Submitted by कटप्पा on 21 June, 2018 - 23:32
आजच एक धागा पहिला, एका इंग्रजी शब्दाला मराठी शब्द हवा म्हणून.
किल्ली यांच्या धाग्यावरही काही प्रतिसाद वाचले, महाराष्ट्रात लोकांनी मराठी बोलणे कसे महत्वाचे आहे आणि बाकीच्या अमराठी लोकांना मराठी कसे बोलायला भाग पाडले पाहिजे वगैरे वगैरे.
इतका मराठीचा अट्टाहास कशासाठी? मराठी मिश्रित हिंदी किंवा इंग्रजी मिश्रित मराठी बोलणे हे खूप कॉमन आहे आणि आपण याला सपोर्ट केला पाहिजे. निदान यातून आपण मराठी लोक काही इंग्रजी शब्द शिकू तरी.
आपल्याला काय वाटते???????
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी अस करेल, मी इथूननिघेल अ>>
मी अस करेल, मी इथूननिघेल अ>> मी असे करेन. मी इथून निघेन.
मी असे करेन. मी इथून निघेन.>>
मी असे करेन. मी इथून निघेन.>>> धन्यवाद अमा ! वाचत असतानाच ते खटकलं होतं .
हे अर्धवट हिंदाळलेले मराठी
हे अर्धवट हिंदाळलेले मराठी इंग्रजी बोलणारे लोक हिंदी किंवा इंग्रजी देखील नीट बोलत नाहीत. त्याचा सात्विक संताप येतो. त्या त्या भा षेचे बेअरिंग पक्के घ्यावे ना. अर्धवट राव व आवडा बाई पीळ मारतात.
मी अस करेल, मी इथून निघेल अस
मी अस करेल, मी इथून निघेल अस वाचलं आहे . तर हे बरोबर आहे का ?.>>>>>>>>>
करेन , निघेन असे हवे.
तसेच "आपण लिहुयात", आपण जाऊयात " असे जे मालिकांमध्ये सर्रास बोलले जाते , ते सुद्धा कानाला खटकते, दूरदर्शन च्या जमान्यात लिहूया, जाऊया असायचे अचानक उपग्रह वाहिन्या वाढल्यावर हा "त" यायला लागला आहे.
पण मला वाटते हा भाग "बोली" नुसार बदलेल,
मी करेन,निघेन
मी करेन,निघेन
तो/ती - करेल, निघेल
ते - करतील, निघतील
आम्ही - करू, निघू
मी अस करेल, मी इथून निघेल अस
मी अस करेल, मी इथून निघेल अस वाचलं आहे . तर हे बरोबर आहे का ?.>>>>>>>>>
प्रथमपुरुष एकवचन - मी करेन
प्रथमपुरुष अनेकवचन - आम्ही करू
द्वितीयपुरुष एकवचन -तू करशील
द्वितीयपुरुष अनेकवचन - तुम्ही कराल
तृतीयपुरुष एकवचन - तो / ती करेल
तृतीयपुरुष अनेकवचन - ते / त्या करतील
ज्यांना प्रथमपुरुष, द्वितीयपुरुष, तृतीयपुरुष हे कळत नसेल त्यांच्यासाठी:
१. प्रथमपुरुष म्हणजे बोलणारी व्यक्ती जेव्हा स्वतःबद्दल बोलत असते तेव्हा प्रथमपुरुष. उदा. 'अ' व्यक्ती 'ब' शी स्वतःबद्दल बोलत आहे, तर "मी करेन / मी जाईन / मी जेवेन
२. द्वितीयपुरुष म्हणजे बोलणारी व्यक्ती जेव्हा ज्याच्याशी बोलत आहे, त्याच्याबद्दलच बोलत असेल तेव्हा द्वितीयपुरुष. उदा. 'अ' व्यक्ती 'ब' शी 'ब'बद्दलच बोलत आहे, तर "तू करशील / तू जाशील / तू जेवशील"
३. तृतीयपुरुष म्हणजे बोलणारी व्यक्ती बोलताना स्वतःबद्दल किंवा ज्याच्याशी बोलत आहे त्याच्याबद्दल न बोलता कुणा तिसऱ्याच व्यक्तीबद्दल बोलत असेल तेव्हा तृतीयपुरुष. उदा. 'अ' व्यक्ती 'ब' शी बोलत आहे परंतु 'क' बद्दल, तेव्हा "तो करेल / ती जाईल / तो जेवेल"
मुम्बईतले आली गेली ऐकले
मुम्बईतले आली गेली ऐकले बोलतात ऐकले की काटा येतो अंगावर. >>>>
वसई-विरार आणि त्यापुढील (पालघर, बोईसर, डहाणू) पट्ट्यात राहणाऱ्या मुलांकडून "मी आला, मी बोलला, मी जेवला, मी झोपला" असे बऱ्याचदा ऐकले आहे, त्याबद्दल
प्रथमपुरुष एकवचन - मी आलो / मी जेवलो (पुल्लिंगी), ---- मी आले / मी जेवले (स्त्रीलिंगी)
प्रथमपुरुष अनेकवचन - आम्ही आलो / आम्ही जेवलो (उभयलिंगी)
द्वितीयपुरुष एकवचन - तू आलास / तू जेवलास (पुल्लिंगी), ---- तू आलीस / तू जेवलीस (स्त्रीलिंगी)
द्वितीयपुरुष अनेकवचन - तुम्ही आलात / तुम्ही जेवलात (उभयलिंगी)
तृतीयपुरुष एकवचन - तो आला / तो जेवला (पुल्लिंगी), ---- ती आली / ती जेवली (स्त्रीलिंगी), ----- ते [विमान] आलं / ते पडलं (नपुंंसकलिंगी)
तृतीयपुरुष अनेकवचन - ते [मुलगे] आले / जेवले (पुल्लिंगी), ----- त्या [मुली] आल्या / जेवल्या (स्त्रीलिंगी), ----- ती [झाडाची पानंं, पुस्तकं] पडली (नपुंसकलिंगी)
बाप रे काय सुरू आहे इथे
बाप रे
काय सुरू आहे इथे 
मला वाटतं, मायबोलीवर
मला वाटतं, मायबोलीवर शुद्धलेखन आणि व्याकरण पोलीस असा एक धागा काढावा. मायबोलीवरच्या लेखनातल्या लक्षात आलेल्या चुका तिथे नोंदवाव्यात.
>>
प्लिज काढा.
खूप फायदा होईल.
बाप रे Uhoh काय सुरू आहे इथे
बाप रे Uhoh काय सुरू आहे इथे Sad
Submitted by दक्षिणा on 3 July, 2018 - 13:17>>>>
मराठी व्याकरणाचा तास!!!

बाप रे Uhoh काय सुरू आहे इथे
बाप रे Uhoh काय सुरू आहे इथे >>>
ग्रामर नाझींचा कॉन्सन्ट्रेशन कँप
>>>>गप्पा हाणताना कचकून
>>>>गप्पा हाणताना कचकून धेडगुजरी बोला. पण फॉर्मल ठिकाणी बोलण्यासाठी प्रमाण भाषा आलीच पाहिजे. फॉर द सिंपल रिझन, दॅट इट्स फॉर्मल ऑकेजन. तिथे लुंगी बनियन घालून जात नाही आपण. तशीच भाषाही आली पाहिजे.<<<<
व्वा आरारा!! एकदम परफेक्ट!
ह्या धाग्यावर खालील प्रतिसाद तुम्ही दिला होतात हे आता अजिबात खरे वाटत नाही.
https://www.maayboli.com/node/65438
>>>>अहो, ते असंबद्ध अशुद्ध मराठी अन कवितांची प्रतिमांची मोडतोड, हे लेखकाच्या कविकल्पनेचं अपत्य आहे!
त्या कुण्या आडवळणाच्या गावात मभा दिन साजरा झाला, कुणी हाती माईक धरून त्याचे सूत्रसंचालन करू धजला, माय मराठीची पत इथल्यापेक्षा तिथे जास्त समर्थपणे पेलली गेली, ह्याला काही किंमत नाही?
मायबोलीवर मराठी भाषा दिन साजरा करण्यात आपण सादक व प्रतिसादकांनी काय हातभार लावला, हे जरा आरशाला विचारून पहा प्रत्येकाने.
टीआरपी "उपायडायला" दरच वर्षी मराठीचा दर्जा कसे "हे लोक" घालवत आहेत असे लेख पाडले जातात, त्यातला हा ही एक. असो .<<<<
आरशाला <<<< आरश्याला म्हणायचे
आरशाला <<<< आरश्याला म्हणायचे आहे का? की ह्याच 'हातभाराबद्दल'म्हणत आहात?
बेफी हम्म!
बेफी हम्म!
अरे कुठे नेवून ठेवलाय धागा
अरे कुठे नेवून ठेवलाय धागा बाहुबली किलर चा !!!
प्राकृतोद्भव आणि संस्कृतोद्भव
प्राकृतोद्भव आणि संस्कृतोद्भव विषयक माझा प्रतिसाद हा या धाग्याच्या विषयाशी संबंधित होता. धाग्याचा विषय मराठीचा अट्टाहास का असा आहे. तर मग मराठी भाषा ही प्राकृतापसून बनलेली आहे. संस्कृतपासून बनलेली भाषा ही प्रमाण मराठी आहे. त्यामुळे संस्कृतचा अट्टहास प्राकृत मराठीबाबत का हा प्रश्न तार्किक होता.
एका मूर्ख आयडीच्या मूर्ख मल्लिनाथीमुळे तो उडवला गेला. हा आयडी माझा प्रतिसाद आला की वायफळ बडबड चालू करतो. वेबमास्टरांनी कृपया समजून घ्यावे ही विनंती.
प्रतिसाद उडवला नसेल हो,
प्रतिसाद उडवला नसेल हो, पोस्टच झाला नसेल. इतका वेळ आहे का वेमा कडे एकूण एक प्रतिसाद वाचायला आणि उडवायला?
>>अरे कुठे नेवून ठेवलाय धागा
>>अरे कुठे नेवून ठेवलाय धागा बाहुबली किलर चा<<
धाग्याचा विषय मराठीचा अट्टाहास का, असा असताना चर्चेला सोशल मिडिया, टिवी इ. ठिकाणी "प्रमाण" मराठीतंच बोललं जावं असं अनपेक्षित (कि अपेक्षित?) मागणी/वळण लागलेलं आहे. काहि उत्साहमुर्तिंनी तर व्याकरणाचे धडेच इथे गिरवले आहेत. गंमतीचा भाग म्हणजे, गेल्या दोन दिवसांत या धाग्यावर आलेले अपेक्षित प्रतिसाद ऋन्म्याच्या पुण्याईमुळे (हाराकिरी पथक सतत त्याच्या मागावर असतंच म्हणा...
) आलेले आहेत कि खरोखर पोटतिडिकिने आलेले आहेत, या शंकेला वाव आहे. बेफिंनी तर आरसाच दाखवलेला आहे. तर ते असो...
अजुन काहि गंमतीशीर गोष्टी समोर आलेल्या आहेत -

१. अमेरिकन अशुद्ध इंग्लिश - अर्धवट ज्ञान असलं कि हि अशी मतं बनवली जातात. अरे, अमेरिकन इंग्लिश हि एक भाषा आहे. कांप्युटर वापरता ना? प्रोफाय्ल सेट करताना, भाषेच्या ड्रॉपडाउन मध्ये अमेरिकन इंग्लिश हा पर्याय दिसतो ना? आणि न्युज चॅनल्स कशाला, अगदि पोटस सुद्दा सोटु मध्ये अमेरिकन स्लँग्स वापरतात; डबल निगेटिव्ज निगेशन फर्म करण्याकरता वापरतात. कारण त्यांचा ऑडियंस अमेरिकन आहे, डबक्या पलिकडचा इंग्लंड नाहि. अर्थात, हे सगळं जाणवायला/समजायला एक्स्पोजर लागतं...
२. घरी शुद्ध, प्रमाणित मराठी बोलत असल्याने फर्स्ट ग्रेडर सुद्धा शुद्ध बोलतो - होप्फुली यात (
हॅबिच्युअल) एग्झॅजरेशन नाहि/नसावं. पण ते वाचल्यावर, घरातला कुत्राहि मराठी बोलतो असं वाचायला मिळतंय कि काय, असं वाटुन गेलं...शेवटी जाताजाता - गेल्या काहि वर्षांत, विद्रोहि साहित्याचा प्रसव/प्रसार होत असताना, आजकालच्या मराठी साहित्य संमेलनांत हि अशी सोकॉल्ड प्रमाणित भाषा व्यासपिठावरुन बोलणं बंधनकारक असेल का, हा प्रश्न मला पडतो...
हॅपी जुलै फोर्थ, एव्हरीबडी! लेट दि फायरवर्क्स बिगिन!!
इथे आता महागठबंधन होण्याच्या
इथे आता महागठबंधन होण्याच्या शक्यता दिसताहेत.
अजुन काहि गंमतीशीर गोष्टी
अजुन काहि गंमतीशीर गोष्टी समोर आलेल्या आहेत - >>> . निदर्शनास आल्या आहेत.
काहि उत्साहमुर्तिंनी तर व्याकरणाचे धडेच इथे गिरवले आहेत. >> विद्यार्थी धडे/पाठ गिरवतात शिक्षक/ऊत्सवमुर्ती धडा/पाठ शिकवतात.
या शंकेला वाव आहे. >> शंका घेण्यास वाव आहे.
शेवटी जाताजाता >> ह्याला द्विरुक्ती म्हणतात? तुम्ही ते डबल निगेशनचं काय म्हणत होतात...
अरे कुठे नेवून ठेवलाय धागा
अरे कुठे नेवून ठेवलाय धागा बाहुबली किलर चा---

फायरवर्क म्हणालाच आहात तर....
फायरवर्क म्हणालाच आहात तर.... सध्याचा पोटूस काय बोलतो त्यावरुन काही अनुमान काढू म्हणता!
लेट थ फिरवोर्क बिगीं म्हणजे
लेट थ फिरवोर्क बिगीं म्हणजे लेट थ फाईट स्टार्ट ☺️
हाब, भारी
हाब, भारी
क्रॅप्स, परत कीबोर्ड हरवला वाटतं तुमचा!
लेट दि फायरवर्क्स बिगिन!!>>
लेट दि फायरवर्क्स बिगिन!!>>
ही सगळी पोस्ट हेराफेरीतला बाबुराव आपटे मशीन गन घेऊन धोतर एका हाताने धरून बेदुन्ध गोळीबार करतो तशी वाटली
इथे आता महागठबंधन होण्याच्या
इथे आता महागठबंधन होण्याच्या शक्यता दिसताहेत.
<<
शत्रू का शत्रू वो मेरा मित्र असा साक्षात्कार कोहरा थोडा हटल्यावर झालेला दिसतोय. त्या धुक्यात आपण आपलीच कशी उडवून घेतोय अन काँटेक्स्ट काय आहेत याचेही भान हरवलेय.
सायलेंट लोकही एक्स्पायरी डेटची तोफ आलेली पाहून आता त्यातून फटाके फुटतील अशा फुसक्या अपेक्षा ठेवून आहेत.
असो. याचा व्याक्रणाशी काडीचा संबंध नाही. अन भंभ्याशी तर अजिबातच नाही.
हा धागा मराठीत कण्टेण्ट/वाङ्मय निर्मिती करणार्यांनी किमान व्याकरणाचे नियम पाळायला हवेत या अपेक्षेवरून जिकडे नेण्याचा "प्रेत्न" चाल्लाय तिकडे जाण्याचा लयच अनुभव गाठीशी असल्याने हे अवांतर इथेच थाम्बवतो.
टण्णपाखरा,
टण्णपाखरा,

iइथे मधे मधे अंदाधुंद गोळीबार करणारा बाबूराव बरोब्बर शोधलात तुम्ही!
ही सगळी पोस्ट हेराफेरीतला
ही सगळी पोस्ट हेराफेरीतला बाबुराव आपटे मशीन गन घेऊन धोतर एका हाताने धरून बेदुन्ध गोळीबार करतो तशी वाटली > >एकदमच पटले टण्या.
- ऋन्मेष -
- ऋन्मेष -
>>>>>
अजुनही वेगळ्या विभक्तीचे प्रत्यय जोडणे हा प्रमाण आणि बोली भाषेतला फरक वाटत असेल तर नको बोलूया.
>>>>>
अमितव, यू आर स्टिल नॉट गेटींग मा पॉईण्ट डूड !
व्याकरण दृष्ट्या काय चूक आणि काय बरोबर हा मुद्दाच नाहीये.
ते तुम्ही लोकंच ग्यानी आहात. तुम्हालाच माझ्यापेक्षा जास्त ठाऊक असणार.
मुद्दा आहे तो व्याकरणदृष्ट्या कर्रेक्ट च लिहिण्याबोलण्याच्या अट्टहासाचा !
आई रीपीट ...
व्याकरण दृष्ट्या काय चूक आणि काय बरोबर हा मुद्दाच नाहीये.
ते तुम्ही लोकंच ग्यानी आहात. तुम्हालाच माझ्यापेक्षा जास्त ठाऊक असणार.
मुद्दा आहे तो व्याकरणदृष्ट्या कर्रेक्ट च लिहिण्याबोलण्याच्या अट्टहासाचा !
- ऋन्मेष -
- ऋन्मेष -
>>>>
शाळेत भाषा* शिकवतात, ती उद्या तुम्हाला व्यवहारात वापरता यावी म्हणून.
>>>>
नक्कीच!
पण शाळेत जे शिकवतात ते सारेच व्यवहारात वापरा असा अट्टहास नसावा.
उदाहरणार्थ,
कोणाला सांगू नका, पण मी शंभर मार्कांचे पुर्ण संस्कृत घेतलेले. कारण अ तुकडीतल्या मुलांना ते कंपलसरी होते आणि अ तुकडीतल्या मुलांनाच ते शिकवले जायचे.
आता हे संस्कृत फक्त अ तुकडीतील हुशार मुलांनाच का शिकवले जायचे हा एक वेगळा चर्चेचा विषय होईल.
ते एक असो
पण शाळेत शिकलेली संस्कृत भाषा किती जण व्यवहारात वापरतात हा संशोधनाचा विषय होईल.
आता ईथे लगेच मी वापरतो, मी वापरतो म्हणत हात वर करणे अपेक्षित नाही
Pages