Submitted by mimarathi on 22 June, 2018 - 08:51
नमस्कार,
माझी ७५ वर्षांची आई पुण्या जवळ तळेगाव येथे राहते. इथे अमेरिकेत ती ६ महिन्यांपेक्षा जास्त राहू शकत नाही. तसेच तिला इथे अजिबात आवडत नाही, कंटाळा येतो. ती एकटी राहते त्यामुळे मला सतत काळजी वाटत राहते. वृद्धाश्रमाचा विचार मनात आला तरी खूप अपराध्यासारखा वाटतं. सध्या तरी एखादे वर्ष ताबडतोब भारतात परत जाण शक्य नाहीये . माझ्या सारखेच अशा परिस्थितीतून गेलेले काही जण नक्की असतील, तरी कृपया मला काही तरी मार्ग सुचवा.
धन्यवाद.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
राम जन्मला नाही अजून तर
राम जन्मला नाही अजून तर रामेश्र्वर कसं वसेल? >> हा फारच लॉजिकल प्वाइंट आहे. फारच आवडलाय.
म्हणजे श्रावणबेळगोळा देखिल नंतर वसलं की काय?
आरारा काका आज अॅमीताईसारखे
आरारा काका आज अॅमीताईसारखे प्रतिसाद देताहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
राम जन्मला नाही अजून तर रामेश्र्वर कसं वसेल? >>>>> भारीच
राम या नावावर 'लेबल ऑर
राम या नावावर 'लेबल ऑर ग्राफिक ऑर ब्रँडनेम इमिटेशन इज अ पनिशेबल ऑफेन्स' वाला लीगल डिसक्लेमर नसावा श्रावण बाळाच्या काळात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दशरथ अँड कौसल्येने पण त्या काळचा पॉप्युलर नेम डाटाबेस पाहूनच नाव ठेवले असेल.
त्यामुळे 'राम जन्मल्याशिवाय रामेश्वर कसे' हा प्रश्न कदाचित मूट ठरावा.
रामाने लंकास्वारीआधी शिवलिंग
रामाने लंकास्वारीआधी शिवलिंग पुजले, म्हणून रामेश्वर आहे ते.
विकू,
विकू,
अथश्री अपार्टमेंट कॉम्प्लेक्स आहे,
तिकडे फ्लॅट भाड्याने घेऊन रहावा लागतो
तुम्हाला तिकडे भाडे किती आहे विचारायचे आहे का?
आरारा काका आज अॅमीताईसारखे
आरारा काका आज अॅमीताईसारखे प्रतिसाद देताहेत.
माझ्यासाठी हे कौतुकच आहे. आभार.
Happy
>>
पण तरी एकदा परत आत्मपरीक्षण करायला हवे, आपले प्रतिसाद फारच stereotype होतायत का ते!
===
माझ्या मर्यादित अनुभवावरून अशा लोकांसाठी मुंबई पुण्यापेक्षा सांगली सोलापूर सारखी टियर २ गावे बरी. मेडिकल सोयी असतात. खर्च तुलनेने कमी. कामासाठी माणसे / महिला मिळणे तितकेसे कठीण नाही. तळमजल्यावर घर मिळणे शक्य वा स्वतंत्र घराची किंमत अगदी प्रचंड नाही. शेजार पाजारची सपोर्ट सिस्टीम बरी. अर्थात पूर्ण आयुष्य मुंबईत गेले तर ते सर्व सोडून अशा ठिकाणी जणे अवघड आहे. >> सोलापूर नको ओ पाण्याची बोम्ब आहे. पण बाकी मुद्द्यांशी सहमत. सांगली, मिरज, नाशिक अशा ठिकाणी हवं.
आरारानीच कुठल्यातरी एका धाग्यात चांगला प्लॅन दिलेला म्हाताऱ्यांसाठी असा छोटा प्रोजेक्ट बनवायचा. मी जाईन तिकडे रहायला अजून वीसेक वर्षांनी, कदाचित आधीच. छोटीशी सेप्रेट रूम,बाथरूम, बेड, कपाट, पाणी, वीज, इंटरनेट असलं कि बास झालं. मेडिकल इमेरगेंसी सर्व्हिसची मला गरज वाटत नाही, बाकीच्यांना हवी तर असुदेत पण त्याचा भुर्दंड मला पडला नाय पायजे. नाहीतर मी सिंगल सीटर PG मधे राहीन![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
दुसऱ्याचे प्रतिसाद quote
दुसऱ्याचे प्रतिसाद quote करताना सुरुवातीलाही कंस बिंस टाका मंडळी.
>>दशरथ अँड कौसल्येने पण त्या
>>दशरथ अँड कौसल्येने पण त्या काळचा पॉप्युलर नेम डाटाबेस पाहूनच नाव ठेवले असेल.<<
पॉप्युलर? एक अख्ख्या (सहाव्या) अवताराच्या नांवात देखील राम आहे ना?..
राम नाव डेटाबेसात असण्याचा
राम नाव डेटाबेसात असण्याचा मुद्दा नाही. रामेश्वर हे रामाने स्थापलेलं ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे राम जन्मलाच नसेल तर रामेश्वर कुठून येणार. शंकर साशकिय कर्मचारी असल्यागत रामाने "साएब, ते पूलाच्या टेंडरचं बघा तेवढं, एकदम जंक्शन देवूळ बांधू इथे. पण पूलाचे मार्गी लावा" केलं. मराठीत ऐकायला बरं वाटतं नाही, संस्कृतात ज्योतिर्लिंग स्त्रोत्रात "सेतूबंधे तु रामेशं" म्हणून बरे वाटते.
तुमचे हे बाष्कळ आणि पांचट
तुमचे हे बाष्कळ आणि पांचट विनोद त्या बेकरीवर टाका, लोक खोटे खोटे हसतात तरी तुमच्या विनोदांवर तिथे.
मेडिकल इमेरगेंसी सर्व्हिसची
मेडिकल इमेरगेंसी सर्व्हिसची मला गरज वाटत नाही, बाकीच्यांना हवी तर असुदेत पण त्याचा भुर्दंड मला पडला नाय पायजे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
<<
वीसेक वर्षांनी जाल म्हणताय?
बरं.
मग तेव्हा बघू किती मेडिकल सर्विस लागते ते.
<<< बाकीच्यांना हवी तर असुदेत
<<< बाकीच्यांना हवी तर असुदेत पण त्याचा भुर्दंड मला पडला नाय पायजे. >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हे म्हणजे असे झाले की मी पहिल्या मजल्यावर राहाते तर सोसायटी मेंटेनन्समध्ये लिफ्टचा खर्च मी का भरू?
<<< मग तेव्हा बघू किती मेडिकल सर्विस लागते ते. Proud >>>
अगदी अगदी, माझ्या मनात पण हाच विचार आला.
तुम्हाला तिकडे भाडे किती आहे
तुम्हाला तिकडे भाडे किती आहे विचारायचे आहे का? << सिंबा हो. भाडे व ईतर खर्च किती आहे?
मग तेव्हा बघू किती मेडिकल
मग तेव्हा बघू किती मेडिकल सर्विस लागते ते. Proud >> मेडिकल सर्व्हिस नव्हे मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिस.
I mean टपकायची वेळ आली होती पण नंतर बेड रिडन १-२ महिने जगलो असलं काही नकोय.
पण तुम्ही म्हणताय तसं हा आताचा विचार आहे अजून वीस वर्षांनी काय होईल सांगता येत नाही.
आशा आहे कि त्याआधीच टपकणार नाही :P.
विकु, अथश्रीला साधारण ४५-५०
विकु, अथश्रीला साधारण ४५-५० हजार महिना भाडं आहे.
Bap re! Konte athashri don ka
Bap re! Konte athashri don ka teen aahet na? Punyat itaka bhade pahilyandach aikale.
माझ्या मित्राचे आई वडील
माझ्या मित्राचे आई वडील राहतात , चांदणी चौक च्या अथश्रित, त्याला विचारले आहे,त्याचे उत्तर आले की लिहितो
हे मी पाषाण ला असलेल्या
हे मी पाषाण ला असलेल्या अथश्री बद्दल लिहिलं आहे.
अथश्री चांदणी चौक (अम्ब्रॉशीआ
अथश्री चांदणी चौक (अम्ब्रॉशीआ हॉटेल समोर) 1 BHK इतका ऐवज असणारी जागा 15k दर महिना, वेगळा मेंटेनन्स नाही,
अर्थात ही जागा त्यांनी एक व्यक्ती कडून भाड्याने घेतली आहे, तेव्हा मालक मालकप्रमाणे आणि घराच्या साईझ प्रमाणे भाडे थोडेफार कमी जास्त होऊ शकते
Pages