२०१८ वासंतिक गटग

Submitted by वैद्यबुवा on 24 May, 2018 - 10:38
ठिकाण/पत्ता: 
बुवा-सदन
माहितीचा स्रोत: 
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, June 9, 2018 - 10:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! ह्याचंच नाव पूर्वी "कल्लोळ" असायचं ना? Happy

>>पोळ्यापण सांगाल का
अरे, श्रीखंड आहे तर पोळ्या का पुर्‍या सांगा, होऊ दे खर्च! Proud

अरे वा वा सही. बाफ आला म्हणजे तयारी सुरू झाली. अमित, राखी - येणार का?

पुर्‍या पुर्‍या पडतील की नाही कोण जाणे!. >>> Happy बार गाडण्याची पण सुरूवात झाली म्हणजे मांडव उभा राहिलाच. रोज इतका गाडा की गटगच्या दिवशी भारतात कोठेतरी बाहेर पडला पाहिजे.

अमित, तू यायचं जमव गटगला. पानांची चिंता करु नकोस >>> हो आणि अमित आता हुकमी लावणी लिहू शकत असल्याने डॉन मधल्या अमिताभसारखे "पहले पान, फिर गान" हे ही होउ शकेल.

सायोचे ते मै राइस लेके आऊ क्या हे वाक्य वाचून सारखं ते "मै तुझसे मिलने आऊ क्या, बोल मै हलगी बजाऊ क्या" हे गाणं आठवत आहे Lol (भलती चॅनल्स बघितल्याचा परिणाम Wink )

मै Rofl
सिरिय्सली! मला ते सत्या मधलं मै तेरेको फ्रिजं लाके दु क्या? मै तेरेको टिवि लाके दूक्या आठवलं चंदरचं! Lol

तू जात्येस ना पण? >>> एकदम पडघवली वाचल्याचा फील आला "जात्येस ना" वरून. ओसरीवर सुपारी कातरत अमित बसला आहे. खाली सावली आणि वर वाळवणं, भोवताली इवल्याशा वार्‍यानं डुलणारी पोफळ वगैरे. व समोरून सड्याच्या पोटाशी आणि पर्‍याच्या अंगाशी लागून असणार्‍या बागा व तेथून समोरून जाणार्‍या सिंडीला हे विचारत आहे.

बुवा २+१
भाचा २
फा १
सायो १
एम्टी १
मी २
मायावी २
शोनू १
पर्देसाई १

सो सध्या १३+१?

>>> ओसरीवर सुपारी कातरत अमित बसला आहे. खाली सावली आणि वर वाळवणं, भोवताली इवल्याशा वार्‍यानं डुलणारी पोफळ
Lol

बुवा, सिंडी बहुतेक तुम्हालाच शोधाय्ला निघाली आहे. Proud

बुवा - लोकेशन मधे बुवा सदन लिहिलंय ते आता पाहिलं मी. बार्क्याची माय घराबाहेर काढेल ना अशाने तुम्हाला Happy

शोनू Happy

अरे ते हलगी मी एकलय. मला ते मुजिकशिवाय निस्ते शब्द बघून लक्षत नाही आलं. तुफान आहे ते!!!! Lol अजून आहेत खरं काही पण ते पि जि कॅटेगरी नाहीयेत. Proud

Pages