1 May 2008 रोजी टोनी स्टार्क "आर्यन मॅन" बनुन प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्या चित्रपटापासून "इन्फिनिटी वॉर"ची सुरुवात झाली. तब्बल १० वर्षांचा अवधी आणि १७ चित्रपटांच्या माध्यमातून इन्फिनिटी वॉरच्या साखळ्या जोडल्या गेल्या आहे. इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा एका संकल्पनेवर काम करण्यात आले आहे. प्रत्येक चित्रपटातून एक कडी घेऊन इन्फिनिटी वॉरची जमीन तयार केली गेली. एक एक कॅरेक्टर, घटना यांचा संबंध शेवटी "इन्फिनिटी वॉर" मध्ये एकत्र आणला आहे. मार्व्हल कॉमिक्स चित्रपटांमधे सर्वात महत्त्वाचा चित्रपट म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जाईल.
प्रचंड भव्य आणि १०-१५ सुपर हिरो एकाच चित्रपटात येणे ही सुपरहीरो चित्रपटांच्या प्रेक्षकांसाठी "शेकडो लज्जतदार पदार्थांनी भरलेली राजेशाही थाळी आहे"
तर..
याआधीच्या चित्रपटात "Thor: Ragnarok" दाखवल्याप्रमाणे अॅसगार्ड आणि म्युनिर नष्ट होऊन सगळ्यांना थोर पृथ्वीवर घेऊन येत असतो. त्याला वाटेत "थॅनोज्/थॅनोस" नामक महाप्रचंड सुपरडुपर व्हिलन गाठतो. थॅनोसला सगळ्या ब्रम्हांडावर राज्य करायचे आहे. (राज्य म्हणण्याऐवजी ते 'संतुलित ठेवायचे आहे' असे म्हणणे योग्य ठरेल) त्यासाठी त्याला इन्फिनिटी स्टोन हवे असतात. हे स्टोन ६ शक्तींचे प्रतिनिधित्व करतात.
१) टेस्सरॅक्ट ( अंतराळ स्टोन) (हा स्टोन कॅप्टन अमेरिका- फर्स्ट अव्हेंजर आणि अॅव्हेंजर-१ चित्रपटात दाखवला आहे) = या स्टोनच्या वापराने अंतराळातील इतर आयाम उघडता येतात, कुठल्याही स्थानी टेलिपोर्टच्या माध्यमातूनप्रवास करता येतो. भौतिक शास्त्राचे नियम या स्टोनच्या मदतीने सहज तोडता येतात. सध्या हा स्टोन लॉकी ने अॅसगार्डच्या तळघरातून चोरलेला आहे
२) द ओर्ब (शक्ती स्टोन) ( हा स्टोन गॅलक्सी ऑफ गार्डियन्स-१ चित्रपटात दाखवला आहे)= कुठली शक्तीला दुप्पट करण्याची क्षमता या स्टोन मधे आहे. इतर स्टोनची शक्ती या स्टोन मुळे सहज नियंत्रित केली जाऊ शकते. तसेच इतर शक्तींचा प्रतिकार करण्यात हा स्टोन मदत करतो. सध्या हा स्टोन नोवा ग्रहावर सुरक्षित ठेवलेला आहे
३) अॅथर (वर्तमान स्टोन) = हा स्टोन थोर- डार्क वर्ल्ड मधे दाखवला गेला आहे.)= या स्टोनमुळे आपल्या इच्छा पुर्ण होण्यास मदत मिळते.याच्या द्वारे आपल्या इच्छेद्वारे एक आभासी दुनिया निर्माण करता येते. सध्या हा स्टोन कलेक्टर नामक एका वस्तुसंग्रहाकाकडे आहे.
४) स्केप्टर ( मानसिक स्टोन) = (हा स्टोन अॅव्हेन्जर्स -अल्ट्रोन या चित्रपटात पाहिला आहे.) = या स्टोन मुळे समोरच्या व्यक्तीवर नियंत्रण मिळावता येते. याने मेंदूची क्षमता कैकपटीने वाढते व त्याने मोठ्याप्रमाणात ज्ञान हस्तगत केले जाऊ शकते जे सामान्य व्यक्तींना शक्य नाही. हा लॉकीच्या छडीमधे होता जो अल्ट्रोन रोबोटने काढून "व्हिजन" या नविन सुपरहिरोच्या माथी लावला आहे. सध्या तो त्याच्याजवळ आहे
५) आय ऑफ अगामोटो/ टाईमस्टोन)= हा स्टोन डॉक्टर स्ट्रेंज या चित्रपटात दाखवला आहे = या स्टोन मुळे ब्रम्हांडातील काळावर नियंत्रण ठेवता येते. वेळ हवी तशी मागेपुढे करून थांबवून हवे ते करता येते. सध्या हा स्टोन डॉक्टर स्ट्रेंजच्या गळ्यातील लॉकेट मधे आहे.
६) सोअल स्टोन (आत्मा स्टोन) - हा स्टोन अजुन कुठल्या चित्रपटात दाखवला गेला नाही= याने आत्मा नियंत्रित केली जाते. कुणालाही एकसाथ नष्ट करणे, जिवंत करणे इ. यास्टोन द्वारे नियंत्रित होतात. विश्वातील प्रत्येक आत्मा या स्टोन ने जोडली गेली आहे.
या सर्वशक्तीमान स्टोनच्या मागे महाशक्तीशाली थॅनोस लागलेला आहे. ब्रम्हांडावर नियंत्रण मिळवुन त्यात समतोल साधण्याचे त्याचे उदिष्ट आहे. त्यासाठी तो वाट्टेल ते करतो. ग्रह नष्ट करणे, त्यावरचे जनजीवन नष्ट करणे, निसर्ग नष्ट करून पुन्हा नविन उभा करणे इ. कामाद्वारे त्याला वाटते की आपण समतोल साधत आहे. या त्याच्या वेडेपणातून स्वतःचा ग्रह "टायटन" देखील सुटला नाही. हल्क आणि थोर यांना पराभूत करून तो त्यांना अंतराळात फेकून देतो. अॅसगार्डचा पेहरेदार हैम्डल हल्क ला त्याच्या शक्तीद्वारे पृथ्वीवर पाठवून देतो. परंतू थोरची मदत करता येत नाही. थोर अंतराळात फिरत असताना गॅलक्सी ऑफ गार्डियन या टिम ला सापडतो.
तिकडे हल्क पृथ्वीवर स्ट्रेंजच्या घरात आदळतो. थॅनोसचे स्टोनच्या मागे असणे व त्यासाठी तो पृथ्वीवर देखील येणार आहे हे हल्क डॉक्टर आणि टोनी यांना सांगतो. त्यादरम्यान थॅनोसची लोक पृथ्वीवर माईंडस्टोन आणि टाईमस्टोनसाठी पोहचतात. आर्यन मॅन , डॉ. स्ट्रेंज, हल्क आणि स्पायडरमॅन हे एका टीमला भिडतात. तर दुसरी टीम व्हिजन , वांडा, कॅप्टन अमेरिका, ब्लॅक विडो यांना भिडते. पृथ्वीवर आलेले हे संकट सगळ्या सुपरहिरोंना एकत्रित आणते. पहिल्या टिमचा पाठलाग करत करत आर्यन मॅन स्ट्रेंज स्पायडर मॅन हे टायटन ग्रहावर थॅनोसला रोखण्यासाठी पोहचतात. तर दुसर्या टीमचा पराभव कॅप्टन करतो. माईंड स्टोन ला थॅनोस हाती पडण्याआधी नष्ट करण्यासाठी कॅप्टन व्हिजनला "वकांडा"ला घेऊन जातो. पृथ्वीवर हल्ले एकामागोमाग एक होत राहतात.
थोर थॅनोसविरोधात मदत मिळ्वण्याकरीता रॉकेट व ग्रुट यांना घेऊन एका ग्रहावर जातो. तर गार्डियन्स थॅनोसला रोखण्यासाठी टायटनवर येतात.
थॅनोसला स्टोन मिळतात का? पृथ्वीवर होणारे हल्ले सुपरहिरो परतून लावण्यात यशस्वी होतात का? थॅनोस आणि ग्मोअराचे काय नाते आहे.? या युध्दाचे काय परिणाम होतात? इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी चित्रपट बघायला हवा.
तुम्ही जर प्रत्येक चित्रपट बघत आला असाल तर हा मस्ट वॉच चित्रपट आहे. एकेक कॅरेक्टरचा बारकाईने अभ्यास करून कमीत कमी दृष्यांमधे त्या कॅरेक्टरचे बॅकग्राऊंड, त्याचे वागणे इ स्पष्ट केले आहे. थॅनोस सुपरडुपर व्हिलन असुन देखील त्याच्या कृत्यांमागे काय उद्देश आहे, तो नेमका आहे कसा हे सर्वकाही व्यवस्थित दाखवले आहे. १५-२० सुपरहिरो असुन सुध्दा प्रत्येकाला व्यवस्थित जागा दिलेली आहे. कुठेही गर्दी झालेली वाटत नाही. सगळ्यांची एंट्री साधी असुन ही ऐन मोक्याच्या क्षणी आल्याने प्रचंड भाव खाऊन जाते. थोर्,हल्क, थॅनोस, स्पायडी यांचे प्रवेश दिमाखदार झाले आहे परंतू सर्वात इफेक्टीव्ह मात्र कॅप्टन अमेरिका - स्टिव्ह रॉजर याची एंट्री आहे. तो जसा पडद्यावर येतो तसे एक पॉझेटीव्ह वातावरण तयार झाल्यासारखे वाटते. आशा निर्माण होते.
चित्रपटाचे अॅनिमेशन अव्वल दर्जाचे आहे यात वाद नाही. चित्रपटाची पटकथा देखील वेगवान ठेवली आहे. एकामागोमाग एक घटना विविध ठिकाणी घडत आहे तरी प्रेक्षकांना गोंधळायला होत नाही. डायलॉग एकसेएक आहे पंचलाईन योग्य जागी ठेवून दिल्या आहे. धक्कातंत्र प्रत्येक सीन नंतर अनुभवायला मिळतो. सुरुवातीला प्रत्येक सीन वर किंचाळून चिअर्स करणारा प्रेक्षकवर्ग हळूहळू शांत होतो. शेवटीशेवटी तर हाऊसफुल्ल असलेल्या सिनेमागृहात "पिनड्रॉप" शांतता होते. ही या चित्रपटाची खरी ताकद आहे. प्रत्येक प्रेक्षक पडद्यावर चाललेल्या अंतिम युध्दात मनापासून सहभागी होतात. लढाईत कधी पारडे सुपरहिरोंकडे झुकते तर कधी थॅनॉसकडे.. प्रत्येक वेळी एक सप्राईज अॅलिमेंट येऊन लढाईची बाजू पलटवतो. हि रंगत उत्तरोउत्तर वाढत जाते. समोर दिसत असुन देखील "पुढे काय" हा प्रश्न मनात आपसुक येतो. मनात अपेक्षित असलेले मांडलेले गणित सारखे खोडावे लागते.
अतिभव्य आणि शेकडो कलाकारांना घेऊन त्यांच्यात योग्य समतोल साधून चित्रपट निर्मिती कशी करावी याचा एक आदर्श धडा याचित्रपटातून मिळतो. आपल्या इथे केवळ दोन हिरो अथवा हिरोईन जरी असल्यातर त्यांचे नखरे कॅटफाईट वगैरे सांभाळता सांभाळता दिग्दर्शक निर्मात्यांच्या नाकीनऊ येतात. इथे तर २०-३० मुख्य कलाकार आहे.
जाताजाता :- चित्रपटाच्या क्रेडीट्स नाव वाचावी. शेकडो भारतीयांची नावांचा समावेश विविध फिल्डमधे आहे. प्रोडक्शन लाईनपासून ते अॅनिमेशन, साऊंड एडिटींग पर्यंत जवळपास सर्वच ठिकाणी एक-एक-दोन-दोन तरी नाव वाचली आहे. आणि अजुन एक........... क्रेडीट्स संपल्यानंतरचा दाखवलेला सीन चुकवू नका. मोठे सप्राईज आहे.
महाभारत विषयावर या भव्यतेत चित्रपट बनला असता तर जगभरात प्रचंड गाजला असता. या लोकांनीच या महाकाव्यावर चित्रपट बनवावा ही इच्छा...
अरे काय तुम्ही लोकं.. इन मिन
अरे काय तुम्ही लोकं.. इन मिन ३ ४ दिवस झाले पिच्चर रिलीज होऊन..
त्यात लोकांना टिकिटं मिळना आणि बरेचसे लोक फॉलोअर्स्पन नाहीए तरी तुम्ही बेधडक न सांगता स्पॉयलर का टाकुन राहिलेय..
आधी कसे प्रतिसाद देताना ठळक अक्षरात स्पॉयलर अस लिहायचे..
आणि फक्त ४ दिवसात वर सगळी स्टोरी सांगुन मोकळे झाला..
म्युनिर तुटला/फुटला, थॅनोजची एन्ट्री कधी होते, हाइमडेल हल्कला कुठ पाठ्वतात, तो कुठ पडतो, लोक मरतात काय अन काय काय.. लोकांची उत्सुकता शिगेला लावून लिहायचं ना..आणि जे लोक म्हणताय कि आम्हाला नाही माहित सारे पिच्चर त्यांना स्पॉयलर काय देत सुटला..
निषेध निषेध निषेध
काल पहिला... पण थॉर माणूस
काल पहिला... पण थॉर माणूस यांनी म्हटल्या प्रमाणे मलाही मजा नही आया.. ..नवरा 4DX मध्ये पाहू म्हणत होता... पण बरं झालं फक्त 3D मध्ये पहिला...फार काही अनिमेशन होते असे काही वाटलं नाही.. आणि थॉर माणूस यांनी लिहिलेले पौंट्स पटले..थॅनॉस आणि गमोराचे नातं काही मनाला भिडलं नाही..थॅनॉसची टीममध्ये मला तर 4 च माणस दिसली बाकीची अशीच extra..लोकांना आवडत असेल पण आमच्या दोघांनाही ओव्हर हैपड वाटलं आणि जाम बोर झाला पिच्चर थोडी फार बॅकग्राऊंड असूनही...
टीनाबाई
टीनाबाई
वर शिर्षकात स्पॅायलर लिहीलेले वाचले नाही का? शिर्षक न वाचता धागा उघडून वाचायला कोणी निमंत्रण दिले नाही.
तसच म्युनिर तुटला हे थाॅर रेनगाॅग चित्रपटात होते... तु्म्ही चित्रपट न पाहताच लिहीत आहे.
ग्मोडा चे नाते पहिल्या
ग्मोडा चे नाते पहिल्या गार्डीयन मध्ये दाखवले.. ते पुरेसे आहे.. हा बाॅलिवूड चित्रपट नाही की लांबलचक वाक्य, बापाचा तिरस्कार आहे म्हणून घरातल्या वस्तु फोडा, मेरा बाप खलनायक है असे तीन तीन वेळा वेगवेगळ्या अॅंगल ने ग्मोरा स्टारलाॅर्ड गौप्यस्पोट केल्यासारखे सांगते..
कमीत कमी संवाद, मेलोड्रामा व प्रसंगात जास्त कथानक पोहचवले गेले आहे
गमोरा ला हॉलिवुड मित्र मंड्ळ
गमोरा ला हॉलिवुड मित्र मंड्ळ पेज ने मोगरा असे नामकरण केले आहे.
टीनाबाई
टीनाबाई
वर शिर्षकात स्पॅायलर लिहीलेले वाचले नाही का? शिर्षक न वाचता धागा उघडून वाचायला कोणी निमंत्रण दिले नाही.>> वाचलं ना..
म्हणुनच पिच्चर पाहिल्यानंतर इथे आली वाचायला..
मी नवे लोक जे आहेत जे कुणी धागा वाचुन पिच्चर पाहावा कि नाही ठरवतात त्यांच्या हिशोबाने म्हणतेय..
माबोवर इतरही लोक परिक्षन वा मते लिहितात पिच्चर वर पण स्पॉयलर जेथुन सुरुवात होते तिथे ठळक अक्षरात लिहितात सुद्धा ना..
उदा द्यायच तर स्वप्ना यांची जुन्या चित्रपटांवरची लेखमाला पाहा.. इतक्या जुन्या अन कधीकधी बर्यापैकी नव्या चित्रपटाबद्दल लिहुनही अन एवढे वेगळे जॉनर असुनही जुन्या चित्रपटांकरीतापन त्या उत्सुकता ठेवतात लोकांच्या मनात.. त्याउलट तुम्ही अगदी चित्रपटात काय काय अन कसं सुरु होतं तेच सांगुन दिलं ना..
तसच म्युनिर तुटला हे थाॅर रेनगाॅग चित्रपटात होते... तु्म्ही चित्रपट न पाहताच लिहीत आहे.>>
मी एक एक पिच्चर कोळून प्यायलीए अन वर जोडीला कॉमिक्स सुद्धा वाचलेय हो..
म्युनिर बद्दल तुम्ही टवणे सरांना जो प्रतिसाद दिला त्यांनी त्यांची मार्वल युनिव्हर्सशी ओळख कितपत आहे हे स्पष्ट केलेली.. ज्या व्यक्तिला मार्वल अन अॅव्हेंजरशी ओळख अगदी जेवढ्यास तेवढी आहे त्यांना इतका मोठा स्पॉयलर अन वन लायनर कसाकाय देऊ शकता तुम्ही.. त्याउलट त्यांना चित्रपट बघायला मजा येते तर तो नक्की पाहा अस सांगाव ना..
गमोरा ला हॉलिवुड मित्र मंड्ळ
गमोरा ला हॉलिवुड मित्र मंड्ळ पेज ने मोगरा असे नामकरण केले आहे.>> अमा तू मागे लिहिते म्हणालीस ना रविवारी.. तुझ्या धाग्याची वाट पाहतेय
जेव्हा शीर्षकात लिहीले आहे
जेव्हा शीर्षकात लिहीले आहे तेव्हा पुन्हा धाग्याच्या सुरवातीला का लिहावे? इतके बाळबोध लोक आहे? स्पष्ट स्पाॅयलर लिहून पण जे लोक धागा वाचतील तर ती त्यांची चुकी आहे. येथे खड्डा आहे असे लिहून पण तिथे जाऊन पडणारे लोक असतात..
माझ्या हिशोबाने मी सुचना केली आहे... बाकि कुणाचा काही भ्रमनिरस झाला तर तेच जवाबदार..
एकदा वर लिहीले आहे मग प्रतिसादात लोक चर्चा करणारच मग ते टवणे असो वा थाॅर असो... स्पाॅयलर सांभाळून त्यांनी योग्य चर्चा केली आहे.. ज्यांची ओळख नाही त्यांनी उगाच आगाऊपणा करून धागा कशाला वाचायचा?
बर्र _/\_
बर्र _/\_
कॉमन इंटरेस्ट म्हणुन डोकावली होती इथे..
तुम्ही फार मनावर घेतलं असेल तर जाऊ देत..
चैतन्य रास्कर,,,निक फ्युरी हा
चैतन्य रास्कर,,,निक फ्युरी हा captain marvel ला contact krto ....ticha solo movie yetoy hya varshi ....ani HAWKEYE ha RONIN banun yenar ahe २nd part madhye
सगळे पार्ट कुठल्या क्रमाणे
सगळे पार्ट कुठल्या क्रमाणे बघावे
१) कॅप्टन अमेरिका - (फर्स्ट अॅव्हेन्जर ) = सुरुवात या चित्रपटाने करण्यात यावी. यात पहिला अॅव्हेन्जर स्टिव्ह रॉजर हा कॅप्टन अमेरिका कसा बनतो हे दाखवले आहे. टोनी स्टार्क (आर्यनमॅन) याचे वडील, कॅप्टनचा जिवलग मित्र - बेक्की(जो पुढे जाऊन विंटर सोल्जर बनतो) हाय्ड्रा, रेड स्कल आणि टेस्सरॅक्ट यांच्या बद्दलची माहीती तुम्हाला मिळेल.
२) आर्यन मॅन = टोनी स्टार्क जो विनाशक युध्द सामुग्रीचा निर्माता आहे तो आर्यनमॅन कसा बनाला हे यात दाखवले आहे. टोनी चा स्वभाव, त्याचे बेफिकिरी, काहीही करु शकण्याची क्षमता, त्याची प्रेयसी पेपर (असे ही नाव असते) इत्यादी माहीती मिळेल. आणि शेवटी निक फ्युरी टोनीला शिल्डच्या वतीने "अॅव्हेन्जर" योजनेत सामिल होण्यासाठी सांगतो.
३) इन्क्रेडेबल हल्क = हा मुख्य धारेतला नाही (कारण हल्क वेगळा कलाकार बनला आहे) तरी हल्क आणि टोनीचे कनेक्शन तसेच थॉरचे आगमन यासाठी हा चित्रपट आहे. हल्क एक सामान्य व्यक्तीपासुन क्रोधीत हल्क कसा कुठल्या घटने मुळे बनला ही माहीती मिळेल .
४) आर्यन मॅन २ - आर्यन मॅन चित्रपटाचा पुढचा भाग, कथा स्वतंत्र असली तरी यात पेपर, वॉर मशिन आणि " ब्लॅक विडो- नताशा रोमनॉफ" यांची माहीती मिळते.
५) थॉर - एव्हेंजर चा प्रमुख घटक विजेचा देवता थॉर याची माहीती मिळते. त्याचा प्रसिध्द हतोडा म्युनिर, त्याचा भाऊ लॉकी, दुसर्या आयाम मधे असणारे त्याचा ग्रह "अॅसगार्ड" , तो पृथ्वीवर कसा आला ? हॉकआय यांची माहीती यातून दिलेली आहे.
६) अॅव्हेण्जर १- आर्यन मॅन, कॅप्टन अमेरिका, ब्लॅक विडो, हॉक-आय, थॉर, हल्क या सर्व सुपर हिरोन्न कसे एकत्र आणले जाते आणि लॉकि ने थॅनोसच्या मदतीने केलेला हल्ला कसा हे हिरो परतवून लावतात याची गोष्ट यात दाखवली आहे.
७) आर्यनमॅन ३ - आर्यनमॅन कथेचा ३रा स्वतंत्र अध्याय. यात शेवटी एका नविन सुपरहिरोचा जन्म होतो दाखवले आहे.
८) थॉर - डार्क वर्ल्ड - थॉर कथेचा दुसरा भाग यात चित्रपटात दुसर्या स्टोनला दाखवण्यात आले आहे. डार्क वर्ल्डचा सम्राट आणि त्याचे सैन्य , लॉकिचे मतपरिवर्तन, थॉर चे सम्राट होणे असे बरेच काही यात आहे
९) कॅप्टन अमेरिका २ विंटर सॉल्जर = कॅप्टन रॉजर आता शिल्ड्साठी काम करतो. त्याच्या जोडीला नताशा -विडो आणि फॉल्कन आले आहे. कॅप्टनचा जुना मित्र बक्की आता विंटरसोल्जर म्हणून त्याच्या विरोधात उभा ठाकलेला आहे. त्याला हाय्ड्रा यांनी मानसिक कंट्रोल करुन तयार केले आहे.
१०) गार्डियन ऑफ गॅलक्सी १ = पृथ्वीवरुन आता अंतराळात मार्वल ने झेप घेतली आहे. इतर ग्रहांवर काय चालू आहे याची माहीती यात दिली आहे. पिटर क्विल (स्टार लॉर्ड) , ग्लोमोरा, गृट यांचा गृप कसा बनतो आणि तिसरा स्टोन हा नोवा वाल्यांकडे जातो हे यात आहे
११) एव्हेण्जर -२ एज ऑफ अल्ट्रोन = अव्हेण्जर सिरीज चा दुसरा भाग यात टोनी आणि हल्क मिळून अल्ट्रोन नामक रोबोट बनवतात जो अॅव्हेण्जरची जागा घेऊन पृथ्वीचे रक्षण करणार असतो परंतू डाव उलटतो आणि तो रक्षकच्या ऐवजी भक्षक बनतो, हॉक आय चे कुटुंब, हल्क-नताशा यांचे संबंध, सर्व ६ स्टोनची कथा या चित्रपटात " व्हिजन" आणि वान्डा या दोन सुपरहिरोंचा समावेश केला आहे. तसेच माइइंड स्टोन देखील कसा मिळतो हे दाखवले आहे.
१२) अॅन्ट मॅन=मार्वव्हलचा नविन सुपर हिरो अँट मॅन याची स्वतंत्र कथाअँटमॅन कसा बनतो त्यामागे टेक्नॉलॉजी काय आहे वगैरे यात आहे. फाल्कन आणि अँटमॅन यांची पहिली भेट यात आहे
१३ ) कॅप्टन अमेरिका ३ - सिविल वॉर = कॅप्टन अमेरिका सिरिजचा ३ रा पार्ट= दुसर्या भागात स्टिव्हचा मित्र बक्की याला हाय्ड्राने मानसिक कंट्रोलखाली घेतलेले आहे. हे दाखवले गेले आहे. आता त्याच बक्कीवरुन कॅप्टन अमेरिका आणि टोनी स्टार्क मधे उभी फुट पडते. तसेच सरकारच्या नविन धोरणामुळे ही दरी वाढत जाते. एक वेळ असा येतो की एक्मेकांविरुध्द टिम बनली जाते. या चित्रपटात "व्हिजन" सोबत " ब्लॅक प्पँथर, स्पायडरमॅन या नविन सुपर हिरोंचा समावेश होतो.
१४) डॉक्टर स्ट्रेंज = जादुयी दुनियेतला जादुगार डॉक्टर स्ट्रेज चा इंट्रोडक्शन चित्रपट आहे. त्याचीच माहीती आहे. टाईम स्टोन काय प्रभाव टाकतो याची महत्वाची माहीती आहे
१५) गार्डीयन आॅफ गॅलक्सी 2= गार्डीयन चा दुसरा भाग यात ग्रुट पुन्हा बालय अवस्थेत जातो ट, क्वील कुठून आला त्याचे पृथ्वीचे नाते काय, त्याने पहिल्या भागात स्टोन हाताने कुठल्या पावर ने पकडलेला, ग्मोरा आणि नेबुला यांचे काय नाते आहे, कलेक्टर कडे स्टोन कसा आला ही माहीती मिळेल
१५) स्पायडर मॅन - होम कमिंग = सगळ्या स्पायडर मॅन चित्रपटांपेक्षा हा चित्रपट वेगळा आहे. स्पायडरमॅन हा टोनी स्टार्कच्या प्रभावाखाली, देखरेखेखाली मोठा होत आहे. शिकत आहे. सिव्हिलवॉर नंतर त्याच्या आयुष्यात कसा बदल होत जातो हे दाखवले आहे.
१६) थॉर - रॅग्नरॉक= हा थॉर कथेतला ३रा महत्वाचा चित्रपट - अल्ट्रोन नंतर हल्क कुठे जातो ? डार्क वर्ल्ड नंतर लॉकीचे काय होते इ.चा दुवा या चित्रपटात जोडला गेला आहे. अॅव्हेंजर-३ इन्फ्रिनिटी वॉरची सुरुवात या चित्रपटाच्या शेवटाने होते.
१७) ब्लॅक पँथर - वकांडा आणि ब्लॅक पँथर आणि किंग टिचाला यांची स्वतंत्र कथा दाखवली आहे. सिव्हिल वॉरच्या शेवटी बक्कीला ब्लॅक पँथरला सोपवले होते त्याचे पुडे काय होते ते ही आहे.
हे १७ चित्रपट क्रमाने बघितल्यावर पुर्ण इन्फ्रिनिटी वॉरची कल्पना स्पष्ट होते
आई ग, इतके
आई ग, इतके
मी दहा वर्षीय चिरंजीव सोबत गेलो
मला ढिम्म काही कळलं नाही, दर दहा मिनिटांनी एक नवीन हिरो आणि मग मारामारी. त्यानेच मग सगळं समजावलं, कोण हिरो कुठल्या सिरीज मधला आहे, त्याची स्पेशालिटी काय आहे, कोण ओरिजनल अव्हेनजर्स आहेत कोण प्रमोटेड आहेत.
त्याचे इतके अफाट ज्ञान पाहून न्यूनगंड म्हणतात तो आला एकदम
मी त्याला विचारले तो थेनॉस जर राजा आहे तर एकटाच का फिरतोय, तर उत्तर आले ज्याच्या हातात दहा हजार सोल्जर्स ची ताकद आहे त्याला काय कशाला पाहिजेत लोकं
हे ऐकून मी निपचित पडलो
Submitted by दत्तू on 1 May,
Submitted by दत्तू on 1 May, 2018 - 07:44
उत्तम यादी. पण यात गार्डीअन्स ऑफ गॅलेक्सी वॉल्युम २ राहीलाय टाकायचा? गमोरा आणि तिची बहीण नेब्युला यांच्या नातेसंबंधांना उलगडणारा (नेब्युला आणि गमोरा यांची रिलेशनशीप जवळपास थॉर आणि लोकीच्या नात्यासारखी बनली या चित्रपटामुळे. सिबलींग रायवलरी.) आणि मँटिस (जी कदाचित वॉल्युम ३ नंतर नव्या गार्डीअन्स टीम मधे राहील) चे इंट्रोडक्शन.
त्याचे इतके अफाट ज्ञान पाहून
त्याचे इतके अफाट ज्ञान पाहून न्यूनगंड म्हणतात तो आला एकदम>>> पु. लं. च्या बाळ शंकरची आठवण आली एकदम.
<< ज्याच्या हातात दहा हजार सोल्जर्स ची ताकद आहे त्याला काय कशाला पाहिजेत लोकं>> लोल
दत्तूभाऊ, लिस्टबद्दल आभार...कायकाय मिसलंय ते तरी कळलं. १०, १२, १५, १६ व १७ हे नाही पाहिले त्यामुळे बर्याच गोष्टी डोक्यावरुन चाल्लेल्या
धन्यवाद थाॅर, लक्षातच आला
धन्यवाद थाॅर, लक्षातच आला नाही
अॅडला आहे
१) Power stone ठेवलेल्या
१) Power stone ठेवलेल्या ग्रहाचा नाव नोवा नाही, झान्डर(Xander) आहे.
२) सेप्टर(scepter) आणि ओर्ब (orb) हि स्टोन्स ची नाही तर स्टोन्स ज्यात contain केले होते त्याची नावं आहेत.
फारएण्ड, DC आणि marvel वेगवेगळे आहेत , त्यांचे कॉमिक मध्ये canon crossover झाले आहेत (उदा. Iron man हा कॉमिक मध्ये batman ला भेटला आहे) पण फिल्म मध्ये तसे crossover होण्याची शक्यता खूप कमी आहे कारण तो फार मोठा आणि खर्चिक प्रोजेक्ट असेल. आणि मार्व्हल कडे अजूनही सर्व कॉमिक characters चे film rights नाहीत त्यामुळे x men, fantastic four, deadpool हे mcu च्या फिल्म्समध्ये सध्या दिसणार नाहीत. आताच मागच्या महिन्यात disney ने fox कडून deadpool, ff आणि x men चे rights घेतले पण deal final 2020 पर्यंत तरी होणार नाही त्यामुळे ते अवेंजर्स सोबत 2020 नंतरच दिसतील.
थॉर माणूस, माझ्यामते तरी jim
थॉर माणूस, माझ्यामते तरी jim starlin ने लिहिलेल्या Infinity Gauntlet एवढीच मोठी भव्यता होती या फिल्ममध्ये, अर्थात ही तुमची मते आहेत पण तरीही तुमच्या मुद्द्यांबद्दल माझी मते काही फिल्म आणि कॉमिक दोन्हीचा आधार घेऊन बनवली आहेत ,
१)या फिल्मचं secret केव्हाही Thanos जिंकतो कि हरतो हे नव्हतंच, तर कोण शेवटी मरतो आणि त्यावरून next फिल्म काय येते, soul stone कुठे असतो आणि थॉर ला नवीन hammer कसा मिळतो हे होतं.
२)थेनॉस आणि गमोरा चे रिलेशन दाखवले नाही पण guardians च्या 1st पार्ट मध्ये थेनॉस चा dialogue होता की गमोरा त्याची favourite मुलगी आहे आणि तेवढा बिल्ट अप पुष्कळ होता. कारण गमोराला हे माहित नसते आणि माझ्यामते तो सिन चांगला effective झाला. आणि तसेही थेनॉस चे कॉमिक version असो किंवा फिल्म version, तो कोणावर प्रेम करू शकतो हेच शक्य वाटत नसल्यामुळे जेव्हा कळते कि तो गमोरावर प्रेम करतो तेव्हा त्याचे आणि गमोराचे emotions त्या सिनमध्ये चांगले वाटतात.
३) I agree with this one. कॉमिक मध्ये ब्लॅक ऑर्डर सर्वात घातक आणि almost invincible आहे. त्यातल्या त्यात फक्त ebony maw खूप शक्तिशाली दाखवला. पण थेनॉसने ऑर्डर दिल्याप्रमाणे एकही ब्लॅक ऑर्डर मेंबर एकही स्टोन आणू शकत नाही हे खटकले.
४)soul stone ची अजूनही कम्प्लेट दाखवली नाहीये कारण शेवटी थेनॉस ला गमोरा दिसते ती कॉमिक मध्ये दाखवल्याप्रमाणे soul stone मधल्या soul realm मुळेच. आणि एक fan theory अशी आहे की जे avengers मेले आहेत ते सर्व त्या soul stone मधेच असतील. ती स्टोरी next avengers मध्ये पूर्ण कळेल.
५)आपण परत विसरलात कि guardians part 1 मध्ये सांगितल्याप्रमाणे आणि कॉमिक नुसार सुद्धा थेनॉस हा सगळ्यात powerful being आहे तेव्हा त्याला आणि त्याच्या army ला nova corps काही difficult नाही. आणि वर सांगितल्याप्रमाणे डिस्नी कडे नोवा कॉर्पचे rights आहेत पण त्यांचे अजूनही Nova superhero character rights वर डिल्स चालू आहेत आणि तसेही जर आता मार्व्हल युनिव्हर्स मध्ये xander ग्रह थेनॉस ने उडवला असेल तर नोवा तसाही येणारच नाही.
एक कॉमन गोष्ट अशी आहे की हे मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स आहे, मार्व्हल कॉमिक युनिव्हर्स नाही, तेव्हा यात भरपूर गोष्टी modified आणि वेगळ्या असतील, जसे ब्लॅक ऑर्डर जर कॉमिक मध्ये खूप शक्तिशाली असतील तर जरुरी नाही की फिल्म्स मधेही तशीच असतील.
हे दोन्ही युनिव्हर्स वेगळे कसे हे Gwenpool कॉमिक मध्ये एकदा dr strange(कॉमिकमधला) एकदा आपल्या(खऱ्या) जगाला भेट देऊन मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स सुद्धा पाहतो असे दाखवले आहे.
धन्यवाद दत्तू हे सगळे डीटेल्स
धन्यवाद दत्तू हे सगळे डीटेल्स दिल्याबद्दल ! आता या बाफचा नोड नं लक्षात ठेवून संदर्भाला वापरतो. यातले दोनतीनच पाहिले आहेत (आयर्न मॅन, हल्क). स्पायडर मॅन पाहिला आहे पण तो २००२ चा. हा होम कमिंग वाला वेगळा दिसतोय. बॅटमॅन व तो डार्क नाइट ई यातले नाहीत असेही दिसते.
पु. लं. च्या बाळ शंकरची आठवण आली एकदम >> टोटली
वैभव - हो त्या दोन्ही कंपन्या
वैभव - हो त्या दोन्ही कंपन्या वेगळ्या आहेत याची कल्पना आहे. क्रॉसओव्हर वगैरे ची माहिती नव्हती.
यातली कोणतीही कॉमिक्स न वाचल्याने कोणतीही कॅरेक्टर्स माहीत नव्हती (स्पायडर मॅन वगैरे सोडले तर)
http://collider.com/mcu
http://collider.com/mcu-timeline-explained/#avengers-infinity-war
>>>नवीन Submitted by Vaibhav
>>>नवीन Submitted by Vaibhav Gilankar on 1 May, 2018 - 10:33
>>>२) सेप्टर(scepter) आणि ओर्ब (orb) हि स्टोन्स ची नाही तर स्टोन्स ज्यात contain केले होते त्याची नावं आहेत.
बरोबर, दत्तु यांनी स्टोन आणि कंटेनर अशी दोन्हीची नावे दिलेली आहेत. आधी कंटेनरचे नाव आणि पुढे कंसात स्टोनचे नाव.
सोल स्टोनला कंटेनर नाही कारण तो एक खास स्टोन आहे, रेड स्कल (पहिल्या कॅप्टन अमेरीका १ मधला व्हिलन जो इथे सोल स्टोन चा रखवालदार म्हणून अडकला आहे) चा एक डायलॉग आहे या स्टोन विषयी "it holds a special place among the other Infinity Stones, it has a certain kind of Wisdom." कारण सोल स्टोन हा फक्त स्टोन नाही, त्याला स्वतःची अशी इच्छाशक्ती आहे. इतर स्टोन्सप्रमाणे तो तुम्हाला हवे तसेच करेल याची खात्री देता येत नाही. स्टोनमधे तो ज्याच्याकडे आहे त्याच्या आत्म्यावर ताबा मिळवण्याची किंवा आत्म्यात बदल घडवण्याची ताकद सुद्धा आहे. तसेच ते एक पॉकेट डायमेंशन आहे जिथे आत्मे जाऊन अडकतात/रहातात.
शेवटच्या सीनमधे थॅनॉस पाण्यावर उभा राहून छोट्या गमोराशी बोलताना दाखवलाय ती सोल स्टोनची करामत असू शकते, कारण थॅनॉसने इतर स्टोन्सचा वापर केलेला दाखवला असला तरी या स्टोनचा वेगळा असा वापर केलेला दाखवलेला नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की जरी थॅनॉसने निम्मे विश्व मारण्याचा प्रयत्न केला असला तरी बहुतेक सोल स्टोनने त्यांना मरू न देता त्याच्या पॉकेट डायमेन्शन मधे ठेवलेलं असावं.
तसं नसेल तर मग अॅवेंजर्सना काळ मागे फिरवून सगळ्यांना परत आणावं लागेल, ज्यात प्रॉब्लेम हा आहे की त्यांना थॅनॉस बरोबर परत हाणामारी खेळावी लागेल.
>>>आपण परत विसरलात कि
>>>आपण परत विसरलात कि guardians part 1 मध्ये सांगितल्याप्रमाणे आणि कॉमिक नुसार सुद्धा थेनॉस हा सगळ्यात powerful being आहे तेव्हा त्याला आणि त्याच्या army ला nova corps काही difficult नाही. आणि वर सांगितल्याप्रमाणे डिस्नी कडे नोवा कॉर्पचे rights आहेत पण त्यांचे अजूनही Nova superhero character rights वर डिल्स चालू आहेत आणि तसेही जर आता मार्व्हल युनिव्हर्स मध्ये xander ग्रह थेनॉस ने उडवला असेल तर नोवा तसाही येणारच नाही.
नवीन Submitted by Vaibhav Gilankar on 1 May, 2018 - 10:37
काही मुद्द्यांवर लेट्स अॅग्री टू डिसअॅग्री... प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या पडतात त्यामुळे कुणाला चित्रपट खूप आवडेल तर कुणाला बर्यापैकी आवडेल, तर काहींना नाही आवडणार. मला चित्रपट चांगला वाटला आहे पण... ज्या लेवलची अपेक्षा होती ती मिळाली नाही इतकेच.
थॅनॉस मार्वल युनिवर्समधे सर्वात शक्तीमान नाही, सेलेस्टीअल त्याच्यापेक्षाही वर येतात. त्यांनी व्हॉल्युम १ मधे तो खूप शक्तीमान असल्याचं सांगितलं आहे आणि ते खरंच आहे. तो नोवा कॉर्प्सला हरवू शकतो का? नक्कीच. पण मला इतकंच म्हणायचं होतं की नोव्हा कॉर्प ही पृथ्वीपेक्षाही प्रगत अशा ग्रहाची संरक्षण सेना होती, त्यांना १ मिनीटाचे देखील फूटेज न मिळणे पटले नाही.
बाकी, थॅनॉस सगळा ग्रह उध्वस्त करत नाही, थोडे लोक ठेवतो नेहमी. मला तर वाटते त्याने सगळे अज्गार्डिअन्स देखील मारलेले नाहीत.
>>थॅनॉस मार्वल युनिवर्समधे
>>थॅनॉस मार्वल युनिवर्समधे सर्वात शक्तीमान नाही, सेलेस्टीअल त्याच्यापेक्षाही वर येतात. त्यांनी व्हॉल्युम १ मधे तो खूप शक्तीमान असल्याचं सांगितलं आहे आणि ते खरंच आहे. तो नोवा कॉर्प्सला हरवू शकतो का? नक्कीच. पण मला इतकंच म्हणायचं होतं की नोव्हा कॉर्प ही पृथ्वीपेक्षाही प्रगत अशा ग्रहाची संरक्षण सेना होती, त्यांना १ मिनीटाचे देखील फूटेज न मिळणे पटले नाही.>>
I don't know if you're talking about film or comic but थेनॉस फिल्ममध्ये तरी celestials शी भिडताना दाखवला नसल्यामुळे सांगू शकत नाही(obviously, त्याच्या एवढ्या वर्षांच्या विध्वंसात त्याने एकदा तरी celestialsना हरवले असेलच अस ते दाखवतीलच) आणि कॉमिक मध्ये पण celestials पेक्षाही शक्तिशाली आहे. फिल्ममध्ये पण नोवा कॉर्पस शी compare केलं तर definitely powerful आहेच त्यामुळे तो easily जिंकला असेल. But I agree की त्याची Xander वरची battle दाखवायला हवी होती.
>>बाकी, थॅनॉस सगळा ग्रह
>>बाकी, थॅनॉस सगळा ग्रह उध्वस्त करत नाही, थोडे लोक ठेवतो नेहमी. मला तर वाटते त्याने सगळे अज्गार्डिअन्स देखील मारलेले नाहीत.>>
शेवटचे अज्गार्डिअन्स त्या बोटवरच होते जी फिल्मच्या सुरुवातीलाच त्याने उडवून दिली.
लोकांना एक कळलेले नाही की
लोकांना एक कळलेले नाही की यातले शेवटचे कोणतेच characters कायमचे मेलेले नाहीत कारण त्यांच्या फिल्म्सचे sequels अजूनही बनत आहे. तेव्हा ज्यांना असे वाटत आहे की MCU च्या फिल्म्स conclude होतील त्यांनी chill मारा कारण कालच kevin feige ने सांगितल्या प्रमाणे त्यांचे 2025 पर्यंतचे schedule कालच ठरवले आहे आणि पुढचे पण लवकरच ठरेल.
Mala evadhe paise deun sad
Mala evadhe paise deun sad ending picture dakhavlya baddal bhramniras jhala.
बरं झालं
बरं झालं यालाच अच्छे दिन म्हणतात..
आर्यन मॅन - राजेश खट्टर(शाहीद
आर्यन मॅन - राजेश खट्टर(शाहीद कपूरचे सावत्र वडिल)
थानोस - निनाद कामत
कॅप्टन अमेरिका - जॉन सेनगुप्ता
स्पायडर मॅन - वैभव ठक्कर
ब्लॅक पँथर - विराज अधव
थॉर - गौरव चोप्रा
ब्लॅक विडो - नेश्मा चेंबुरकर
हल्क - समय राज ठक्कर
कर्नल निकोलस- शक्ती सिंह
स्टार लॉर्ड - रोहित रॉय
डॉ. स्ट्रेंज - सप्तर्षी घोष
व्हिजन - अतुल कपूर
डबिंग आर्टीस्ट
दत्तु, तुम्ही दिलेल्या
दत्तु, तुम्ही दिलेल्या चित्रपटाच्या लिस्टीतले सगळेच चित्रपट माझ्या लेकीने पाहिलेत.
अवेंजर्स फॅन.
<<<<<<<<कोण हिरो कुठल्या सिरीज मधला आहे, त्याची स्पेशालिटी काय आहे, कोण ओरिजनल अव्हेनजर्स आहेत कोण प्रमोटेड आहेत.
त्याचे इतके अफाट ज्ञान पाहून न्यूनगंड म्हणतात तो आला एकदम>>>>>>>> हौ ना. माझ्या लेकीला पण अफाट ज्ञान आहे.
मी ही मग उगीच तिला चिडवायला म्हणून "अरे कौन है ये लोग?? और रहते कहा है?? असं म्हणाले तर कसली वैतागली माझ्यावर.
अर्धे अॅसगार्डियन यांना
अर्धे अॅसगार्डियन यांना मारले आहे. थॉर रॉकेटला सांगतो.
Pages