैत्रीण मानतील, तिच्या चुकीसाठी तिला माफ करतील.. , कुणी सांगावं, की ती जर खरोखरच शातीरदिमाग असेल, तर तिचा हा ही प्लॅन असू शकतो, की आस्तादला व्होट देऊन त्याला आणि पु ला कॉम्पिटीशनमध्ये उभं करून ज्या कुठल्या टीम मध्ये ती असेल, तिकडून पु ला जिंकवायचं. त्याच्या टीम मध्ये असेल, तर डायरेक्ट त्याच्या बाजूने लढून नाहीतर समोरून असेल तर त्याला मदत करून किंवा आहे त्या टीम ला मदत न करून..
तिची असली सगळी calculations सतत सुरू असल्याने ती ज्या टीम मध्ये असते, ती शक्यतो जिंकतेच आणि मग ती इतरांकडून क्रेडिट expect करते आणि त्यांनी नाही दिलं तर स्वतः घेते(इकडे माती खाते, कारण लोकांना असं स्वतःचं कौतुक स्वतः करणारे लोक अजिबात आवडत नाहीत आणि क्रेडिट घेणारे तर नाहीच नाही! त्यातून सै बाई पडल्या टीनेजर स्वभावाने! त्या रिबेल करणारच! कोणी अशी आई गिरी करायला गेलं तर.. आणि पुष्की तर तिला पहिल्या पासूनच पाण्यात पाहतो. त्याला तिची आणि सै ची मैत्रीही सहन होत नाही आणि मेघाचं कितीही बरोबर असलं तरी तिला क्रेडिट देणं आणि तिचं स्वतःला क्रेडिट घेणंही.. ) मेघा अजून थोडी स्मार्ट असती, तर तिने ह्यावर जरा वर्क केलं असतं आणि लोकांना ते कितीही योग्य असले, तरी सल्ले देणं, जिंकवणं कमी केलं असतं किंवा किमान ओपनली क्रेडिट घेणं तरी कमी /बंद करायला हवं होतं..
दुसरा भाग म्हणजे, तिने काल सै का सपोर्ट करणं. तर यातही अनाकलनीय असं काहीच नाही! कारण एकतर सै च तिची मैत्रीण आहे, आ नाही.. आणि तिला मागच्या वेळेस ओढवून घेतलेला सै चा रागही न्यूट्रलाईझ करायचा असावा! नोट, पूसै तिच्याशी कसेही वागत असले, तरी ती मात्र सै ला कायम सपोर्टच करत आली आहे आणि राहील, हे ती स्वतःच म्हणालीये.. तिला सै टीम म्हणून तर हवी आहेच, पण ती तिला मैत्रीण मानते, हे वेळोवेळी दिसून आलेले आहेच.
पण पु आणि सै ज्या पद्धतीने मेघाचा दु:स्वास करतायत, ते पाहता ते तिच्या प्रेमाच्या लायक नाहीत, हे नक्कीच आणि गेमसाठी सुद्धा आता तिने सेल्फ रिस्पेक्ट सोडू नये असं वाटतं..
कालच्या भागात ममां जरी आ ला बोलले नसले, तरी आज ते बोलतील, असे वाटतेय. ते काल कुठल्यातरी गोष्टीवरून आ उन्मादाने टाळ्या वाजवत होता, तेंव्हा त्याला म्हणाले, की तू जास्त टाळ्या वाजवू नकोस, मी तुझ्याकडे येतोय, या अर्थाचं.
बाकी सै ची कॅप्टनशीप हे नक्कीच तिला ह्या आठवड्यात घालवायचे नसल्याने केलेले कार्य आहे, हे पटतेय. मागे पूनम की अजून कोणी लिहिल्याप्रमाणे जर खरोखरच ऑडिट्स होत असतील आणि व्होट्स काऊंट होत असतील, तर तिला सगळ्यात कमी मतं पडून ती आज गेली असती आणि हे टीआरपी साठी धोक्याचं असणार, म्हणून हा निर्णय घेतला असावा! हे खरं असेल तर शरा आणि नंकिलासुद्धा सै पेक्षा जास्त मतं असणार! हा एक सुखद धक्का आहे..
आजच्या भागात ममां मला वाटतेय तशी झुंडीने मेघावर वार केल्याबद्दल ह्या मंडळींची शाळा घेतात का बघायचे! आत्तापर्यंतच्या अनुभवावरून तरी ते विकेंडच्या डावात पहिल्या दिवशी एका ग्रुपला तर दुसऱ्यादिवशी दुसऱ्या ग्रुपला टार्गेट करतात, हे जर झाले तर दुसऱ्या दिवशीचा त्यांचा स्टँडच खरा परिणाम करून जातो, हा अनुभव आहे आणि ज्या सॉफ्टली ते काल मेघाला रागावले, ते पाहता, हे होईल या बाबतीत मी पॉझिटिव्ह आहे. बघू या काय होते ते!
या सपोर्टमध्ये सुद्धा "
या सपोर्टमध्ये सुद्धा " बाकीच्यांपेक्षा तुलनेने बरा/बरी डिझर्विंग" वगैरे असाही एक विचारप्रवाह असू शकतो ना!
सपोर्ट करतोय त्याच्या सगळ्याच गोष्टी पटतायतच किंवा पटल्याच पाहिजेत असे नाही ना!>> अगदी अगदी, इथे कोणीच फेअर खेळत नाहीये, सगळे मागून बोलताहेत
विचार केला तर कोणीच चांगले नाहीयेत
हल्ली स्मिताचे चाहते वाढलेत कारण माझ्या मते ती डम्ब असली तरी मनाने साफ वाटते, कुणाबद्दल अगदी टोकाचे किंवा वाईट बोलत नाही, सुंदर आहे, टास्क चांगले करते, सगळ्यांना जपते
सानी, एक नंबर ॲनालिसिस.
सानी, एक नंबर ॲनालिसिस.
कुणी काहीही म्हणो, मेघाकडे जिगरा पण आहे आणि प्रचंड शातीर दिमाग पण. या सगळ्याने मेघा आणखी स्ट्राँग होऊन पुढे येणार हे दिसतेय. आज पहाल तर मेघा व स्मिता या दोघींचे सपोर्टर्स एक्स्पॉनेन्शियली वाढलेत. सै- पु- आ तर अक्षरश: कचऱ्याच्या भावात गेलेत.
मी व्यक्तिशः सुरुवातीला मेघाला आजिबातच सपोर्ट करत नव्हतो. खुर्चीसम्राट टास्कपासून मेघा- सैला सहानुभुती होती पण खरे समर्थन स्मिता, पुष्कर व ऋतुजा या तिघांनाच होते. ऋतुजा गेली नसती तर तीच जिंकलेली पहायला आवडले असते. मेघाला सपोर्ट वाढला तो सो कॉल्ड सिनियर्सच्या माजोर्ड्या वर्तणुकीमुळे. सद्यस्थितीला मेघा व स्मिता, दोघींपैकी कुणीही जिंकलेलं आवडेल. मात्र, निकम्मी रेशम व गर्विष्ठ आस्ताद या दोघांना शेवटच्या पाचात आजिबात् पहायचे नाही. सै, पु चालतील, शर्मिष्ठा असेल तर उत्तमच.
Pages