२०१८ वासंतिक गटग

Submitted by वैद्यबुवा on 24 May, 2018 - 10:38
ठिकाण/पत्ता: 
बुवा-सदन
माहितीचा स्रोत: 
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, June 9, 2018 - 10:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाराबाफ वर पूर्वी अर्धा पाव खारीक, ख्जून बदाम पिस्त्याची एक्झॉटिक खिरापत मिळत असे, ती खुराक थांबल्यापासून बाफ मरगळला.
बारा आणि शिट्टी बाफ म्हणजे मायबोलीचे हडप्पा - मोहंजोदारो आहेत. Proud

बाराबाफवर मधे मधे फुंकर मारून धूळ हटवण्याचे काम मी करत असतो, शिट्टीचे माहित नाही....
कुठले मासे>>> चिन्याच्या दुकानातले,
कसे बनवणार- तळून, उकडून ... (ते काय मोदक आहेत तळून-उकडून आणायला? ) Wink
...
मी सध्या शेलफिश (कोलंबी, कुर्ल्या, लॉबस्टर वगैरे खात नाहीय.. ) तेव्हा मासा म्हणजे खराखूरा मासा... भाजून हवा असेल तर भाजून, आणि भातावर वाढण्याच्या आमटीतला हवा असेल तर तो.. आणि शेलफिश हवं/चालत असेल तर ते वेगळं घेऊन येईन.. पण 'गिर्‍हाईकाची गॅरेंटी हवी'.. Happy

मी सध्या त्रिदंडी सन्यास असतो तसा त्रिदंडी शाकाहारी आहे. वाटले तर कधीकधी चिकन ई. खातो Happy

बाय द वे पुन्हा हा बाफ वाचला. बुवा पहिल्याच पानावर मेलोड्रॅमॅटिक मोड मधे गेले होते. फार लौकर बाहेर आलेले दिसतायत.

मी सध्या शेलफिश (कोलंबी, कुर्ल्या, लॉबस्टर वगैरे खात नाहीय.. ) >>> सेम हिअर

कसे बनवणार- तळून, उकडून ... >> एअर फ्रायर नाही का तुमच्याकडे? Wink

आता आणखिन पथ्याचं सांगाल तर जे मिळणार आहे ते पण मिळणार नाय मित्रों! गप्प तश्रिफा घेऊन या. बाकी बघून घेऊ. Proud
(विसरु नका हा स्त्रीदंडी टीपापा बाफकरांचं जिटिजि आहे. जास टें टें केली की दंडी बसते/उडते)
Proud

विनयसुद्धा फिश आणणार हे ऐकल्यावर आमचे मेंबर वाढलेत. संख्येने. Proud

शिरगणती:

बुवा २+१ (श्रीखंड + पोळ्या + बटाटवडे + वाइन)
भाचा २
फा १
सायो १ (रेडिओ राइस)
एम्टी १ (चेट्टिनाड चिकन)
मी ३+१ (छोले, होममेड आर्टिसान ब्रेड, जमल्यास एक डेझर्ट, इच्छुकांना मेंदी)
मायावी २ (माया + गाजर हलवा)
शोनू १ (सुरळीच्या वड्या, फिश फ्राय)
पर्देसाई १ (एग्झॉटिक...एग्झॉटिक...एग्झॉटिक!!)
हाब १ (सिक्स पॅक पाव)
नंद्या४३ १ (चार प्रकारची आलागाश. एक प्रकारची गेलागाश) Proud

सो सध्या १६+२

नंद्या४३ १ (चार प्रकारची आलागाश. एक प्रकारची गेलागाश) Proud >> तीन प्रकारची गेलागाश असती तर त्यांच्या आयडीचा कोड (४३) आपोआप फिट्ट झाला असता.

स्त्रीदंडी >>> बुवा Lol

नन्द्या, तुम्ही काही बियर वगैरे आणत बसू नका. मी आणेन. मला आलागाश व्हाईट आणायची आहे स्पिसिफिकली. तुम्हाला कदाचित सापडायची नाही.

एअर फ्रायर नाही का तुमच्याकडे? >>>> डायेटवाले कोण कोण आहेत माझ्या शिवाय? >> अहो आरारांच्या एअर फ्रायरच्या बाफावरून गंम्मत केली. तुम्ही अगदी ताकातली सुरमई गुरगुट्या भातात घालून केळीचं पान लाऊन सुशी बनवली तरी आम्ही तितक्याच आनंदाने खाऊ. Lol

हाब १ (सिक्स पॅक पाव) >> पाव आणतो पण ते खाणार कश्याबरोबर? बटाटेवडे का?
नाही तर आंब्याची पेटीच घेऊन येतो, कोण आंबा कसा खातो त्याचं प्रात्यंक्षिक थेटच बघायला मिळेल, पुन्हा बाफवर लिहिल्यासारखाच खाल्ल्ला की नाही ते क्रॉस चेक पण करता येईल Proud

चालेल, हापूस आणा. Proud

पर्देसाई, मासे डायेटवर नसले म्हणजे झालं. हवंतर पकडण्याआधी त्यांचं कौतुक करा जरा - तेवढंच अंगावर मूठभर मांस चढेल त्यांच्या. Proud

चालेल, हापूस आणा. Proud >> मला एकदम शाळा मधला शिरोडकर आणि बेंद्रे बाईचा सीन आठवला.
बाई - हे खाकी (हापूस) ए का पण ?
शिरोडकर - (डोळ्यात पाणी आणून) खाकीचे (हापूसचे) बाई!
बाई - हे खाकी (हापूस) नाही पिवळं ए (पायरी ए).

बाबो! एकदम शिरेस मासेखाऊ आहेत की देसायनू! सोत्ता पकडून मासे खाता म्हंजे काय चष्टाय का राव?
बरं मी इतका शिरेस नैये ते. धोतर संभाळात कुडं कोंबडी बिंबडी पक्डू मी?
Lol

देसाईंची एक्झॉटिक लाइफ सायकल Happy
vinay exotic.png

भारी मैचित्र!
देसाई फोटोग्राफरला द्द्यायच्या टिपिकल पोझमधे वाटतायत म्हणजे जाळ्याकडे बघायचच्या एवजी कॅमेराकडे बघतायत ..

धोतर संभाळात कुडं कोंबडी बिंबडी पक्डू मी?>>> तुम्ही " कोंबडी पळाली" वर डॅन्स करा मग हाकानिका!

मै Lol

जाळ्याकडे बघायचच्या एवजी कॅमेराकडे बघतायत . >>> अय्या ! पाहिलं किती हुबेहूब चित्र काढते मी! प्राजक्ताला ते चित्र म्हणाजे फोटोच वाटला. Rofl

Lol सहीये.

पण टोपीखालून देसाईंचे केस दिसत आहेत...फाऊल झाला. Proud
फा असता तर त्याने त्या टोपीवरून मोनिकाच्या रेस्टॉरंटच्या ईन्स्पेक्शनच्या सीन ची आठवण काढली असती. Wink

लोल हाब!

मैचित्र भारी आहे. समुद्राचा वारा, मधल्या सीन मधे घातलेली टोपी कशामुळेही परदेसायांच्या हेअर स्टाइल मधे तसूभरही फरक पडलेला नाही. त्यांच्या नेहमीच्या सलूनमधेही ही जाहिरात म्हणून सहज खपेल. त्यात मायबोली टी शर्ट घालून ते मासे पकडतात Happy

Pages