भरून आलेलं आकाश
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
11
भरून आलेलं आकाश
गूढ मंद प्रकाश
हवाही स्तब्ध
कुणीतरी भारलेली
कधी कधी मन
येतं ना भरून
कंठ दाटून येतो
डोळे गरम होतात
भरू ही पहातात
पण बरसत नाहीत
आणि सारं निवळतं
न बरसताच
अगदी हळू, सावकाश
तसच हे
भरून आलेल आकाश
मग …..
इतक्या वेळ चूप्प बसलेला
खोडसाळ वारा
ढगाना ढकलायला लागतो
हळूच येते ढगा आडून
सोनेरी किरणांची तान
बदलूनच जातं सारं
अगदी सारं हवामान
सारं काही पूर्ववत होतं
कसलीही खूण उरत नाही
काही क्षणांपूर्वी इथे काही घडल होतं
हेही कुणाला कळत नाही
हेही कुणाला कळत नाही
सुधीर
विषय:
प्रकार:
शेअर करा
जिथे भरुन
जिथे भरुन आलेल आकाश असता तिथे भरुन आलेल डोळे असतात खुपदा
छान कविता
रेश्मा
केवळ
केवळ सुंदर!!
कधी कधी
कधी कधी मन
येतं ना भरून
कंठ दाटून येतो
डोळे गरम होतात
भरू ही पहातात
पण बरसत नाहीत
.
हे मस्तच! सही एकदम!
रेश्मा,
रेश्मा, संघमित्रा, आयटी
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
सुधीर
सुंदर!!!!!!!आव
सुंदर!!!!!!!आवडली....
कवीता
कवीता चांगलीय. ह्याचं विडंबन टाकलं मायबोलीवर तर कृपया राग मानू नये.
सुमेधा,
सुमेधा, मृण्मयी धन्यवाद
मृण्मयी त्यात राग कसला .....
सुधीर
सुधीर मस्त
सुधीर मस्त आहे कविता एकदम...
================
ऐक माझ्या आसवांची मागणी आता नवी
रोज रात्री आठवांची ती जुनी मैफल हवी
-एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!
मिल्या
मिल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
सुधीर
क्या बात
क्या बात है सुधीर
सकाळी सकाळी मस्त कविता वाचायला मिळाली. लिहीत रहा रे.
श्यामली
श्यामली
अभिप्रायाबद्दल अभारी आहे.
सुधीर