२०१८ वासंतिक गटग

Submitted by वैद्यबुवा on 24 May, 2018 - 10:38
ठिकाण/पत्ता: 
बुवा-सदन
माहितीचा स्रोत: 
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, June 9, 2018 - 10:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतर म्हणजे आणखी काय? <<< मी प्रत्येकवेळी नवीन काहीतरी आणण्याच्या प्रयत्नात असतो.... ते आणता येत नाही.

काक्वांच्या जिभेला पुरेसा तिखटपणा नाही राहिलेला असं वाटून फारएन्डने हॉट सॉस आणले होते. पुढच्या जीटीजीला त्याचे पांग फेडण्यात येतील. Proud

सायो - तू आणि विकु राहिले बहुधा. सगळेच राहिले असते. कोणीतरी कोणाचेतरी पॅकेज काढले बोलताना आणि अचानक आठवले की ते बॉक्सेस उघडायचेच राहिले होते. तोपर्यंत तू आणि विकु ऑलरेडी गेला होतात.

काक्वांच्या जिभेला पुरेसा तिखटपणा नाही राहिलेला असं वाटून फारएन्डने हॉट सॉस आणले होते. पुढच्या जीटीजीला त्याचे पांग फेडण्यात येतील >>> Lol टोटली. टीपापाकरांना हॉट सॉस म्हणजे पूर्वी वेस्ट इंडिजच्या टीमला भारतात ग्रीन टॉप दिले होते तसे आहे. हा जोक एबाबांपर्यंत पोहोचवा.

प्रवासामुळे (इथे खरंतर कार्यबाहुल्यामुळे वगैरे लिहायला आवडलं असतं, पण शेवटी मी म. म. आहे.) वृत्तांत* लिहायला थोडा उशीरच होतो आहे.

प्री-प्री गटग - रातराण्या वगैरे करून बुवांकडे येऊन पोहोचलो. तेव्हा त्यांनी मायेने बिर्यानी खाऊ घातली. त्यांनी बहुधा माझे वजन पाहून ती सगळीच्या सगळी माझ्या पोटात ढकलायचा** घाट*** घातला. पण मी झक्कींसारखी समयसूचकता वगैरे दाखवून तो हाणून पाडला आणि ताणून दिली ती जवळपास थेट फारेंडाच्या आगमनापर्यंत. बुवा बहुधा माझा झोपाळूपणा बघून दचकले असावेत, पण ते अत्यंत ग्रेशियस होस्ट असल्याने त्यांनी चेहर्‍यावर तसे काही भाव येऊ दिले नाहीत.

प्री-गटग - फारेंडाचे आगमन झाले, व त्याने शूज काढता काढताच बॅटींग सुरू केली. पण मी ह्या घटनेचा 'प्रत्यक्षदर्शी' नसल्याने मी ते रेडिओ कॉमेंटरीवर ऐकल्यासारखे नंतर ऐकले. मिसेस बुवांचे माबोकरांविषयी झालेले मत फारेंडास बघून थोडे सुधारल्यासारखे वाटले. ब.व. आणि बाटल्या आणायला जाताना बुवांनी 'तोवर कोणी आले तर त्यांना आत घ्या' अशी म. म. सूचना करताच मिसेस बुवांनी म. म. पत्नीच्या शिताफीने सर्जिकल स्ट्राईक करून हे 'मराठी लोकांचेच गटग आहे' ह्यावर शिक्कामोर्तब केले. Proud बुवा आणि फारेंड ह्यांच्याबरोबर निक जोनास व प्रियांका चोप्रा ह्यांबद्दल साधकबाधक आणि मूलभूत चर्चा झाली. त्यांनी वंदनाबेनकडे दोघांनीच जाऊन माझा बेनना भेटण्याचा चान्स हुकवला, पण ब. व. मागेच ठेवलेले असल्याने मी हळूच चार बटाटेवडे लंपास करून त्यांचा मूक बदला घेतला.

गटग - ब.व. आले पण माबोकर नाही, ही 'नेपथ्य आहे पण कलाकार नाहीत'**** अशी आगळीच अवस्था होऊ पाहत असताना हायझेनबर्ग आले. ह्यांचे आधीचे नाव चमन असल्याने ह्यांनी 'चमन की हायझेनबर्ग' हे ड्युअ‍ॅलिटी प्रिन्सिपल व्यवस्थित साधले. नंतर झक्कींचे आगमन होताच त्यांनी मलाच हायझेनबर्ग समजून 'हायझेनबर्ग की भास्कराचार्य' अशी ड्युअ‍ॅलिटी साधली. मग हळूहळू नेहमीच्या यशस्वी कलाकार मंडळींचे आगमन झाले. त्यातले काही कलाकार सस्पाऊस आले असल्याने त्यांनी त्यांच्या त्यांच्या ड्युअ‍ॅलिट्या साधून घेतल्या. 'ओरिजिनल की ड्युआय' ह्या माबोवरच्या ड्युअ‍ॅलिटीबद्दल तर काही बोलायलाच नको. बाकी निसर्गही 'ऊन की पाऊस' अशी त्याची एक ड्युअ‍ॅलिटी साधून घेत होता.

नंतर जेवताना 'गाजरहलवा की श्रीखंड', 'तर्रीदार वांगे की एक्झॉटिक मासे' अश्या ड्युअ‍ॅलिट्या आल्या. विकुंची कृष्णाकाठची वांगी कलेजा काटून गेली. बाईंच्या बारक्याने आणलेला सॉल्लिड टेक्श्चरवाला ब्रेड खाऊन मन एकदम इटालियन रेनेसाँ वगैरेच्या काळात गेले. सगळेच पदार्थ अगदी जबरदस्त होते. फारएण्डिराया येणार म्हणून व्हीताईंनी खास बॉलिवूडवाला गाजर का हलवा आणला, आणि प्रसंगास बहार आणली. इतकं सगळं खाऊन झोप येणार की काय असं वाटत असताना विकु आणि फा आयआयएससीबद्दल सुरू झाले आणि बाफ मंदावला असताना एकदम पन्नास पोष्टी याव्या, तसे स्फुरण सगळ्यांना चढले. एबाबा आणि झक्की एका वेगळ्याच ऐतिहासिक दृष्टीकोनातून सगळ्यांकडे बघत असल्याने प्रसंगास वेगळेच परिमाण प्राप्त झाले.*****

* माबोवरचे अनेक नामांकित वगैरे असलेले गजलकार वृत्तांचांच अंत पाहतात. तो हा नव्हे, तो करायला पेशल प्रतिभा लागते.
** आगगाडीतला कोळसेवाला भल्यामोठ्या इंजिनात कोळसे फावड्याने ढकलतो त्याप्रमाणे.
*** सिंडी किंवा हाब असते तर हा विळदचा असता. बुवा असल्याने त्यांना येवल्याच्या घाटाची आठवण येऊन त्यांनी हा जेवल्याचा घाट घातला.
**** म्हणजे एकंदरीत व्यावसायिक कलाकार अमेरिकेतल्या नाटकांमध्ये वेळ मारून नेतात असे ऐकतो त्याप्रमाणेच.
***** हे परिमाण वगैरे लिहायची संधी बर्‍याच दिवसांनी मिळाली, त्याबद्दल शुद्ध मराठीत झक्कींचे आणि एबाबांचे 'स्पेशल थँक्यू हं'.

(क्रमशः - कारण हा माबोवर असलाच पाहिजे म्हणून.)

(पुढे चालू)

हे चालू असताना सगळ्यांनी एकत्र दुसरीकडे बसायची फर्माईश आली, आणि चर्चेला वेगळीच खोली^ प्राप्त झाली.^^ मग गाडी एकदम सांकाच्या रूळावर गेली. बाई आणि त्यांचा बारक्या त्यांच्या सुंदर आवाजीने अगदी भूतकाळात गेले म्हणून मी माझ्या नर्डेघाशीने रॅप करून सगळ्यांना वर्तमानकाळात घेऊन आलो. कला कालातीत वगैरे असते ती अशी. माझा आवाज वाईट लागला तो विकुंनी पानातून शेंदूर खायला घातला म्हणून नव्हे, हे मी नमूद करतो.^^^ हे सगळे चालू असताना जी सांडलवंड होत होती आणि आगाऊ बाया येऊन काय जे म्हणत होत्या, त्याविषयी वर आलेच आहे. Proud बुवा ग्रेशियस होस्टाच्या भूमिकेत असल्याने लगेच ते साफ वगैरे करत होते. 'कार्पेट साफ करायला इतकी "का रपेट" ' वगैरे प्रश्न माझ्या मनात येऊन गेलेच. त्याचबरोबर ड्युअ‍ॅलिटीच्या थीमला अनुसरून मध्येमध्ये 'पाकीजा की शोले' वगैरे अश्या ड्युअ‍ॅलिट्याही येत होत्या. शेवटी 'चहा की कॉफी' ही महत्वाची ड्युअ‍ॅलिटी आल्यावर काही लोकांने मनात नि:श्वास सोडलेले ऐकू आले. Proud ह्याबरोबर झालेल्या अनेक गप्पागोष्टी इतरांनी वर लिहिल्याप्रमाणे झाल्या. त्यामुळे गरजेपेक्षा फूटेज त्यांना देत नाही. Wink फारएण्डिरायांनी लावणी गायची फर्माईश कोणी केली नाही, पण बहुधा त्यांच्या समतोल वगैरे व्यक्तिमत्वानुसार त्यांनी 'लावालावीची सवय आपल्याला नाही' वगैरे म्हणून ती उडवून लावली असती. फारतर 'शेतात कधी काम केलं नाही, त्यामुळे लावणी, कापणी वगैरे जमत नाही' असा एखादा मिनीबार गाडला असता. (मिनीबार बाटल्यांचा नव्हे. तो ते गाडत नाहीत.) परंतु बाई वाड्यावर आल्या होत्या आणि त्यांनी सांका केला, हेही नसे थोडके. बाहेर वारा आणि आत वाडा, दोन्ही फोफावले होते अगदी. त्यातून मै आणि सायो झक्कींबरोबर 'रोटिका का पटेल' अश्या पराठे-ड्युअ‍ॅलिटीत घुसल्या. 'पराठे की मराठे' अशी एखादी ड्युअ‍ॅलिटी येईल की काय असे वाटले, पण कोणी मराठे उसगावी असे दुकान काढतील अशी शक्यता सांप्रतकाळी वाटत नाही, हे कोणालाही 'पटेल'. नाही म्हणायला पुण्यातल्या एका औषधव्यवसायात पारंगत आणि अग्रगण्य असलेल्या बाईंबद्दल माहिती मिळाली. (पुण्यातल्याच ना हो त्या?) Wink

मग हळूहळू एकेक नंबर कमी होत गेला, फारएण्डाने जादूगाराची पोतडी एकदम उघडावी तशी पोतडी उघडून हॉटसॉसप्रदान केले, गोष्टी विसरण्याचे कार्यक्रम यथासांग पार पडले. आणि पीएचडीकडून जसे पोस्टडॉक, तसे गटगकडून आम्ही पोस्टगटग केले.

पोस्ट-गटग - बुवा त्यांच्या निसर्गरम्य वाटांवर आम्हां वाटसरूंना घेऊन गेले. फारेंडाच्या घरी आदल्या रात्री मुलांचा दंगा होऊन झोप न झाल्याने त्याचा गाडीत डोळा लागत होता.^^^^ पण 'फॉरएव्हर टूगेदर' वगैरे नावे कोरलेल्या झाडांच्या गच्च वनराईतून चालताना बेटा खुशीत आला. कदाचित मुळामुठेकाठी अश्याच ठिकाणी कोरलेल्या एखाद्या नावाची^^^^^ आठवण त्याला आली असावी. मग एकंदरीत भारत, तिथलं वातावरण अश्या वळणावळणांतून गाडी बुवांच्या घरी लिटरली आणि कॉर्पोरेट जगावर फिलॉसॉफिकली एकदमच आली. बर्‍याच गोष्टी शिकायला व ऐकायला मिळाल्या, आणि मग हे पोस्ट गटग संपले.

अशी ही पाचा उत्तरांची नसलेली आणी साठा उत्तरांत न मावलेली कहाणी सुफळ संपूर्ण झाली. Happy

^ बार गाडलाय प्लीज नोट.
^^ एक आवाज - * वरून आता ^ वर का गेलात?
दुसरा आवाज - ते चर्चाबदलाचे लाक्षणिक आहे. वेटींग फॉर गोदो वरून सुचलेले.
पहिला आवाज - पण तसंच का करायचं?
दुसरा आवाज - चूप्प्प!
^^^ आपल्याला हवी असलेली अफवा पसरवायची असल्यास 'हे असं झालं नसावं' असं म्हणण्याचं टेक्निक माबोवरच एका गुरूंनी दाखवलं आहे.
^^^^ 'मुलांचा दंगा परवडला, पण हे किती उच्छाद मांडतात Uhoh ' अशी पुटपुट झोपेत त्याच्या तोंडून निघत होती. Proud
^^^^^ कुठले नाव ते स्पष्ट झालेले नाही.

मासे खायच्या बाबतीत मी अगदीच लिंबूटिंबू ! आजवर ग्रिल्ड साल्मन शिवाय काही खाल्ले नव्हते. आल्या आल्या पापलेट चे तुकडे व आमटी ( सॉरी , कालवण ) प्लेट मध्ये घेऊन एकाग्रतेने काटे चुकवत आस्वाद घेत होतो तर हाब हस्तांदोलन करून डिस्टर्ब करून र्हायले! घरी आल्यावर माझ्या अंगाला महाभारत कलीन मत्स्यगंधेसारखा वास येत होता इती सौ. !

मी निष्कांचन निर्धन साधक.
वैराग्याचा एक उपासक.
मनात माझ्या का उपजावे
पापलेटाचे प्रेम..

( आता चिनूक्स प्रताधिकाराचा सोटा घेऊन येणार !)

भा Lol धमाल लिहीले आहे

बाई आणि त्यांचा बारक्या त्यांच्या सुंदर आवाजीने अगदी भूतकाळात गेले म्हणून मी माझ्या नर्डेघाशीने रॅप करून सगळ्यांना वर्तमानकाळात घेऊन आलो. कला कालातीत वगैरे असते ती अशी. >>> हे सर्वात आवडले Happy

घरी आल्यावर माझ्या अंगाला महाभारत कलीन मत्स्यगंधेसारखा वास येत होता इती सौ. ! >>> Lol
विकु, तुम्ही आता पापलेट. खाता. आलाच. पाहिजे. ची उजळणी करा.

भा Lol

त्या 'एक लाइकतर बनतोच'चा संदर्भ सांगा की कोणीतरी.

चर्चेला वेगळीच खोली^ प्राप्त झाली >>> Lol जबरी. हे निसटले होते. खालच्या नोट मुळे लक्षात आले. लिटरली आम्ही उठून दुसर्‍या खोलीत जाउन बसलो होतो.

बाय द वे आपले रेसिडेण्ट लावणीकार म्हणजे अमितव. लावणीचा आणि माझा काही संबंध नाही. शेतीच्या किंवा तमाशातील.
हे वाक्य
"do you know about chicks?"
"Fowl? No. Women? No"
या चालीवर वाचावे.

भाचा Lol भारी! मला वाटतं कित्येक वर्षांनी कोणी इतका सविस्तर वृत्तांत लिहिला. Happy

ड्युअ‍ॅलिटी ने भरलेला हा वृतांत सिंग्युलॅरिटीत आवडला.
Lol मस्त लिवलंय. तारांकित आणि गाजरांकित टीपा फोन वरुन काल नीट वाचता येत न्हवत्या त्या आता नीट वाचल्या. Rofl

बरं एक डॉयलॉग इथे द्यायचाच राहिला. नंद्या४३ यांना मी आठवण करून दिली की वैशाली वरच्या त्या सुप्रसिद्ध गटगला आमची भेट झाली होती. व तेव्हा आतेभावाच्या लग्नाकरता मी भारतात गेलो होतो, पण त्यांचा समज झाला की मी माझ्याच लग्नाला गेलो होतो. तेव्हा गटगला भेटल्यावर त्यांनी तसे विचारले होते.

या आठवणीवर हसून ते परवा पुढे म्हंटले, की "मग आतातरी झालेय का?"

भा .. धम्माल वृतांत Lol !
उसगाव अन तिथल्या गटगची आठवण झाली .. कसं काय पब्लिक? वृतांत वाचुन कळलं .. मजेतच असाल Proud

मस्तं मस्तं लिहिलियंस भा.
ते नगरमध्ये पीएचडी च्या क्लासला कोण जात होते म्हणे.. ते एक फार भारी डिस्क्शन चालू होते.

Happy हो ते नक्की काय होते? अंधुक आठवते.

बाय द वे भां चा वृ पुन्हा वाचला की काहीतरी नवीन रत्न सापडते.

तारे आणि गाजरं सर्वात भारी आहेत!! >>> Happy टोटली.

>>> नगरमध्ये पीएचडी च्या क्लासला कोण जात होते म्हणे.. ते एक फार भारी डिस्क्शन
हे नाही मला आठवत ऐकल्याचं. निराळ्या खोलीतलं असावं. Proud

पीएचडी च्या क्लासला Lol हो झक्की ती सिरियल बघतात ना "कट्टी बट्टी" त्यात आहे वाटते. त्यावर "नगर मधे असूही शकतील पीएच्डीचे क्लासेस" असंही कोणीतरी म्हणाले, बहुतेक हाब ? Happy

हो हो. हाबं नी ऑफीशियल कन्फर्मेशन दिलं. नगर मध्ये कसकसले क्लास असतील त्याचा भरवसा नाही.

Pages