गूगल हरवले आहे...

Submitted by sachin kulkarni on 30 June, 2018 - 15:15

प्रसंग १:
स्थळ: हिंजेवाडी IT पार्क, पुणे, आंतरराष्ट्रीय IT कंपनी
वेळ: सकाळी ९:१०
रमेश: सुरेश, लवकर गूगल वर शोध ना हा कोड…
सुरेश: हो रे, मी प्रयत्न करतोय पण गूगल चालतच नाही. नेटवर्क चालू आहे आणि इतर वेबसाईट ओपन होत आहेत.
रमेश: काहीतरीच काय? चल मी प्रयत्न करतो. हा कोड लवकर मिळाला पाहिजे.
सुरेश: ‘page not found’ मेसेज येतोय रे?
रमेश: हो रे...मला पण...नेटवर्क टिमला विचारू, चल...
प्रसंग २:
स्थळ: शिवाजीनगर परिसर, पुणे.
वेळ: सकाळी ९:१५
[राजेश स्वतःच्या गाडीने पहिल्यांदाच पुण्यात आला आहे. निगडी ला कसे जायचे हे तो गूगल map वर शोधतो आहे...पण आश्चर्य...’page not found’]
प्रसंग तिसरा:
स्थळ: चिंचवड, पुणे. [सर्व साधारण घर]
वेळ: सकाळी ९:२०
[सई: वय वर्ष ६: इंग्रजी माध्यमातुन शिकणारी मुलगी होमवर्क साठी आईची मदत घेत आहे.]
सई: आई, विंड-मिल चे स्पेलिंग सांग ना...
मंजू (सईची आई): थांब गं, गूगल वर शोधते आहे ना...
[पण आश्चर्य...’page not found’]
प्रसंग ४:
स्थळ: गूगल मुख्यालय, कॅलिफोर्निया. मुख्य ऑफिस
वेळ: रात्री ८
[गूगल ची उच्चस्तरीय तातडीची मीटिंग चालू आहे...संपूर्ण जगात गूगल चालत नाही; इंटरनेट चालू आहे पण गूगल ची वेबसाईट / होम पेज चालत नाही. सर्व संगणक तज्ञ गूगल का चालत नाही हे शोधण्यात अडकले आहेत.]

प्रसंग ५:
स्थळ: डेक्कन जिमखाना, पुणे.
वेळ: सकाळी ९:३०
[पेन्शनर आजी-आजोबांचा ग्रुप चर्चा करत आहे...]
आत्माराम आजोबा: अरे ऐकल का...गूगल बंद पडले म्हणे?
शांताराम आजोबा: हो माझ्या नातवानी आत्ताच मला whats app केली आहे हि breaking news...
सुशीला आजी: आपल्याला काय फरक पडतोय त्या गूगल नी...आपण नाही वापरले कधी आणि आपल्यावेळी होत का गूगल? तरी काम होत होती ना???
आत्माराम आजोबा: गूगल वर काहीही शोधलं तर सापडते म्हणे...दुसरी ‘अस्मिता’ च जणू...
[सगळे हास्यविनोदात मग्न...]
[
अर्धा तास गूगल बंद म्हणजे तर ‘हाईटच’ झाली होती. गूगल च्या तज्ञांना हा प्रश्न सुटत नाही म्हणजे...वेगवेगळे विचार बाहेर टीव टीव करू लागले (म्हणजेच बाहेर पडू लागले)...
शत्रू राष्ट्रांनी व्हायरस तर तयार केला नसेल ना ???
गूगल बंद पडण्यामागे परग्रहवासियांचा तर हात नाही ना ???
पावलोपावली गूगल वर अवलंबून असणारे आता पर्यायी मार्गांचा विचार करत आहेत.
]
प्रसंग १ उत्तरार्ध:
रमेश: गूगल कुठेच चालत नाही रे, आता काय करायचं?
सुरेश: हे बघ, लायब्ररी मधून मी पुस्तक आणले आहे. आपल्याला पाहिजे असणारा code आहे या पुस्तकात.
प्रसंग २ उत्तरार्ध:
राजेश ने मोबाईल बाजूला ठेवून १-२ लोकांना माहिती विचारली. लोकांनी योग्य माहिती दिली (पुण्यातले असूनही). राजेश सरळ पुणे-मुंबई रस्त्याने निघाला.
प्रसंग ३ उत्तरार्ध:
[ गूगल बंद असल्यामुळे मंजू डिक्शनरी ची मदत घेते आणि पाहिजे असलेले स्पेलिंग शोधते. कितीतरी दिवसांनी धूळ खात पडलेली डिक्शनरी बाहेर निघाली.]
**************************************************************
प्रसंग शेवटचा (झोपेतून उठण्याचा):
मंजू: अरे सचिन, उठ ना झोपेतून !!! आज कंपनीनी सुट्टी दिली आहे का?
[सचिन खडबडुन जागा झाला...पटकन मोबाईल वर गूगल टाईप केले आणि...आणि....गूगल होम पेज ओपन झाले.........]

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगले लिहिले आहे. पूर्वी निबंधाला विषय असायचा "वीज निर्मिती बंद झाली तर" आज हेच "गुगल बंद झाले तर" असे झालेय. काळ बदलला Lol

मस्तय

छान आहे. भावना समजली.
पण प्रॅक्टिकली खालील विचार मनात आलेच.
प्रोग्रॅमिंगची पुस्तकं छापणे आणि ती काल बाह्य होणे याचा वेग इतका जास्त आहे की अद्ययावत प्रणालीचं पुस्तक कोणी लिहिलंही असेल का कोण जाणे! दुसरं पुस्तकात काही सापडलं तरी ते अंतिम सत्य नसतं, ते युज करुन त्यातील अनुभवांवरुन त्रुटी काय आहेत याची चर्चा जी फोरम्स मध्ये होते ती सगळ्यात जास्त महत्वाची असते, आणि त्यातुन प्रश्न सोडवायच्या विविध पद्धती तयार होतात/ समजतात. हे सगळं पुस्तकात मिळण्याची शक्यत फार फार कमी असते.
दुसरं म्हणजे शोध सुविधा. मी लिमिटेड पुस्तकं वाचली असणारेत, सो मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर त्या पुस्तकात असेल तर मी चटकन शोधेन अन्यथा कशात मिळवायचं ? तर त्यावरची इतर पुस्तके शोधा. ती कशी शोधायची? बरं मिळाली तरी योग्य संदर्भ सापडायला अजुन वेळ जाणार.
सो ते काही प्रॅक्टिकल नाही.

पत्ता शोधणे हे नकाशातुन होउ शकेल. पण मी जाणारे त्यावेळची रहदारी ( ट्रॅफिक) , झालेले अपघात, बंद केलेले रस्ते आणि डिटोर, नवे बांधलेले रस्ते हे सगळं नकाशात कसं बरं मिळेल?
रोज पायाखालचा रस्ता असेल तरी जीपीएस लागतो कारण ट्रॅफिक आणि अपघात माहिती मिळुन आयत्यावेळी रस्ता बदलता येतो.

स्पेलिंग मात्र नक्की मिळेल.