मराठीचा अट्टाहास कशासाठी?

Submitted by कटप्पा on 21 June, 2018 - 23:32

आजच एक धागा पहिला, एका इंग्रजी शब्दाला मराठी शब्द हवा म्हणून.
किल्ली यांच्या धाग्यावरही काही प्रतिसाद वाचले, महाराष्ट्रात लोकांनी मराठी बोलणे कसे महत्वाचे आहे आणि बाकीच्या अमराठी लोकांना मराठी कसे बोलायला भाग पाडले पाहिजे वगैरे वगैरे.
इतका मराठीचा अट्टाहास कशासाठी? मराठी मिश्रित हिंदी किंवा इंग्रजी मिश्रित मराठी बोलणे हे खूप कॉमन आहे आणि आपण याला सपोर्ट केला पाहिजे. निदान यातून आपण मराठी लोक काही इंग्रजी शब्द शिकू तरी.

आपल्याला काय वाटते???????

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारएन्ड, पण बोलीभाषांमध्ये तितके फरक पूर्वापारच आहेत की! 'वर्दी' शब्द (जो मुळात मराठीत बाहेरून आला) तो अगदी आत्ताआत्ता 'गणवेष' या अर्थी रुळलाच की - अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत तो 'आगमनाची सूचना' या अर्थी वापरत असत. तेही पुण्यामुंबईत. नागपुरात मुळातच तो गणवेष याच अर्थी वापरत नसतील कशावरून? तिथे हिंदीचा प्रभाव आहेच.

किंबहुना म्हणूनच एक प्रमाण भाषा असावी आणि सर्वांकरता असलेल्या कामकाजात तिचाच वापर व्हावा असे म्हणतोय.

आता ती पुण्यामुंबईची आहे हे खरे. सध्या बदलाचे वारे असल्याने ती ही बदलायची असेल तरी हरकत नाही. 'अंगुस्तान विद्यापीठ' प्रमाणे महाराष्ट्राच्या नकाशावरून अंतरे बघून बरोब्बर मध्य जेथे येइल तेथील वापरू Happy

हे फक्त सर्वांकरता असलेल्या वापराबद्दल - सरकारी कामकाज, बातम्या, वर्तमानपत्रे वगैरे. स्थानिक बोलीभाषा कधीच अशुद्ध समजायचे कारण नाही, आणि तिच्या स्थानिक वापरात काही बदल करण्याचेही.

>>> महाराष्ट्राच्या नकाशावरून अंतरे बघून बरोब्बर मध्य जेथे येइल तेथील वापरू
नाही, इलेक्टोरल वोटसारखी काहीतरी वेटेजवर आधारित सिस्टिम हवी. (बघ मी किती इंग्रजी शब्द वापरले! Proud )

त्यांचा मुद्दा मराठीत हिंदी/इंग्रजीची भेसळ होण्याबद्दल आहे ना?

पण कळले ना सगळ्यांना! मग झाले तर. हवी कशाला इलेक्टोरल वोट पद्धत? नुकताच अमेरिकेत काय घोळ झाला माहित आहे ना!!

<>
ते १९१२ साली खरे होते नि आताहि. आता बर्‍याच ठिकाणी फक्त स्पॅनिश बोलतात म्हणून. तेंव्हा ब्रिटिश इंग्रजी अमेरिकेत नव्हते म्हणून.
म्हणजे १९४० सालचे पुण्याच्या सदाशीव पेठेत रहाणारे लोक जर आज परत पुण्यात अवतरले तर ते मराठी बद्दलहि म्हणतील की अहो पुण्यात गेली कित्येक वर्षात मराठी भाषा लुप्तच झाली आहे.

अट्टहास.
नवीन Submitted by चिनूक्स on 22 June, 2018 - 21:15
<<
Rofl

आणि त्या कुसुमाग्रज- मराठीभाषादिन धाग्याचे काय झाले? >>>
धागाकर्ते अडमीन ला प्यारे झाले

एक थंब रूल आहे, भाषा ती बोलावी ज्यातून आपण सर्वोत्कृष्ट पद्धतीने व्यक्त होऊ शकतो.

जशी प्रत्येक गावची बोलीभाषा असते तशी मुंबईतील मराठी माणसांची एक बोलीभाषा आहे ज्यात हिण्दी शब्द सर्रास असतात. आणि आता कॉन्वेंट मध्ये शिकणारया पिढीत तितकेच ईंग्रजी शब्दही असतात.

आमच्या मेंदूला शुद्ध मराठी भाषा हा एक कानांवरचा अत्याचार वाटतो.

खरेतर मी असाच अट्टाहस करेन की शुद्ध भाषा बोलून छळू नका _/\_

पण याबाबत कोणावर जबरदस्ती करू शकत नाही. एखाद्याला त्या आस्ताद काळेसारखी शुद्ध भाषाच बोलायची असेल तर त्याला नावं ठेवणेही चूक. काय बोलावे आणि काय ऐकावे याबाबत आपली चॉईस असावी. पण ती आपल्यापुरतीच !

अट्टहास हा देखील हट्टआसचा अपभ्रंश असावा अशी शंका घ्यायला वाव आहे.

हट्टआस = हट्ट + आस (एखाद्या गोष्टीची आस ठेवुन हट्टाने त्यामागे लागणे)... Proud

अशुद्ध ऐकले की आमचा छळ होतो त्याचं काय?
>>>

मला सर्वांनी प्रामाणिकपणे एका प्रश्नाचे ऊत्तर द्या.
सध्या मेजोरटी शुद्ध भाषा बोलणारयांची आहे का अशुद्ध भाषा बोलणारयांची?

स्वाती,
Why Can't The English? कविता मस्त आहे!

मेजॉरिटी तर दारू पिणार्‍यांची सुद्धा असू शकते.
>>>>>

मला नाही वाटत.
स्त्रियांमध्ये प्रमाण कमी असते. फार लहान मुले दारू पित नाहीत. स्त्रिया आणि लहान मुले मिळून लोकसंख्येचा मोठा टक्का बनतो. पुरुषांमध्येही कुठे सारेच पितात. ओवरऑल मेजोरटी न पिणारयांचीच असेल.

असो, आपल्याला काय म्हणायचेय ते मला समजले. पण मला काय म्हणायचेय तो अर्थ काढण्यात गल्लत करत आहात.
मेजोरटी विन्स असे सरसकट विधान मला करायचे नाही आणि हे प्रत्येक ठिकाणी लागूही होत नाही.

उदाहरणार्थ दारू पिणारे जास्त असले तरी त्रास नेहमी दारू पिणारयांचा न पिणारयांनाच होणार, उलटे होणार नाही.
आता हा, माझ्यासारखे न पिणारे उपदेशाचे डोस पाजत पिणारयांना त्रास देत असतील तर ती गोष्ट वेगळी.

असो, पण भाषेबाबत मात्र बहुसंख्य जनता जी भाषा बोलते, बहुसंख्यांना जी भाषा समजते, जी झेपते, जी आवडते, त्यातच संवाद साधणे उत्तम.
तुम्ही (म्हणजे कोणीही) जर शाळेत शंभर मार्कांचे संस्कृत घेतले असेल. आणि त्यात शंभर पैकी शंभर मार्कही मिळवले असतील. म्हणून ईथे संस्कृत वार्तालापच करू लागलात तर ईतरांना कसे झेपणार?

असो, पण दारू आणि भाषेची तुलना छान केलीत.
काही लोकांना भाषा टिकवणे गरजेचे वाटते, मला संस्कृती टिकवणे गरजेचे वाटते.
काही लोकांना आपल्या शुद्ध भाषेचा अभिमान असतो, मला माझ्या निर्व्यसनी असण्याचा आहे.

फक्त फरक ईतकाच मी ईतरांना विनंती करतो, अट्टाहस नाही Happy

समाजाचे जास्त नुकसान आणि र्हास हा अशुद्ध भाषेने होतो की दारूमुळे हे आता ज्याचे त्याने ठरवा. मला या वादात पडायचे नाहीये Happy

Pages