Submitted by कटप्पा on 21 June, 2018 - 23:32
आजच एक धागा पहिला, एका इंग्रजी शब्दाला मराठी शब्द हवा म्हणून.
किल्ली यांच्या धाग्यावरही काही प्रतिसाद वाचले, महाराष्ट्रात लोकांनी मराठी बोलणे कसे महत्वाचे आहे आणि बाकीच्या अमराठी लोकांना मराठी कसे बोलायला भाग पाडले पाहिजे वगैरे वगैरे.
इतका मराठीचा अट्टाहास कशासाठी? मराठी मिश्रित हिंदी किंवा इंग्रजी मिश्रित मराठी बोलणे हे खूप कॉमन आहे आणि आपण याला सपोर्ट केला पाहिजे. निदान यातून आपण मराठी लोक काही इंग्रजी शब्द शिकू तरी.
आपल्याला काय वाटते???????
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला माझ्या निर्व्यसनी
मला माझ्या निर्व्यसनी असण्याचा आहे.>>>>
तुम्हाला शाखा चे व्यसन आहे हो ते दारूपेक्षा वाईट आहे.
तुम्हाला शाखा चे व्यसन आहे हो
तुम्हाला शाखा चे व्यसन आहे हो ते दारूपेक्षा वाईट आहे.
>>>
मी शाहरूखचा जब तक है जान अर्धाच पाहिला आहे.
तो काय तो हॅपी न्यू ईयर पाहिलाही नाही.
हॅरी मेट सेजल बघायचा विचारही केला नाही.
फॅन, रईस, डीअर जिंदगी एकेकदाच पाहिले.
याला व्यसन म्हणावे का?
बरं आवडत्या व्यक्तीला व्यसन म्हटले तर या जगात अशी एक व्यक्ती दाखवा जिच्या आवडीचे कोणीच नाही. उद्या लोकांच्या छंदालाही व्यसन बोलाल. आठवड्याचे पाच दिवस नऊ ते पाच चाकरी करणारयांना ऑफिसचे व्यसन आहे बोलाल.
रोज सकाळी उठून देवाच्या पाया पडणारयांना भक्तीचे व्यसन आहे बोलाल.
क्रिकेटचे व्यसन, चित्रपटांचे व्यसन, गाण्यांचे व्यसन, राजकारणाचे व्यसन, मायबोलीचे व्यसन .... या सर्वांना दारूच्या व्यसनाच्या पंक्तीत बसवून दारूच्या व्यसनाला सौम्य बनवायचा प्रयत्न आहे हा, बाकी काही नाही.
असो, धाग्यात दारू आणि शाहरूख आणलेत याबद्दल धन्यवाद
विषय भाषा शुद्धीकरणाचा आहे हे मात्र लक्षात असूद्या ..
मा़झा आता गोंधळ व्हायला लागला
मा़झा आता गोंधळ व्हायला लागला आहे.
अट्टहास, अट्टाहास की अट्टाहस ?
अत्त + हास असे आहे का ते ?
अत्त + हास असे आहे का ते ?
स्वतः घड(व)ले हा (आग्रह) की स्वतः (ला) हास ?
अट्टहास बरोबर आहे. आता ग्रहण
अट्टहास बरोबर आहे. आता ग्रहण वाचत आहे. त्यात आलाय अट्टहास शब्द.
भास्करा तुला समजेल अशा भाषेत
भास्करा तुला समजेल अशा भाषेत बोलायचे म्हणजे
कंबख्त तू शुद्ध भाषा बोललाच नाहीस.
किंवा
बिना भेसळ शुद्ध भाषेत बोललेल्या एका वाक्याची किंमत तुम क्या जानो भास्कर बाबू
रच्याकने - वय झालं की हजरजबाबी पणा कमी होतो का? फार विचार कर करून उत्तरं द्यावी लागतायत
<<<मराठी मिश्रित हिंदी किंवा
<<<मराठी मिश्रित हिंदी किंवा इंग्रजी मिश्रित मराठी बोलणे हे खूप कॉमन आहे आणि आपण याला सपोर्ट केला पाहिजे. निदान यातून आपण मराठी लोक काही इंग्रजी शब्द शिकू तरी.>>>
मराठीचे माहित नाही, पण चांगले इंग्रजी शिकायचे असेल तर इंग्रजीत मराठी, मराठीत इंग्रजी अशी भेसळ करू नका. कुठलीच भाषा धड बोलता येणार नाही. असे केवळ भाषा शिकण्याबद्दल वाटते, यात कुणि काय बोलावे याबद्दल काही मत नाही!!
लोकांना मी काय सांगणार?
नि "मायबोली" म्हणजे स्वतः बोलतो ती तीन भाषांचे मिश्रण केलेली भाषा असेच इथल्या कित्येकांचे मत आहे. त्याच न्यायाने इंग्रजी सुद्धा मराठी माणूस जे बोलेल तेच इंग्रजी.
कारण दुसर्या कुणाचे बरोबर असेल हे कुठलाहि मराठी माणूस प्राण गेला तरी मान्य करणार नाही!
आणि हेहि कुणि मान्य करणार नाही!
ज्याना मराठी चा अट्टहास
ज्याना मराठी चा अट्टहास करायचा त्यानी करावा. ज्याना नाही करायचा त्यानी करु नये.
सुलु आणि उरलेल्यांनी तुमच्या
सुलु
आणि उरलेल्यांनी तुमच्या मागे यावे का?
<<<महाराष्ट्रात राहणाऱ्या
<<<महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी लोकांना मराठी शिकवण्यापेक्षा आपण हिंदी शिकावी ते फायद्याचे असेल>>>
या महाशयांना कोपरापासून नमस्कार.. किती ते अकलेचे तारे तोडणे..
फार विचार कर करून उत्तरं
फार विचार कर करून उत्तरं द्यावी लागतायत
>>>
वेळेचा अभाव आणि माबोवर आले की लास्ट लॉगिनला काय चर्चा केलेली, कोणाशी वाद घातलेला हे डोक्यात राहत नाहीये. वा ठेवत नाहीये.
आणि वय वाढले असे बोलताहात जसे की ज्येष्ट नागरीकाशी बोलत आहात
येनीवेज, हे बालविवाहाचे दुष्परीणाम आहेत. त्यावर पंधरा ऑगस्टला स्वतंत्र धागा काढू..
आणि हो, कौन कम्बख्त शुद्ध बोलणे के लिये मायबोलीपे आता है ...
<<<महाराष्ट्रात राहणाऱ्या
<<<महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी लोकांना मराठी शिकवण्यापेक्षा आपण हिंदी शिकावी ते फायद्याचे असेल>>>
>> बरोबर तर आहे की.
जो एखादी नवीन भाषा शिकतो ते
जो एखादी नवीन भाषा शिकतो ते त्याच्याच फायद्याचे असते.
जो आपल्याच भाषेवर अडून बसतो तो आयुष्यभर तिथेच बसून राहतो.
तसेही मुंबईत हिंदी शिकावी
तसेही मुंबईत हिंदी शिकावी लागत नाही. ती ईथली फर्स्ट लॅगवेज आहे.
<<महाराष्ट्रात राहणाऱ्या
<<महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी लोकांना मराठी शिकवण्यापेक्षा आपण हिंदी शिकावी ते फायद्याचे असेल>>>
>> बरोबर तर आहे की.>>
मग परदेशी गेल्यावर आपण कशाला इंग्रजी बोलायची..शिकू दे की त्यांना पण नवीन भाषा..
वेळेचा अभाव आणि माबोवर आले की
वेळेचा अभाव आणि माबोवर आले की लास्ट लॉगिनला काय चर्चा केलेली, कोणाशी वाद घातलेला हे डोक्यात राहत नाहीये. वा ठेवत नाहीये.
आणि वय वाढले असे बोलताहात जसे की ज्येष्ट नागरीकाशी बोलत आहात >>>
अरे म्हणजे ज्ये ना नाही पण जरा मोठा आणि परिपक्व झालायस असं म्हणायचं होतं.
अरे म्हणजे ज्ये ना नाही पण
अरे म्हणजे ज्ये ना नाही पण जरा मोठा आणि परिपक्व झालायस असं म्हणायचं होतं.>>>> +११११११११
खरंच! ऋन्मेऽऽषशी बोलताना मोकळेपणा वाटायचा, आता तो गौप्यस्फोट केल्यापासून काहीही बोलायचं तर उगाच दडपण येतं!
आता तो गौप्यस्फोट केल्यापासून
आता तो गौप्यस्फोट केल्यापासून काहीही बोलायचं तर उगाच दडपण येतं!। >>>>
मला शुद्ध मराठी बोलायला
मला शुद्ध मराठी बोलायला शिकायचं आहे. कृपया माझी मदद करा!
चपाती बोलू की पोळी?
चावी बोलू की किल्ली?
(अख्खा भारत तर चपाती म्हणतो)
तसेच 'मै उससे मिला' चालतं पण 'मला रस्त्यात पाकीट भेटलं म्हणून मी पक्याला मिळालो आणि आम्ही पार्टी केली' म्हटल्यावर भुवया वर होतात!
सॉलिड कन्फ्युजन आहे. मला तर डाउटै की मराठी म्हणून आपण बोलतो (की म्हणतो?) ती मराठी नाहीच! खरी मराठी कुठेतरी चिंध्या नेसून फिरतेय आणि तिच्या जागी दुसरीच मिरवतेय!
मग परदेशी गेल्यावर आपण कशाला
मग परदेशी गेल्यावर आपण कशाला इंग्रजी बोलायची..शिकू दे की त्यांना पण नवीन भाषा.
>>> तुम्हाला मुद्दा कळला नाही. मी शिकवण्या बद्धल बोलत होतो. परदेशी लोक नॉन इंग्रजी लोकांना इंग्रजी शिकवायच्या फंदात पडत नाहीत , आपण जसे मोडके तोडके बोलू समजायचं प्रयत्न करतात.इंफॅक्ट आपल्याकडूनच इंडियन शब्द, छोटी छोटी वाक्य शिकतात.
आपण अमराठी लोकांना मराठी शिकवण्यापेक्षा हिंदी किंवा इतर भाषा त्यांच्याकडून शिकावी, फायदाच होईल पुढे.
चपाती बोलू की पोळी?
चपाती बोलू की पोळी?
(अख्खा भारत तर चपाती म्हणतो)
>>>>
भारताचा काय संबंध? अख्खा भारत मराठी नाही. महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकं काय बोलतात ते बोला. माझ्यामते चपाती. कदाचित पोळी हा शुद्ध मराठी शब्द असेलही, पण त्यामुळे गंडायला होते. कोणी म्हटले आज डब्यात पोळी आहे ये खायला तर आपण पुरणपोळीच्या अपेक्षेने जातो आणि साधी गूळपोळीही नशिबात येत नाही. म्हणून चपातीच. हॉटेलातही चपाती म्हणूनच मागावी लागते ना. मग घरी चपाती बोलायला कसली लाज आलीय. ईंग्रजांनी सुद्धा चपाती या शब्दाचाच स्विकार केलाय. त्यामुळे थोडा ग्लोबल विचार करा.
महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकं
महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकं काय बोलतात ते बोला. माझ्यामते चपाती.
--- पोळी पोळी पोळी.....
पोळी म्हणजे पुरणपोळीच्या अपेक्षेन जाल तर तुमची चूक. गेट आउट ओफ कम्फर्टझोन
एग ऑमलेटला मराठीत
एग ऑमलेटला मराठीत अंण्ड्याची पोळी बोलतात
शुद्ध मराठी बोलायला शिकायचं
शुद्ध मराठी बोलायला शिकायचं आहे. कृपया माझी मदद करा!>>>>>>
कृपया मला मदत करा
मुंबईत बायका मी आले, गेले
मुंबईत बायका मी आले, गेले ऐवजी मी आली मी गेली म्हणतात.
आणि गाणं, कविता म्हणत नाहित, बोलतात.
वर अंड्याच्या पोळ्या 'बोलतायत
वर अंड्याच्या पोळ्या 'बोलतायत' की!
मुंबईत बायका मी आले, गेले
मुंबईत बायका मी आले, गेले ऐवजी मी आली मी गेली म्हणतात.
>>>>
वर्षाताईंचे गाणे आहे ना गंमत जंमत मध्ये .. मी आले .. निघाले
यावरून एक विनोद आठवला, एक
यावरून एक विनोद आठवला, एक मुंबईची मुलगी पुण्यात राहायला जाते. असाच मस्त पाऊस पडत असतो. तिला आल्याचा चहा प्यायची हुक्की येते. पण घरात आले नसते. मग शेजारच्या काकूंकडे जाते. दार ठोठावते आणि म्हणते, काकू चहाला आले पाहिजे. काकू म्हणतात हो येणार ना
माझी कॉन्व्हेंटवाली एअर
माझी कॉन्व्हेंटवाली एअर होस्टेस मामी आहे, तिने अगदी सुरवातीच्या दिवसात ," साबुदाणा खिचडीत काय "टाकलेत" ?" असे विचारून आई चा प्राण कंठाशी आणला होता,
पण हे आता सर्रास होतंय.
पण हे आता सर्रास होतंय. हिंदीचा परिणाम आहे. डालना चं टाकणे.
Pages