![natural icecream](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2020/09/27/natural%20icecream.jpg)
साहित्यः
दुध - १ वाटी/कप,
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप,
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप,
आवडत्या फळाचा गर/पल्प - १ वाटी/कप,
साखर - चवीनुसार,
वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.
वैशिष्ट्य : पूर्ण कृतीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नसल्याने आइस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होत नाहित व चव अगदी नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागते.
टिप : फळाच्या गरामध्ये पाण्याचा अंश असलेली फळे (संत्र, मोसंब, कलिंगड इ.) घेउ नयेत. घट्ट गराची फळे (आंबा, सीताफळ, चिकु, स्ट्रॉबेरी, पपई) घ्यावीत.
आला का धागा वर? सॅारी रश्मी
आला का धागा वर? सॅारी रश्मी तुला उत्तर देता आल नाही. दक्षुला धन्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी आज या पद्धतीने चिकू चे
मी आज या पद्धतीने चिकू चे केले ...खूप मस्त झालेय...अप्रतिम चव आलीये. सर्वाना आवडले घरी. खूप खूप थँक्स मुग्धा
एक अगदीच बेसिक प्रश्न -
एक अगदीच बेसिक प्रश्न - icecream सेट करायला ठेवल्यावर त्यावर झाकण ठेवायचं का? की उघडं ठेवायचं?
काल शेवटी या कृतीने
काल शेवटी या कृतीने आईसक्रिम करायला मुहूर्त मिळाला. मस्त झालेय आईसक्रिम. धन्यवाद मुग्धा.
१/२ टीस्पून वॅनिला, २ १/२ टे. स्पून कोको, आणि १/४ कप चॉकलेट चिप्स , १/२ कपापेक्षा थोडी जास्त साखर, स्टोअर ब्रॅन्ड नॉन फॅट मिल्क पावडर, होल मिल्क , आणि हेवी विपिंग क्रिम वापरले .
मी गेल्या वीकेंडला करुन
मी गेल्या वीकेंडला करुन बघितले आइसक्रीम ही रेसिपी वापरुन
![2018-05-27_14-07-01-790.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4843/2018-05-27_14-07-01-790.jpg)
![2018-05-27_23-23-20-730.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4843/2018-05-27_23-23-20-730.jpg)
हापूसच्या फोडी घालून मॅंगो फ्लेव्हरचे केले होते!
चवीला छानच झाले होते पण का कुणास ठाउक मधूनमधून बर्फ लागत होता!
चितळ्यांच्या दुधात पाणी असेल का?
फोटो डकवतोय:
ताडगोळा आईस्क्रीम (कार्नेशन
ताडगोळा आईस्क्रीम (कार्नेशन मिल्क पावडर, हेवी व्हिपिंग क्रीम, दूध, कॅन्ड ताडगोळे, अंदाजे साखर)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ताडगोळे फ्लेवर कसा लागेल काय की म्हणून बॅकप म्हणून मँगो आईस्क्रीम केले. बट नो वरीज...
https://www.facebook.com
https://www.facebook.com/groups/204761046648876/permalink/660266867764956/
या fb page वर वरील पाककृती कॉपी पेस्ट केलेली दिसली without credits . मधुक्टली please check
आज पहिल्यांदा मुहूर्त लागला
आज पहिल्यांदा मुहूर्त लागला हे आईस्क्रीम करायचा. बटरस्कॉच-चॉकलेट फ्लेवर केला. मस्त झालं होतं आईस्क्रीम. घरी बनवलं आहे यावर विश्वासच बसेना नवर्याचा.
आमच्या इथे थंडी असल्यामुळे
आमच्या इथे थंडी असल्यामुळे (उणे १०-१५ च्या दरम्यान) बनवून पाहण्याची संधी मिळाली नाही अजून...पण एकुणात पुणे-मुंबई इथे उन्हाळ्याची चाहूल जाणवू लागली आहे आणि म्हणून महाराजा हा धागा वर यायचीपण वेळ झाली आहे...माबोकरानो/करीनो करा विविध चवीची आईसक्रीम बनवायला सुरु आणि टाका फोटू
माझं स्ट्रॉबेरी आइस्क्रीम
माझं स्ट्रॉबेरी आइस्क्रीम करून झालं आठवड्यात. आता ओरिओ फ्लेवर करून बघणार आहे.
ही recepie वापरून मी
ही recepie वापरून मी द्राक्षाचं आईस्क्रिम बनवलं... माझ्या साडेचार वर्षाच्या मुलीने वाटीभर आईस्क्रिम खाताना कमीतकमी दहा वेळा 'मम्मा मस्त झालंय' असं म्हटलं... याहून मोठी पावती काय असेल? ... खरंच छान आणि सोपी Receipe... आणि विशेष म्हणजे लवकर सेट होतं आईस्क्रिम.. मी फोटो पण काढलाय पण इथे कसा द्यायचा ते नाही माहित..
काळी द्राक्ष की गोरी.
काळी द्राक्ष की गोरी. द्राक्षाची सालं काढून घेतली का.
वाह योग्य वेळी धागा वर आला.
वाह योग्य वेळी धागा वर आला. फ्रेश स्ट्रॉबेरीज आहेत घरात आजच करुन पाहते.
काळी द्राक्ष की गोरी.
काळी द्राक्ष की गोरी. द्राक्षाची सालं काढून घेतली का.>>>काळी नाही हिरवीच होती घरी.. सालं नाही काढली.. बारीक फोडी करून घेतल्या.. अर्ध्या फोडी blend करताना टाकल्या अन् अर्ध्या पूर्ण मिक्श्चर तयार झाल्यावर... आजही कोणाचाही फोन आला तरी मुलीचं आईस्क्रीम पुराण सुरू आहे... इतकं आवडलं तिला..
ह्या रेसिपीनी पान आईसक्रिम
ह्या रेसिपीनी पान आईसक्रिम होईल का? कोणी केलय का? असेल तर प्लिज रेसिपी द्या.
स्ट्रॉबेरीज आहेत घरात पण खूप
स्ट्रॉबेरीज आहेत घरात पण खूप आंबट आहेत, चांगलं लागेल की नाही माहित नाही म्हणून नाही केलं.
स्ट्रॉबेरीज आहेत घरात पण खूप
स्ट्रॉबेरीज आहेत घरात पण खूप आंबट आहेत, चांगलं लागेल की नाही माहित नाही म्हणून नाही केलं.
>>>स्ट्रॉबेरीज बारीक करून साखर घालून जरा जॅमसारखी कन्सिस्टन्सी येइतो शिजवा. दूध, साय आणि मिल्क पावडर एकत्र करून त्यात हवा तितका गोडपणा येइतो वरचा जॅम घाला.
धन्यवाद सहेली. करून बघेन.
धन्यवाद सहेली. करून बघेन.
@सहेली - मस्त सूचना आहे.
@सहेली - मस्त सूचना आहे. मीही करुन बघेनच.
Tender coconut
Tender coconut
चव अप्रतिम आलीये.
चव अप्रतिम आलीये.
थोडा थोडा बर्फ लागतोय.
Amul fresh cream use केली त्या ऐवजी full fat cream/ heavy cream use करायला हवी.
शिवाय दूध हि full fat हवं.
या कृतीने काल चिकू आइस्क्रीम
या कृतीने काल चिकू आइस्क्रीम करून पाहिलं, मस्त झालं होतं. सगळ्यांना आवडलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या सोप्या आणि मस्त कृतीसाठी धन्यवाद !!
ता.क - बराच वेळा प्रयत्न करूनही फोटो अपलोड होत नाहीत माझे ( कुठल्याच धाग्यावर)... सगळी प्रोसेस पूर्ण झाली तरी end result येत नाही फोटोचा, मी काय क्रू ????
करोना गेल्यावर खा.
करोना गेल्यावर खा.
आता सूप , हळद पाणी , चहा वगैरे गरम प्या
खरंच थंड काही खायला प्यायला
खरंच थंड काही खायला प्यायला नको सध्या
ac सुद्धा वापरायला नको.
Mastach recipes, saglyanche
Mastach recipes, saglyanche ice creams baghun ata rahavat nahie! Madhe me without dudh ani cream ice cream kelahota, tyala ice cream mhanava ka mahit nahi! 2 Bananas cut karun freeze kele, tyat Chiku che freeze kelela tukde, agdi navala dudh ani madh asa sagलa grind kela, smooth paste bane parynt grind karun freeze kela, 1-2 tasat diet ice cream tayar
![Banana icecream2.png](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u71821/Banana%20icecream2.png)
वॉव.. मस्त आहे हे.. कृती पण
वॉव.. मस्त आहे हे.. कृती पण सोपी आहे. मागच्या वर्षी केले होते घरी.. आंबा, चॉकलेट हेझलनट, चॉकलेट कॉपी, वँनिला, रोज इ.
आता करोना गेलाकी करेन. मुलं वेड्यासारखी खातात.. नकोच आत्ता.
TI याला सॉर्बे (sorbet)
TI याला सॉर्बे (sorbet) म्हणतात वाटत.. नो मिल्क नो क्रिम.. फक्त फ्रुट प्युरी आणि बर्फ.
तुम्ही सगळे आता आईस्क्रीम
तुम्ही सगळे आता आईस्क्रीम खायला का नको म्हणत आहात?
Piku, Sorbet madhe jasta
Piku, Sorbet madhe jasta karun citrus fruits astat asa mala watta, kiva berries, Banana chiku apple asha falancha sorbet mhanava ka nahi asa mala pan prashna padlay, ani he barfal lagat nahi, creamy texture yetay mhanun hi hyala creamy sorbet mhanuya! gharche hyala diet ice cream mhantat!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Piku, Sorbet madhe jasta
Piku, Sorbet madhe jasta karun citrus fruits astat asa mala watta, kiva berries, Banana chiku apple asha falancha sorbet mhanava ka nahi asa mala pan prashna padlay, ani he barfal lagat nahi, creamy texture yetay mhanun hi hyala creamy sorbet mhanuya! gharche hyala diet ice cream mhantat!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages