Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162
या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे
"शर्मिष्ठा राऊत"
'नन्दकिशोर चौघुले'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मामी - माझं वोट मेघा लाच.
मामी - माझं वोट मेघा लाच.
..आणि आपण आपेक्षा करतोय की
..आणि आपण आपेक्षा करतोय की आस्ताद सुधारलाय व त्याने नन्द्किशोरला भांडु नको म्हणुन समजवाव...
>> त्याची उच्च अभिरुची आणि काय

होना.. त्याच्या उच्च अभीरुची
होना.. त्याच्या उच्च अभीरुची व सक्षम अशा बुध्दिमत्तेला आउचा छळ होतोय व नन्दकिशोर छळतोय हे पटतच नसेल बहुतेक...
सई मेघा आणि ग्रूपला इतका
सई मेघा आणि ग्रूपला इतका सपोर्ट असण्याच एक कारण मला वाटत की त्यांची जी सुरुवात झाली ती अंडरडॉग म्हणून झाली..... क्रिकेट बघताना बहुतांशी त्रयस्थ प्रेक्षक जसा अंडरडॉग टीमला सपोर्ट करतो तशी सुरुवात झाली.... त्यातून रेशमटीमने (आम्ही सिनीअर्स वगैरे म्हणून) जो वारंवार ऑसीज सारखा माज दाखवला त्यातून मेघा टीमला सपोर्ट वाढत गेला!
मेघा टीमने क्वचित चुका केल्या आणि त्यांच्या चुका बऱ्याचदा हार्मलेस होत्या.... त्यांनी केलेली भांडणेही बऱ्याचदा reaction टाइप्सची होती!
आता जसाजसा प्रेक्षकांचा कल कळायला लागलाय तसेतसे रेशम आणि आस्ताद (परत एकदा उतरणीला लागलेल्या ऑसीजसारखे) अधूनमधून फेअर खेळतात!
आणि हा दरदिवशी बदलत जाणाऱ्या डायनॅमिक्सचा खेळ आहे..... जोपर्यंत चांगले खेळाल लोक सपोर्ट करतील!
+११११
+११११
स्वरुप योग्या शब्दात सांगीतलस...
स्वरूप, +१११
स्वरूप, +१११
>>म्हणजे जे झाल त्याला याचा
>>म्हणजे जे झाल त्याला याचा आडवळनाने पाठींबा..<<
तसं नाहि आहे हो. चौघुले मनात एखादा अजेंडा ठरवुन वाद उकरुन काढतायत, हे माहित असुन देखील आस्तादने (केवळ ब्राउनी पॉइंट्स स्कोअर करायला) लुटुपुटुचा तरी विरोध करायला हवा होता, अशी अपेक्षा करणं चूक आहे. त्याने तसं नाहि केलं तर अनएथिकल लोकांना पाठिंबा दिला असं जाहिर करायच, आणि केलं असतं तर इथेच कोणितरी परत त्याला "डबल ढोलकी" म्हणुन हिणवलं असतं. हे बरोबर नाहि. त्याला विरोध करायचाच असता तर त्याने चौघुल्यांसमोर केला असता, जेंव्हा त्यांनी त्यांचा प्लॅन बॉय्ज रुम मध्ये उघड केला. तेव्हढा प्रामाणिक आहे तो; "फुटेज साठी कायपण" गँगपासुन म्हणुनच त्याने फारकत घेतलेली आहे...
माझ्या मते, संपुर्ण रेशम गँगचं त्या भांडणांत आलिप्त रहाणं हे त्या "अंदरकि बात" मुळे असु शकतं; बघा जरा दुसर्या बाजुने विचार करुन...
एग्झॅक्ट्ली, डेलिया !
एग्झॅक्ट्ली, डेलिया !
तो नंकि आल्यावर सर्व प्रथम माझीही सेम रिअॅक्शन , अतिशय घाणेरडी नजर आहे त्याची बायकांच्या बाबतीत.
कृपा करून बिग बॉसने अंगचोटीला जाणारे झटापटीचे टास्क ठेऊ नये हा माणुस असे पर्यन्त !
मुलींना सिक्स सेन्स असतोच आणि याचं वर्तन्/प्लॅनिंग तर अगदी उघड उघड कॅमेराच्यात दिसतय.
राजेश हर्षदाला हिचा माज उतरवणार म्हंटला तेंव्हा त्याचीही एखाद्या रेपिस्ट सारखी नजर /अविर्भाव होता.
भुषण , सुशान्तही तसेच, बायकांना वाईट स्पर्श करणारे, खराब नजर असणारे..
भुषण चीप माणुस, राजेशला म्हंटला होता (रेशम)तुमचीच प्रॉपर्टी आहे, आणा उचलून !
सई म्हंटली तसे हे सगळे अतिशय चीप / डिस्ट्रक्टीव्ह मेंटॅलिटी पब्लिक आहे, नाक्यावरचे गुंड सगळे !
रेशम एक वेळ ठिक आहे, ती मुळात तशी नाही , संगतीने बिघडली आहे असं अजुनही वाट्तं कुठेतरी पण हे असले पुरुष ज्यांच्यात संभाव्य रेपिस्ट/ eve teaser दिसतो असले स्पर्धक मलाच काय , मला नाही वाटत कुठल्याच मुलीला आवडतील.
ते मागे बोलत नाहीत लिहिलय योग ने , पण म.मां नी विचारलं तुमच्यापैकी कोण मागे बोलत नाही ? यावर कोणीही हात वर केला नाही !
फरक असाय कि त्यांना फुटेज मिळालं नाही , शो फॉरमॅटचा आभ्यास करून आले नाहीयेत, पिकनिकला आल्या सारखे लोळत पडतात, एंटेरटेनिंग नसतील वाटले म्ह्स्णून नसेल दाखवल चॅनलने.
तरीही राजेश बोलायचा सईबद्दल बरेचदा, दाखवायचे.
Btw, पुष्करची अवस्था वाइट आहे असं का वाट्तय इथल्या काही आयडीज ना ?
बिग बॉसच्या घरातल्या तमाम पुरुषांना तर नेमकं उलट वाटतय कि आम्ही एवढे सिनियर पण पब्लिक मधे हा कल का आया हुआ छोकरा का पॉप्युलर ?
तो जेंव्हा जेंव्हा कोणी बायकांशी असभ्य वर्तन करताना दिसलय तेंव्हा स्टँड घेतला आहे म्हणून पब्लिकला आवडतो, मुख्य म्हणजे जोवर मेघाचा मित्रं आहे तोवर आवडणार, गेल्या आठवड्यात फक्त याच कारणाने तात्पुरत्या शिव्या खाल्ल्ल्या पब्लिकच्या.
अवस्था वाईट सध्या आस्तादची दिसतेय , ज्याला व्हिलन टाय्टल मिळूनही समजत नाहीये कि आपण का नाही आवडत लोकांना !
कॅप्टन कोण झाले?
कॅप्टन कोण झाले?
ल
ल
मामी... काळजी नसावी..
आपल्या कॉलेज मित्रांचा ग्रुप जो जगभर पसरला आहे ( भारता सहीत) त्यांचा फुल्ल पाठींबा आहे आपल्याला
Agadi Mami +1111111
राज, चौगुल्यांनी त्यांचा
राज, चौगुल्यांनी त्यांचा प्लॅन सांगितला. हा प्लॅन बिबॉचा आहे असं नाही सांगितलं. तेव्हा बायकांशी असभ्य वागणे, वाईट नजरा, ७२ वर्षाच्या बाईला( जिला काही हेल्थ इश्यूज आहेत! ) उचकवणे हा त्यांचा प्लान आस्तादला मान्य होता असंच दिसतं ना! तेव्हा त्याला त्याचा सोकॉल्ड मेंदू वापरुन गृप फोडायला हे असलं करणं योग्य नाही असं नाही वाटलं?
रेशम गँग ला कुठली अंदरकी बात माहित आहे? किशोर यांचा वैयक्तिक प्लान का त्यांना बिबॉनी या कामगिरीवर पाठवलं आहे हा प्लॅन?
सई झाली कॅप्टन
सई झाली कॅप्टन
शरा टू मेघा:
शरा टू मेघा:
"तू आत्ता रडलीस तर सब बनाबनाया गेम बिगड जायेगा!"
व्वा! शर्मिष्ठा आज अजुन आवडली!
रेशम गॅंगचे फोडा, झोडा आणि राज्य करा मेघा पक्की ओळखून आहे! आणि म्हणूनच तिने अनेकदा अपमान सहन करुनही ग्रूपला फूटू दिले नाहीये!
सईला बोलताना कुठे थांबायचे कळत नाहीये; शराकडून थोडा समंजसपणा घेतला पाहिजेल तिने!... तो पुष्कीपण तसाच, सपोर्ट देतोय का शंका घेतोय काहीच कळत नाही..... स्वताला फेअर सिद्ध करण्याचा किती तो अट्टाहास!
आऊ तर अजून महान!..... अग बाई काल तुझ्यासाठी कोण भांडायला उभे राहीले होते बघ की जरा आणि मग बोल!
बाकी रेशम आणि आस्तादने आज थोडे ब्राउनी पॉइंट्स मिळवले..... त्याखा ने जी लावालावी केलेली कळली त्यामुळे ते पण सटकले असणार त्याखावर जरा..... अजुन बना किंगमेकर!
आज सई छा गई. काय मस्त
आज सई छा गई. काय मस्त आर्ग्युमेंट्स केली तिनं आणि स्पष्टपणे आपल्या चुका, स्वतःतले दोष मान्य केले.
आज रेशम फार लोभस वाटली. अतिशय समजुतदारपणा दाखवला तिनं. रेशम इज लर्निंग फास्ट. मात्र रेशम आणि अस्तादचं मत सईच्या पारड्यात पडण्याचं कारण आहे सईनं केलेला त्याखाचा पोलखोल! रेशम-राजेश बद्दल त्याखाच्या कमेंट्स आणि अस्तादला रेडा म्हणणं त्याच्याविरोधात गेलं. शिवाय, कालच्या भांडणात त्यानं काही पवित्रा न घेण्यामागचा जो काही हेतू सांगितला त्यानंतर केवळ भूषण आणि स्मिताच त्याला पाठिंबा देऊ शकतात.
मात्र आजचे स्टार्स आहेत शरा आणि पुष्की. काय मस्त बोलले ते. डोक्यावर बर्फाची लादी ठेऊन एकसे एक सुयोग्य मुद्दे मांडून, सईला प्रश्न विचारून तिची कॅप्टनपदाची खुंटी बळकट केली त्यांनी.
मेघाबद्दल व्हिलनमंडळींच्या मनात इतका आकस आहे की तिची कोणतीही कृती त्यांना झेपत नाही. त्यामुळे या आठवड्यात तिनं दूर राहण्याचा निर्णय घेतलाय ते ठीकच. पण हे अति होतंय. आतापर्यंतचे जे कॅप्टन झाले त्यांनी काय स्वतःच्याच डोक्यानं कामं केलीयेत का? गृपची मतं लक्षात घेतली नाहीयेत की काय? व्हिलन गँग नेहमीच त्यांच्यातला कोणी कॅप्टन झाला तर गृप डिस्कशन्स करते की.
पण जाउ देत, या निमित्तानं व्हिमंच्या गृपात एक छोटीशी फट पडली हे उत्तम. त्याखाची परिस्थिती बिकट झालीये. न घरका, न घाटका.
आज खेळाआधी सई अस्तादनं तिला समर्थन द्यावं म्हणून त्याच्याशी बोलल्यावर अस्तादभाऊ तत्परतेनं बाथरूममध्ये जाऊन रेशमला सांगत होते की "मी इतका मेंदू वापरून, अनेक कॅल्क्युलेशन्स करून त्याखाला कसे जास्त पैसे द्यायचे याची व्यूहरचना केली (हे तो हात अगदी वर हवेत उडवत अतिशय अभिमानानं बोस्ट करत होता. मला तर बघून हसूच आलं.) ते काय सईला समर्थन द्यायला?"
पुढे सई आणि शरा त्याला म्हणाल्या होत्या की " अरे, पण तू का नाही त्याखा ऐवजी जास्त पैसे घेऊन कॅप्टन्सीचा उमेदवार झालास? तू जास्त डिझर्व करतोस." हे त्या मुद्दाम म्हणाल्या अर्थात, त्याच्या डोक्यात किडा सोडायला. तर त्यावर अस्तादचं भव्य उत्तर होतं की " हा कॅनवास खरंतर फार छोटा आहे पण मला किंगमेकर बनायला आवडतं. " पुढे तो पुन्हा मेंदूच्या वापराबद्दल काहीतरी बोलला.
मी इतका मेंदू वापरून, अनेक
मी इतका मेंदू वापरून, अनेक कॅल्क्युलेशन्स करून त्याखाला कसे जास्त पैसे द्यायचे याची व्यूहरचना केली>>
हा कॅनवास खरंतर फार छोटा आहे पण मला किंगमेकर बनायला आवडतं.>>
आस्त्याच्या डोक्यात भलतेच कहीतरी. आणि सुशांत ला आजारी म्हणून त्याला बदली कॅप्टन केले तर लगेच पहिला प्रश्न - त्याने मला इम्म्युनिटी मिळेल का? आणि म्हणे छोटा कॅनव्हास?!!
हा कॅनवास खरंतर फार छोटा आहे
हा कॅनवास खरंतर फार छोटा आहे पण मला किंगमेकर बनायला आवडतं. " पुढे तो पुन्हा मेंदूच्या वापराबद्दल काहीतरी बोलला. Rofl>>काळे खरंच धन्यवाद आहे असं काही बोलला असेल तर.. जाम डोक्यात जातो. तो आहे का नॉमिनेटेड? असेल तर जायला हवा ह्यावेळी.
If they make Marathi version
If they make Marathi version of big bang theory, Astad sure gets to play Sheldon Cooper
सई कॅप्टन झाली बरं झालं.
सई कॅप्टन झाली बरं झालं. त्यागराज होतोय की काय वाटायला लागलेलं. पर्सनली फार आवडत नसली, तरी तीच व्ह्यायला हवी अस वाटत होतं.
पुष्कर छान बोलला. आस्ताद आणि रेशम ने छान stand घेतला भले कारण काहीही असो, कदाचित गेलो किंवा राहिलो तर चांगुलपणा किंवा एकीकडे मेघाला शह वगैरे, किंवा त्या खा त्यांच्या विरुद्ध बोलल्याने असेल पण सई तशी डोकेबाज आहे.
मी लाडावलेली arrogant म्हणते ते बरोबर
, तिनेही मान्य केलं आज. सुधारेल म्हणाली.
शर्मिष्ठाचा रोल आता मोठा असेल
शर्मिष्ठाचा रोल आता मोठा असेल येत्या आठवड्यात असं वाटतंय. चांगलं समजावते ती grp मधल्याना.
बरेच एकेक आधी बाहेर पडले रे
बरेच एकेक आधी बाहेर पडले रे gang मधले तर आपली मतं सई कडे वळवतील, मेघा हरावी म्हणून अशी मला शंका यायला लागलीय
स्मिता आऊला बोलताना नुसती बघत राहिली काल त्याचा राग आला खूप.
आज जुईचा चेहेरा कसा झाला असेल bb बघताना जेव्हा आ आणि रे ने सईच्या बाजूने मत दिलं तेव्हा, हा विचार करून हसायला येतंय. जाम किरकिर केली असेल तिने.
>>तेव्हा बायकांशी असभ्य वागणे
>>तेव्हा बायकांशी असभ्य वागणे, वाईट नजरा, ७२ वर्षाच्या बाईला( जिला काही हेल्थ इश्यूज आहेत! ) उचकवणे हा त्यांचा प्लान आस्तादला मान्य होता<<
केवळ उचकवणे हा प्लॅन माहित होता; पण तो कुठल्या पातळी पर्यंत चौघुले नेतील हे ऑब्विय्स्ली माहित नसणार. चौघुले वहावत गेले यात दुमत नाहि पण त्यांच्या वर्तणुकिचं बिल आस्तादच्या नांवाने पण फाडणं मला थोडं विक्षिप्त वाटलं...
>>किशोर यांचा वैयक्तिक प्लान का<<
हो
मामींच्या अप्डेट्स्वरुन समजतंय कि आस्तादने येनकेन प्रकारे ब्राउनी पॉइंट्स मिळवलेच...
आज मेघाला बोलू दिले नाही
आज मेघाला बोलू दिले नाही लोकांनी. रेशम, आस्ताद, शर्मिष्ठा आणि पुष्कर यांनी छान मुद्दे मांडले. त्याखाचे मागे बोलणे उघड केल्यावर सगळे सईबद्दल आणि सईशी बोलू लागले. त्यावर किचौ बोलला कि झाली का ती कॅप्टन? झाली असेल तर उठूया खूप वेळ झाला बसून

मेघाचे सईची बाजू घेणे किंवा सतत मधे बोलणे हा मुद्दा जास्तच उचलला(त्यांच्यात फूट पाडायचा चांगला प्रयत्न) त्यावर आवर घालायला उना ने सैमे ला लांब झोपायची अट घातली. बेडवरच खूप मोठी रणनिती आखली जाते, जाऊ शकते असे दिसते. बेड शेअर करणे लयच अवघड आहे बिबॉसच्या घरात
बेड शेअर करणे लयच अवघड आहे
बेड शेअर करणे लयच अवघड आहे बिबॉसच्या घरात >>>
(No subject)
. बेड शेअर करणे लयच अवघड आहे
. बेड शेअर करणे लयच अवघड आहे बिबॉसच्या घरात >>>
बेड शेअर करणे लयच अवघड आहे
बेड शेअर करणे लयच अवघड आहे बिबॉसच्या घरात >>>☺
बेड शेअर करणे लयच अवघड आहे
बेड शेअर करणे लयच अवघड आहे बिबॉसच्या घरात >>>
आज सैने एक उत्तम खेळी केली ती
आज सैने एक उत्तम खेळी केली ती म्हणजे जेव्हा तिने त्याखाला उघडं पाडलं आणि त्याने आरोप नाकारले तेव्हा सैने ते प्रत्येक गोष्ट डिनायच करणार असतील तर मी नाही बोलणार अशी भुमिका घेतली. त्यामुळे आस्ताद रेशमला सैचे बोलणे जेन्युइन वाटले व त्यांनी सांगण्याचा आग्रह केला. एकूणच आजचा सैचा वावर उत्तम, समंजस वाटला. आज विकेंडचा वारमध्ये कळेल कसे फटाके फुटतात.
बादवे, मांजरेकरांनी स्किटचा टास्क दिलेला तो कधी असणारे??
बापरे किती मोठा interview तो
बापरे किती मोठा interview तो कॅप्टनशिप साठी. आस्ताद काय प्रश्न विचारत होता कालच्या भांडणाचे , स्वतः पण तर बघतच बसलेला की . मेघाला तर बोलूच देत नव्हते , स्वतः किती मध्ये मध्ये आणि मोठ्याने बोलतात , दुसर्याने बोललेले मात्र सहन होत नाही. मेघाचा सॉलिड धसका घेतलाय रे टीमने . बाकी औचं डोकं काय कुठे कसं चालत ते काय झेपेना मला. शर्मिष्ठा छान बोलली. त्याखा चं पोलखोल झाला म्हणून रे आस्तादचं मत सईला मिळालं. तो आस्तादला खरंच रेडा म्हणाला ? Rofl त्याच्या प्राणी संग्रहालयात अजून वाढ झाली मग :-p
काल सईला रे विचारत होती की
काल सईला रे विचारत होती की ती बेबीसिटिंगच्या टास्कमधे एक तास आत बसून काय करत होती. सई म्हणाली की बाळाला गोष्ट सांगत होते.
रे म्हणे 'इतका वेळ? बाळाला सतत फिरवायचा टास्क होता' तर सई म्हणाली की 'नाही. बाळाबरोबर खेळू पण शकत होतो आणि ममांनी तर माझ्या गोष्टीचं कौतुक देखील केलं'
त्यावर मेंदूधारी अस्ताद छद्मीपणे हसून म्हणाला ' आणि तुला ते खरं वाटलं? तू ते सिरियसली घेतलंस?'
आता हा ममांपेक्षही शहाणा!
Pages