मराठीचा अट्टाहास कशासाठी?

Submitted by कटप्पा on 21 June, 2018 - 23:32

आजच एक धागा पहिला, एका इंग्रजी शब्दाला मराठी शब्द हवा म्हणून.
किल्ली यांच्या धाग्यावरही काही प्रतिसाद वाचले, महाराष्ट्रात लोकांनी मराठी बोलणे कसे महत्वाचे आहे आणि बाकीच्या अमराठी लोकांना मराठी कसे बोलायला भाग पाडले पाहिजे वगैरे वगैरे.
इतका मराठीचा अट्टाहास कशासाठी? मराठी मिश्रित हिंदी किंवा इंग्रजी मिश्रित मराठी बोलणे हे खूप कॉमन आहे आणि आपण याला सपोर्ट केला पाहिजे. निदान यातून आपण मराठी लोक काही इंग्रजी शब्द शिकू तरी.

आपल्याला काय वाटते???????

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुद्ध मराठी बोलायला शिकायचं आहे. कृपया माझी मदद करा!>>>>>>
कृपया मला मदत करा
Submitted by सिम्बा on 29 June, 2018 - 23:43

@ सिम्बा, योग्य त्या मुद्द्याला हात घातलात, परंतु दुर्दैवाने आजकाल मराठी मालिकांमध्ये देखील 'माझी मदत कर' आदी वाक्ये ऐकू येतात! Sad Sad Sad

परंतु दुर्दैवाने आजकाल मराठी मालिकांमध्ये देखील 'माझी मदत कर' आदी वाक्ये ऐकू येतात! >>>>>>
आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे रोहिणी हट्टंगडी, शुभांगी गोखले वगैरे जेष्ठ कलाकारांकडून सुद्धा काही वेळा ही भाषा ऐकली आहे

मला मदत करा
माझी मदत करा
दोन्ही बरोबर वाटतात
जर एकच भावना पोहोचवायला दोन वेगळे शब्द, दोन वेगळ्या वाक्यरचना मिळत असतील आणि त्यातून कुठला तिसरा अर्थ नसेल निघत तर चांगलेच आहे की..

काना मात्रा वेलांटी चुकली कीं वाचकांची खरमरीत पत्रें येण्याचे अन चुकणाऱ्याने सुधारायचे दिवस गेले..
>>>>>>

आताचे लोकं शुद्धलेखनाला नाही तर आत जो मजकूर आहे, जे विचार आहेत, त्याला जास्त महत्व देत असावेत.

पुढच्या पिढीत ईंग्रजी माध्यमात शिकलेल्या बोलण्यापुरते मराठी येत असलेल्या पिढीकडून तर अपेक्षाही ठेऊ नयेत फार .. काळासोबत चालावे.

माझा एक मामा आहे तो मराठी च बोलले पाहिजे या मताचा आहे...नाही म्हणजे आम्ही मराठी च बोलतो पण अगदी वॉट्सप वर पण मराठी च टाईप करावं लागेल या ग्रुप वर राहायचं असेल तर अशी सक्ती ही असते...
मराठी जरूर बोलावी च पण इतकं टोक गाठू नये असं वाटतं

मी सोडला असता ग्रुप ☺️
>>>>
त्यापेक्षा नवीन ग्रूप काढावा. तिथे मामासह सर्वांना भरती करावे आणि डिक्लेअर करावे ईथे कसलीही सक्ती नाही.

१. आताचे लोकं शुद्धलेखनाला नाही तर आत जो मजकूर आहे, जे विचार आहेत, त्याला जास्त महत्व देत असावेत.
२. पण अगदी वॉट्सप वर पण मराठी च टाईप करावं लागेल या ग्रुप वर राहायचं असेल तर अशी सक्ती ही असते...
<<
१. बद्दल.

एक तर मराठी बोला, किंवा बोलतोय ती मराठी नाही, हे मान्य करून मग बाकी धेडगुजरी बरळा.

मराठीच्या किंवा कोणत्याही बाबतीत अशुद्ध चालेल असे चल्ता है, धक्ता है वाले विचार उपयोगी नाहीत.

बोली भाषा, गप्पा मारतानाची भाषा, जनरल बाजारात "भैया वांगा केव्ढेको दिया?" स्टाईल चालते. त्यातले "विचार" तिथे महत्वाचे आहेत. मला नुसती बोली मराठी नव्हे, तर वर्‍हाडी, अहिराणी, कोकणी, थोडीफार पावरी देखिल येते. मराठवाड्यात बोलली जाणारी हैदराबादी ढंगाची हिंदी मिश्रीत, नागपूरकडची एम्पीस्टाईल हिंदी मिश्रीत, अन मुंबैची बंबैय्या हिंदी मिश्रीत मराठी या सगळ्या मराठीच्या 'बोली' आहेत.

"मराठी" नव्हेत.

जेव्हा तुम्ही गल्लीत्/दोस्तांत बोलण्याचीच भाषा प्रमाण असे गृहित धरता, तेव्हा तुमची फॉर्मल लँग्वेजही तितकीच भिकारडी बनते. घरी घालायचे कपडे घालून ऑफिसात जात नाहीत, तसेच फॉर्मल भाषा ही शुद्धच असली पाहिजे.

याची अनेक कारणे आहेत. अन सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे बिझिनेस/लीगल इम्प्लिकेशन्स. मी जे काय बोलतोय त्याचा अर्थ तोच, अन तितकाच निघाला पाहिजे. कोणत्याही संदर्भात, अर्थछटेतून इ. त्यातून दुसरा अर्थ निघता कामा नये, अन्यथा प्रकरण फिस्कटते.

एकदा चलता है धकता है ची सवय लागली की सगळीकडे तीच लागते, अन सगळीकडे तसेच लिहिले बोलले जाते. अन ही असली रत्ने पहायला मिळतात :
"Actually i was just compleate mba .and i have marketing experience and team leader .i have offer for job in mswipe etch but im not join because of i will start my own pvt ltd company and i hav project. but how to gate bank lone."

हे असले चालत नाही. तुमची लायकी दिसते.

गप्पा हाणताना कचकून धेडगुजरी बोला. पण फॉर्मल ठिकाणी बोलण्यासाठी प्रमाण भाषा आलीच पाहिजे. फॉर द सिंपल रिझन, दॅट इट्स फॉर्मल ऑकेजन. तिथे लुंगी बनियन घालून जात नाही आपण. तशीच भाषाही आली पाहिजे.

मुद्दा,

वर्तमानपत्रे वाचूनही लोक भाषा शिकत असतात, तिथे फॉर्मलच भाषा हवी. बीबीसी ऐकून इंग्रजी बोलायला शिकणारे लोक आहेत, त्याच कारणासाठी आकाशवाणीवर "माझी मदत करा" ऐकू आलं तर ही मोठी चूक आहे.

२.
ग्रूप शुद्ध मराठी बोलण्यासाठीचा असेल, तर आग्रह धरण्यात काहीच अडचण नाही.

कोणे एके काळी माबो रोमन लिपीत मराठी धकवून घेत असे. नंतर शिवाजी सुषा वगैरे फाँट्स आले, अन आजकाल आपण युनिकोडत असतो.

त्याकाळी अन आताही, देवनागरी लिहिण्याबद्दलचा आग्रह तुम्ही पाहिला नाहिये का?

मराठी बोलायचं नाहिये, तर भाऊ, मायबोलीवर येऊन काय करतो आहेस?

इथली धन्स, धन्यु वाली स्पेशल मराठी देखिल एक वेगळ्या छटेची बोलीभाषाच आहे. पण ती माबोबाहेर बोलून उपयोग नाही.

***
परदेशी भाषा शिकून बहुराष्ट्रीय कंपन्यांतून काम करताना शुद्ध भाषा वापरली जाते की बोली? कंपनी कम्युनिकेशन्स मधे फॉर्मल लँग्वेज असते की स्लँग?

तिथे ही "भावनाओं को समझो" स्टाईल मद्दड फुटनोट लिहितो का आपण?

मग केवळ फॉर्मल मराठी फॉर्मली शुद्ध लिहिण्या/बोलण्यात अडचण काय आहे?

एकमेकांच्या चुका दुरुस्त करून सगळ्यांचीच भाषा सुधारायचा, वाढवायचा यत्न करायचा, की "छे छे, मेजॉरिटी काय म्हणतेय?" म्हणून सर्वच शिखरे छाटून एक नकटा टेकड्यांचा प्रदेश बनवायचाय आपल्याला?

इथली धन्स, धन्यु वाली स्पेशल मराठी देखिल एक वेगळ्या छटेची बोलीभाषाच आहे. पण ती माबोबाहेर बोलून उपयोग नाही.
>> हो आणि खतरनाक आहे ती. स्पेशली - रच्याकने म्हणजे by the way हे ज्याने सुरू केलंय त्याला दंडवत ☺️

आजकालच्या पोरांना खरंच मराठी येत नाही.

तपासणी करताना 'हनुवटी इथे ठेवा' म्हटलं की नक्की काय ठेवा हा प्रश्न भल्याभल्यांना पडतो.

माझ्या एका सीबीएस्सी भाचीला (आता हिचा मुलगा जेवढा आहे तेवढी असताना) मी 'गोजिरवाणी' म्हटल्यावर तिने रडून गोंधळ घातलेला, की मामा मला हे काहीतरी वाईट बोलला!

तिचे चिरंजीव लहानपणापासून छोटा भीम पहातच बोलायला शिकलेत. हिंदी अस्ख्लीत अन शुद्ध बोलतात. मराठीच्या नावाने बोंब!

असो.

मराठीवाचवामराठीवाढवा. इतकेबोलूनमीमाझेदोनशब्दसंपवतो.

>>जेव्हा तुम्ही गल्लीत्/दोस्तांत बोलण्याचीच भाषा प्रमाण असे गृहित धरता, तेव्हा तुमची फॉर्मल लँग्वेजही तितकीच भिकारडी बनते.>> आरारा, सहमत. ज्यांचा प्रतिसाद कोट केला आहेत त्यांना तीच भाषा प्रमाण वाटत असल्यामुळे इकडे ‘हल्ली कसं हेच चालतं, लोकांना कसं असं बोललेलं कळतं‘ वगैरे मल्लिनाथी सुरु असते.

त्याच कारणासाठी आकाशवाणीवर "माझी मदत करा" ऐकू आलं तर ही मोठी चूक आहे.
>>>>>

आरारा, एवढी मोठी पोस्ट लिहिलीत. पण सगळीच वेगळ्या ट्रॅकला गेली. माझा मुद्दा वेगळाच होता. आपण अर्थ वेगळाच काढलात.

मला म्हणायचंय की मला मदत करा हे शुद्ध आणि माझी मदत करा हे अशुद्ध हे असे का? आणि कोणी ठरवले?
मला त्याला चॅलेंज नाही करायचेय. पण दोघांतून योग्य तो अर्थ जातोय आणि तिसराच अर्थ निघत नाही तर प्रमाण भाषा म्हणजे आणखी वेगळे असते काय?

बरं मला एक सांगा, जी काही प्रमाण भाषा आहे ती जेव्हा बनली तेव्हापासून ती तशीच आणि तितकीच आहे का? त्यात कधीच काही भर पडली नाही का?

तपासणी करताना 'हनुवटी इथे ठेवा' म्हटलं की नक्की काय ठेवा हा प्रश्न भल्याभल्यांना पडतो.
>>>>>

यात चूक कोणाची?
त्या मुलाची की त्याला ईंग्रजी माध्यमात शिकवणारया आणि घरीही सर्रास ईंग्रजी शब्द वापरणारया पालकांची?

मुळात याला चूक म्हणायचे का?

आज मराठी आली नाही आली तरी चालते.
पण ईंग्रजी नाही आली तर हसे होते.
मग कोणी आपल्या मुलांच्या मराठीवर दुर्लक्ष करत ईंग्रजी पक्के केले तर त्यात गैर काय आहे?

सौ बात की एक बात -
कुठली भाषा शिकावी आणि कुठली नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न नाही का?

जर त्याला हनुवटी काय हे समजले नसेल तर त्याला नक्कीच त्या अवयवाला काय बोलतात याचा हिंदी वा ईंग्रजी भाषेतला शब्द माहीत असणार. एवढे सिंपल आहे हे Happy

रे भंभ्या,

व्याक्रण अन शिक्रण यात फरक आहे.

माझी अन मला.

अर्थ बदलतो राजे.

विभक्ती प्रत्यय नामक प्रकार आहेत, ते का आहेत? हे तू समजविणे मजपाशी वेळ नाही, अन तुझी समजून घेण्याची वेळ निघून गेलेली आहे.

अन समजत असले, तरी तू एक स्टँड घेतला आहेस, अन त्याला चिकटून तू पलट्या मारमारून, फाटे फोडफोडून बब्बड कर्शील हे मला ठाउक आहे.

मी काय बोलून र्‍हायलो भो?
जे बोलतो आहेस, ते मराठी नाही हे मान्य कर, अन मग बब्बड हवं ते हवं तितकं. बाकी इंग्रजी पक्की करायचे दिवे इथे पाजळू नका राजे.
माबोवर "मला इंग्रजी येत नाही" वाले तुझे प्रतिसाद किती?
ते जरा गणून सांग पाहू?
बेंबट्या, घाल पाहू बोटे? Wink

रच्याकने म्हणजे by the way हे ज्याने सुरू केलंय त्याला दंडवत ☺️
>>>>

मला सुरुवातीला सिरीअसली तो एक मराठी शब्द वाटायचा. कारण मायबोलीसारख्या संकेतस्थळावरची लेख कथा कविता वगैरे लिहिणारी पब्लिक जो शब्द वापरते म्हणजे तो आपल्यासारख्या मराठीत ढ असणारया मुलाला माहीत नसणारा एक खर्राखुरा मराठी शब्दच आहे असे वाटायचे. नशीबाने मी मायबोलीवर फार काळ रेंगाळलो आणि ईथे असे शब्द बनवले जातात हे समजले Happy

>>मला मदत करा, माझी मदत करा. दोन्ही बरोबर वाटतात<<

हो. एकात मदत शब्दाचा प्रयोग क्रियापद म्हणुन झालेला आहे तर दुसर्‍यात नाम म्हणुन...

जे बोलतो आहेस, ते मराठी नाही हे मान्य कर
>>>

ते जर मराठीच नाही मग त्याला अशुद्ध मराठी का बोलत आहात? Happy

राज,
Lol
"do my help"
"help me"
समज्तंय का?

आजकाल मायबोलीवर धेडगुजरी हे संबोधन बर्‍याच वेळा वाचायला मिळतं.
सदरहू शब्दप्रयोग जातीयवादी आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

do my help"
"help me"
>>>>

मराठी आणि ईंग्रजी व्याकरणाचे नियम असे शब्दशा भाषांतर करून बनत नाहीत आरारा. नाहीतर गूगल ट्रान्सलेटर नेहमीच जिंदाबाद असते.

ऋन्मेष चांगले मुद्दे मांडताय पण कोणापुढे?
आपण, आपले काके-मामे, आपल्या गल्लीबोळातले लोक जी मराठी बोलतात तीच प्रमाण आणि उर्वरित अक्खा महाराष्ट्र बोलतो ती गावंढळ, अशुद्ध मानणार्‍यांपुढे?
"त्यांना" आरती करा आणि व्हा पुढे.
****
महाराष्ट्रातल्या बहुसंख्य लोकांना 'प्रमाण' मराठी बोलता येत नाही, म्हणून रडे काढणारा एक धागा काही दिवसांपूर्वी आला होता. मला एक समजत नाही, जी भाषा त्या प्रदेशातल्या बहुसंख्य लोकांना बोलता येत नाही, ती 'प्रमाण' कशी? कुणी बनवली तिला प्रमाण? जगाच्या पाठीवर दुसरं असं उदाहरण आहे का? 'फ्रान्समधल्या बहुसंख्य लोकांना फ्रेंच येत नाही' किंवा 'इस्राएलमधल्या लोकांना हिब्रू येत नाही' असं कधी ऐकलंय?
की एक ऑब्स्क्युअर बोली 'प्रमाण' म्हणून महाराष्ट्राच्या डोक्यावर बसवण्यात आली, असं तर नाही?
तो शिवाजी म्हणून एक होता, त्याने 'महाराष्ट्र' नावाच्या प्रदेशाला पहिल्यांदा एक राजकीय अस्तित्व दिलं. तोसुद्धा कधी आपली मावळी भाषा इतरांच्या डोक्यावर लादायला गेला नाही. मग हे 'शुद्ध' 'प्रमाण' भाषावाले टिक्कोजीराव कुठनं आले?
कॅप्टन जॅक स्पॅरोच्या 'पायरेट कोड' सारखी प्रमाण भाषा इज मोअर लाईक 'गाईडलाईन्स', नॉट 'रुल्स'. आम्ही आम्हाला पाहिजे ती मराठी बोलू. तुम्ही जा उडत!!...

आरारा - अरे, कितव्यांदा तोंडघशी पडायचं आहे? "चिंतनीय" शब्द आठवतोय? त्याचा अर्थ समजला का? असल्यास इथे मांडा मग बोलु. तोवर माझी तिच भूमिका - सायलेंस इज दि...

मला आरती करा
>>>>>>>>>>>>>>>>

त्यासाठी ऑपरेशन करुन घ्यावं लागेल. जमणारे का?

मराठी आणि ईंग्रजी व्याकरणाचे नियम असे शब्दशा भाषांतर करून बनत नाहीत आरारा. नाहीतर गूगल ट्रान्सलेटर नेहमीच जिंदाबाद असते.
>>>>>>>>>>>>

'अमितादिदी' आणि 'परकर बोलता करणे' हे अजरामर प्रकार आठवले.

Pages