१. मासा (हवा तो. साफ करून.) मी लोकली मिळणारा - फिश फार्ममधला- गोड्या पाण्यातला आमच्या कोळ्याने 'पिंक परी' असलं महान नांव सांगितलेला जिवंत मासा माझ्यासमोर टबातून काढून दिलेला सुमारे पाव किलो वजनाचा आणला होता.
२. हळद, लिंबू, मीठ : लावून ठेवण्यासाठी.
३. मसाले
तिखट
मिठ
आलं लसूण पेस्ट
जिरेपूड
धणेपूड
गरम मसाला
लिंबाचा रस
अन थोडा लोणच्याचा मसाला (केप्र)
चहाचा चमचाभर तेलात मिक्स करून.
४. बचकभर चिरलेली कोथींबीर
५. काकडी, टमाटा, बटाट्याचे काप.
सोप्पी आहे. संपूर्ण रेस्पि इथे लिहिण्याचा पॉईंट म्हणजे एयर फ्रायर नामक यंत्रात इतके सुंदर तळल्याच्या चवीचे मासे चमचाभर तेलात होतात, हे सांगणे असा आहे.
माशाला ३ पाण्यातून स्वच्छ धुवून हळद मीठ लिंबू लावून ठेवायचं. मग एक २-५ मिन्टांनी वरचे सगळे मसाले मिक्स करून चांगले चोळून लावायचे.
धीर धरवेल तितका वेळ मॅरिनेट होऊ द्यायचं.
एयर फ्रायर सेटिंग्ज :
३ मिनिटे, किंवा हिटरचा लाईट बंद होई पर्यंत १८० डिग्रीला चालू करा. याआधी मधल्या नॉनस्टिक भांड्याला हाता/ब्रशने ८-१० थेंब तेल चोपडुन घ्या.
त्यानंतर भांडे बाहेर काढून त्यात आधी बटाटे, टमाटे, कांदे, ढोबळी, झुक्किनी इ. जे असेल ते माशाच्या उरलेल्या मसाल्यात घोळून खाली पसरा. त्यावर मासा/तुकड्या ठेवा, अन भांडे एयरफ्रायरमधे घाला. हवे तर थोडे तेल ब्रशने लावा/स्प्रे करा.
टोटल टाईम २० मिनिटे. (पाव किलो मासा प्लस शे दीडशे ग्रॅम भाज्यांसाठी)
१० मिनिटांनी (अर्धा कुकिंग टाईम) पॅन बाहेर काढून मासा उलटवा. हवे तर ब्रशने तेल लावा.
२० मिनिटात चांगला कडक तळला जातो.
पुरेसा तळल्यासारखा नाही वाटला तर पुन्हा भांडं आत ढकलून दोन पांच मिनिटे अजून तळा. हाकानाका!
या यंत्रात कमीत कमी तेलात तळल्यासारख्या चवीचे पदार्थ बनवता येतात. आम्हाला (फुकट) भेट मिळालेल्या चायनामेड एयरफ्रायरमधे वरील पाकृ बनवलेली आहे. बेसिकली एक शेगडीची कॉईल, पंखा, अन बंद तंदूरटाईप भांड्यात एक जाळीदार नॉनस्टिक भांडे अशी अॅरेंजमेंट असते.
माबोवर या प्रकारे कुकलेल्या रेस्पिज फारशा नाहीत म्हणून ही एक टाकली.
मस्त दिसते आहे. तोंपासू!! पण
मस्त दिसते आहे. तोंपासू!! पण एव्हढे काटे बघूनच घाबरले. मला काटेवाले मासे खाताच येत नाहीत
एअर फ्रायर नसल्याने त्यात केलेले पदार्थ कसे लागतात ते माहीत नाही. पण तेल लावून बेक केलेला मासा आणि एफ्रा मधे कूक केलेला मासा यांच्या चवीत फरक असावा असे वाटते.
एफ्रा वापरून केलेल्या पाकृ लिहा अजून म्हणजे त्याचे महत्व पटून तो आणला जाईल
प्रेझेटेंशन जमलय .
प्रेझेटेंशन जमलय .
एअर फ्रायर घरी तळण जास्त होत असेल तर घे असा सल्ला मिळाला त्यामुळे ते घेतल नाही
छान...
छान...
Air fryer मध्ये खूप कमी
पिंकी बाई छान दिसतायत, एक्दम टेम्पटिंग
पण या लग्नी आमच्याकडे मासे बनतील अशी शक्यता नाही, त्यामुळे पाककृतीला माझा पास,
Air fryer मध्ये खूप कमी तेलात पदार्थ तळला जातो हे खरे आहे, पण त्याला वेळ जास्त लागतो, साधारण 4माणसांचे कुटुंब तो पदार्थ खाणार असेल तर खूपच जास्त वेळ लागू शकतो (एका घाण्यात 2 सामोसे, त्याला 15 ते 20 मीनिटे मग 4 माणसांचे किमान 8 सामोसे तळायला किती वेळ लागेल?)
केवळ या एका मुद्द्यावरून आमच्याकडे त्याची खरेदी होल्ड वर आहे
केवळ या एका मुद्द्यावरून
केवळ या एका मुद्द्यावरून आमच्याकडे त्याची खरेदी होल्ड वर आहे>> माझीही याच मुद्द्यावरून रद्द झाल्यात जमा आहे.
मासे खात नसल्याने पाकृला पास. पण दिसत्ये छान!
मासा दिसतोय छान.
मासा दिसतोय छान.
माशाला,ध.जि.पूड आणि लोणचे मसाला ये बात कुछ हजम नही हुई.खैर अपनी अपनी पसंद.
माबोवर या प्रकारे कुकलेल्या रेस्पिज फारशा नाहीत म्हणून ही एक टाकली.>>>>> आवडलं!
एयरफ्रायर ची क्रेझ
एयरफ्रायर ची क्रेझ गेल्यावर्शी फार होती आता फार चर्चा नाही.
माशाला आलं लसूण पेस्ट,
माशाला आलं लसूण पेस्ट, जिरेपूड, धणेपूड, गरम मसाला आणि लोणच्याचा मसाला (केप्र) हे वाचुनच उत्साह मावळला.
एका मासा फ्राय करायला शे दिड्शे ग्राम भाज्या घालाव्याच लागतात का एफ्रा मधे? की नुसता मासा फ्राय होतो?
फायनल आउटपुट छान दिसतंय.
डॉक्टर साहेब, तुमच्या पाकृ
डॉक्टर साहेब, तुमची पाकृ लिहिण्याची शैली जाम आवडते म्हणून हे ही आवडलं !
--- एक Eggetarian
एका मासा फ्राय करायला शे
एका मासा फ्राय करायला शे दिड्शे ग्राम भाज्या घालाव्याच लागतात का एफ्रा मधे? की नुसता मासा फ्राय होतो?
<<
नुस्ता मासा नक्कीच फ्राय होतो. भाज्या अन बटाटे घातले, की वन डीश मील तयार होतं. प्रोटीन्,स्टार्च अन व्हेजिटेबल्स वालं. लो अॅडेड फॅट. माशात जे असेल तितकंच. अन माशातलं फॅट ओमेगा३ वगैरे हेल्दी असतं. ते वेगळंच.
***
(एका घाण्यात 2 सामोसे, त्याला 15 ते 20 मीनिटे मग 4 माणसांचे किमान 8 सामोसे तळायला किती वेळ लागेल?)
<<
एका घाण्यात किमान ६ मध्यम आकाराचे सामोसे होतात. भांडं गच्च भरलं तरी चालतं. आधी सामोसे 'तळून' ठेवायचे अन ऐन वेळी मावेत गरम करून वाढायचे. हाकानाका. तेलात तळणे अन नंतर तळलेले तेल फेकणे हा पराक्रम करण्यापेक्षा हे प्र्करण बरंय. शिवाय आमच्याकडे सध्या आम्ही दोघंच शिल्लक आहोत. अन दोघांना मिळून तळलेले ४ सामोसे ८ दिवस पुरतात, तेव्हा...
नेक्स्ट रेसिपी शेगाव कचोरीची टाकतो. तुम्हा घासफूसवाल्यांसाठी.
मासा मस्त दिसतोय. आज रात्री
मासा मस्त दिसतोय. आज रात्री मासा खावाच लागणार!
पण एअर फ्रायर नाही. तेव्हा ओव्हनमध्ये असाच करुन खातो.
तुम्ही अशाच रेसिप्या टाकत राहिलात तर एअर फ्रायर कार्ट मध्ये लवकरच येईल
मस्त दिसतयं. पण आम्ही
मस्त दिसतयं. पण आम्ही घासफूसवाले.
नेक्स्ट रेसिपी शेगाव कचोरीची टाकतो. तुम्हा घासफूसवाल्यांसाठी. >>> हो, प्लीज मनावर घ्या.
भारी दिसतोय! तोंपासु!!
भारी दिसतोय! तोंपासु!!
एअर फ्रायर घ्यायचा चान्स नाही, पण आता मासा खावा लागणार.
(अवांतरः तुम्ही एअर फ्रायर घेतल्याचं आश्चर्य वाटलं. खरंच का घरगुती नैमित्तिक तळण - शॅलॉ फ्रायसुद्धा - इतकं वाईट आहे?)
मासा मस्त दिसतोय !
मासा मस्त दिसतोय !
सही आहे हे! इथे तो मासा बहुधा
सही आहे हे! इथे तो मासा बहुधा मिळणार नाही पण इतर कोणतातरी घेउन करून पाहायला हवे.
रेसिपी छान वाटतेय. लिहीलेय पण
रेसिपी छान वाटतेय. लिहीलेय पण छान.
ए. फ्रा. नाहीये. आणायचा विचारही नाही. ओव्हन किंवा शॅलो फ्राय करुन बघेन कधीतरी.
केप्र लोणचे मसाला --- कैरी लो.म. , लिं. लो.म. , मि. लो. म. -- यातला कोणता म वापरला ?
अवांतरः तुम्ही एअर फ्रायर घेतल्याचं आश्चर्य वाटलं. >> स्वाती, त्यांनी लिहीलंय की त्यांना तो ए. फ्रा. फुकट मिळालाय.
अरे हो, सॉरी- ते माशापुढे
अरे हो, सॉरी- ते माशापुढे दिसलं नाही.
But the question remains - खरंच आवश्यक/healthier आहे का ते?
मला एअर फ्रायर खूप आवडतो!
मला एअर फ्रायर खूप आवडतो! अवनपेक्शा एआ मधल्या गोष्टी चविष्ट वाटतात. मस्त तळल्या जातात.
रेसिपी छान! मी कॉस्कोतला फ्रोझन टॉर्टिया क्रस्टेड तिलापिया हवेत तळते. सुपर्ब लागतो.
सही दिसतोय मासा!
सही दिसतोय मासा!
ए फ्रा घ्यावा का?
Veg recipes lihilyat tar bar
Veg recipes lihilyat tar bar padel mala. Cookies, muffins nako breakfast kinva jevayla chaltil ashya tikhatamithachya majhyakade air fryer ahe pan fries vyatirikt vaprla jat nahi.
मासे, एअर फ्रायर, लोणचं मसाला
मासे, एअर फ्रायर, लोणचं मसाला नी इतर सर्वच आहे घरी तर करून बघते. हा काट्याने कापलेला भाग छान रसरशीत दिसतोय.
वाहशेफ च्या एअर फ्रायर रेसिपीज छान आहेत, मला आवडतात.
https://www.youtube.com/playlist?list=PLNr2FIoikJCdpU-qh4F3OPeW82tRk07U0
( हे पाहिल्या नंतर झिंगलेले चिकन पण बघा. मला ते बघायलाच आवडतं. करायचा पण विचार केला पाहिजे
https://youtu.be/6skjbVDVEg4 )
ड्रंकन चिकन उर्फ बियर बम चिकन
ड्रंकन चिकन उर्फ बियर बम चिकन करायचंच आहे कधी तरी. बघू कधी मुहूर्त लागतोय.
*
@ इबा
घरी केलेलं प्रासंगिक तळण अजिबात चुकीचं नाही. जेवणात फॅट इनटेक हवच.
फक्त वर सांगितलंय तसं दोघांच साठी तळण केलं, तर ४ सामोसे तळून मग कढईभर तेल फेकावं लागतं. कारण ते रियुज करायचं नाही असा काकूंचा दंडक आहे. अन सामोसा बुडेल इतकं तेल तर घ्यावंच लागतं तळताना. तेच तळण इथे कमी वेस्टेजमधे होऊन चवही (ऑल्मोस्ट) तशीच लागते इतकंच. अर्थात, एयरफ्रायरमधे भजी तळता येत नाहीत. मोठ्या कष्टाने अगदी कोरडं पीठ होईल इतपत भिजवून खेकडा भजी केली होती एकदा. बरी जमली होती.
मासा पाहुन तोपांसु.पण..पण
मासा पाहुन तोपांसु.पण..पण तेलात तळल्यावर ती थोडी खरपुस करपलेली टेस्ट अस्ते ती मिस्स होनार.
ए.फ्रा मधे तंदुर इफेक्टच येतोय की.
फिश एकदम टेम्प्टींग दिसत आहे.
फिश एकदम टेम्प्टींग दिसत आहे. अगदी तोडाला पाणी सुटल. करुन बघणार पण तव्यावर शॅलो फ्राय करणार.
एअर फ्रायर घरी तळण जास्त होत असेल तर घे असा सल्ला मिळाला त्यामुळे ते घेतल नाही << तळण न करायच कारण जास्त तेल अनहेल्दी असल्यामुळे न खाणं हे आहे की चव आवडत नाही हे आहे? चव आवडत नसेल तर प्रश्नच नाही. पण तळलेल्या सारखी चव पण पोटात कमी तेल जाईल अस पाहीजे असेल तर एअर फ्रायर चांगला ऑपश् न आहे ना?
भाज्या अन बटाटे घातले, की वन
भाज्या अन बटाटे घातले, की वन डीश मील तयार होतं. >>>>माशाचा अपमान!.डाळीच्या आमटीबरोबर्/सोलकढीबरोबर माशाला सद्गती मिळते.
>>दोघांच साठी तळण केलं, तर ४
>>दोघांच साठी तळण केलं, तर ४ सामोसे तळून मग कढईभर तेल फेकावं लागतं.>> आरारा, ह्याकरता सामोसे अवनमध्ये बेक करणं ह्या ऑप्शनचा विचार नाही केलात का?
फक्त वर सांगितलंय तसं दोघांच
फक्त वर सांगितलंय तसं दोघांच साठी तळण केलं, तर ४ सामोसे तळून मग कढईभर तेल फेकावं लागतं >>>> तळणीचं उरलेलं तेल फेकणं उद्योग आमच्याकडे पण चालतो. पण आमच्याकडे समोशांपेक्षा पुर्या, मेदुवडे हे प्रकार जास्त करून तळले जातात. शॅलोफ्रायमध्ये केळ्याचे काप, पॅटिस/कटलेट आणि वर्षातून एकदा किंवा दोनदा मासे. होतात का हे प्रकार एयरफ्रायरमध्ये? हे सगळे प्रकार होत असतील तर मी नक्कीच घेइन एफ्रा.
येस, मेक्स सेन्स. धन्यवाद,
येस, मेक्स सेन्स. धन्यवाद, आरारा.
लोकहो,
लोकहो,
एयर फ्रायर अन ओटीजी हे बर्यापैकी इंटरचेंजेबल आहेत. एक पंखा एक्स्ट्रा आहे यापलिकडे एफ्रा मधे जास्त काही नाही. पण त्यामुळे तळल्याचा फील अन टेस्ट येते हे नक्की. थोऽडा वेगळा प्रकार आहे, अन कामाचा आहे. फिलिप्स चे १० हजाराचे अन चायनामेड २ हजाराचे, आउटपुटमधे फार फरक पडत नाहीये हे मला तरी दिसलेय. (आमच्या एका मित्राकडे फिलिप्सचा विकत घेतलेला एफ्रा आहे. किंमत नक्की ठाऊक नाही, कुकिंग क्वालिटी सेम)
ही पाकृ यंत्र घरी पडलेलं आहे, अन वापरलं जात नाही, अशांसाठी आहे असे समजा. असेही भारतीय स्वयंपाकात पारंगत गृहिणींनी विकत घेतलेल्या नव्या गॅजेट्सपैकी कुकर्/मिक्सर्/फुप्रो या उतरत्या क्रमात आत्मसात केलेल्या प्रकारांशिवायचे मावे/ओटीजी/एयर फ्रायर/सोलार कुकर इ. प्रकार कधीकाळी शेंगदाणे/उपम्याचा रवा भाजण्या व्यतिरिक्त फारसे वापरलेच जात नाहीत, अशी पिंक टाकून थांबतो.
पण तेलात तळल्यावर ती थोडी
पण तेलात तळल्यावर ती थोडी खरपुस करपलेली टेस्ट अस्ते ती मिस्स होनार.
<<
अजिब्बात नाही.
ती टेस्ट परफेक्ट येते. थोऽडा जास्त वेळ ठेवावा लागतो इतकेच. रवीवारी तसा केला होता. पण तसा मासा अॅक्चुअली ओव्हरकुक्ड असतो. आतून बर्यापैकी ड्राय फ्लेकी होतो..
*
आरारा, ह्याकरता सामोसे अवनमध्ये बेक करणं ह्या ऑप्शनचा विचार नाही केलात का?
<<
आमच्याकडे कुठे दीपचे सामोसे मिळतात?
पण नाही. बेक नाही केले कधी.
*
सिंडाक्का,
पुर्या/मेदुवडे होतात, पण पुरी छोट्या पोळीसारखी लागते अन मेदुवडा पुरीसारखा पसरतो. बेकिंग शीट वर करायचा. अर्थात, होत नाहीत
Pages