२०१८ वासंतिक गटग

Submitted by वैद्यबुवा on 24 May, 2018 - 10:38
ठिकाण/पत्ता: 
बुवा-सदन
माहितीचा स्रोत: 
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, June 9, 2018 - 10:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुलावात रेडीओ ठेवला तर, चविष्ट, सुगंधी, रंगीबेरंगी, नि संगित पुलाव असा नवीन प्रकार होईल

हौ! फार फार मजा आली.
ह्या वेळी सगळे पदार्थ खालले मी. टॉप!
फिश फ्राय, करी, चिकन चेट्टिनाड, छोले! मग गाजर हलवा!
वांगंमय विकु थोडे उशिरा आले त्यामुळे ते खालले नाही पण ते आज ट्राय करेन. रेडियो राईस काल रात्री खालला. Happy
आपण इथलं लोकल पबलिक तर जमतोच पण भा आणि फा नी इतक्या लांब लांबून यायचं केलं ते विशेष म्हणावं लागेल.
भा पार बॉस्टन्हून इथे दोन दोन बॅगा संभाळत, ट्रेन /बस घेत आला आणि फा पण स्पेशल फक्त जिटिजि करता आला.

पु ल देशपांडे व फारेंड हे माझे आवडते लेखक आहेतच. त्यामुळे फारेंड यांना भेटायचा योग आला हे फार छान झाले. गडबडीत स्वाक्षरीची वही घरीच विसरली त्यामुळे त्यांचा संदेश व स्वाक्षरी राहिली. त्यांच्या प्रतिभासाधनेत व्यत्यय येऊ नये म्हणून फार बोललो नाही. पण वेंगसरकर शिवलकर पासून थेट आय आय एस सी मधल्या ज्योतिष विषयक कार्यशाळेबद्दल गप्पा झाल्या. आय आय एस सी मधल्या कार्यशाळेबद्दल त्यांचे मत अजूनही बदलले नाही हे पाहून त्यांचे हातपाय बांधून पूर्वी व्हिलन लोक "वसीहत के कागजाद" पर "दस्तखत" घेत तसे करावे असा विचात मनात आला. तसेही संख्यबळ आमच्या बाजूने होतेच.

पापलेट ची आमटी व तळलेले असे दोन्ही प्रकार मनसोक्त खाऊन बकेट लिस्ट मधल्या "पापलेट खाणे" यावर काट मारली. अस्सल मासेखाऊ पापलेट साठी का वेडे होतात ते कळले.

गाणीही छान झली. प्रत्येक गटगला कुणीतरी काहीतरी सांडले पाहिजे हा नियम मी कॉफी सांडून पाळला. अ‍ॅडमिन प्लीज नोट. तुमच्या एक्सेल शीट मध्ये त्या कॉलम मध्ये माझे नाव.

मजा आली काल. यावेळी रेकॉर्ड ब्रेक उपस्थिती होती म्हटले तरी चालेल! बुवा -बुवींनी चकाचक क्लीन केलेले घर मंडळांनी आल्या आल्या चटण्या वगैरे सांडवून पवित्र केले. वर आणि बुवा वॅक्यूम घेऊन आल्यावर एक आगाऊ बाई त्यांना " कशाला आत्ताच क्लीन करताय अजून खूप सांडायचे बाकी आहे" असं म्हणाली! Proud कुणीतरी ते सिरियसली घेऊन आख्खा कॉफीचा ग्लासही पाडला म्हणे नंतर. गुड लक गेटिंग दॅट थिंग ऑफ द कार्पेट, बुवा!:)
फूड चे फोटो काढायचे राहिले ! जबरदस्त मेनू अ‍ॅज युज्वल! फा, स्पेशल थॅन्क्स फॉर हॉट सॉस!! अजून उघडला नाहीये .

पापलेट ची आमटी > पापलेटची आमटी नसते हो. कालवण असतं. डाळीची आमटी असते. भरल्या वांग्याच्या भाजीत सोडे ( ड्राय फिश) घातलेहोतेत का? Happy

Lol
सो सॉरी if we felt like carpet nazis! आम्ही स्वतः कंटाळलो आहोत त्या कार्पेट ला. Can’t wait to get wooden floors done.
लिविंग रुम कारपेट के दामन पर दाग म्हणजे घरमालक के इज्जत पे उंगली असते, सो घाईघाईत ती सफाई करणं गरजेचं होतं. Happy
आणि ते मशीन त्या करताच घेतलं होतं त्यामुळे डाग टोटली ऑफ आहे.

(विकु) नो वरिज अ‍ॅट ऑल. Happy

आगाऊ बाई Lol

पाहून त्यांचे हातपाय बांधून पूर्वी व्हिलन लोक "वसीहत के कागजाद" पर "दस्तखत" घेत तसे करावे असा विचात मनात आला. तसेही संख्यबळ आमच्या बाजूने होतेच.>>>>>> Lol

<<<ज्यांनी कुणी सांडासांडी केली त्यांना अगदी कुठ्ठे न्यायची सोय नाही.>>>

अश्याने गटग होणारच नाही!
आता मी म्हंटले आगाऊ बायकांना अगदी कुठ्ठे न्यायची सोय नाही, तर मग स्वैपाक कोण करणार, मागून आवरणार कोण?
नाही म्हंटले तरी थोडा तरी उपयोग असतो बायकांचा गटग मधे, तर चालवून घ्यावे थोडे फार दोष. त्यातच मजा.
सगळे काही पुरुषांसारखे सर्वगुण संपन्न थोडीच. असणार?

टोटल धोपटून काढायच्या लायकीचा फुल टॉस आहे हा नन्द्या. Lol
मी थोडी सुरवात करतो.... Proud
एका पुरुष व्यक्ती काढून काही चुकून सांडलं = सगळे पुरुष सांडलवंड किंग्स असतात आणि त्या ला काऊंटर आर्गुमेंट म्हणून सगळे पुरुष सांडलवंड किंग्स असतात तर सगळ्या बायका आगाऊ क्वीन्स असतात हे मांडणे. प्लस पुढे गटग मध्ये स्वयंपाक आणि नंतरची आवरा आवरी हे बायकांचेच काम आहे ही गैरसमजयुक्त करॉलरी त्याला जोडणे म्हणजे मल्टाय लेवलांवर हा आर्ग्युमेंट खुपच मिसलिडिंग आहे नन्द्या, तर ... थोडं आण्खिन चिंतन मनन करणे गरजेचे आहे. (इतर औषधांबरोबर हे पण लिहून घ्या तुमच्या आर एक्स स्क्रिप्ट मध्ये, तुम्हाला (इतरांकडून) त्रास कमी होईल आणि मानसिक स्वास्थ्य लाभेल.
Lol

Lol जबरी आहेत वर्णने

आता आगाऊ बाई कोण ह्यावर गेस करु >>> त्यांनी स्वतःवरच सेल्फ डेप्रकेटिंग(*) कॉमेण्ट केली असावी.

टीपापात यालाच सेल्फ डेप्रकेटिंग म्हणतात.

प्री-गटग मधे बुवा, मी व भा "मेरे पास वंदनाबेन है" कडे गेलो. जाताना भासाहेब मागे फोनवर टिक्टिक करत बसले होते. सोनेरी केस वगैरे मुळे दोन काका लोकांबरोबर एखादा पुतण्या आल्यासारखे दिसत असेल. बुवांनी ग्रोसरी स्टोअर मधे जाताना पाणी आणायचे आहे म्हणायच्या ऐवजी बाटल्या आणायच्या आहेत म्ह्ण्टल्यावर भांनी सवयीप्रमाणे आयडी करता खिशात हात घातला तेव्हा पासपोर्ट घरीच राहिल्याचे लक्षात आले. मग उलगडा झाला की बाटल्या पाण्याच्याच आणायच्या होत्या. वंदनाबेन नी ही सेमी-प्रमुख पाहुण्यांची दखल घेत विचारपूस केली (म्हणजे व्हर्बलीच. नाहीतर माबोवर विपु शोधाल) आणि वड्यांबरोबर बोनस म्हणून चटणीही दिली. ग्रोसरी स्टोअर्स मधे हॉट कप न सापडल्याने तीन जण त्या आइलमधल्या शेल्फकडे मनन चिंतन करत उभे आहेत असेही एक चित्र काल तेथे दिसले असेल. असे मनन चिंतन पूर्वी काही स्पेसिफिक आइल्स मधेच होत असे.

मग आम्ही पुन्हा बुवा-सदन मधे आलो. हा झाला प्री-गटग वृ.

सांकाबद्दल बोलायचे राहिले. बाई, ल्हान्या , भा आणि होस्टांची गाणी मस्त झाली. भा ने आधीच केसांना रॉक स्टार लूक दिला होता त्यात हात अन खांदे उडवण्याच्या अदा, मधे मधे रॅप करणे ( कोण ते अडाणी लोक म्हणाले गाणे थांबवून मध्येच गप्पा सुरु झाल्या म्हणून?) आणि माइक नसला तरी फोन हाती नाचवत गाणे त्यामुळे कॉन्सर्ट चा फील आला एकदम. Wink
विकु, झक्की, फा , भा वगैरे मध्येच गहन राजकीय चर्चेत रंगले होते पण आम्ही तिकडे सरकलो तर बरखास्तच करुन टाकली त्यांनी चर्चा.
विकुंची वांग्याची भाजी आज खाल्ली आम्ही. भार्री झाली होती. नेक्ष्ट टायमाला विकुंच्या आईचा मसाला वाटी वाटी मागायाला पाहिजे Happy

फा Lol
बूट काढता काढता केलेली ब्याटिंग आणि पुढे वेगमन्स किस्सा टोटल लोल होता.

पोस्ट जिटीजि पण खुप गहन चर्चा झाली. हाबं ९:३० पर्यंत होता.

भाच्चा रॅप Lol

गटगमधले संवाद कोणाला आठवत आहेत का?

पाकीजा व शोले विकुच पाहतात ना आलटून पालटून?
"बसंती, आपके पाँव बहोत हसीं है! इन कुत्तों के सामने इन्हे जमीं पर मत उतारियेगा..." असे मिक्स अप् कोणाचे झाले?

तसेच "परदेशी, परप्रांतीय गुन्हेगारांच्या फोटोंज ना सगळेच लाइक करतात. या अस्सल मराठी फोटोला एक तरी लाइक बनतोच"

Lol
'लाइक'वाला डायलॉग आठवतोय, पण संदर्भ विसरले.

>> लिविंग रुम कारपेट के दामन पर दाग म्हणजे घरमालक के इज्जत पे उंगली असते
असं तुम्हाला कोणी सांगितलं? तत्काळ त्यांची संगत सोडा.
ती 'लिविग' रूम आहे, दॅट्स व्हॉट लिविंग बीइंग्स डू! दे स्पिल! (आठवा: मानव स्खलनशील आहे.) Lol

जोक्स अपार्ट, सर्व नेटिव्ह आणि व्हिजिटिंग अटेन्डीजमुळे भय्यंकर मज्जा आली!
ल्हान्याने प्रथमच तीन लोफ एकत्र बेक करायचा प्रयोग (उशीरा उठल्यामुळे नाइलाजाने Proud ) केला होता, पण ब्रेड वंदनाबेनच्या बटाटवड्यांना साजेसा झाला त्यामुळे मला हुश्श झालं.
बुवांचा बारक्या गंगूबरोबर बराच वेळ मस्त खेळत होता, त्याच्या सहनशक्तीचं कौतुक वाटलं. (त्याची सहनशक्ती इतकी डेव्हलप केल्याबद्दल कोणाला क्रेडिट द्यावं? Proud )
सगळेच पदार्थ भारी झाले होते, त्यात डावंउजवं सांगणं मुश्किल आहे.
पानामुळे मजा आली. सुदैवाने कोणी कार्पेटवर पिंक टाकली नाही. Proud
मतांच्या पिंका बर्‍याच पडल्या, पण त्या चौफेर होत्या आणि नेहमीप्रमाणेच कोणत्याही विषयाला कमीजास्त फूटेज मिळालं नाही हे नमूद करायला हवं. Proud

देसाईंचे मासे खरोखर एवढे एग्झॉटिक होते की विकुंसारखा तत्वनिष्ठं माणूस देखील आयुष्य भराची ऊपासना सोडून डायनिंग टेबलचा एक कोपरा पकडत आयुष्यात पहिल्यांनेच मस्त्यगंधेच्या (फिश करी) आस्वादात मग्न झाला. मी 'काय विकु का कसे काय?' म्हणत हात पुढे केला तर म्हणे 'ह्यात खूप काटे आहेत मल डिस्टर्ब करू नका' मी आपलं विकुंना चुकून काटा लागला तर ते एरॉटिक मोडमध्ये 'काटा लगा' म्हणतील की काय ह्या भितीने त्यांनी मासे खाऊन तृप्तीचा ढेकर दिल्यानंतरच पुन्हा सोफ्यावर त्यांचा बाजूला जाऊन बसलोच होतो की त्यांचा एनिग्मा पुन्हा कॉफीच्या रुपाने ऊफाळून आला. Proud

लॉस्ट अ‍ॅन्ड फाउन्ड : सायो माझं चाफ्याचं रोप विसरली, वृंदाताईंनी त्यांच्याकडे विसरलेली गंगूची टॉय कार आठवणीने आणली, शोनू यायचंच विसरली, मी यावेळी काहीसुद्धा विसरले नाहीये. भौतेक! Proud

हो मी पण आख्खा इं.पॉ, च विसरले होते अल्मोस्ट!! बाईंमुळे आठवण झाली निघता निघता!
सायो माझं स्विस चीज प्लँट पण विसरली!
देसायांना हॉट सॉस डिलिवर करायचा राहिलाच आहे अजून. आता आज उद्या करेन Happy
सगळेच पदार्थ भारी झाले होते>>
देसाईंचे मासे खरोखर एवढे एग्झॉटिक होते >>>दोन्हीला +१११

हो ना, मै चं स्वीस चीज प्लँट विसरले हे हायवेला लागल्यावर लक्षात आलं पण ऑलरेडी उशीर झाल्यामुळे परत मागे गेले नाही. पण बाईंचा चाफा माझ्या डोक्यातून साफ निघून गेला होता Uhoh आता ल्हान्याला पाठवा न्यायला प्लीज.

Pages