Submitted by बेफ़िकीर on 3 June, 2018 - 11:39
गझल - गढूळलेला समाज
========
गढूळलेला समाज गातो अराजकाचे विषण्ण गाणे
विखारवारा न सोसल्याने उभे तिरंगे उदासवाणे
बघाल तेथे जहाल वक्ते, मशालमोर्चे, सवंग चर्चा
हरेकजण चालवीत आहे समानतेचे स्वतंत्र नाणे
नकोस तू आवरू मनाचा जुना पसारा.... असे न होवो....
स्वतःहुनी जे गहाळले ते पुन्हा मनाला भिडून जाणे
तुझ्यामुळे जे सुचायचे ते अजूनही ऐकवीत असतो
मुशायरे आजही कसे त्यावरीच तगतात कोण जाणे
कसेबसे राखलेत माझ्या मनावरी लेप विस्मृतींचे
उगीच पाहू नकोस, उकरू नकोस दुखणे जुनेपुराणे
जगात जगता विरून गेल्या किती उभाऱ्या, किती भराऱ्या
कधीतरी ह्या जगास होते करायचे आपल्याप्रमाणे
बनून माणूस चांगला तू, कुठे कुठे धावशील मित्रा
कितीजणींना मनात सुचती सलज्जतेने तुझे उखाणे
खयाल घेतो तुझे नि त्यांची रूपे बनवतो, महान ठरतो
तरी न तो 'बेफिकीर' म्हणतो, मला मिळाले नवे घराणे
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बेफिजी छानच! अप्रतिम.
बेफिजी छानच! अप्रतिम.
मार्मिक आहे रचना.
मार्मिक आहे रचना.
गढूळलेला समाज गातो अराजकाचे विषण्ण गाणे
विखारवारा न सोसल्याने उभे तिरंगे उदासवाणे
हे अगदी खास!
पहिला, दुसरा शेर उत्तम आहे.
पहिला, दुसरा शेर उत्तम आहे.
चौथा अतिशय म्हणजे अतिशय आवडला...