Submitted by कटप्पा on 21 June, 2018 - 23:32
आजच एक धागा पहिला, एका इंग्रजी शब्दाला मराठी शब्द हवा म्हणून.
किल्ली यांच्या धाग्यावरही काही प्रतिसाद वाचले, महाराष्ट्रात लोकांनी मराठी बोलणे कसे महत्वाचे आहे आणि बाकीच्या अमराठी लोकांना मराठी कसे बोलायला भाग पाडले पाहिजे वगैरे वगैरे.
इतका मराठीचा अट्टाहास कशासाठी? मराठी मिश्रित हिंदी किंवा इंग्रजी मिश्रित मराठी बोलणे हे खूप कॉमन आहे आणि आपण याला सपोर्ट केला पाहिजे. निदान यातून आपण मराठी लोक काही इंग्रजी शब्द शिकू तरी.
आपल्याला काय वाटते???????
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाही आधी ह आणि मग म. >>
नाही आधी ह आणि मग म. >> टण्या सहमत आहे. पण आमच्या तिकडे किंवा कित्येक भागात बोली आणि लिखित मध्ये फरक सांगतानाचे उदा. आहे. ते.
चहा प्यायलीस का ऑर चहा प्यायली आहेस का?
ह्यापैकी कोणती प्रमाणभाषा व का? >> दोन्ही प्रमाण आहेत. कारण दोन्ही वाक्यांचे अर्थ निराळे दिसतायत.
चहा प्यायलिस का? यात फक्त पृच्छा केलेली आहे. सो हे सरळ सरळ वाक्य आहे. जसं आपण जेवलिस का विचारतो तसं.
चहा प्यायली आहेस का? हे ही प्रमाण वाक्यच आहे. कारण यात अध्याहृत वाक्य अजून दडलेलं मला दिसतंय ते म्हणजे चहा प्यायली आहेस का? की करू?
आता काही जणांचे आक्षेप हे
आता काही जणांचे आक्षेप हे 'बोलताना' अमुक तमुक शब्द ऐकला की दाताखाली खडा आल्यासारखे वाटते - अश्या प्रकारचे आहेत. मुळात बोलायची भाषा ही प्रमाण असण्याची गरज नाही, त्यामुळे त्याला आक्षेप का हे कळलं नाही.>>>
वरच्या चर्चेत प्रमाणभाषा-पाठिराख्यांनी मराठीच्या अट्टहासाची देखिल पाठराखण केली आहे. म्हणजे इतर बोलीभाषा बोलणार्यांची मराठीच्या मिश्रभाषा होत जाण्याला काही हरकत नाही? बोलीभाषा देखिल मिश्र होत गेली तर चालेल?
- आताच्या बोलीभाषा (आणि प्रमाणभाषा सुद्धा) एक प्रकारे मिश्रण होत जाऊनच तयार झाल्या आहेत - त्याचे काय?>>>
इंग्रजी मधे तर कित्येक भाषेतल्या शब्दांची भेळ आहे. याच पद्धतीने ती भाषा टिकूनही आहे आणि जगावर राज्य देखील करतेय. कर्मठपणा वाढला की -हास निश्चित.>>>
+++++++++++१. हेच तर सांगतोय.
(बाकी कंड वगैरे पातळीवर चर्चा आलेली पाहून मजा वाटली. एखाददुसर्या शब्दावर फोकस करून मुद्द्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे हेसुद्धा थोरच. असो)
नो नो नो दक्षिणाजी. प्यायलीस
नो नो नो दक्षिणाजी. प्यायलीस हा प्यायली आहेस ह्याचा अपभ्रंश आहे.
जमतंय > जमत आहे
करतोय > करतो आहे
आलोय > आलो आहे.
{इंग्रजी मधे तर कित्येक
{इंग्रजी मधे तर कित्येक भाषेतल्या शब्दांची भेळ आहे. याच पद्धतीने ती भाषा टिकूनही आहे आणि जगावर राज्य देखील करतेय. कर्मठपणा वाढला की -हास निश्चित.>>>
+++++++++++१. हेच तर सांगतोय.}
गरज असेल तिथे नवे शब्द भाषेत घ्यायला कोणी विरोध केलाय?
भाषेत नवीन शब्द घेणे आणि
भाषेत नवीन शब्द घेणे आणि भाषाच बदलून टाकणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हो. वर उदाहरणे दिलीत तशी.
----
<<<<<<<<<<<आपलं मराठी व्याकरण
<<<<<<<<<<<आपलं मराठी व्याकरण आणि शुद्धलेखन कच्चं आहे, असं तुम्ही तुमच्या आधीच्या अवतारात लिहिल्याचं आठवतंय. चुका सुधारायची आणि शिकायची तयारी आहे, असंही तुम्ही लिहिलं होतं. ते शोधून पुरावा देण्याइतका वेळ तुमच्यावर घालवायची हौस नाही.
>>>>>>>>
अहो भरत हे तर मी आताही तेच बोलतोय.
माझे व्याकरण आणि शुद्धलेखन कच्चे आहे हे या धाग्याच्या चर्चेतही मी कबूल केले आहेच.
तुमच्या विभक्ती प्रत्यय संधी समास वगैरे व्याकरणयुक्त चर्चेविरुद्ध मी काही लिहिलेही नाही कारण व्याकरणावर भाष्य करावे ईतकी माझी पात्रताही नाही.
मुद्दा आहे अट्टहासाचा !
जर मी एखादे मराठी वाक्य ईकडे तिकडे करून बोलतो, जसे की वरचे उदाहरण ज्यावरून रामायण घडले - मला मदत करा वा माझी मदत करा, - ज्याचा अर्थ समोरच्याला योग्यच पोहोचणार आहे तर त्यात फार काही वावगे आहे असे मला वाटत नाही. याऊपरही चुका सुधारायला माझी हरकत नाहीच. पण मला अट्टहास मान्य नाही
बाकी माझेही लिहायचे राहिले की
बाकी माझेही लिहायचे राहिले की मी आ रा रा ह्यांच्या ह्या धाग्यावरील भूमिकेशी पूर्ण सहमत आहे.
(त्यांची माझ्या धाग्यावरची भूमिका ही अनेकदा धागा माझा असल्याने असते हे अलाहिदा)
जेथे औपचारिकता महत्वाची असते तेथे प्रमाण भाषाच वापरावी हे माझेही मत आहे.
मला वाटते की चर्चा ह्यावर व्हायला हवी की जिला माध्यमे, वर्तमान पत्रे प्रमाण भाषा म्हणून योजतात तीच प्रमाण भाषा का म्हंटली जाते.
(ही माध्यमे वगैरे स्वतःच त्यातही गडबड करतात हे आणखी निराळेच)
भाषा प्रवाही आहे ही भूमिका जितकी योग्य तितकीच 'कुठेतरी भाषेचे एक व तथाकथित प्रमाण स्वरूप' टिकवले जावे ही भूमिकाही!
तसेच, प्रमाण भाषा येतच नसेल तर औपचारिकता महत्वाची असलेल्या ठिकाणी ती शिकल्याशिवाय जाऊ / लिहू नये हीपण माझी भूमिका आहे.
पण हळूहळू ह्या तथाकथित प्रमाण भाषेचे प्रमाण असणे गढूळ / सुधारित होत राहणार हेही स्वीकारणे आवश्यक झाले आहे.
मूळ धाग्यातील मूळ विचारावर मात्र इतकेच म्हणेन की इतर भाषेतील शब्द कळावेत म्हणून मराठी वाक्यात इतर भाषेतील शब्द येऊ द्यावेत ही दिशाच चुकीची आहे. इतर भाषेतील शब्द स्वतंत्रपणे शिकावेत.
दक्षिणा - ब्राह्मण शब्द उच्चारताना ह आधी येतो, यायला हवा.
व्याकरणाचे नियम व वाहतुकीचे नियम ह्यांची तुलना करणाऱ्या प्रतिसादांना मनावर घेण्याइतका वेळ दुर्दैवाने माझ्यापाशी नाही. कदाचित ती तुलना अर्थपूर्णही असेल असे मान्य करून टाकतो.
>>प्रमाण भाषा - बातम्या,
>>प्रमाण भाषा - बातम्या, वर्तमानपत्रे, सरकारी नोटिसा वगैरे मधे वापरली जाणारी भाषा. ही देशभरात सहसा एकच असते. कॅनडा वगैरे अपवाद असतील. अमेरिकेतही एकच आहे. डबल निगेटिव्ह वगैरे यात कोठेही वापरत नाहीत.<<
परत तेच. सरकारी नोटिसा किंवा कोर्टातली भाषा याचा एक फॉर्मॅट आणि त्यात विशिष्ट शब्दांचा वापर केलेला असतो. तिला प्रमाण भाषा म्हणत असाल तर ती सर्वसाधारण बातम्या, वर्तमानपत्रां मध्ये मुळीच बोलली/लिहिली जात नाहि; कोर्टाच्या कामकाजाचं कवरेज हा कदाचित अपवाद. एरव्ही अमेरिकेत तरी हा "प्रमाण" भाषेचा विनाकारण बाऊ केला जात नाहि. काहि कस वर्ड्स सोडले तर अमेरिकन माणुस जी भाषा नेहेमीच्या वापरात बोलतो (स्लँग्ज, डबल निगेटिव शब्द वापरुन) तीच भाषा लिखित स्वरुपात वापरतो. मग तो इंटरऑफिस इमेल/मेमो असो, क्लायंट/बोर्ड मिटिंग प्रेझेंटेशन असो वा कंग्रेशनल डिबेट. आणि त्यावर एखादा प्युरिस्ट आक्षेपहि घेत नाहि...
आता ज्या कोणाला हे दिसलं/दिसत (कोषातुन बाहेर यायची इच्छा) नाहि, त्यांच्या करता माझ्याकडे उपाय नाहि. पण जेंव्हा कोणी छातीठोकपणे सांगायचा प्रयत्न करतो कि "हे होतच्च नाहि"; तर ती एकप्रकारे इतर वाचकांची दिशाभूल असते. ती टाळण्यासाठी हा अट्टाहास. आधीच भारतातुन अमेरिकेत येणार्या (आणि न येणार्या पण अर्धज्ञानी) लोकांनी अमेरिकेची त्यांच्या चष्म्यातुन दिसणारी प्रतिमा प्रचलित करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे, त्यात अजुन एकाची भर नको - म्हणुन हा पोस्टप्रपंच...
इच्छुकांसाठी एक इंटरेस्टिंग बाइट....
हेला - सहमत.
हेला - सहमत.
दक्षिणा - ब्राह्मण शब्द उच्चारताना ह आधी येतो, यायला हवा. >> बेफी एकदम सहमत. यायला हवा. पण कोल्हापूर साईडला किंवा ऐकताना म पहिला ऐकू येतो. पण या पुढे मी कटाक्षाने बोलताना ह पहिल्यांदा येईल याची दक्षता घेईन.
मला भाषेचे अधिक अधिक शुद्ध स्वरूप वापरायला आवडते 
काहि कस वर्ड्स सोडले तर
काहि कस वर्ड्स सोडले तर अमेरिकन माणुस जी भाषा नेहेमीच्या वापरात बोलतो (स्लँग्ज, डबल निगेटिव शब्द वापरुन) तीच भाषा लिखित स्वरुपात वापरतो. मग तो इंटरऑफिस इमेल/मेमो असो, क्लायंट/बोर्ड मिटिंग प्रेझेंटेशन असो वा कंग्रेशनल डिबेट. आणि त्यावर एखादा प्युरिस्ट आक्षेपहि घेत नाहि... Happy >
असं कुठे होतं म्हणे.
आग्रह धरत नाहीत किंवा आक्षेप घेत नाहीत.. कारण 'काम होते आहे ना मग हे पण चालते' असे छातीठोकपणे सांगणार्या अश्या लोकांशी डोके लावण्यात काही ऊपयोग नसतो हे आपण ईथे पाहिलेच आहे.
कंप्लायंस, कंटेटं जनरेटर्स किंवा ईन्वेस्टर रिलेशनशिप मधल्या लोकांकडून तुमचे 'लिखित' स्वरूपातले (स्लँग्ज, डबल निगेटिव शब्द ) पास करून घेऊन कंपनीच्या कम्युनिकेशन मध्ये छापून आणून दाखवा पाहू.
तिसरा परिच्छेद एकतर्फी आणि अनावश्यक वाटला.
बरं आता अट्टहास अट्टहास
बरं आता अट्टहास अट्टहास खेळायचं का ?
प्रमाणभाषेचा धागा वेगळा असेल तर खूप बरं होईल.
>>कंप्लायंस, कंटेटं जनरेटर्स
>>कंप्लायंस, कंटेटं जनरेटर्स किंवा ईन्वेस्टर रिलेशनशिप मधल्या लोकांकडून तुमचे 'लिखित' स्वरूपातले<<
हायझेनबर्ग - दृष्टि आडहि सृष्टी असते भाऊ. काहि गोष्टी तुमच्या चौकटित घडत नाहित म्हणुन त्या अस्तित्वातच नसतात, या भ्रमात राहु नका. डबल निगेटिवजची काहि उदाहरणं त्या वरच्या लिंकमध्ये आहेत - बघा काहि प्रकाश पडतो का?..
हायझेनबर्ग - दृष्टि आडहि
हायझेनबर्ग - दृष्टि आडहि सृष्टी असते भाऊ. काहि गोष्टी तुमच्या चौकटित घडत नाहित म्हणुन त्या अस्तित्वातच नसतात, या भ्रमात राहु नका. डबल निगेटिवजची काहि उदाहरणं त्या वरच्या लिंकमध्ये आहेत - बघा काहि प्रकाश पडतो का?.. >> अहो मग तुमच्या सॄष्टीची व्याख्या लिहायची ना डिस्क्लेमर म्हणून... तुम्ही "इंटरऑफिस इमेल/मेमो असो, क्लायंट/बोर्ड मिटिंग प्रेझेंटेशन असो वा कंग्रेशनल डिबेट." ह्या वाक्यात बटू वामनाने पाय ठेवलेल्या पृथ्वी सारखेच सरळसरळ कॉर्पोरेट विश्वावर पाय ठेवला ना राव.
कंग्रेशनल डिबेट टेक्सास आणि मॅसॅच्युसेट्स मधून आलेल्या कँडिडेट मध्ये झाली तर मग सगळ्या काऊबॉय स्लँग्स ईंग्लिश लिटरेचरचा भाग झाल्या का?
फ्रेंच/ बेल्जिअन लोक 'are you hungry, yes?' असे म्हणतात मग तुमच्या मते ही वाक्य रचनाही ईंग्लिश व्याकरणसंमत असेलच? बघा वापरून बिझनेस कम्युनिकेशन मध्ये.
वरची डबल निगेशनची लिंक तुम्हीच दिलित ना? त्याच्या शीर्षकतला The Double Negative: It's Not Unusual (Sometimes) ठळक केलेला शब्द दहा वेळा वाचा पाहू.
धाग्यात अमेरीकन्स का आले?
धाग्यात अमेरीकन्स का आले?
आता ते लोकं काय करताहेत यावरून आपण काय करायचे हे ठरवायचे का?
हे त्या अंधश्रद्धेच्या धाग्यात टाकायला हवे.
जे अमेरीकन्स करतात ते सारेच योग्य आणि तोच आपला बेंचमार्क ही अंधश्रद्धा फार असते आपल्याकडे..
निदान भाषेबाबत तरी आपल्याला स्वत:ची मते असायला हवीत !
>>(Sometimes) ठळक केलेला शब्द
>>(Sometimes) ठळक केलेला शब्द दहा वेळा वाचा पाहू<<
चला, यानिमित्ताने अजिबात नाहि ते समटाइम्स हा तुमचा प्रवास झालेला आहे - यातच समाधान आहे. माझ्यापुरता विषय संपला...
हायझेन बर्गा,
हायझेन बर्गा,
गाढवा पुढे गीताला कुणी ढकलले?
अन मग ती गाढवापुढे येऊनही वाचली कशी?
अन गीता वाचली म्हणून गोंधळ होण्याचे कारणच काय?
अन झालाच गोंधळ तर गोंधळ बरा कसा काय?
तो ही कालचा?
या प्रश्नांची उत्तरे शोधा पाहू?
पण जेंव्हा कोणी छातीठोकपणे
पण जेंव्हा कोणी छातीठोकपणे सांगायचा प्रयत्न करतो कि "हे होतच्च नाहि" >>> असं कोठे लिहीले आहे? पूर्ण वाक्य वाचा.
"प्रमाण भाषा - बातम्या, वर्तमानपत्रे, सरकारी नोटिसा वगैरे मधे वापरली जाणारी भाषा. ही देशभरात सहसा एकच असते. कॅनडा वगैरे अपवाद असतील. अमेरिकेतही एकच आहे. डबल निगेटिव्ह वगैरे यात कोठेही वापरत नाहीत"
प्रमाण भाषा वापरतात त्याची तीन उदाहरणे दिलेली आहेत तेथे कोठेही वापरत नाहीत. अमेरिकेत देशभर बातम्या देणारी चॅनेल्स, कंपन्यांचे क्वार्टरली कॉल्स,
आणि हे जगात सर्वत्र होते. अमेरिकेची प्रतिमा मलीन कशी काय होते हे असल्याने? ती भाषाच अशुद्ध आहे वगैरे जे आधी आले आहे त्याला विरोध ऑलरेडी केलेला आहे. एखाद्या सभेत अॅनेक्डोट म्हणून एखादे वाक्य देणे वेगळे ("The king, he stay the king") आणि भाषाच तशी वापरणे वेगळे.
कसेही लिहू बोलू अर्थ कळण्याशी
कसेही लिहू बोलू अर्थ कळण्याशी मतलब म्हणणारे इंग्रजी कसे लिहत बोलत असतील याबद्दल कुतूहल आहे
I were there yesterday
Can I do what their doing?
He get what he deserve
असले काहीसे, चालवून घेत असतील का ?
हे पालथा घडा सोडून इतर लोकांना आहे, नाहीतर आमच्या मीटिंग मध्ये हिब्रू मध्ये बोलूनही चालतं आणि त्याबद्दल कसे काय करतो यावर एक भंपक थाप येईल.
अहो ते Sometimes ईनफॉर्मल
अहो ते Sometimes ईनफॉर्मल सेटिंग्स, पार्टी, मित्रांमध्ये, कथेतल्या रिजनल कॅरॅक्टरच्या तोंडी , गाण्यात वगैरे साठी आहे हो.

तुम्ही आपले कंपनीचे वार्षिक अहवाल आणि बोर्डाच्या कम्युनिकेशनमध्ये स्लँग्ज घालायला निघाले. there ain't no increase in EBITDA from last quarter.
ऊगीच नाही एच आर तुमच्याकडून ' मी मिडियासमोर मूग गिळून गुमान गप्प बसेन' अशी शपथ लिहून घेत.
तारतम्याने वापरायच्या गोष्टी आहेत हो.
चला, यानिमित्ताने अजिबात नाहि ते समटाइम्स हा तुमचा प्रवास झालेला आहे - यातच समाधान आहे. माझ्यापुरता विषय संपला... >> जातांय? जा पण ह्या वाक्यातले एकूण निगेशन तरी मोजून जा ... There ain't no one not going to miss you never
अर्थ कळला ना मग ठीक आहे.
आमच्यासारखे ज्यांना इंग्रजी
आमच्यासारखे ज्यांना इंग्रजी अजिबातच येत नाही, त्यांच्याकडून चुका होऊच शकणार नाहीत.
मधुरांबे,
मधुरांबे,
ते मायबोली मंडळ युजर्सची ट्र्राफिक मायबोलीकडे वळवण्याच्या खटपटीत जिवाचं रान करतं.. आणि तुम्ही ईथे जमलेली ट्राफिक १७६० लिंका देऊन तिकडे फेसबूकवर ढकला.
फेसबुक तर बेस आहे ना
फेसबुक तर पाया आहे ना माहिती चा ?
या प्रश्नांची उत्तरे शोधा
या प्रश्नांची उत्तरे शोधा पाहू? >> ह्या भाषेच्या गुळाची चव काही कळंना झालीये ह्यांना
here ain't no increase in
here ain't no increase in EBITDA from last quarter >>> हाब
It ain't gonna be no product company no more
Keep your mum shut !!
Keep your mum shut !!
( कानाने ऐकलेले )
हाब स्टील द शो हीअर...
हाब स्टील द शो हीअर...
प्यायलीस हा प्यायली आहेस
प्यायलीस हा प्यायली आहेस ह्याचा अपभ्रंश आहे.>> चूक. दोन्ही वेगळे आहेत.
प्यायली आहेस - प्यायलीयस, जसं करतो आहे - करतोय, करतो आहेस - करतोयस.
इथे करतोस म्हणजे नेहमी करतोस - प्रेझेंट. करतो आहेस - प्रेझेंट कन्टिन्युअस
प्यायलीस का - हे आत्ता प्यायलीस का या अर्थाने आणि प्यायली आहेस का - हे आयुष्यात कधी प्यायली आहेस का या अर्थाने.
आता प्रमाण भाषेत चहा प्यायली आहेस / प्यायलीस का - हे पण चूक आहे. चहा प्यायला आहेस का. जसं आंबा खाल्ला आहेस का.. आंबा खाल्ली आहेस का असं नाही लिहित. असो. प्रमाण भाषेवर चर्चा नाही, त्यामुळे आणखी बोलत नाही.
धागा वर.
धागा वर.
Pages