Submitted by सत्यजित... on 18 May, 2018 - 07:24
बघूच धावतो कसा? खट्याळ चांदवा...
सखे..फुलांसवेच आज माळ चांदवा!
अजून पाहिली न मी भरात पौर्णिमा
उगाच दावतो मला घड्याळ चांदवा!
नभावरुन एकदाच हात फेरला
उद्या कळेल बातमी..'गहाळ चांदवा!'
शशीस चेहरा तुझा म्हणू कसा? प्रिये,
तुझ्यापुढे दिसे मला गव्हाळ चांदवा!
निळ्या नभावरी पिठूर साय पांघरु...
उधाणला उरातुनी दुधाळ चांदवा!
तनू-तनू तहानली सहाण वाटते
हळूच वेच चांदणे,उगाळ चांदवा!
पहाटही नभावरी गुलाल रंगते
मिठीत लाजला तिच्या मधाळ चांदवा!
—सत्यजित
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम!
अप्रतिम!
अप्रतिम,सुंदर !!!
अप्रतिम,सुंदर !!!
सुंदर ...
सुंदर ...
सुरेख चांदवा !!!
सुरेख चांदवा !!!
शेवटचे ३ -> १ न. !!!!
शेवटचे ३ -> १ न. !!!!
एकदम झक्कास
एकदम झक्कास
छानच..
छानच..
छान !!
छान !!
हळूच वेच चांदणे, उगाळ चांदवा!
हळूच वेच चांदणे, उगाळ चांदवा!! अप्रतिम
छान !
छान !
खूप सुन्दर
खूप सुन्दर
सर्व प्रतिसादकांचे मनापासून
सर्व प्रतिसादकांचे मनापासून धन्यवाद!
हळूच वेच चांदणे,उगाळ चांदवा!
हळूच वेच चांदणे,उगाळ चांदवा! >>
निव्वळ अप्रतिम
वाह! फारच सुंदर..!
वाह! फारच सुंदर..!
नभावरुन एकदाच हात फेरला
उद्या कळेल बातमी..'गहाळ चांदवा!'>> वा!