१. मासा (हवा तो. साफ करून.) मी लोकली मिळणारा - फिश फार्ममधला- गोड्या पाण्यातला आमच्या कोळ्याने 'पिंक परी' असलं महान नांव सांगितलेला जिवंत मासा माझ्यासमोर टबातून काढून दिलेला सुमारे पाव किलो वजनाचा आणला होता.
२. हळद, लिंबू, मीठ : लावून ठेवण्यासाठी.
३. मसाले
तिखट
मिठ
आलं लसूण पेस्ट
जिरेपूड
धणेपूड
गरम मसाला
लिंबाचा रस
अन थोडा लोणच्याचा मसाला (केप्र)
चहाचा चमचाभर तेलात मिक्स करून.
४. बचकभर चिरलेली कोथींबीर
५. काकडी, टमाटा, बटाट्याचे काप.
सोप्पी आहे. संपूर्ण रेस्पि इथे लिहिण्याचा पॉईंट म्हणजे एयर फ्रायर नामक यंत्रात इतके सुंदर तळल्याच्या चवीचे मासे चमचाभर तेलात होतात, हे सांगणे असा आहे.
माशाला ३ पाण्यातून स्वच्छ धुवून हळद मीठ लिंबू लावून ठेवायचं. मग एक २-५ मिन्टांनी वरचे सगळे मसाले मिक्स करून चांगले चोळून लावायचे.
धीर धरवेल तितका वेळ मॅरिनेट होऊ द्यायचं.
एयर फ्रायर सेटिंग्ज :
३ मिनिटे, किंवा हिटरचा लाईट बंद होई पर्यंत १८० डिग्रीला चालू करा. याआधी मधल्या नॉनस्टिक भांड्याला हाता/ब्रशने ८-१० थेंब तेल चोपडुन घ्या.
त्यानंतर भांडे बाहेर काढून त्यात आधी बटाटे, टमाटे, कांदे, ढोबळी, झुक्किनी इ. जे असेल ते माशाच्या उरलेल्या मसाल्यात घोळून खाली पसरा. त्यावर मासा/तुकड्या ठेवा, अन भांडे एयरफ्रायरमधे घाला. हवे तर थोडे तेल ब्रशने लावा/स्प्रे करा.
टोटल टाईम २० मिनिटे. (पाव किलो मासा प्लस शे दीडशे ग्रॅम भाज्यांसाठी)
१० मिनिटांनी (अर्धा कुकिंग टाईम) पॅन बाहेर काढून मासा उलटवा. हवे तर ब्रशने तेल लावा.
२० मिनिटात चांगला कडक तळला जातो.
पुरेसा तळल्यासारखा नाही वाटला तर पुन्हा भांडं आत ढकलून दोन पांच मिनिटे अजून तळा. हाकानाका!
या यंत्रात कमीत कमी तेलात तळल्यासारख्या चवीचे पदार्थ बनवता येतात. आम्हाला (फुकट) भेट मिळालेल्या चायनामेड एयरफ्रायरमधे वरील पाकृ बनवलेली आहे. बेसिकली एक शेगडीची कॉईल, पंखा, अन बंद तंदूरटाईप भांड्यात एक जाळीदार नॉनस्टिक भांडे अशी अॅरेंजमेंट असते.
माबोवर या प्रकारे कुकलेल्या रेस्पिज फारशा नाहीत म्हणून ही एक टाकली.
कारल्याच्या चकत्या काय सुंदर
कारल्याच्या चकत्या काय सुंदर दिसताहेत अगदी तोंडाला पाणी सुटलं.
सायो सांगेलच(बहुतेक हेच उत्तर
सायो सांगेलच(बहुतेक हेच उत्तर :)) दीपचे फ्रोझन पंजाबी समोसे खूप अफलातून होतात एअरफ्रायरमध्ये. कणभरही तेल लागत नाही.
सशल, आर यु किडींग मी? घरी
सशल, आर यु किडींग मी? घरी सामोसे करायचे कष्ट घेववत नाहीत दीपचे पंजाबी सामोसे असताना. अर्थात भारतात असे फ्रोजन सामोसे मिळणार नाहीत हे लक्षात राहिलं नाही लिहिताना.
मैत्रीणीने केलेले बेक्ड समोसे
मैत्रीणीने केलेले बेक्ड समोसे , त्यात तिने शॉर्ट्निग आणि बेकिन्ग पावडर टाकुन कव्हर बनवलेले, प्रमाण वैगरे नाही माहिती , मी करायची सुतराम शक्यता नसल्याने मी काही विचारले नाही क्रुती वैगरे !
https://m.youtube.com/watch?v
https://m.youtube.com/watch?v=OWkzaLWtAhw&t=0s&list=PLNr2FIoikJCdpU-qh4F...
या एअर फ्रायर च्या व्हिडिओत त्याने आधी मैदा नी बटर ब्लेंड करून घेतली नी मग थोडेसे पाणी घालून फिरवलेय. जास्त फिरवू नका ग्लुटेन बाहेर येई पर्यंत म्हणतोय तो. छान क्रिस्पी दिसताहेत याचे बेक केलेले समोसे. तो खाताना कुर्रम कर्रम आवाज येतोय
छोटे छोटे 10 समोसे झालेत एका वेळी.
दीपचे सामोसे मी खाल्लेले
दीपचे सामोसे मी खाल्लेले नाहीत. त्यामुळे तुलना करु शकत नाही. मी सेल्फ रायझिंग फ्लोर आणि दही/ताक किंवा कणिक, बे. पा. आणि दही/ताक वापरुन मी सामोशाच्या पारीसाठी पीठ भिजवते. ब्रेशने तेल लावुन ओवनमधे ४२५ फॅ ला १५ मिनीटे अणि ३७५ फॅ ला अजून ८-१० मिनीटे. फिलो पॅस्ट्री किंवा तळलेल्या सामोश्यासारखे हे सामोसे होत नाहीत. इथे , घरी पट्टी सामोसे बनवणे किंवा सामोसा खायला ५० मैल गाडी हाकणे एवढे दोनच पर्याय होते तेव्हा असे सामोसे / सामोसा चाट केली जायची. हाच डो वापरुन लेकाच्या डब्यासाठी एंपानाडा केले जायचे .
>> सशल, आर यु किडींग मी?
>> सशल, आर यु किडींग मी?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
नॉट अॅट ऑल. लाजेकाजेस्तव मनातला डाऊट कन्फर्म करण्याकरता तसा प्रश्न मुद्दाम विचारला
उपवास स्पेशल.
उपवास स्पेशल.
स्पायसी पोटॅटो वेजेस.
दोन मध्यम बटाटे चिरून पाण्यात थोडा वेळ भिजवून मग कोरडे करून घ्यावेत.
![P1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u62709/P1.jpg)
त्याला उपवासी लोकांसाठी फक्त जिरं, मीठ, मिरची, कोथिंबीर, लिंबू अन तूप लावावे
अनुपवासी लोकांनी आलं लसूण पेस्ट, धणेपूड, हळद अॅड करावी, हवे तर तुपाऐवजी तेल.
एयर फ्रायर सेटिंग्ज :
२०० डिग्री प्रीहिट ३ मिनिटे,
भांड्याला तेल्/तुपाचा ब्रश/स्प्रे लावून त्यात वेजेस टाकून १० मिनिटे
यानंतर बाहेर काढून एकदा हलवून घेणे. हवे असल्यास आवडीचे चीज किसून टाकणे.
पुढील ८ ते १० मिनिटे १६० डिग्रीवर, जसे कडक हवे तशाप्रमाणे
हे मसाला
![P2.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u62709/P2.jpg)
अन हे उपवासाचे :
![P3.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u62709/P3.jpg)
एन्जॉय!
ही पाकृ उपवासाची म्हणून माशापासुन वेगळी काढली आहे. https://www.maayboli.com/node/66587 इथे.
मस्त आहेत स्पायसी पोटॅटो
मस्त आहेत स्पायसी पोटॅटो वेजेस.
Mashyacha BB var upasache
Mashyacha BB var upasache batate recipe takali mhanun kahi batatyancha upas modla nasta:) aata mala cultural shock baslay:) hamm aata mashyanna batate ithe aale mhanun rag yeu/ vait vatu shakta!
अहो बटाट्याचा उपवास मोडला
अहो बटाट्याचा उपवास मोडला नसता, पण उपवासी लोकांना रेस्पी दिसून माझा ट्यार्पी कसाकाय वाढला असता? मी स्वतः कधीच उपवास करत नाही. पण लोक उपासाच्या दिवशी मासा उघडून बघत नाहीत.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
Mast batata
Mast batata
पण लोक उपासाच्या दिवशी मासा
पण लोक उपासाच्या दिवशी मासा उघडून बघत नाहीत. >
कुठला मेजर एकादशी शिवरात्र टाईप उपास येतोय का?
पावसाळा आला म्हणजे आषाढी असेल ना?
Kal vatpaurnima hoti. What's
Kal vatpaurnima hoti. What's app nahiye ka!
आहे आहे. पण भडिमार ग्रुप मधले
उपसस !!! अरे नाही कसे! कालच 7 जन्म म्हणजे 100 वर्षे कारण 7 x 12+ 16 =100 अस काही तरी तिरपाकडं गणित वाचलं की!
फिलिप्स चा एयर फ्रायर घ्यावा
फिलिप्स चा एयर फ्रायर घ्यावा काय? किंमत जास्त असली तरी वर्क मन शीप चांगली वाटतेय . नोन स्टिक tray वगैरे. डागदर मंतत की सगळे सारखेच. काय क्रावं ब्रं ?
डॉक्टरांना भेट मिळालंय एफ्रा.
डॉक्टरांना भेट मिळालंय एफ्रा.
पण ते इथे रेस्प्या लिहु लिहु लोकांना घ्यायला लावणार असं दिसतंय.
वा रे वाह ची तन्दूर चिकन
वा रे वाह ची तन्दूर चिकन रेसिपी इथे https://www.youtube.com/watch?v=DosjRtIxuEg पाहून मी जवल जवळ एफ्रा घ्यायचे नक्की केले आहे.
तंदूरीसाठी एफ्राच हवा असे
तंदूरीसाठी एफ्राच हवा असे नाही. साधा ओटीजी/कन्व्हेक्शन मोडवाला मावे देखील उत्तम चालतो. त्यात बनवलेले चिकन रोटेसरी जास्त भारी!
फिलिप्स चा एयर फ्रायर घ्यावा
फिलिप्स चा एयर फ्रायर घ्यावा काय? >>. जरूर घ्या. माझ्याकडे फिलिप्सचा आहे. मी पण वाह रे वाह तंदूर चिकन रेसिपी पाहून (आणि अर्थात इतर रिव्ह्युज वाचून) फिलिप्स घ्यायचा ठरवले. तंदूर चिकन पण करून पाहिले. अजुन हात बसायचाय पण (दोनदा केले, तेव्हा मॅरिनेशनल पुरेसा वेळ नाही व एफ्रामध्ये कमी वेळ ठेवले होते. त्यामुळे तितके भारी झाले नव्हते. ) पण ते गणित जमले की नक्कीच भारी होणार.
मला का कोण जाणे, अवनपेक्षा एफ्रातील पदार्थ आवडतायत.
मिसळ पाव वरील एयर फ्रायर
मिसळ पाव वरील एयर फ्रायर ची लिंक कृपया द्यावी....
Pages